बिलगलेल्या कविता

सुनिल पाटकर's picture
सुनिल पाटकर in जनातलं, मनातलं
19 Sep 2009 - 9:38 pm

बिलगलेल्या कविता

कवितांचे आणि आपले नातं तसं अगदी घट्ट..लहानपणी आईच्या कडेवर बसून एक घास काऊचा आपल्या पोटात जातो ,तो या कवितेच्या सोबतीनं..अडगुल-मडगुल गुणगुणणा-या आईच्या तोंडाकडे बाळही कसं टकमक बघत रहातं..ही कवितेची ओढ नाहीतर काय ?.अनेक पावसाळे पाहिलेत असा दाखला देणारे आपण आयुष्यातील पहिल्या पावसाचं स्वागत येरे येरे पावसा असं गुणगुणत करतोच ना ! बड्बड गाणी, बालगीतं मोठमोठ्यानं म्हटल्या शिवाय अक्षरांशी गट्टी कुणाची जमली का ?.
कविता आपण शिकतो, जगतो ते शाळेत..तरुणपणात ज्याला एकतरी कविता सुचलेली नाही असा माणूस सापडणे कठिण.शाळेत शिकलेल्या कविता आयुष्यभर आपली साथ सोडत नाहीत.कधितरी गप्पांच्या ओघात ही कविता आम्हाला होती असं म्हणत आपण कविता चटकन म्हणूनही टाकतो.आजी-आजोबा,अगदी आई-बाबा आणि वेळ पडली तर आपणही शाळेत शिकलेल्या कविता पाठ केल्यासारख्या म्हणतो.काही कविता काळाच्या पडद्याआड जातात पण विस्मृतीत जात नाहीत .अचानक त्या आठवतात नाहीतर आपण आठविण्याचा प्रयत्न तरी करतोच.या कवितांमध्ये असं काय असतं की त्या आपल्याला इतक्या बिलगलेल्या असतात.परवा आमच्या घरात एक फुलपांखरु आलं अतिशय सुंदर फुलपांखरु होतं ते, त्याला पाहाता-पाहाता माझ्या तोंडून सहज शब्द बाहेर पडले.छान ! आणि मला लहानपणाची ती कविता आठवली
फुलपांखरु I
छान किती दिसते I फुलपांखरु I
या वेलीवर I फूलांबरोबर
गोड किती हसते I फुलपांखरु I
पंख चिमुकले I निळे जांभळे
हालवूनी झुलते I फुलपांखरु I
डोळे बारिक I करिती लुकलुक
गोलमणी जणु ते I फुलपांखरु I
मी घर जाता I येइ न हाता
दूरच ते उड्ते I फुलपांखरु I
तुम्हाला आठ्वतात का अशा काही कविता..या निमित्ताने त्या आठवू .इतरंना सांगू .कुणी विसरले असेल तर त्याला या माध्यमातून त्या कवितेजवळ नेऊ.आजीच्या जवळचे घड्याळ असेल नाहीतर लाडकी बाहुली असेल.कुणाला काहितरी सापडेलच की.
.....................................................................................................

वाङ्मयप्रतिसाद

प्रतिक्रिया

प्राजु's picture

19 Sep 2009 - 9:45 pm | प्राजु

लेखन आवडले.
मला ती
भुई नळ्यांचे झाड फुलांचे
भिडे निळ्या आभाळी रे
आली फुलवित हासत..... **वित
लक्षदिप दिपवाळी रे

जमला मेळा गोपाळांचा
धुमधडाका फटाकड्यांचा
दिव्या दिव्यांची राग शोभते
सुंदर निळ्या आभाळी रे..

इतकीच आठवते.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

युयुत्सु's picture

19 Sep 2009 - 9:45 pm | युयुत्सु

मला वसंत बापटांची "दख्खन राणीच्या कुशीत पोटात, शेकडो पिले ही चालली खुषीत" ही कविता हवी आहे.

-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
------

बाकरवडी's picture

19 Sep 2009 - 9:48 pm | बाकरवडी

फुलपांखरु I
छान किती दिसते I फुलपांखरु I

या कवितेचे रिमिक्सही झाले आहे.
मस्त कविता आहे.

शाळेत असताना फेमस हिंदी सिनेमांतील गाण्यांच्या चाली लावत असू.
कणा या कवितेला लावलेली रेमिक्स चाल अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.

