'अभिनंदन साप्ताहिक सकाळ मधल्या बक्षिसाबद्दल!' मेसेज मोबाइलवर झळकला आणि मी चकीत झाले. मला बक्षिस मिळाल्याचं मलाच माहीत नाही? मी मित्राला फोन केला त्याने सांगितले की साप्ताहिक सकाळच्या कथास्पर्धेत तुझ्या एक होती वैदेही ला बक्षिस मिळालंय. मला तोवर माहीतीच नव्हतं.
मग मित्राने वाचून दाखवलं. बक्षिस उत्तेजनार्थ आहे हे ही कळलं.
दोन वर्षांपूर्वी माझ्या 'मी आणि नवा पाऊस' ला पहिल्या पाचात स्थान मिळालं होतं. त्यावेळेला सप्टेंबरच्या मध्यात मला साप्ताहिक सकाळच्या हपिसातून फोन आला होता. फोटो आणि माहीतीसाठी तसेच बक्षिस समारंभाचं आमंत्रण करण्यासाठी. तो काही यावर्षी आला नाही तेव्हा मी आपलं मला केळं मिळालं असं समजून चालले होते. आणि अचानक आज कळलं अगदीच केळं नाही तर निदान उत्तेजनार्थ बक्षिस मिळालं.
असो तर बातमी ही की माझ्या कथेला उत्तेजनार्थ का होईना बक्षिस मिळालंय. ब्लॉगवर पिडीएफ कशी चढवायची हे शिकले की त्या कथेची ही लिंक इथे टाकेन. साप्ताहिक सकाळच्या आज प्रसिद्ध झालेल्या कथा विशेषांकात माझी कथा छापलेली नाहीये पण पुढच्या एक दोन अंकांमधे ती छापली जाणार आहे.
उत्तेजनार्थ का होईना १२००-१५०० च्या गठ्ठ्यातून आपण १० मधे आलो हे काही छोटं प्रकरण नाही अशी स्वतःचीच पाठ थोपटत मी फेसबुकमधे स्टेटस अपडेट करायला गेले. उत्तेजनार्थ बक्षिसाचं भाषांतर Consolation Prize असं लिहिलं आणि मी थबकले.
हे Consolation Prize म्हणजे सांत्वनार्थ दिलेलं बक्षिस आहे? मला अचानक बिचारं वाटलं. बक्षिस न मिळाल्याने मी रडतेय असं चित्र आलं समोर. छोटीशी, मूर्तीमंत बावळटपणा असलेली, हुजूरपागेच्या पाचवी अ मधली, दोन वेण्या त्याही रिबिनीने वर बांधलेल्या अशी नीरजा बक्षिस न मिळाल्याने रडून रडून सुकलीये आणि मग तिचं सांत्वन करायचं म्हणून गोळी चॉकलेटासारखं 'घे बाळा तुला पण बक्षिस..' असं म्हणत Consolation Prize कुणी देतंय असं वाटलं. असं रडू रडू करून मला नकोच ते Consolation Prize असं वाटलं. राग आला साप्ताहिक सकाळ वाल्यांचा. मी काय रडायला नव्हते बसले ना बक्षिस दिलं नाहीत म्हणून मग? हे दया येऊन दिलेलं बक्षिस का? असे अचाट स्वाभिमानी डायलॉग्ज मी मनातल्या मनात मारले.
पण मग परत मायमराठीतला मजकुर आठवला. तिथे माझं बक्षिस उत्तेजनार्थ होतं. 'तू बरं लिहितेस गं पण काय करणार बाकीच्यांच्या कथा तुझ्या पेक्षा खूप चांगल्या होत्या. तुझी कथा पहिल्या पाचात नाही येऊ शकली. पण म्हणून निराश व्हायची गरज नाही. तू अजून चांगलं लिहावंस. अजून चांगला प्रयत्न करावास म्हणून तुला उत्तेजनार्थ बक्षिस देतोय आम्ही' असं म्हणणारं उत्तेजनार्थ बक्षिस. तेव्हा पहिल्या पाचात आलीस म्हणजे कायमच येशील असं नाही असा गर्वाचा फुगा फोडणारं, आता लिही परत पहिल्या पाचांपेक्षा जास्त चांगलं असं आवाहन करणारं उत्तेजनार्थ बक्षिस.
दहाच मिनिटात या बक्षिसाने केवढं शिक्षण केलं माझं. आणि माझं नशीब हे की हे समजायची अक्कल परमेश्वरानी माझ्या डोक्यात घातली.
तेव्हा आता त्या दिल्या अकलेला जागून तरी का होईना लिहिणे, लिहीत रहाणे क्रमप्राप्त आहे.
तेव्हा (भोगा आता आपल्या कर्माची फळं...) वाचा मी लिहिलेलं!!
