"दूरून साजरे" असे पोलाद कारखाने

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
8 Sep 2009 - 9:55 pm

भंगारातून चांगल्या प्रतीचे पोलाद बनविण्याची सर्वसाधारण पद्धत
या पद्धतीत खालील टप्पे येतात: भंगार भरणे, भंगार वितळवणे, पोलादाचे शुद्धीकरण व ओतकाम. त्यानंतर रोलिंग.
भंगार भरणे: पहा आकृती १ व २ Filling the charging bubkets
आकृती १: भंगार एक तर "ग्रॅब बकेट"च्या सहाय्याने भरले जाते किंवा दीड ते दोन मीटर व्यासाच्या मोठ्या लोहचुंबकाद्वारे भरले जाते. खालील चित्रात भंगार ग्रॅब बकेटमधून भंगारबादलीत पडत आहे.
 Filling the scrap
आकृती २: भंगाराच्या गोदामातून ते भंगाररथावर ठेवलेल्या भंगाराच्या बादलीत (Scrap bucket) भरले जाते व ते भरतांना वेगवेगळ्या जातीचे भंगार योग्य प्रमाणात मिसळले जाते. त्यासाठी भंगाररथावर load cells द्वारा वजन करण्याची सोय असते. (पहा आकृती-३) Fig. 3 Scrap Transfer Car with weighing arrangement
आकृती ३: वरच्या चित्रात लोड सेल असे लिहिलेले आहे ते वजन करण्याचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे.
भरलेली भंगारबादली यारीच्या सहाय्याने उचलून भट्टीवर धरली जाते. या यारीला दोन हूक असतात. आमच्या यारीचा मोठा हूक ६५ टन तर छोटा हूक ३० टन वजन उचलू शकतो. मोठ्या हूकने उचललेल्या भंगारबादलीचा खालचा भाग दोन फाळक्यांचा असतो व छोट्या हूकच्या सहाय्याने ते फाळके फाकून त्यातून भंगार भट्टीत पडते. (पहा आकृती-४)
 Charging the EAF
आकृती-४ (वर)
भट्टीत भंगार घालताना खूप ज्वाला बाहेर पडतात. कधी-कधी छोटासा स्फोटही होतो. त्यामुळे भट्टीत भंगार घालताना कुणालाही बाहेर उभे रहाण्याची अनुमती नसते.
८० टन पोलाद बनविण्यासाठी साधारणपणे ८७ टन भंगार लागते व ते ३ किंवा ४ बादल्यांत भरले जाते.
मग विजेच्या आर्कच्या सहाय्याने सर्व भंगार वितळविले जाते. त्याचवेळी पाईपच्या सहाय्याने प्राणवायू (Oxygen) ही फुंकला जातो (inject) व कार्बनची पावडरही फुंकली जाते (inject). या दोन्ही एकाच वेळी केलेल्या प्रक्रियांमुळे विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर कमी होतो. हल्ली आम्ही सुपरसोनिक वेगाच्या oxygen co-jet चे बर्नर्स लावले आहेत त्यामुळे विजेचा खप खूप कमी झाला आहे. (पहा आकृती-५) EAF in operation
आकृती ५: भट्टी चालू असताना. भंगार पूर्णपणे वितळून १६०० डिग्री सेल्सियसचे तपमान व साधारणपणे सोयीचे रासायनिक पृथक्करण मिळाल्यावर भट्टीतून पोलाद डाबूत ओतले जाते. (पहा आकृती-६)  Tapping of EAF
आकृती ६: टॅपिंग ८० टन पोलाद ३ मिनिटात "इकडून तिकडे"! अग्निरथावर आरुढ डाबू मग लेडल फर्नेसखाली नेला जातो.
 Ladle furnace waiting for the next ladle
तिथेही विजेच्या आर्कच्या सहाय्याने पोलाद पुन्हा एकदा गरम केले जाते, त्याचे रासायनिक पृथक्करण करून "तिखट-मीठ" घातले जाते. (त्यांना Ferro-Alloys म्हणतात)
 Ladle furnace in operation
मॅंगनीज, सिलिकन, कार्बन त्यात योग्य प्रमाणात मिसळून, पोलादातील गंधक काढून व त्याचे तपमान साधारणपणे १६०० डिग्री सेल्सियसपर्यंत आणले जाते.
 Ladle kept on turret
त्यानंतर डाबू टरेटवर (Turret) नेला जातो. (पहा आकृती-७)