याचबरोबर माझ्या पाठच्या बहीणी तुझ्या संगती सोबती....,या बाळांनो या रे या... ह्या कविता कायम लक्षात राहणार्‍या !

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

अनामिक's picture

19 Sep 2009 - 9:49 pm | अनामिक

मला आम्हाला ४थीत एक कविता होती ती नेहमी आठवते...

घाटातली वाट
काय तिचा थाट
मुरकते गिरकते
लवते पाठोपाठ

खाली खोल दरी
वर उंच कडा
भला मोठा नाग जणू
उभा काढून फणा

निळी निळी परडी
कोणी केली पालथी
पाने फुले सांडली
वरती आणि खालती....

एवढीच आठवते.... कुणाला पूर्ण येत असेल तर लिहा...

-अनामिक

भोचक's picture

19 Sep 2009 - 10:46 pm | भोचक

यातलं एक कडवं आठवतंय.

भिऊ नका कोणी
पाखरांची गाणी
सोबतीला गात गात
खळाळत पाणी

(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती

सुनिल पाटकर's picture

21 Sep 2009 - 10:44 pm | सुनिल पाटकर

सरिता पदकी यांची ही कविता आहे.

क्रान्ति's picture

19 Sep 2009 - 10:43 pm | क्रान्ति

लेख तर मस्तच, पण त्याचं शीर्षक अतिशय आवडलं.:)

बहिणाबाई चौधरी यांची "आदिमाया" ही कविता तशी मला शाळेत वगैरे कधीच नव्हती, पण बाबांच्या संग्रहातल्या पत्रं पुष्पम् या संपादित काव्यसंग्रहातली ही कविता बाबांनी सहजच कधीतरी नवरात्रात ऐकवली होती, ती अजूनही मनात जपून ठेवली आहे [आणि अर्थातच लिहून पण ठेवली, म्हणून पूर्ण टंकता आली!]

आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी ?

बारा गाडे काजळ कुंकू पुरलं नाही लेनं
साती समुदराचं पानी झालं नही न्हानं

धरतीवरलं चांदीसोनं डागीन्याची लूट
आभायाचं चोयी लुगडं तेभी झालं थिटं

इडापिडा संकटाले देल्हा तूने टाया
झाल्या तुह्या गयामंधी नरोंडाच्या माया

बरह्मा इस्नू रुद्रबाळ खेळईले वटी
कोम्हायता फुटे पान्हा गानं आलं व्होटी

नशीबाचे नऊ गिर्‍हे काय तुझ्या लेखी ?
गिर्‍ह्यानाले खाईसनी कशी झाली सुखी ?

नऊ झनासी खाउन गेली सहज एक्या गोष्टी
दहाव्याशी खाईन तेव्हा कुठे राहिन सृष्टी

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

मनीषा's picture

19 Sep 2009 - 11:10 pm | मनीषा

बहुतेक ग दि मां ची आहे .

निळ्या खाडीच्या काठाला
माझा हिरवाचं गावं
जगात मी मिरवितो
त्याचे लावोनिया नाव |

पुलं ओलांडिता पुढे
रस्ता येईल तांबडा
घरी आणेल सरळ
जरी दिसला वा़कडा |

पहा तेथून खालती
साळ वाकते सोन्यात
बघलचं जेवताना
कुंकु प्रत्येक दाण्यात |

माणसांच्या जागी साठी
दाटी करितात माड
गर्द मधेच एखादे
आंब्या फणसाचे झाड |

असो झाडी किंवा वाडी
सुने नाही वाटायचे
काळोखात कोणीतरी
ज्योत घेऊन आलेले |

(यातली मधली दोन - तीन कडवी आठवत नाहीयेत)

सहज's picture

20 Sep 2009 - 6:10 am | सहज

बा. भ. बोरकरांची आहे असे वाटते.

चांगला धागा, प्रतिसाद वाचायला मजा येते आहे.

स्वाती२'s picture

20 Sep 2009 - 4:54 pm | स्वाती२

बरोबर. बोरकरच.

मुक्तसुनीत's picture

19 Sep 2009 - 11:47 pm | मुक्तसुनीत

अनेक दिवसानी इथे आलो तो हा धागा पाहिला. एकेक प्रतिसाद वाचून सुखावतो आहे. मंडळी, अजून पुष्कळ कविता येऊ द्यात.

आणि हो , दख्खन राणी कविता मला सुद्धा हवी आहे. (बापट सरांची आहे म्हणूनच नव्हे फक्त ! ;-) ) देता का कुणी ?

