तू सांगितलंस म्हणून
मेकॅनिक्स् चं प्रकरण समजून घेताना
फोर्सेसचे कम्पोनन्ट्स् लिहू लागलो तेव्हा...
तेव्हा म्हणालीस,
एफ् साइन् थिटा, एफ् कॉस् थिटाच्या
या प्रकरणात पडतोसच कशाला?
'प्रकरण' दोघांसाठी असतं,
अन् मेकॅनिक्स् फक्त मार्क मिळविण्यासाठी
प्रकरणाची जात एकच - लफडं हीच
लफडं करण्याची वेळ आली
तेव्हा हेच शब्द माझ्यावर आघात ठरले
कारण तुझ्या प्रकरणात नाव भलत्याचंच होतं
माझा आधारच काढून घेणारं!
***
गेल्या वार्षिक परीक्षेत
मी बोंबललो होतो
पुन्हा वार्षिक परीक्षा आलीय...
आता पास व्हायचंच आहे
मागे खाल्लेली गटांगळी विसरण्याचा
खटाटोप तरी करावाच लागेल, कारण
पास होण्याचं एक स्वप्न त्यातलंच!
तू आपटली असशीलच! सपशेल, नेहमीसारखीच
मीही आपटलो!! एटीकेटीच्या वर्षावात, दणदणीत
होणार्या प्लेसमेन्ट्सची भीती छातीत साठवून घेत!
पोट भरण्यासाठी नोकरी तर
आता मलाच शोधायची आहे
प्रकरणाच्या - लफड्याच्या - तुझ्या व्याख्येत
ती कुठे नसेलच!
प्रतिक्रिया
13 Oct 2009 - 2:00 am | नंदन
वास्तववादी विडंबन :). सोमवारी हपिसाला दोष देत कालिजातले दिवस आठवण्याचा मूड असताना तेव्हाही विद्यार्थी'दशा' कशी होती याची पुन्हा आठवण करून देणारी ;)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
13 Oct 2009 - 2:01 am | चतुरंग
लफडेबाज दाद आवडली! ;)
चतुरंग
13 Oct 2009 - 2:01 am | श्रावण मोडक
डिप्लोमाला असताना ट्रिगॉनॉमेट्रीनं केलेला छळ आठवला. तिथं ज्या दांड्या उडून आपटलो तेही आठवलं. ;)
बेला, सूक्ष्म बदलही मार्मीक केलात. :)
13 Oct 2009 - 2:42 am | सुवर्णमयी
शिकरणानंतर प्रकरण आले वा..
13 Oct 2009 - 6:48 am | अवलिया
आरतिच्या... तरीच.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
13 Oct 2009 - 7:18 am | प्रशांत उदय मनोहर
आपला,
(नॉस्टाल्जिक) प्रशांत
---------
फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे.
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
13 Oct 2009 - 9:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त!
अदिती