एक फॅशन : दिपावलीच्या शुभेच्छा

llपुण्याचे पेशवेll's picture
llपुण्याचे पेशवेll in जनातलं, मनातलं
15 Oct 2009 - 9:45 am

प्रथम सर्वाना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

(फटाकेप्रेमी)पुण्याचे पेशवे

(पणतीप्रेमी)पुण्याचे पेशवे

असो. तर मुख्य मुद्दा हा की. दिवाळीच्या शुभेच्छांचा महापूर आला आहे. आता याला कारण म्हणजे तशी फॅशनच आहे. मिपावरील आमच्या उण्यापुर्‍या दिड वर्षाच्या वावरात आम्ही काही फॅशन मिपावर येऊन गेलेल्या आणि काही अजूनही असलेल्या ज्यात आम्ही स्वतः हौशीने उतरलो होतो. आजची दिवाळीच्या शुभेच्छांचा पाऊस बघून आम्हाला फॅशनवर लिहावेसे वाटले.

शुभेच्छा देण्याची फॅशन
शुभेच्छा घेण्याची फॅशन
जिकडे पहावे तिकडे अवघी वाहे फॅशन
इकडे एक फॅशन तिकडे एक फॅशन
ज्याच्या त्याच्या वकूबाने ज्याची त्याची फॅशन

कौल पाडण्याची फॅशन कौल फोडण्याची फॅशन
चारोळ्या लिहीता लिहीता कविता पाडण्याची फॅशन
कविता लिहीता लिहीता विडंबनाची फॅशन
दवा-दारू ज्यादा होई विडंबन निषेधाची फॅशन

गजलांची फॅशन कधी वृत्तांची फॅशन
जोतिषाला लाथ बसता निषेधाची फॅशन
स्वदेशाची फॅशन कधी परदेशाची फॅशन
Resident * NRI करता करता हिरव्या नोटांची फॅशन

वाढदिवसांची फॅशन कधी लग्नाची फॅशन
अपत्यप्राप्ती झाल्यानंतर अभिनंदनाची फॅशन
जोतिषाची फॅशन कधी गूढ शक्तींची फॅशन
श्रद्धाश्राद्ध करताना मूढ उत्तरांची फॅशन

डांबिसाखाँची फॅशन कधी एलियनाची फॅशन
खोबार खोबार होता होता खोब्र्याची फॅशन
सेनेची फॅशन कधी काँग्रेसची फॅशन
राज राज म्हणताना अर्जुन होण्याची फॅशन

रामाची फॅशन कधी गणपतीची फॅशन
मोदक खाता खाता हलीम खाण्याची फॅशन
अश्रद्धेची फॅशन देव तुडवायची फॅशन
'शब्द संपले' म्हणून डोके झुकवायची फॅशन

पाकृची फॅशन कधी कॉकटेल ची फॅशन
तिखट दारू पिताना व्यनि करण्याची फॅशन
धागे उडण्याची फॅशन फाट्यावर मारण्याची फॅशन
भीमटोले हाणताना विरजण लावण्याची फॅशन

लाळ गळण्याची फॅशन हसून लोळण्याची फॅशन
मॉनिटरवर कॉफी उडवून फुटण्याची फॅशन
खपण्याची फॅशन कधी वारण्याची फॅशन
जुन्या गोष्टी आठवून हळवे होण्याची फॅशन

कूटप्रश्नांची फॅशन कधी समुपदेशनाची फॅशन
दोन घोट घेता घेता दाणे चरण्याची फॅशन
निषेधाची फॅशन कधी लोकशाहीची फॅशन
सांगोपांग चर्चा करत वैचारिक लिहीण्याची फॅशन

पुरोगामी फॅशन कधी प्रतिगामी फॅशन
बाया पाहून चळताना पुरुष पाहण्याची फॅशन
क्रातिकार्‍यांची फॅशन कधी गांधींची फॅशन
तात्यारावांची फॅशन कधी आंबेडकरांची फॅशन

धागे काढण्याची फॅशन जाहिरात करण्याची फॅशन
प्रतिसादलोलूप होऊन काड्या टाकण्याची फॅशन
प्लीज प्लीज म्हणून प्रतिसाद मिळवायची फॅशन
प्रतिसादकाना वंदून धागा वर आणण्याची फॅशन

जाता जाता एक बोलण्याची फॅशन
अवांतरातून वार करण्याची फॅशन
खुद के साथ बाता करण्याची फॅशन
लक्ष ठेऊन चांदणी देण्याची फॅशन