लवंगी's picture

19 Sep 2009 - 11:48 pm | लवंगी

वरची कविता वाचून खूप आठवणी जाग्या झाल्या.. :)

माझा भावाला फुलपाखरू म्हणताच यायच नाहि लहान असताना.. तो हि कविता अशी म्हणायचा

छान किती दिसते I फुलकाफुलु I =))

आम्हि त्याला फुलकाफुलू च चिडवायचो..

गणपा's picture

20 Sep 2009 - 2:40 am | गणपा

जेव्हा हे गुपीत माझ्या कन्येला समजल तेव्हा पासुन ती पण मला फुलकाफुलु च चिडवते. :?

एकलव्य's picture

20 Sep 2009 - 4:47 am | एकलव्य

या वेलीवर I फूलांबरोबर
गोड किती हसते I फुलपांखरु I

सुनिलराव - या सुंदर लिखाणाबद्दल आपले आणि इतर प्रतिसादकांचेही मनापासून आभार!

मीनल's picture

20 Sep 2009 - 5:45 am | मीनल

१]येरे येरे पावसा, तुला देतो पैसा
२]श्रावणमासी हर्ष मानसी
या आठवल्या.
मीनल.

घाटावरचे भट's picture

20 Sep 2009 - 6:12 am | घाटावरचे भट

माझी आजी मला लहानपणी एक कविता म्हणून झोपवीत असे. छान पीलू रागातली चाल होती त्याची. 'चहूबाजूंनी राघू मोर बसवीले, पाळण्यात बाळ रंगीत निजवीले' असे काहीतरी शब्द आहेत. फारच छान म्हणते माझी आजी ते. माझं ऑल टाईम फेवरेट...

मीनल's picture

20 Sep 2009 - 6:41 am | मीनल

ते गाण अस आहे-

नीज नीज बाळा रे झोके देते आई,
करी बाळा जो जो गाई.

सुतार उत्तमसा तुजसाठी आणविला
पाळणा रंगित बनविला
चहुबाजूनिया राघु मोर बसविले
पाळण्यात बाळ निजवीले

खडबड ते उंदिर करती
कण शोधाया ते फिरती
परी अंती निराश होती
जातिल हे सोडूनिया सदनाला
गणगोत जसे आपणाला

हे गाण मी माझ्या मुलाला झोपवताना म्हणत असे. माझे बाबा म्हणायचे फक्त पहिल कडव म्हण. दुसर दारिद्र्य दाखवणार कडव कशाला म्हणायच?
पण मुलाला समजायला लागल्यावर तो मला सांगायचा, "आई हदबद ( म्हणजे खडबड ऊंदिर) म्हन. मी भोपतो."

मीनल.

घाटावरचे भट's picture

20 Sep 2009 - 1:31 pm | घाटावरचे भट

खूप खूप धन्यवाद. :)

मिसळभोक्ता's picture

21 Sep 2009 - 11:13 pm | मिसळभोक्ता

खडबड ते उंदिर करती
कण शोधाया ते फिरती
परी अंती निराश होती
जातिल हे सोडूनिया सदनाला
गणगोत जसे आपणाला

हे कडवे अत्यंत जीवघेणे आहे. पण हाच तर कवितेचा गाभा आहे.

-- मिसळभोक्ता

चतुरंग's picture

21 Sep 2009 - 11:53 pm | चतुरंग

ही नुसती दारिद्र्याची जाणीव नाही तर परिस्थितीचा वेध आहे.
गरीबी ही वाईट असते पण ती अनेक गोष्टी शिकवते ज्या एरवी शिकायला मिळणे अवघडच.

चतुरंग

सुबक ठेंगणी's picture

22 Sep 2009 - 5:08 am | सुबक ठेंगणी

ह्या कवितेचं वेगळं version आज्जीकडून ऐकलं आहे.

बा नीज गडे नीज गडे लडिवाळा
नीज नीज माझ्या बाळा
रवि गेला रे सोडुनि आकाशाला
धन जैसे दुर्भाग्याला...

मधल्या ओळी मला आठवत नाहीत. पण नंतर
खुडबुड हे उंदिर करिती... हे कडवं ती म्हणायची ....

