(पुरे का पुरे का)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जे न देखे रवी...
18 Sep 2009 - 8:26 pm

ही प्रेरणा, हॅ हॅ हॅ

आता काम होईल नक्की निकाली युरेका युरेका
उरलाय स्प्रे मारल्यात पाली पुरे का पुरे का

मला पाहून ती अशी पळाली काय सांगू
हातानेच मी मारली टपली, पुरे का पुरे का

तिचे कीटकांशी होतेच तंटे कळता मला अन
झाडले घर मी, पुरे टवाळी पुरे का पुरे का?

नवे कोळी येता सदनात माझ्या वदले स्वतःशी
रित्या घरात नवी जाळी आली, पुरे का पुरे का?

दांडा लांब करता झाडूचा झाला उपयुक्त तोही
चला झाडलोटीला ह्या सुरूवात झाली पुरे का पुरे का?

रामरगाड्याच्या पसार्‍यात अडकले अशी मी
पुरी दीवार भरे जाळींनी पुरे नाही का??

जरी देह माझा हलला नाही तरी जाळी निघाली
कामवालीच ठरली मुक्तीदात्री, बरं का बरं का!

विडंबन

प्रतिक्रिया

दशानन's picture

18 Sep 2009 - 8:32 pm | दशानन

>>जरी देह माझा हलला नाही तरी जाळी निघाली
कामवालीच ठरली मुक्तीदात्री, बरं का बरं का!

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

लै भारी !

रेवती's picture

18 Sep 2009 - 8:38 pm | रेवती

चांगली चाललीये साफसफाई!
आता सगळं घर कसं स्वच्छ वाटत असेल नै?;)

रेवती

अमृतांजन's picture

18 Sep 2009 - 8:38 pm | अमृतांजन

१++

खूप आवडले विडंबन!

श्रावण मोडक's picture

18 Sep 2009 - 8:42 pm | श्रावण मोडक

बास का, बास का... विडंबन भारीच की...

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Sep 2009 - 8:55 pm | बिपिन कार्यकर्ते

आता एकदा कधी तरी आंघोळही करा... :D

बिपिन कार्यकर्ते

Nile's picture

18 Sep 2009 - 11:20 pm | Nile

आज डीओ मारलाय, पुरे का पुरे का?

लवंगी's picture

18 Sep 2009 - 9:30 pm | लवंगी

पुरे का पुरे का?? :)

पाषाणभेद's picture

18 Sep 2009 - 9:59 pm | पाषाणभेद

दिवाळी जवळ आली, सफाई सुरू करा आता.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

अवलिया's picture

18 Sep 2009 - 10:39 pm | अवलिया

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

चित्रा's picture

18 Sep 2009 - 11:24 pm | चित्रा

जरी देह माझा हलला नाही तरी जाळी निघाली
कामवालीच ठरली मुक्तीदात्री, बरं का बरं का!

छान आहे :)

Nile's picture

18 Sep 2009 - 11:28 pm | Nile

कवितेची वाट लावली जरी,
विडंबना हसले जन, पुरे का पुरे का? ;)

^हे आपलं उगाच, चालुद्या सफाई. ;)

संदीप चित्रे's picture

19 Sep 2009 - 12:33 am | संदीप चित्रे

करायला बघून शेवटी दमलेली दिसतीयस बिचारी...
विडंबन वाचायला मजा आली.
एक सूचना (अर्थातच आगाऊ) ! --
कामवालीच ठरली मुक्तीदात्री... ह्या ओळीत "बरं का बरं का" च्याऐवजी "बरे का बरे का" वापरून पाहिलंस का?

