रामराम मंड्ळी,
हिंदु धर्माच्या मान्य तेनुसार "आत्मा" अमर असतो. प्रत्येक आत्मा एका देहाच्या मृत्युनंतर दुसर्या देहात प्रवेश करतो.. योनी कुठली का असेना. पण आत्म्याला मरण नाही.. भक्तीमार्गाने मोक्ष (?) किंवा जन्म-मरणाच्या फेर्यातुन सुटका होते.
गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात : नैनं छिन्द्न्ती शस्राणि | नैनं दहति पावकः ||
हे तत्वज्ञान जेव्हा सांगितले गेले तेव्हा जगाची (सर्व सजीव धरुन) लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या यांचा काही मेळ लागतो का?
ह्या तत्वज्ञानाप्रमाणे आत्म्याला जनन-मरण नसेल तर आत्तापर्यंत हजारो वर्षात करोडो आत्मे मोक्षास प्राप्त होऊन पृथ्वीवरील सजीव सॄष्टीचा नाश व्हावयास हवा होता, इथे तर दिवसें दिवस लोकसंख्या वाढत आहे. मग हे आत्मे कुठुन आले? मेल्यानंतर आत्मा कुठे जातो, त्याला दुसर्या शरीरात जायला रस्ता कोण दाखवतो? बहुतेक सजीवात प्रजोप्तदानाची १ ली पायरी अंड्यात असते, जीव आकाराला येईपर्यंत आत्मा कुठे असतो?
माणुसप्राण्यात डोहाळे लागतात, इतर सजीवात काय होत असेल.. वाघीणीने बदल म्हणुन गवत खाल्ल्याचे माहीतीत नाही, मग माणसालाच का हे?
सुष्ट-दुष्ट, चांगले-वाईट असा भेदाभेद मान्य केला, तर चांगले काम करणारा देह पुण्यवान की आत्मा? वाईट कामाची शिक्षा देहाला का भोगायला लागते, तिथे आत्म्याला थेट शिक्षा का नाही होत? का हे देवाच्या अखत्यारीत नाही, मग वाईट माणुस (हे परत साक्षेपी, राज ठाकरे मराठी माणसाला चांगला, पण उत्तर-भारतीयांना वाईट) मेला की नरकवासी का नाही म्हणायचे, तिथे स्वर्गीय, कैलासवासी का म्हणतात?
च्यामारी... प्रश्न काही संपत नाहीत, हे टंकित कोण करतोय, मी कि माझा आत्मा? मग बुध्दीचे स्थान काय?
#:S #:S #:S दमलो बुवा..
जाणकारांनी लक्ष घालावे..
प्रतिक्रिया
30 Sep 2009 - 9:13 am | विसोबा खेचर
हर्षलसाहेब, जरा माझं ऐका.
एखाद्या छान संध्याकाळी आवडत्या स्त्रीसोबत ग्लेन मोरांजीचे दोन पेग घ्या, मासळीचं सुंदर जेवण जेवा. छानशी मिठाई खा. त्यानंतर भीमण्णा, आमिरखा, किशोरीताई यांसारख्या एखाद्या दिग्गजाचं गाणं ऐका आणि उरलेली छानशी रात्र त्या आवडत्या स्त्रीसोबत घालवा...
तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील..!
आणि असंच त्या बाईला महिन्यातनं एखाद-दोनदा भेटून वरील कार्यक्रम सुरू ठेवा म्हणजे भविष्यात असले प्रश्न तुम्हाला पडणार नाहीत. बोळा निघेल आणि पाणी वाहतं होईल! :)
आपला,
तात्याभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी, इंदौर.
30 Sep 2009 - 9:32 am | JAGOMOHANPYARE
<<<<<<< त्याला दुसर्या शरीरात जायला रस्ता कोण दाखवतो >>>>>>>>>>>>>
तात्या !
:)
30 Sep 2009 - 9:36 am | दशानन
एखाद्या छान संध्याकाळी आवडत्या स्त्रीसोबत ग्लेन मोरांजीचे दोन पेग घ्या, मासळीचं सुंदर जेवण जेवा. छानशी मिठाई खा. त्यानंतर भीमण्णा, आमिरखा, किशोरीताई यांसारख्या एखाद्या दिग्गजाचं गाणं ऐका आणि उरलेली छानशी रात्र त्या आवडत्या स्त्रीसोबत घालवा...
काय सल्लापण दिला आहे ..... :D
हे बघा हर्षद सेठ...
तात्यांचे काय मनावर घेऊ नका... मी सांगतो तसे करा...
चार बीयरचे कॅन घ्या.. एक टेलीस्कोप घ्या.. मस्त पैकी फार्महाऊसवर बाहेर चांदण्यारात्री बसा... चंद्र शोधू नका... सरळ युफओ शोधा... ते सापडले तर त्यांनाचा विचारायचं सरळ बाबा रे हे आत्मा बित्मा काय असते ?