पाहून पटे सत्य एकच फॅशन
करावे जसे चालू असेल फॅशन
विचाराने कधी करा एक फॅशन
करावी कधी अविचारानेही फॅशन

वावरमत

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Oct 2009 - 9:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

गुरूवार फळला म्हणायचा का बुधवार संध्याकाळ?
पेशवे तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!! ;-)

(फॅशनला घाबरणारी) अदिती

श्रावण मोडक's picture

15 Oct 2009 - 9:53 am | श्रावण मोडक

+१

निखिल देशपांडे's picture

15 Oct 2009 - 9:56 am | निखिल देशपांडे

कालचा बुधवार शेवटी...
आमच्या पण वाढदिवसाच्या शुबेच्छा!!!!

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

विजुभाऊ's picture

15 Oct 2009 - 10:14 am | विजुभाऊ

बुधवारी कवितांची फॅशन
दोन शब्दी कौलांची फॅशन
विरजणाची फॅशन
सामुपदेशनाची फॅशन
रूपकाची फॅशन
शेअर बाजारची फॅशन
तस्ले ल्हिले असे म्ह्नाय्ची फॅश्न्न
हे असले ल्ह्यायचिही फॅशन

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

टारझन's picture

15 Oct 2009 - 9:51 am | टारझन

प्रतिसाद द्यायची फॅशन !!

-(एफ.टी.व्ही. प्रेमी) टारोबा मॉडल

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Oct 2009 - 9:52 am | llपुण्याचे पेशवेll

आयला "प्लीज प्लीज म्हणून प्रतिसाद मिळवायची फॅश" हे न करताच प्रतिसाद. अहो भाग्यम्!
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

मस्त कलंदर's picture

15 Oct 2009 - 9:54 am | मस्त कलंदर

आणखी फॅशन्स राहिल्या ना लिहायच्या इथे....
बुधवार नि गुरूवारच्या कवितांची!!!!!
खव उचकपाचक करण्याची!!!!! :D

बाकी.... मिपा फॅशन्सचा अभ्यास दांडगा आहे हो..... :)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

विकास's picture

15 Oct 2009 - 9:56 am | विकास

तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा!

बाकी खालील ओळ थोडी बदलाविशी वाटते...

स्वदेशाची फॅशन कधी परदेशाची फॅशन
Resident * NRI करता करता हिरव्या नोटांची फॅशन

या ऐवजी:

स्वदेशाची फॅशन कधी परदेशाची फॅशन
Resident * NRI म्हणत "अ"-निवासींना झोडण्याची फॅशन ;)

चला आता पळतो....

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Oct 2009 - 9:58 am | llपुण्याचे पेशवेll

खरे आहे. पण अजून बर्‍याच फॅशन बाकी आहेत. सर्व लिहायच्या तर कविता क्रमशः लिहावी लागेल. अर्थात क्रमशः ही सुधा एक फॅशनच आहे.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

निखिल देशपांडे's picture

15 Oct 2009 - 10:02 am | निखिल देशपांडे

+१ सहमत ची फॅशन
तिरक्या प्रतिसादाची फॅशन

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

मदनबाण's picture

15 Oct 2009 - 10:01 am | मदनबाण

व्वा... आपला हल्लीचा वावर पाहुन मत द्यायची फॅशन आवडली... ;)

(ट्रेंडी)
मदनबाण.....

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |

विसोबा खेचर's picture

15 Oct 2009 - 10:04 am | विसोबा खेचर

छान रे! :)

आपला,
(फॅशनेबल) तात्या.

अवलिया's picture

15 Oct 2009 - 11:08 am | अवलिया

अच्छा अशी असते होय ... फॅशन.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

संजीव नाईक's picture

15 Oct 2009 - 3:55 pm | संजीव नाईक

दिवाळीच्या शुभेच्छा!
पेशवे आता जरा स्वामी कडे सुध्दा बघा.
नुसते फॅशन करत राहु नका.
संजीव

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Oct 2009 - 4:44 pm | llपुण्याचे पेशवेll

हो का? बरं बरं !
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

सूहास's picture

15 Oct 2009 - 4:47 pm | सूहास (not verified)

फॅशन ची फॅशन करत रहायची फॅशन...

सू हा स...
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5111067.cms) नो-बेल ओबामा

अनामिका's picture

16 Oct 2009 - 4:22 pm | अनामिका

पेशवे!
जन्मदिवसाच्या व दिपावलीच्या मनःपुर्वक शुभेच्छा!
मी शुभेच्छा निव्वळ फॅशन म्हणुन दिलेल्या नाहीत. :>
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।