लवंगी's picture

22 Sep 2009 - 6:38 am | लवंगी

हेच मी माझ्या आजीकडून ऐकलेल

भाग्यश्री कुलकर्णी's picture

22 Sep 2009 - 1:33 pm | भाग्यश्री कुलकर्णी

असेच म्हणते.
अजुन एक्,गायी गुरे हंबरली
पैंजणे हरीची वाजली.
हिच पावले माझ्या हरीची
खुण असे ती हंबरण्याची
झरझर नयनापुढुनी प्रतिमा ही सरली.
असंही काहिसं होतं गाणं

शाहरुख's picture

23 Sep 2009 - 12:04 am | शाहरुख

मीनल-जी, सुबक ठेंगणी-जी,भाग्यश्री कुलकर्णी-जी,
अंगाईगीताचे शब्द दिल्याबद्दल आपले शतशः आभार..

घाटावरचे भट-जी,
प्रश्न विचारल्याबद्दल आपले शतशः आभार..

सुनिल पाटकर-जी,
धागा सुरू केल्याबद्दल आपले शतशः आभार..

विसोबा खेचर-जी,
मिपा सुरू केल्याबद्दल आपले शतशः आभार..

- शाहरुख

अनामिक's picture

22 Sep 2009 - 5:15 pm | अनामिक

माझी आईपण हिच अंगाई गायची!

-अनामिक

सुबक ठेंगणी's picture

20 Sep 2009 - 6:40 am | सुबक ठेंगणी

वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे,
घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे

कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी,
राईत कधी वा पडक्या वाड्यापाठी

हळु थबकत जावे कधी कानोसा घेत,
कधी रमतगमत वा कधी भरारी घेत

वेळूंच्या कुंजी वाजवुनी अलगूज,
कणसांच्या कानी सांगावे हितगूज

मला एवढीच आठवते. पुढे अजून आहे का? आणि ह्या कवितेचे कवी मात्र मला आठवत नाहीत? कुणाला आठवतंय का?

sujay's picture

20 Sep 2009 - 6:43 am | sujay

७ वीत आम्हाला ईंग्लीशला रवींद्रनाथांची गीतांजली मधली -
where the mind is without fear
and the head is held high
where knowledge is free
into that heaven of freedom my father
let my country awake

ही कवीता होती आणी मला ही भयंकर आवडायची , मी हीला सुंदर चाल लावली होती , म्हणून आज ही पाठ आहे.

माझी सगळ्यात जवळची कवीता म्हणजे माझी आजी मला गायची ते अंगाई गीत-

करी अंगाई सुखे राजसा बाळा
निज रे निज लडीवाळा

तु आवडता बाबांचा
तुज वरी जीव आईचा
लाडका असशी सकळांचा

निज रे निज लडीवाळा

का कुणास ठाउक पण जेंव्हा जेंव्हा आजी "तु आवडता बाबांच" वर यायची तेव्हा तेव्हा माझे डोळे नकळत भरायचे. अजूनही कधी मुड आला तर मी आजीला हे गायला सांगतो आणी अजूनही डोळे भरून येतात.
मनाच्या कोपय्रात कुठेतरी अजून बालपण जीवंत आहे ह्याचा समाधान आहे.
सुनीलशेठ ईतक्या जुन्या आठवणी ताज्या करणारा धागा चालु केल्या बद्दल आभारी आहे.

(nostalgic)सुजय

मला २ महिन्यानंतरही खव आणी खफ मध्ये लिहायची सोय उपलब्ध नाही. मी काय करावे?

स्वाती२'s picture

20 Sep 2009 - 5:18 pm | स्वाती२

खूप छान धागा!
मला टपटप टपटप टाकित टापा नावाच बालगीत फार आवडायच.

चतुरंग's picture

20 Sep 2009 - 5:22 pm | चतुरंग

टपटप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली, पायी रुपेरी तोडा ॥

उंच उभारी दोन्ही कान, ऐटीत वळवी आपुली मान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा ॥

घोडा माझा घाली रिंगण, उखडून टाकी सारे अंगण
काही त्याला अडवत नाही, नदी असो की ओढा ॥

घोडा माझा फ़ार हुशार, पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इशारा कशास चाबूक ओढा ॥

चतुरंग

स्वाती२'s picture

20 Sep 2009 - 5:41 pm | स्वाती२

धन्यू चतुरंग!