-नी
प्रतिक्रिया
27 Sep 2009 - 2:54 pm | दशानन
हे Consolation Prize म्हणजे सांत्वनार्थ दिलेलं बक्षिस आहे? मला अचानक बिचारं वाटलं. बक्षिस न मिळाल्याने मी रडतेय असं चित्र आलं समोर. छोटीशी, मूर्तीमंत बावळटपणा असलेली, हुजूरपागेच्या पाचवी अ मधली, दोन वेण्या त्याही रिबिनीने वर बांधलेल्या अशी नीरजा बक्षिस न मिळाल्याने रडून रडून सुकलीये आणि मग तिचं सांत्वन करायचं म्हणून गोळी चॉकलेटासारखं 'घे बाळा तुला पण बक्षिस..' असं म्हणत Consolation Prize कुणी देतंय असं वाटलं. असं रडू रडू करून मला नकोच ते Consolation Prize असं वाटलं. राग आला साप्ताहिक सकाळ वाल्यांचा. मी काय रडायला नव्हते बसले ना बक्षिस दिलं नाहीत म्हणून मग? हे दया येऊन दिलेलं बक्षिस का? असे अचाट स्वाभिमानी डायलॉग्ज मी मनातल्या मनात मारले.
+१
:D
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
मानसिक अवस्थेचे एकदम विदारक वर्णन ;)
***
राज दरबार.....
27 Sep 2009 - 3:00 pm | बिपिन कार्यकर्ते
छान मुक्तक. खरे तर उत्तेजनार्थ पेक्षा आवाहनार्थ बक्षिस असा शब्दप्रयोग करायला हवा.
बिपिन कार्यकर्ते
27 Sep 2009 - 6:02 pm | शक्तिमान
नीरजाताई.. उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी अभिनंदन..
अशाच उत्तमोत्तम लेखांची अपेक्षा आहे!
27 Sep 2009 - 6:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिल्या पाचात येण्यासाठी शुभेच्छा...!
>>तेव्हा (भोगा आता आपल्या कर्माची फळं...) वाचा मी लिहिलेलं!!
कर्मभोग कोणाला चुकलेत का ? :)
-दिलीप बिरूटे
27 Sep 2009 - 6:27 pm | मीनल
कथा कधी वाचायला मिळणार याची वाट पहात आहे.
मीनल.
27 Sep 2009 - 6:35 pm | शक्तिमान
ही घ्या...
बहुतेक हीच असावी...
http://www.misalpav.com/node/7769
27 Sep 2009 - 6:42 pm | लवंगी
:)
27 Sep 2009 - 6:43 pm | स्वाती२
नी, अभिनंदन! कथा आवडली होतीच, हे मुक्तकही आवडलं.
27 Sep 2009 - 9:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
असंच म्हणते.
खरंतर सुरूवातीचे एक-दोन परिच्छेद वाचताना तू तुझ्या लौकीकाला जागत नाहीस का काय वाटत होतं. पण पुढे वाचल्यावर ते परिच्छेद वाचून गंमत वाटली.
अदिती
27 Sep 2009 - 6:54 pm | विदेश
मनःपूर्वक अभिनंदन! पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा.
27 Sep 2009 - 8:17 pm | विकास
मनःपुर्वक अभिनंदन आणि पुलेशु!
27 Sep 2009 - 10:33 pm | मदनबाण
मनःपुर्वक अभिनंदन...
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
27 Sep 2009 - 10:56 pm | मी-सौरभ
सौरभ
28 Sep 2009 - 12:12 am | प्रभाकर पेठकर
हार्दीक अभिनंदन. अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो अशी सदिच्छा.
नवनविन कथा मिपावर येऊ देत, आनंदाने वाचू आणि प्रतिसादही देऊ.
आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
28 Sep 2009 - 1:00 am | प्राजु
मुक्तक आवडलं.
कधी कधी आपलं मनच आपल्याला बर्याच गोष्टी शिकवून जातं हे खरंच आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
28 Sep 2009 - 1:59 am | टारझन
छोटंस लिखाण छाण आहे .. हे मुक्तक वगैरे संकप्लना आपल्याला काही माहीत नाही :) पण अगदी मनापासून आलेलं स्फुट वगैरे :)
आमचं लिखाण च्यायला क्वालिफाय व्हायच्या पण लायकीचं नाही :(
28 Sep 2009 - 4:35 am | चतुरंग
नवनवीन कथा येऊदेत वाचायला नक्कीच आवडतील! :)
चतुरंग
28 Sep 2009 - 12:53 pm | मिसळभोक्ता
अरे वा !
टुकार कथांना उत्तेजनार्थ पुरस्कार मिळतात, हल्ली !!
-- मिसळभोक्ता
28 Sep 2009 - 1:10 pm | विनायक प्रभू
अरे वा
28 Sep 2009 - 1:57 pm | नीधप
सगळ्यांचे आभार.
