एक फॅशन : दिपावलीच्या शुभेच्छा
लेखनप्रकार
प्रथम सर्वाना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
(फटाकेप्रेमी)पुण्याचे पेशवे
(पणतीप्रेमी)पुण्याचे पेशवे
असो. तर मुख्य मुद्दा हा की. दिवाळीच्या शुभेच्छांचा महापूर आला आहे. आता याला कारण म्हणजे तशी फॅशनच आहे. मिपावरील आमच्या उण्यापुर्या दिड वर्षाच्या वावरात आम्ही काही फॅशन मिपावर येऊन गेलेल्या आणि काही अजूनही असलेल्या ज्यात आम्ही स्वतः हौशीने उतरलो होतो. आजची दिवाळीच्या शुभेच्छांचा पाऊस बघून आम्हाला फॅशनवर लिहावेसे वाटले.
शुभेच्छा देण्याची फॅशन
शुभेच्छा घेण्याची फॅशन
जिकडे पहावे तिकडे अवघी वाहे फॅशन
इकडे एक फॅशन तिकडे एक फॅशन
ज्याच्या त्याच्या वकूबाने ज्याची त्याची फॅशन
कौल पाडण्याची फॅशन कौल फोडण्याची फॅशन
चारोळ्या लिहीता लिहीता कविता पाडण्याची फॅशन
कविता लिहीता लिहीता विडंबनाची फॅशन
दवा-दारू ज्यादा होई विडंबन निषेधाची फॅशन
गजलांची फॅशन कधी वृत्तांची फॅशन
जोतिषाला लाथ बसता निषेधाची फॅशन
स्वदेशाची फॅशन कधी परदेशाची फॅशन
Resident * NRI करता करता हिरव्या नोटांची फॅशन
वाढदिवसांची फॅशन कधी लग्नाची फॅशन
अपत्यप्राप्ती झाल्यानंतर अभिनंदनाची फॅशन
जोतिषाची फॅशन कधी गूढ शक्तींची फॅशन
श्रद्धाश्राद्ध करताना मूढ उत्तरांची फॅशन
डांबिसाखाँची फॅशन कधी एलियनाची फॅशन
खोबार खोबार होता होता खोब्र्याची फॅशन
सेनेची फॅशन कधी काँग्रेसची फॅशन
राज राज म्हणताना अर्जुन होण्याची फॅशन
रामाची फॅशन कधी गणपतीची फॅशन
मोदक खाता खाता हलीम खाण्याची फॅशन
अश्रद्धेची फॅशन देव तुडवायची फॅशन
'शब्द संपले' म्हणून डोके झुकवायची फॅशन
पाकृची फॅशन कधी कॉकटेल ची फॅशन
तिखट दारू पिताना व्यनि करण्याची फॅशन
धागे उडण्याची फॅशन फाट्यावर मारण्याची फॅशन
भीमटोले हाणताना विरजण लावण्याची फॅशन
लाळ गळण्याची फॅशन हसून लोळण्याची फॅशन
मॉनिटरवर कॉफी उडवून फुटण्याची फॅशन
खपण्याची फॅशन कधी वारण्याची फॅशन
जुन्या गोष्टी आठवून हळवे होण्याची फॅशन
कूटप्रश्नांची फॅशन कधी समुपदेशनाची फॅशन
दोन घोट घेता घेता दाणे चरण्याची फॅशन
निषेधाची फॅशन कधी लोकशाहीची फॅशन
सांगोपांग चर्चा करत वैचारिक लिहीण्याची फॅशन
पुरोगामी फॅशन कधी प्रतिगामी फॅशन
बाया पाहून चळताना पुरुष पाहण्याची फॅशन
क्रातिकार्यांची फॅशन कधी गांधींची फॅशन
तात्यारावांची फॅशन कधी आंबेडकरांची फॅशन
धागे काढण्याची फॅशन जाहिरात करण्याची फॅशन
प्रतिसादलोलूप होऊन काड्या टाकण्याची फॅशन
प्लीज प्लीज म्हणून प्रतिसाद मिळवायची फॅशन
प्रतिसादकाना वंदून धागा वर आणण्याची फॅशन
जाता जाता एक बोलण्याची फॅशन
अवांतरातून वार करण्याची फॅशन
खुद के साथ बाता करण्याची फॅशन
लक्ष ठेऊन चांदणी देण्याची फॅशन
पाहून पटे सत्य एकच फॅशन
करावे जसे चालू असेल फॅशन
विचाराने कधी करा एक फॅशन
करावी कधी अविचारानेही फॅशन

वाचने
6148
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
गुरूवार
In reply to गुरूवार by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to गुरूवार by ३_१४ विक्षिप्त अदिती
कालचा
In reply to गुरूवार by ३_१४ विक्षिप्त अदिती
बुधवारी
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by टारझन
आयला
आणखी फॅशन्स.....
छान!
In reply to छान! by विकास
क्रमशः
In reply to क्रमशः by llपुण्याचे पेशवेll
+१ सहमत
व्वा... आपला
छान रे!
अच्छा अशी
दिवाळीच्य
In reply to दिवाळीच्य by संजीव नाईक
हो का? बरं
फॅशन ची
शुभेच्छा!!!!!!!!!!!!!!