लवंगी's picture

20 Sep 2009 - 5:38 pm | लवंगी

माझ खूप आवडत गाणं

टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठिवरती जीन मखामली वरी रुपेरी तोडा
टप टप टप टप

उंच उभरी दोन्हि कान,
ऐटित वळवी मागेच मान
मध्येच केंव्हा दुडकत दुडकत,
चाले थोडा थोडा
पाठिवरती जीन मखामली वरी रुपेरी तोडा
टप टप टप टप

घोडा माझा फार हुशार,
पाठिवर मी होतो स्वार
नुसता त्याला पुरे इशारा,
कशास चाबूक ओढा
पाठिवरती जीन मखामली वरी रुपेरी तोडा
टप टप टप टप

पाच अरण्ये समुद्र सात,
ओलांडील हा एक दमात
आला आला माझा घोडा,
सोडा रस्ता सोडा
पाठिवरती जीन मखामली वरी रुपेरी तोडा
टप टप टप टप

लहानपणी बाबांच्या पाठिवर स्वार होऊन हे गाण म्हणायला खूप मजा यायची .. :)

स्वाती२'s picture

20 Sep 2009 - 5:46 pm | स्वाती२

धन्यवाद पूर्ण गाण्याबद्दल.

नंदन's picture

20 Sep 2009 - 5:46 pm | नंदन

धागा. 'शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा'* आणि क्रमिक पुस्तकांतली पहिलीतली चिमणीच्या घरट्याची (गरीब बिचार्‍या चिमणीला सगळे टपले छळण्याला...) आणि चौथीतली 'आज ये अंगणा पाहुणा गोजिरा' ही राजा मंगळवेढेकरांची वृक्षारोपणावरची 'पाहुणा' ही कविता - या अजून आठवतात.

*या कवितेचे आंतरजालीय विडंबन फर्मास होईल. काय म्हणता रंगराव? :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

लवंगी's picture

20 Sep 2009 - 5:50 pm | लवंगी

आई मला छोटिशी बंदुक दे ना,
बंदुक घेइन, शीपाई होईन, शत्रूला मारीन ठो ठो ठो..

असे काहिसे बोल होते.. कुणाला आठवतेय का?

हा मजेशीर धागा पाहून आमच्या सासूबाईंनाही त्यांच्या शाळेतील काही कविता आठवल्या, त्यांपैकी ३ इथे देतोय, कडव्यांचा क्रम उलटसुलट झाला असण्याची शक्यता आहे:

१. रा. ग. गडकरींची खालील कविता

सुंदर खाश्या प्रभात काळी
चहू कडे ही फुले उमलली
बाग हासते वाटे सगळी
शीतल वारा या जलधारा
कारंज्याच्या छान
थांब जरासा बाळ
.....
अशा तुला मग बागडतांना
भरभर वार्‍यावर फिरतांना
माझे मग ते फूल कोणते
कसे ओळखू सांग

(.....मधली तीन कडवी आठव्ली नाहीत.)

२. दुसरी कविता 'श्रेष्ठ कोण' या सारखी काहीतरी होती असे त्या सांगतात -

वाटते मजला की व्हावे ईंजिनवाला
भकभक करीत इंजिन चाले
त्याच्या मागे डबे चालले
या सर्वांचा राजा मी
इंजिनवाला पहा

शिंपीदादा पहा बैसला
शिवायास कपडे
कोट तुमानी झरझर शिवतो
जोडुनिया तुकडे
या सर्वांचा राजा मी
शिंपीदादा पहा

शेतकरी हा पहा चालला
नांगर घेऊन
बैल इमानी जाती पुढती
आपण होऊन
या सर्वांचा राजा मी
शेतकरी तो पहा
............

३. चिलीम

नाही माहित डामडौल अगदी
साधी सुधी वागली
नेसायास दिले जुने चिर तरी
नाही असंतोषही
ल्याली भूषण एकही न
रिझली सेवून पाने सुकी
हां हां हरवली चिमा प्रियतमा
माझ्या जीवाची सखी

या कवितेवर 'चिमा कोण?' असा प्रश्न परीक्षेत यायचा म्हणे.

[By the way, कुणाला बालभारती प्रकाशनाची पहिली सुमनमाला कधी निघाली, ते माहीत आहे काय? त्या प्रकाशनातील चौथी व पाचवी या इयत्तांची पुस्तके कुणाकडे मिळू शकेल काय? पुण्यात गणेशखिंडीतील बालभारतीच्या कार्यालयात काही माहिती मिळू शकली नाही.]

"तबकात राहिल्या देठ लवंगा साली" ही कविता बहूधा गदिमांची असावी. ती मला हवी आहे. माझ्या आईकडून ऐकायला मिळाली आहे. आईचे पाठांतर अफाट होते पण कधी कविता/श्लोक मला लिहून दिल्या नाहीत. मूळ पुस्तक मिळवून वाच असे सांगायची. त्यामूळे ही कविता पूर्ण पणे कधी माझ्यापर्यंत पोचली नाही.