जर तो सापडला नाही तर... सरळ बीयर संपवल्यावर व्हिस्कीचे दोन पॅग मारायचे जे तुम्हाला आवडतात ते.... कॉकटेल झाल्यावर तुम्हाला लगेच कळेल आत्मा कसा बाहेर येतो व शरीर कसे साथ देत नाही ते =))
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
30 Sep 2009 - 9:39 am | अवलिया
चुकीचा सल्ला.
उपक्रमावर एक काथ्याकुट टाका. लिहितांना शुद्धलेखनाच्या अगणित चुका करा. एकसे एक प्रतिसाद येतील. वाचुन मेंदुला झीणझीण्या आल्या की तुम्हाला तुमचा आत्मा, इतर आत्मे, ग्रहतारे, पुर्वज, वंशज, सगळे सगळे दिसतील.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
30 Sep 2009 - 10:21 am | हर्षद आनंदी
कार्यक्रम झकास आहे, 'आत्मा संतुष्ट झाला' :)
पण आमचा देह वैविध्यावर विश्वास !! एकाच देहाने समाधान नाय होत ना. मग ह्ये प्रश्न भुत बनुन नाचु लागता आणि २ पेग जास्तच जातात.. मंग काह्याची उत्तरे आनि काह्याचे प्रश्न 8}
30 Sep 2009 - 9:45 am | पाषाणभेद
नुकतेच जालींदर बाबांचे उत्तराधिकारी हर्षदानंदी महाराज (२००९- नामजप आखाडा) यांचे मिपानगरीत आगमन झाले आहे. त्यांच्या आत्मा व शरीर यावर अख्यान आजपासून सुरू होणार आहे. भक्तजणांनी याचा लाभ घ्यावा.
भुताटकी चा आठवडा संपून आता आध्यात्मिक सप्ताह सुरू करा रे.
-----------------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
30 Sep 2009 - 8:04 pm | बाकरवडी
चला आवरून यायला हवे प्रवचनाला!
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
30 Sep 2009 - 11:06 am | धमाल मुलगा
चांगला गडकिल्ल्यांवर भटकायचास, काय हे नसते उद्योग सुचायला लागले रे भावा तुला???
भटकंती थांबलीये का तुझी???
असं कर, मस्त एखाद्या गडावर जा. त्या डोंगराच्या टोकापर्यंत पोहोच, संध्याकाळ असेल तर पश्चिमेचा भणाणलेला वारा चेहर्यावर झेल, दिवसभराच्या शिणवट्यानं थकुन 'केसरिया है रुप म्हारो' म्हणत पल्याडच्या डोंगराआड दडी मारायला निघालेल्या सुर्याची आभाळात चाललेली रंगपंचमी पहात रहा....
कसले प्रश्न आणी कसलं काय? मेंदूवर सुखाचं एखादं मस्त इंद्रधनुष्य कमान टाकून विसावेल...आणि असले फाफटपसार्याचे प्रश्न पडायचे बंद होतील :)
कधी चाल्लायस सांग, मीही येईन म्हणतो!
@ पाषाणभेद,
का अवदसा आठवतेय भौ? सगळ सुखासुखी चाल्लेलं बरं वाटेना का? आध्यात्मिक सप्ताह म्हणलं झालीच बोंबाबोंब चालु ;)
30 Sep 2009 - 12:51 pm | हर्षद आनंदी
पटले तुझे, म्हणुन चाललोय बघ, दापोली-मुरुड-हर्णे-आंजर्ले-केळशी असा सागरी पट्टा अनुभवायला..
अगदी आजच जातोय !! :H :H :H :H :H :H :H
फक्त आणी फक्त कल्ला... पेगचा हिशोब बाटल्यात गुंडाळुन मस्त लाटात डुंबुन राहणार आहे...
30 Sep 2009 - 12:56 pm | धमाल मुलगा
जळवा आम्हाला :)
एंजॉय माडी! (म्हणजे...घे तिच्यायला तुला हवा तो अर्थ..कानडी घे नायतर ताम्ब्याभर माडी घे :) )
30 Sep 2009 - 10:48 pm | टारझन
हॅहॅहॅ ... मी चुकून "एंजॉय मांडी" असं वाचलं !!
-टार्योधन
बाकी तात्याचा सल्लाही पटतो आणि लेखकाचं तत्वज्ञानही !! आवलिया सांगतो त्यातही तथ्य आहे :) आणि धम्या सांगतो त्यातही :) सगळ्यांशी सहमत :)
एकुण काय ? मार्ग जरी वेगवेगळे असले तरी हेतू एकंच !!
कोणी हिरवट म्हाताता म्हणतो , आसनं वेगवेगळी असली तरी एम एकंच :)
-(अंतरजालिय सहमतीकार) टारझन
1 Oct 2009 - 11:50 am | विजुभाऊ
टार्या तु कुठे काय वाचशील काय नेम नाही. =))