मिसळभोक्त्याचे स्पेशल आभार. आपल्या आकसापोटी दुसर्याच्या आनंदावर विरजण घालणारा अनुभव दिल्याबद्दल.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
28 Sep 2009 - 7:39 pm | मिसळभोक्ता
अॅटलीस्ट आय अॅम कन्सिस्टण्ट !
(ता. क. 'माझा श्वास' चा दुसरा भाग कधी ?)
-- मिसळभोक्ता
28 Sep 2009 - 11:19 pm | नीधप
>>अॅटलीस्ट आय अॅम कन्सिस्टण्ट !<<
खरं आहे त्रासदायक असण्यात तुमच्या इतकं कन्सिस्टंट कोणीच नाही.
>>(ता. क. 'माझा श्वास' चा दुसरा भाग कधी ?)<<
तुम्हाला का चिंता?
29 Sep 2009 - 6:03 am | मिसळभोक्ता
तुमच्या इतकं कन्सिस्टंट कोणीच नाही.
अरे वा ! म्हणजे आम्हाला पहिलं बक्षिस !!
टुक टुक !!!
(बी द बेस्ट इन व्हाटेव्हर यू डू, हे आमचं घोषवाक्यच आहे :-)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालूल मिळेल.)
29 Sep 2009 - 6:43 am | अवलिया
मिभोकाका अभिनंदन...
अभिनंदनाचा धागा तुम्हीच टाकताय की मी टाकु...
तशी स्वतःच स्वतःचे अभिनंदन करण्याची आपल्यात पद्धत आहेच.
टाका तुम्हीच..
मी सहमती देतो, सिंगापोरवाले काका पण सहमती देतीलच.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
29 Sep 2009 - 12:19 pm | शक्तिमान
=)) =)) =))
गडाबडा हासत-लोळत आहे
29 Sep 2009 - 5:33 pm | धमाल मुलगा
खरडायचा फळा.
नमस्कार,
रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल.
खरडवहीत नोंद करा
ह्यातच करा की अभिनंदन ;)
28 Sep 2009 - 8:12 pm | निमीत्त मात्र
मिसळभोक्ता हे मिपावरचे कानीये वेस्ट वाटतात. कुणाला काही बक्षीस मिळाले की त्या आनंदावर विरजण कसे घालावे हे ते उत्तम जाणतात. :)
28 Sep 2009 - 8:53 pm | चतुरंग
आजपासून त्यांचं नाव आपण 'विरजणवाले मिभो' ठेवूयात! ;)
चतुरंग
28 Sep 2009 - 10:05 pm | अवलिया
रंगाशेटला अनुमोदन.
-अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
29 Sep 2009 - 6:00 am | मिसळभोक्ता
तो कान्या बुशला शिव्या घालत होता, तेव्हा कशा गुदगुल्या होत होत्या ? आता घ्या लेको !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालूल मिळेल.)
28 Sep 2009 - 4:07 pm | योगी९००
अभिनंदन आणि पुढील लेखनास शुभेच्छा...
हे मनोगत ही आवडले..
खादाडमाऊ
28 Sep 2009 - 4:26 pm | जयवी
नीरजा........मनापासून अभिनंदन गं !!
28 Sep 2009 - 4:29 pm | प्रसन्न केसकर
नीरजा! अन शुभेच्छा पण - दसर्याच्याही अन पुढच्या वेळी प्रथम पारितोषिक मिळावे म्हणुन पण!
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
29 Sep 2009 - 5:43 pm | धमाल मुलगा
हार्दिक अभिनंदन!!!
आम्ही चुकुन काही लिहिलंच तर ते शाळेच्या मासिकातही यायचं नाही :( त्यामुळं आपल्याला तर बॉ ही गोष्ट लै मोट्ठी वाटते :)
28 Sep 2009 - 6:57 pm | अनामिक
अभिनंदन!
लवकर लवकर पुढच्या कथा येऊ द्या आता.
-अनामिक
29 Sep 2009 - 12:02 pm | यशोधरा
अभिनंदन नीरजा. :)
29 Sep 2009 - 12:10 pm | विंजिनेर
अभिनंदन. कथा आवडली. बक्षिसाच्या तोडीचीच आहे!
29 Sep 2009 - 4:10 pm | झकासराव
वाह!
दसर्याची गिफ्ट मिळाली की तुला.
आता आम्हाला अजुन कथा मिळु देत वाचायला. :)
29 Sep 2009 - 5:38 pm | फ्रॅक्चर बंड्या
अभिनंदन
29 Sep 2009 - 5:46 pm | सुप्रिया
अभिनंदन आणि पु.ले.शु.
-सुप्रिया.
देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.
30 Sep 2009 - 2:23 am | धनंजय
पारितोषिकाबद्दल अभिनंदन!
30 Sep 2009 - 8:02 am | विसोबा खेचर
अरे वा, छान छान! :)
तात्या.