-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
------

युयुत्सु's picture

21 Sep 2009 - 8:18 am | युयुत्सु

धन्यवाद... खूप वर्ष चालू असलेला शोध आज संपला.

-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

अर्थ - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
------

सहज's picture

21 Sep 2009 - 9:14 am | सहज

नंदनशी ओळख असले की झाले का हे देखील शनिचे फळ ;-)

सॉरी रहावले नाही :-)

क्रान्ति's picture

21 Sep 2009 - 8:39 am | क्रान्ति

गदिमांचं हे काव्य अप्रतिम आहेच, आणि गीत म्हणूनही ते काळजात रुतणारं आहे. फैयाज यांनी जीव ओतला आहे त्यात!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

भाग्यश्री कुलकर्णी's picture

21 Sep 2009 - 4:03 pm | भाग्यश्री कुलकर्णी

आला आषाढ श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातक चोचीने
प्यावा वर्षा ऋतुतरी.
कितवीत होती ती माहिती नाही.
एक खंड्या पक्षाचीही होती.

अनामिक's picture

21 Sep 2009 - 6:35 pm | अनामिक

अजूनही काही आठवताहेत...

खोप्यामंदी खोपा
सुगरणीचा चांगला
एका पिलासाठी तिनं
जीव झाडाले टांगला
__________

हिरवे हिरवे गार गालीचे
हरीत तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती
फुलराणी ती खेळत होती
गोड निळ्या वातावरणात
अव्याज मने होती डोलत
प्रणय श्रूंखला (?) त्या भृलीला
काही कळेना फुलराणीला....

____________

संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा... यापुढे काय होतं ते आठवतच नाही...

अजून एक होती त्यामधली एकच ओळ आठवते आहे.... "प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमधे उगवूनसुद्धा मेघांपर्यंत पोचलेलं..."

तसेच..
काया मातीत मातीत तिफन चालते ही शेतकर्‍यावरची कवीता एकेकाळी पाठ होती... आता पहिल्या ओळीशिवाय काहीच आठवत नाही....

ह्या आणि अशा सुंदर कविता कुठे एका वेबसाईटवर संकलीत मिळतील का?

-अनामिक

मिसळभोक्ता's picture

21 Sep 2009 - 11:16 pm | मिसळभोक्ता

काया मातीत मातीत तिफन चालते ही शेतकर्‍यावरची कवीता एकेकाळी पाठ होती... आता पहिल्या ओळीशिवाय काहीच आठवत नाही....

ही वर्‍हाडी कवी विठ्ठल वाघांची प्रसिद्ध कविता आहे. कुठल्याशा सिनेमात गाणे म्ह्णून देखील अंतर्भूत आहे.

-- मिसळभोक्ता

महेश हतोळकर's picture

22 Sep 2009 - 3:21 pm | महेश हतोळकर

कुठल्याशा सिनेमात गाणे म्ह्णून देखील अंतर्भूत आहे.
अरे संसार संसार मधे आहे हे गाणे. रंजना आणि कुलदीप पवार (नायीका - नायक) छान आहे हा सिनेमा.

माधुरी दिक्षित's picture

21 Sep 2009 - 7:03 pm | माधुरी दिक्षित

लाल टांगा घेउन आला लाला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे ललल्ला ललल्ला ..................
लीला बसली टांग्यामधे टांगा सुरु झाला .........
पुढचे विसरले आहे आता :(

अश्विनीका's picture

21 Sep 2009 - 11:09 pm | अश्विनीका

-छान धागा. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

मला पण खालील काही कविता / गाणी हवी आहेत. त्यांचे धृपद च आठवते .

१) इंजिनदादा इंजिनदादा काय करता?
डबे मी जोडतो, शिट्टि मी फुंकतो, गावाला जातो नव्या नव्या

२) वळिवाचे ढग आले वरती धरती खाली आसुसली
झाडासंगे वारा खेळे भिंगोर्‍या अन भातुकली - कवि रविन्द्र भट

३) झाड म्हणतं वारा दे , पाखरु म्हणतं चारा दे
सृष्टी मधल्या चराचराला देवा , सौख्य निवारा दे

४)एक पिंजर्‍यातील पोपटाची दिनवाणी स्थिती वर्णन करणारी कविता होती. सुरवात अशी आहे - तोरणाच्या रमणीय चौकटीला..

