मात्र रात्रीची गोष्ट भाग ५

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
15 Sep 2009 - 3:47 pm

मात्र रात्रीची गोष्ट भाग ४

***

स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच.

(चौथा पेग होवुन गेला आहे, वाह्यात चर्चा सुरू आहे अशी अर्धवटावस्था.... अशातच पेग ५ आणि मधूनच एका ठाणेकराचे आगमन)

मी - परवा भेटायचा विचार आहे...

तो- अरे वा ! फटाके फुटणार असतीलच मग ...

मी - विचार करतोय फोडावेत की नाही... साला.. नंतर लफडा नको

(तेवढ्यात एक जण मधुनच येवुन बसतो... स्वतःची ओळख एक ठाणेकर म्हणुन करुन देतो... बील तोच देणार असे म्हणाल्यावर बसु दिले )

ठा - माफ करा. तुम्ही फटाके जरुर फोडा पण त्याची पद्धत असते...

मी - काय ?

ठा - जवळ जावुन फोडणार की लांबुन लांबुन थांबत थांबत फोडणार?

मी -हॅ हॅ हॅ ... रिस्क कशात कमी आहे‍?

ठा - रिस्क नसेल तर फटाके फोडण्यात मजा नाही. फटाके थांबुन थांबुन फोडता येतात पण अंदाज चुकला तर फटाका हातात फुटतो आणि काळजी घेतली नाही तर मागच्या बाजुला फुटतो. जवळ जावुन फोडतांना आनंद जास्त असतो पण फटाके लवकर संपतात.

मी - अरे बापरे अवघडच आहे हो... बर फटाके कधी फोडावेत याचे काही नियम?

ठा - फटाके फोडण्याचे काही दिवस असतात, पण तो रिस्की मामला आहे. दणक्यात तोंडघशी पडायला होते..म्हणजे आपले फटाके फुटतात पण लोकांची दिवाळी होते. आणि लोकांच्या दिवाळीला आपल्याजवळ फटाके नसतात. तेव्हा काळ वेळ पाहुनच फटाके फोडावेत.

मी - फटाके फोडतांना डोळे मिटावे का उघडेच ठेवावे ?

ठा - प्रत्येकाची आवडनिवड असते पण फटाक्याची वात सोलुन, उदबत्ती नीट लागेपर्यत नीट फटाक्याकडे पहावे, नंतर फटाका फुटतांना प्रकाश पडतो तो काही जण पहातात, काही जण फक्त डोळे मिटुन आवाज ऐकतात.... जे आवडेल ते करावे.

तो - वा ! वा ! ठाणेकर तुमच्या फटाक्यातील अनुभवाचा चांगला फायदा होणार याला... का रे मग फोडणार ना ?

मी - हो यार आता एवढे ऐकल्यावर कधी फोडतोय असे झाले आहे..

तो - सुतळी बरी की मोठा लंबुळका?

ठा - प्रत्येकाची आवडनिवड असते, पण हल्ली सुतळी पेक्षा लंबुळका आवडतो असे सांगण्याची फॅशन आहे. आधुनिकतेचे अनेक जे नवे निकष आहेत त्यानुसार सुतळीची आवड ही कालबाह्य झाली आहे. किमानपक्षी दोन्ही फटाके एकावेळी उडवता यायलाच पाहिजेत

मी - म्हणजे? मला जर लंबुळका नसेल आवडत तर मी सनातनी??????

तो - अर्थातच, जन्म वाया !!!

मी - अरे पण...असे कसे काही व्यक्तिस्वातंत्र्य आहे की नाही ? च्यामायला आम्ही जे आवडतील ते फटाके उडवु !

तो- वेडाच आहेस. आधुनिक व्हायचे म्हटले की नैसर्गिक आवडीनिवडी सोडुन द्यायच्या असतात.. सांगा हो ठाणेकर यांना ... जरा घेवुन जा यांना तुमच्या मुंब्र्याच्या फटाकेबाजारात.

ठा - कशाला ? आधीच तिथे गर्दी वाढली आहे सरकारी फटाके फोडायला.. आधीच होती पन्नास वर्षांपासुन.. तिकडे त्या मोठ्ठ्या शहरात तर औरंगजेबाच्या आधीपासुन आहे लंबुळक्या फटाक्याचे दुकान तिकडे पाठवु या ह्याला

मी - बापरे.. मला माहितच नाही .. तुला ?

तो - ऐकले होते लहानपणी... पण तिकडे गेल्याने आधुनिक होता येते हे नव्हते माहित...

