मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(पुरे का पुरे का)

३_१४ विक्षिप्त अदिती · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ही प्रेरणा, हॅ हॅ हॅ आता काम होईल नक्की निकाली युरेका युरेका उरलाय स्प्रे मारल्यात पाली पुरे का पुरे का मला पाहून ती अशी पळाली काय सांगू हातानेच मी मारली टपली, पुरे का पुरे का तिचे कीटकांशी होतेच तंटे कळता मला अन झाडले घर मी, पुरे टवाळी पुरे का पुरे का? नवे कोळी येता सदनात माझ्या वदले स्वतःशी रित्या घरात नवी जाळी आली, पुरे का पुरे का? दांडा लांब करता झाडूचा झाला उपयुक्त तोही चला झाडलोटीला ह्या सुरूवात झाली पुरे का पुरे का? रामरगाड्याच्या पसार्‍यात अडकले अशी मी पुरी दीवार भरे जाळींनी पुरे नाही का?? जरी देह माझा हलला नाही तरी जाळी निघाली कामवालीच ठरली मुक्तीदात्री, बरं का बरं का!

वाचन 4182 प्रतिक्रिया 0