अजून एक छान कविता पहिली च्या बालभारती पुस्तकात होती. तिच्या ही २ च ओळी आठवत आहेत
केळीच्या बागा मामाच्या, हिरव्या घडांनी वाकायच्या

अश्विनी

अश्विनीका's picture

21 Sep 2009 - 11:13 pm | अश्विनीका

१ली च्या बालभारती मधील पूर्ण आठवणारी एकमेव कविता -

आभाळ वाजलं धडाम धुडूम
वारा सुटला सूं सूं सूं
वीज चमकली चक चक चक
जिकडे तिकडे लख लख लख
पाउस पडला धो धो धो
पाणी वाहिले सो सो सो
पाण्यात बोट सोडली सोडली
हातभर जाउन बुडली बुडली
बोटीवर बसला बे डू क
तो ओरडला डराव डूक

- अश्विनी

बेसनलाडू's picture

22 Sep 2009 - 5:27 am | बेसनलाडू

(बहुदा) त्याच पाठ्यपुस्तकातील मला आठवणार्‍या (मी १लीत असताना घोकलेल्या नि आजही लक्षात राहिलेल्या) आणखी दोन कविता अशा -

१. वेडं कोकरू - मंगेश पाडगावकर (??)

वेडं कोकरू खूप थकलं
येताना घरी वाट चुकलं

अंधार बघून भलतंच भ्यालं
दमूनभागून झोपेला आलं

शेवटी एकदा घर दिसलं
वेडं कोकरू गोड हसलं

डोकं ठेवून गवताच्या उशीत
हळूच शिरलं आईच्या कुशीत

(शहाणा)बेसनलाडू

२. या कवितेचे नाव व कवी आठवत नाहीत :(

गाडी आली गाडी आली झुक् झुक् झुक्
शिटी कशी वाजे पहा कुक् कुक् कुक्
तिकिटाचे पैसे काढा छन् छन् छन्
गाडीची ही घंटा वाजे घण् घण् घण्
इंजिनाचा धूर निघे भप् भप् भप्
चाके पहा तपासुनी ठक् ठक् ठक्
जाऊ नका आता कुठे दूर दूर दूर
गाडी आता निघाली ही झुक् झुक् झुक्

(प्रवासी)बेसनलाडू

सुबक ठेंगणी's picture

22 Sep 2009 - 5:41 am | सुबक ठेंगणी

वसंत बापटांचा श्याम. "आम्ही" नावाच्या पुस्तकातला.
त्यातल्य ब-याचशा आठवतात पण पहिलीच आम्ही
आमचं नाव श्याम...
अंssss...शाम्या!
बाबा म्हणतात सांगकाम्या
मास्तर म्हणतात आळशी धोंडा
कोण लागणार त्यांच्या तोंडा
आई ठेवते आमचा मान
राsssssजाsssss म्हणून धरते कान
त्यातल्या त्यात छोटी बरी
दादा म्हणते...सध्यातरी! :)

दुसरी आमचे पाहुणे
पाहुणे येतात कोण कुठले
संपवून टाकतात भात पिठले
आमच्यासाठी उरते खरवड
आईची तर नेहमीच परवड

मधलं आठवत नाही...

नाव काय तुझं सांग पाहू बाळा
कितवीत शिकतोस कुठे आहे शाळा

पाहुण्यांपाशी नसते छत्री
त्यांची बेबी असते मुत्री...

शेवटचा शब्द मी कवितेत पहिल्यांदाच तेव्हा ऐकला! ;)

पद्मश्री चित्रे's picture

22 Sep 2009 - 9:48 am | पद्मश्री चित्रे

आवडला धागा..

आठवणीतल्या कविता या पुस्तकाचे ४/५ भाग आहेत.. त्यात यातील बर्र्‍याच कविता आहेत.
मला आठवलेल्या कविता-
१. गाई पाण्यावर काय म्ह्णुनी आल्या...
२. रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला
३.इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावरी

पर्नल नेने मराठे's picture

22 Sep 2009 - 1:46 pm | पर्नल नेने मराठे

मला पण आठ्व्तेय भा रा ताम्बेन्ची :S

जन पळ्भर म्हणतील हाय हाय..
मी जाता राहिल कार्य काय :SS

चुचु

विदेश's picture

22 Sep 2009 - 2:29 pm | विदेश

"चांदोबा, चांदोबा भागलास का" ; "देवा तुझे किती सुंदर आकाश"
या कविता साथ सोडण्यास तयार नाहीतच !