ठा - अहो हे पुर्वापार चालु आहे.. ज्याला जे फटाके आवडतात ते तो फोडतो. फटाक्यावरुन चर्चा करण्याची आपल्यात पद्धत नाही आणि नव्हती.. हे आताच सुरु झाले आहे.. गेल्या काही वर्षात.. आणि आता हे फार वाढले आहे.. आणि आता तर लंबुळके फटाके आवडत नसतील तर तुमच्यात कमी आहे असे मानले जाते... जावु द्या हे चालुच रहाणार

मी - काय हे असेच चालु रहाणार??

ठा - हम्म.. हे असेच चालु रहाणार.. तोवर तुमचं चालु ठेवा... मी आहेच मधून मधून

(पेग ५ समाप्त)

मी - मग काय...करा रिपीट..

ठा आणि तो - येस्स रिपीट.

(भाग ५ समाप्त)

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Sep 2009 - 4:26 pm | बिपिन कार्यकर्ते

साहेब, ही लेखमालिका कधी संपणार? आतुरतेने वाट बघतो आहे.

स्वगत: काही म्हणता काही कळत नाहीये. :(

बिपिन कार्यकर्ते

निखिल देशपांडे's picture

15 Sep 2009 - 4:39 pm | निखिल देशपांडे

लेखमाला वाचतो तर आहेच...
काही काही संदर्भ लागतात काही लागत नाहीत...
पण चालु दे... नाही कळलेले व्यनी करुन विचारुच

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

दशानन's picture

15 Sep 2009 - 5:00 pm | दशानन

जरा डोकं लाव कळेल ;)

अवलिया's picture

15 Sep 2009 - 5:31 pm | अवलिया

>>>>स्वगत: काही म्हणता काही कळत नाहीये.

हाहाहा :)
ज्यांना जो भाग कळला नसेल त्याचे रसग्रहण करुन मिळेल ;)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रभो's picture

15 Sep 2009 - 5:02 pm | प्रभो

झकास रे... काय समजलं नाय...

ह्या लेखमालेस समर्पित एक चारोळी..

राजे सांगत होता 'मात्र रात्रीची गोष्ट' |
गोष्ट ऐकता ऐकता लोकांना आली झीट ||
राजे म्हणत राहिला |
रिपीट रिपीट रिपीट ||

दशानन's picture

15 Sep 2009 - 5:07 pm | दशानन

=))

जरा जुना हो.. सर्व संदर्भ आपोआप लागतील बघ... जास्त क्रिप्टिक माहीती हवी असेल तर प्रभो... खरोखरच्या प्रभुला शरण जा.. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

15 Sep 2009 - 5:18 pm | परिकथेतील राजकुमार

काय राजे, हायकोर्टाच्या बाहेरच्या बार मध्ये बसला होता काय?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

प्रभो's picture

15 Sep 2009 - 5:26 pm | प्रभो

सुप्रीम कोर्ट म्हणायचयं का परा तुला??

अवलिया's picture

15 Sep 2009 - 5:28 pm | अवलिया

राजे अरे काय हे ?
लोकांना समजत नाही पण जुन्या जाणत्या लोकांच्या डोक्याची पण माती केलीस बाबा तु.. ;)
चालायचेच, जड उद्योग मंत्री झाल्यावर बुद्धी काम करेनाशी होते;)

असो. लिहीत रहा असे मी तरी म्हणेन.. पण संपादकांनीच जाहीर रित्या लिहु नका असे सांगितले आहे तेव्हा तु त्यांच्याशी बोलुन ठरव काय ते !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

15 Sep 2009 - 5:32 pm | दशानन

हॅ हॅ हॅ !

चालू दे... !

जेव्हा नको वाटेल तेव्हा आम्हीच थांबू !

अवलिया's picture

15 Sep 2009 - 5:33 pm | अवलिया

ठीक आहे मग सहन करा संपादकीय बांबु

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

श्रावण मोडक's picture

15 Sep 2009 - 8:04 pm | श्रावण मोडक

;)

सूहास's picture

15 Sep 2009 - 8:06 pm | सूहास (not verified)

सू हा स...

धमाल मुलगा's picture

15 Sep 2009 - 8:37 pm | धमाल मुलगा

बेक्कार!!!
=)) =)) =)) =)) =))

राजे, काय हसवून हसवून मारायचंच ठरवलंय का? ;)

रिपीट करताना पुढचा पतियाळा नका भरु....सगळ्याच पब्लिकला झेपत नाही पतियाळा ;)

पुढचा येऊ द्या ऑन द रॉक्स!