चतुरंग's picture

19 Sep 2009 - 12:39 am | चतुरंग

एका उमलत्या रचनेचं असं ही & हि विडंबन आलेलं पाहून एक विडंबक म्हणून लाज वाटते! B)
(अवांतर - आमची काही जुनी विडंबने अभ्यासून पुन्हा एकदा साफसफाई करावी!) :D
(अतिअवांतर =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) )

चतुरंग

सहज's picture

19 Sep 2009 - 7:48 am | सहज

दिसे दुर्बीणीत गोचर शनिचे, वदशी स्व:ताशी
आता ज्योतिषांचे दुकान उघडेल बरे का बरे का!

सुबक ठेंगणी's picture

19 Sep 2009 - 7:49 am | सुबक ठेंगणी

आता काम होईल नक्की निकाली युरेका युरेका
=)) =)) =)) =)) =))

क्रान्ति's picture

19 Sep 2009 - 8:24 am | क्रान्ति

जोरदार विडंबन! पण आमचा एक लहानसा सल्ला.

दुर्बीण सोडून हाती कशाला उगा घेसि झाडू?
"यमीआज्जी" आभाळ येईल खाली, बरे का, बरे का!;)

अदिती, ह. घे. हे सांगू? ;)

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

परिकथेतील राजकुमार's picture

19 Sep 2009 - 12:21 pm | परिकथेतील राजकुमार

बरेच काही नवे वाचायला मिळाले.
विडंबन पुन्हा एकदा व्यवस्थित वाचुन सविस्तर प्रतिक्रिया देतो.
तुर्तास ही पोच समजावी ..

विस्तृत प्रतिक्रियेसाठी "ही जागा" राखुन ठेवत आहे ...

------

पॉप कॉर्न
... करू नका एवढ्यात चर्चा झोपण्याची, बाटलीत आहेत पेग अजून काही !
आमचे राज्य

कानडाऊ योगेशु's picture

19 Sep 2009 - 1:19 pm | कानडाऊ योगेशु

आयला दोन दोन ठिकाणी आमच्या कवितेचे श्राध्द घातले गेलेय..ते ही सर्वपित्रीचाच मुहुर्त साधुन...धन्य झालो..काव काव..!!! :SS

अजुन एक ..मूळ कवितेपेक्षा विंडबनालाच जास्त प्रतिसाद वाचुन असे वाटते कि मिपाकरांना बारश्याला खाण्यापेक्षा तेराव्याचेच जेवण जास्त आवडतेय..!!! @)

-७_२४ पितरतृप्त फजिती

परिकथेतील राजकुमार's picture

19 Sep 2009 - 3:11 pm | परिकथेतील राजकुमार

अजुन एक ..मूळ कवितेपेक्षा विंडबनालाच जास्त प्रतिसाद वाचुन असे वाटते कि मिपाकरांना बारश्याला खाण्यापेक्षा तेराव्याचेच जेवण जास्त आवडतेय..!!!
---------------------------------------
क्वालीटी मॅटर्स हो.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

कानडाऊ योगेशु's picture

19 Sep 2009 - 3:49 pm | कानडाऊ योगेशु

.

कानडाऊ योगेशु's picture

19 Sep 2009 - 3:45 pm | कानडाऊ योगेशु

ह्यालाच म्हणतात प.रा.चा कावळा करणे ;)

परिकथेतील राजकुमार's picture

19 Sep 2009 - 4:25 pm | परिकथेतील राजकुमार

;) ;) ह्यालाच म्हणतात ट्रुथ हर्टस ;) ;)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2009 - 4:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सगळी कंपूबाजी हो, तुम्ही नका मनाला लावून घेऊ!

प्रतिक्रीया द्यायची राहिलीच, पण कविता आवडली म्हणून तर मनावर घेऊन विडंबन केलं ना!!

अदिती

भोचक's picture

19 Sep 2009 - 6:04 pm | भोचक

आदिती तै, तू म्हणजे अगदी कठीण आहेस
:)) :-)) :)) :-)) :)) :-)) :)) :-))

(भोचक)
तुम्ही कवी आहात ? कोणत्या पक्षाचे?
ही आहे आमची वृत्ती