चिंतामणराव's picture

22 Sep 2009 - 3:07 pm | चिंतामणराव

असेच म्हणतो.
माझ्या मनाला अशी बिलगलेली कविता आहे,

"सतारिचे बोल.."-केशवसुत
काय करावे कोठे जावे नुमजे मजला कि विष प्यावे
अंधारातच घडले सारे लक्ष न लक्षी वरचे तारे
विमनस्क्पणे स्वपदे उचलित रस्त्यातुन मी होतो हिंडत
एका खिडकीतुनी सुर तदा आले दिडदा दिडदा...

संगणकांत लपलेली फाईल सापडत नसली....किंवा
पार्क केलेली गाडी पोलीसांनी उचलुन नेल्याचे वर्तमान कुत्सितपणे पानवाल्याने दिले.....किंवा
अशा प्रसंगी माझ्या तोंडुन वरील ओळी सहज निघुन जातांत आणी लोकांची जरा करमणुक होते.

मस्त कलंदर's picture

22 Sep 2009 - 5:02 pm | मस्त कलंदर

काळोखाची रजनी होती..
हृदयी भरल्या होत्या खंती..
अंधारातची गढले सारे..
लक्ष न लक्षी वरचे तारे...
एका खिडकीतूनी सूर तदा...
आले.. दीड दा दीड दा दीड दा....

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

मस्त कलंदर's picture

22 Sep 2009 - 5:03 pm | मस्त कलंदर

काळोखाची रजनी होती..
हृदयी भरल्या होत्या खंती..
अंधारातची गढले सारे..
लक्ष न लक्षी वरचे तारे...
एका खिडकीतूनी सूर तदा...
आले.. दीड दा दीड दा दीड दा....

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

पर्नल नेने मराठे's picture

22 Sep 2009 - 3:07 pm | पर्नल नेने मराठे

नाचरे मोरा अम्न्ब्याचा वनात
नाचरे मोरा नाच

ही कविता म्हणुन मी पेटीवर वा़जवून स्टिलचा ग्लास :< बक्शिस मिळ्वला होता
चुचु

अनामिक's picture

22 Sep 2009 - 5:20 pm | अनामिक

अजून एक आठवली... अगदी बालवाडीत असतानाची

झुकझुक झुकझुक अगीनगाडी
धुरांच्या रेषा हवेत सोडी
पळती झाडे पाहुया
मामाच्या गावाला जाऊया!

-अनामिक

स्वाती राजेश's picture

22 Sep 2009 - 5:41 pm | स्वाती राजेश

रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला....
ही कविता आता इयत्ता ७वीच्या इंग्रजी माध्यम च्या मुलांना आहे, मराठीच्या पुस्तकात...हवी असेल तर मी देइन....

कानडाऊ योगेशु's picture

22 Sep 2009 - 5:43 pm | कानडाऊ योगेशु

पहीलीतल्या धड्यांची आठवण आली.
कमल नमन कर.
जगन घर बघ
शरद कमळ धर.. असे काहीसे होते.
शेवटी
सगळीकडे कमळच कमळ..

एका निवडणुक प्रचारादरम्यान भाजपने ह्याचा मिश्किल उपयोग केला होता.
शरद कमळ बघ.
राजीव कमळ बघ. इ.इ.

बापरे किती जुन्या आठवणीत घेवुन गेला हा धागा.

पहीली का दुसरीच्या पुस्तकात इंजिनदादा ही कविता होती वाटते.
इंजिनदादा इंजिनदादा काय करता
कोळसा मी खातो,पाणी मी पितो,
गावाला जातो नव्या नव्या..

एक चिमणीची आणि तिच्या हरवलेल्या घरट्याची पण कविता होती.
त्यातले काही शब्द असे होते
कपिला मावशी कपिला मावशी का गं तुझे डोळे ओले..
..
गरीब बिचार्या चिमणीला सगळे बसले टपण्याला..
आणि शेवटी
जळो तुझा पिंजरा मेला त्याचे नाव नक्को मला.
राहीन मी घरट्याविना,चिमणी गेली उडुन राना..

करी अंगाई सुखे राजसा बाळा निज रे निज लडिवाळ
ही अंगाई पूर्ण येते का कोणाला?
कृपया येथे द्याल का
खूप आठवणी आहेत त्या अंगाई च्या