प्रेरणा अर्थात कविवर्य मोडक यांचा प्रवास
पळवाट म्हणाली, "आलास का!
अडाणी आहेसच
ठाउक नाही उत्तर तुला.
प्रश्नही समजलेला नसतोच,
ते येतात तेव्हा
आरोप-प्रत्यारोपांचा मारा सुरू होतो,
मुळमार्गाकडं दुर्लक्ष होतं..."
मूळप्रश्नाच भान राखणं
हे तर उमगण, अन्यथा
सारेच प्रतिसादी महाधूर्त!
"महाधूर्तांच" बरं असतं,
वारा बदलतो तसे तेही
पण तुझ तसं नसतं
म्हणून मी इथेच असते.
अडाणीपणा करताना
पाय फसतील म्हणून सांगतेय..."
लिहताना केव्हा तरी
भान सुटलं, वाचा भरकटली
आता उपायाखाली केवळ
माती अन भीतीच आहे
मी पळतोच आहे...
'नाना फडणीसाचा पाय'
दागिना मिरवत!
प्रतिक्रिया
15 Oct 2009 - 2:41 pm | टारझन
सहज राव ...
तुम्ही इकडे ? :)
- सावज
15 Oct 2009 - 2:46 pm | गणपा
आ रा रा रा अजुन एकला विडंबनाचा डास चावला ;)
बाकी ईडंबन झ्याक.
15 Oct 2009 - 2:46 pm | गणपा
आ रा रा रा अजुन एकला विडंबनाचा डास चावला ;)
बाकी ईडंबन झ्याक.
15 Oct 2009 - 3:13 pm | श्रावण मोडक
चालतोय... आपलं वाचतोय... :)
15 Oct 2009 - 3:16 pm | अवलिया
ठीक प्रयत्न. सुधारणेस किंचित वाव आहे. ब-याच ठिकाणी खुपच सुगम तर काही ठिकाणी दुर्बोधता येते ती सहजच आहे असे मानायला हरकत नाही. असेच लिहित राहिलात तर मला काहीही हरकत नाहि.
****
वरची होती वैचारिक प्रतिक्रिया :)
बाकी बेस्ट... त्या मोडकांना जास्त छळु नका रे.. जातील बर का पळुन.. ;)
नाही तर त्या महान लेखिकेप्रमाणे लेखन बंद करतील.. :D
ओ मोडक...मोडक मोडक ... असं नाही ना करणार... ?? :?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
15 Oct 2009 - 3:46 pm | सुनील
उत्तम प्रयत्न.
पुलेशु
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
15 Oct 2009 - 5:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
पोस्टहापिसातून बोर्डावर आलात हे उत्तम! विडंबन(?) आवडलं (कळलं असं मान्य केलं तर!).
अदिती
15 Oct 2009 - 5:15 pm | दशानन
असेच म्हणतो... ;)
15 Oct 2009 - 6:18 pm | धमाल मुलगा
ढिंच्याक! :)
सहजकाका आगे बढो :)
(तिरप्या प्रतिसादाने लेखाचं सौंदर्य वाढतं म्हणतात म्हणुन आमचाही प्रतिसाद तिरपाच ठेवलाय ;) )
15 Oct 2009 - 6:24 pm | निखिल देशपांडे
सहज काकंचे सहज विडंबन
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
15 Oct 2009 - 6:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>पोस्टहापिसातून बोर्डावर आलात हे उत्तम!
ये लगाया सिक्सर...!!! :) (कवी पोष्टहापिसातून बाहेर आले पाहिजेत याच्याशी सहमत )
बाकी कवितेला (कवीला नव्हे) काही सांगायचे आहे, असे वाटले. पण, नेमके काय सांगायचे आहे याबाबतीत कविता वाचतांना 'गुढ शब्दार्थातून' (जसे, प्रवास, पळवाट,महाधुर्त,नाना फडणीसाचा पाय, भान सुटणे,वाचा भरकटणे) वाचकांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. अर्थात कवी त्याच्या भावना व्यक्त करण्यात तसाही सक्षम असल्याने कवीतेत सक्षम विचार आहेच, तोच विचार मात्र तितक्या दमदारपणे वाचकांपर्यंत पोहचतो का ? याबाबतीत वाचक म्हणून मला जरा शंका आहे.
कवीच्या पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
(सहजचा मित्र )
16 Oct 2009 - 11:27 pm | चित्रा
छान!
>अर्थात कवी त्याच्या भावना व्यक्त करण्यात तसाही सक्षम असल्याने कवीतेत सक्षम विचार आहेच, तोच विचार मात्र तितक्या दमदारपणे वाचकांपर्यंत पोहचतो का ? याबाबतीत वाचक म्हणून मला जरा शंका आहे.
:)
15 Oct 2009 - 5:08 pm | llपुण्याचे पेशवेll
सहजराव आले फॉर्मात. :) दिवाळी बोनस जोरात दिसतायत.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
19 Oct 2009 - 4:12 pm | प्रमोद देव
षटकार!!!!!!!!
19 Oct 2009 - 4:13 pm | विनायक प्रभू
आणखी एक नविन दमाचा खेळाडू.