(बोध....!)

मराठमोळा's picture
मराठमोळा in जे न देखे रवी...
19 Sep 2009 - 3:17 pm

आमची प्रेरणा

!!!!बोध!!!

आळश्यांच्या साम्राज्यावर
मॉर्निंग वॉकचा तोरा
ट्रेडमील उभी कोपर्‍यात
डंबबेल करताहेत मुजरा
चौकाचौकात उभे
हृदयविकार, रक्तदाबाचे दुत
आणी आसमंत सारा
प्रदुषणाने झाकोळलेला
मी कुणाला विचारु
निरोगी आयुष्याचा रस्ता
इथे प्रत्येक जण
विकारांनी पिळवटलेला
कधीचा औषधे घेतोय
आणी डॉक्टर नेहेमीच गोंधळलेला
पैसे कमवा स्पर्धेत
मी देहाची किंमत विकलेला.

आपला मराठमोळा.

समाजजीवनमानराहणी

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

19 Sep 2009 - 3:28 pm | मदनबाण

दोन्ही कविता आवडल्या... :)

मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

श्रावण मोडक's picture

19 Sep 2009 - 3:50 pm | श्रावण मोडक

प्रेरणा चांगली घेतलीत. रचना छान.

सहज's picture

19 Sep 2009 - 3:53 pm | सहज

छान आहे.

अवलिया's picture

19 Sep 2009 - 4:54 pm | अवलिया

छान आहे.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अमोल केळकर's picture

19 Sep 2009 - 4:11 pm | अमोल केळकर

मस्त !
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा