काल तीला भेटणार होतो...पण ऑफिसमधे काम आल्याने बाईसाहेब काही भेटायला येउ शकल्या नाहीत...बसल्या बसल्या खालील कविता सुचली..
त्या दिवशी होती सकाळ
कुंद ढगांनी भरलेली |
ओले केस घेऊन न्हालेली तू
बस साठी थांबलेली ||
वाटलं तुझ्या ओल्या केसातून
फिरावं वारा बनून |
काळजाची धकधक वाढली
तुझ्या गालावरची खळी पाहून ||
तुझ्या त्या डोळ्यांच्या समुद्रात
मारावी वाटतेय डुबकी |
काढलेल्या तुझ्या आठवणींनी
लागते का गं रोज उचकी ||
आजकाल तुझं दिसणं
झालय आमवस्या पौर्णिमा |
वेडा करतो गं तुझ्या गालावरचा
तो कातील रक्तीमा ||
तू नसलीस जवळ की
मन भटकतं माझं रानी-वनी |
विश्वास ठेव माझ्यावर
तूच बसलीय गं माझ्या मनी ||
प्रतिक्रिया
12 Oct 2009 - 6:34 am | अवलिया
अवघडच दिसतंय प्रकरण.
लवकर काय ते सोक्ष मोक्ष लाव बाबा...
वाटल्यास कूणा जाणकाराची मदत घे... :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
12 Oct 2009 - 8:44 am | दशानन
+१
वाईट अवस्था रे ही.... जेव्हा चांगला धडधाकट व्यक्ती कविता करु लागतो... ;)
सुधरा आता...
बाकी कविते बद्दल काय लिहू..... प्रेमवीरांची सगळ्याच गोष्टी जगावेगळ्या !
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
12 Oct 2009 - 1:13 pm | प्रभो
राजे, नान्या तुमच्या प्रतिसादाबद्दल आणी सल्ल्यांबद्दल आभार...
@राजे : जेव्हा चांगला धडधाकट व्यक्ती कविता करु लागतो...
यातून तुला म्हणायच काय???
--प्रभो
12 Oct 2009 - 5:35 pm | दशानन
>>यातून तुला म्हणायच काय???
अरे रे... मेंदुचा समजण्याचा हिस्सा पण तिच्याकडेच गहाण पडला की काय ;)
12 Oct 2009 - 5:41 pm | प्रभो
पण काय धडधाकट माणसे कविता करू शकत नाहीत का????
का धडधाकट माणसात काव्यव्यंग असते.. ?? =)) (असू ही शकेल..आपल्याला काय माहीत नाय..डोका चालत नाय आजकाल..)
(धडधाकटकट)प्रभो
12 Oct 2009 - 5:42 pm | सूहास (not verified)
पण काय धडधाकट माणसे कविता करू शकत नाहीत का????>>>
हो ना ,टार्याने कविंताफटाकड्यांची १०००० ची माळ लावली आहे, फक्त आग लावायची बाकी आहे...
मॅटर खतम
१७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद..
सू हा स...
14 Oct 2009 - 6:08 pm | टारझन
वाजवला तिच्यामायला !! काव्य हा आमचा प्रांत कधिच नव्हता. आमच्या काव्याची झालेली स्तुती पाहुन उगाच असे वाटले की कोणी सोम्या-गोम्या सुद्धा कविता करू शकतो !!
-(सोम्या-गोम्या) टारझन
केस मनाला भिडले !! बाकी केसांबरोबर ते कुढाल्ले हे पण सपष्ट ल्हित जा बाबा (काय आहे ना, केस ह्या अवयवाची जागा बदल्ली की त्याचं नाव बदलते) , हल्ली अधुनिक कविता कुठपर्यंत पोचू शकतात ह्याचा नेम नाही :)
- (गॉण केस) टारझन
12 Oct 2009 - 5:39 pm | सूहास (not verified)
मेंदुचा समजण्याचा हिस्सा पण तिच्याकडेच गहाण पडला की काय >>>
ये तो "साला" होना ही था ..
बाकी राजे हे वरील वाक्य स्वानुभवातील अनुभुतीमुळे आले आहे काय ?
आला का अवांतर प्रतिसाद...
मॅटर खतम
१७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद..
सू हा स...
12 Oct 2009 - 1:25 pm | सुबक ठेंगणी
काय रे...एक दिवस ती भेटली नाही काय लगेच कविता वगैरे??? ह्या कविता तिला दाखवल्या वगैरे नाही आहेस नां??? ;)
12 Oct 2009 - 3:44 pm | फ्रॅक्चर बंड्या
लव गुरु शोधा...
नाडी वगैरे बघुन घ्या...
12 Oct 2009 - 5:32 pm | सूहास (not verified)
क्षणैक विरहा ने व्याकुळ झालेल्या
=)) =)) =))
प्रभ्या , अजुन कविता चालुच हैत का ??
चालु देत...
" माणुस प्रेमात पडल्यावर सर्वात पहिले काय करतो ?"
"कविता"
"हि एक कविता"
"एका कविवीराची"
~~दे तु मला ईडली , देईन मी तुला डोसा "
~~पाहील कुणी आपल्याकडे, तर देईन त्याला ठोसा "
कुठेतरी वाचले होते....
सू हा स...
14 Oct 2009 - 1:17 pm | सोमा
अरे यार ! प्रेमात हि नेहमिचि बोम्ब असते, त्यापेक्शा ते न केलेल बर
स्वत चा अनुभव सागतोय !
14 Oct 2009 - 6:40 pm | धमाल मुलगा
नाही, कविता चांगली आहे...चालुद्या.
पण प्रभ्या लेका तुला कविता लागल्या होत्या त्या अजुन थांबल्या नाहीत काय? अजुन होताहेत? अवघड आहे रे बाबा....हे पिरेम बिरेम अवघड खेळ असतो...म्हणजे त्यांचा खेळ होतो आणि आपला जीव जातो, म्हणुन म्हणतोय हों!
-(जीव जाऊन आता कैदेत) ध.