डाबू टरेटवर ठेवून एका intermediate vessel वर (त्याला टंडिश म्हणतात) आणला जातो. या भांड्यात पोलादाची एक धार पाच धारात विभागली जाते व त्या पाच धारा पाच मोल्डसमध्ये ओतल्या जातात. (पहा आकृती-८)
Start of a first sequence
मोल्डमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी वापरले जाते. प्रत्येक मोल्डला दर ताशी ७० टन पाणी लागते, पण ते पुन्हा वापरले जाते (recycle).
 Casting starts on 5 strands
मोल्डखाली स्प्रे असतात. त्यामुळे मशीनमधून बिलेट (कांब) बाहेर येते ती पूर्णपणे घनस्वरूपात (solid) होऊनच. (पहा आकृती-९).
कांबी पाची स्ट्रॅंडमधून येताना दिसत आहेत)
 5 Straightening units
या कांबी गरमागरम अवस्थेत बाहेर येतात व त्या हव्या त्या लांबीच्या ऑक्सी-बर्शेन टॉर्चेसच्या मदतीने कापल्या जातात.
 Five red-hot strands emerge from caster
कटिंग टॉर्चेसने कापणे नीट दिसणे शक्य नाही. नुसता प्रचंड उजेड दिसतो. खाली पहा  Oxy-Burshane torch cutting billets
बाहेर आलेल्या कांबी नंतर cooling bed वर जातात
 Cooling bed View-1
आणखी एक दृश्यः
 Cooling Bed View 2
आणखी एक दृश्यः
 Cooling Bed View 3
आणखी एक दृश्यः
 Cooling Bed View 4
व तिथून त्या रोलिंग मिलमध्ये जातात.
चुका होऊ नयेत म्हणून काळजी घेतली आहे, तरी पण लिहिता-लिहिता झालेल्या चुका लक्षात आल्यावर दुरुस्त केल्या जातील. तरी क्षमस्व.
रोलिंग मिलबद्दल माहिती एक-दोन दिवसात!
तिथे या कांबी १५ ते १७ वेळा हळूहळू छोट्या केल्या जातात व सळ्या Cooling bed वर नेल्या जातात व तेथे त्या हव्या त्या लांबीत कापल्या जाऊन त्यांची बंडले बनविली जातात. (पहा आकृत्या-१०-१५)

विज्ञानप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

मी कांहीं व्हीडियो चित्रणही केले आहे (एम्पी४) पण ते कसे "चढवायचे" ते माहीत नसल्यामुळे वापरले नाहीं.
हा माझा उपक्रम सर्वांना आवडेल अशी आशा आहे.
खास गोष्ट अशी कीं आजच मी माझ्या व्यावसायिक आयुष्याची ४५ वर्षे पूर्ण केली! एक तर्‍हेने हा माझा "प्रोफेशनल वाढदिवस"च!!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

संतोष सतवे's picture

11 Sep 2009 - 10:54 pm | संतोष सतवे

तुम्ही यु ट्युब या वेबसाइटवर व्हीडीओ अपलोड करु शकता.

चांगला उपक्रम आहे.

लिखाळ's picture

8 Sep 2009 - 10:09 pm | लिखाळ

फार छान..एकदम आवडले.
दुसर्‍या चित्रात उजवीकडे माणूस दिसल्यावर एकंदर प्र्करणाचे आकारमान लक्षात आले. भारीच आहे सगळे :)
पुढे वाचण्यास उत्सुक.

-- लिखाळ.
आम्ही विभक्ती प्रत्यय शब्दाला जोडून लिहितो. तुम्ही कसे लिहिता?

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Sep 2009 - 10:11 pm | बिपिन कार्यकर्ते

काळेसाहेब, चांगला उपक्रम. काही अशाच प्रकारच्या कारखान्यांमधून बघितलेले आठवले. या फर्नेसमधे काही लीकेज आहे का हे बघायला काही थर्मल इमेजिंग असते असे काहीसे आठवते आहे. बरोबर का? त्याचे फोटो बघितल्याचे आठवते आहे. बरोबर असले तर ते फोटो बघायला आवडेल.

बिपिन कार्यकर्ते

सुधीर काळे's picture

8 Sep 2009 - 10:20 pm | सुधीर काळे

थर्मल इमेजिंग अनेक उपयोग आहेत. साधारणपणे पोलाद कारखान्यांत भट्टीच्या, डाबूच्या विटांचे उरलेले आयुष्य "वसूल" करण्यासाठी ते वापरतात. तसेच एकादे विजेचे कनेक्शन ढिले झाले असल्यासही ते दुरून तपासण्यासाठीही वापरतात. १५०,००० व्होल्ट, ३३,००० व्होल्ट, ११,००० व्होल्ट, ३,३०० व्होल्ट अशा उच्च व्होल्टेजसाठी ते खूप उपयोगी आहे. पण ते उपकरण खूपच महाग आहे. म्हणून आम्ही इथल्या PLN कडून हे उपकरण भाड्याने घेऊन आमचे काम करून घेतो. (PLN in Indonesia = MSEB in Maharashtra)
मेकॅनिकल बिघाड predict करण्यासाठीही हे उपकरण खूप उपयुक्त आहे. पण महाग असल्यामुळे बहुदा कुणाहीकडे नसते.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

स्टीलमेकिंगची "साठाउत्तरीची कहाणी पाचाउत्तरी" संपविली आहे. सर्व थरातील लोकांना समजावी म्हणून चित्रकथेच्या स्वरूपात पेश केली आहे. "कार्टून" पाहिल्यासारखीच ही "चित्तरकथा" (वाचण्याऐवजी) पहावी असे मी सुचवेन!
प्रश्नांचे स्वागत आहे.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

धनंजय's picture

8 Sep 2009 - 10:35 pm | धनंजय

धन्यवाद, काळेसाहेब.

निमीत्त मात्र's picture

8 Sep 2009 - 11:10 pm | निमीत्त मात्र

मस्त सफर घडवलीत.

sujay's picture

8 Sep 2009 - 10:57 pm | sujay

काका छान माहीती आणि फोटो. येउ द्या अजुन.

खास गोष्ट अशी कीं आजच मी माझ्या व्यावसायिक आयुष्याची ४५ वर्षे पूर्ण केली! एक तर्‍हेने हा माझा "प्रोफेशनल वाढदिवस"च!! <:P <:P <:P

ईथे अमेरीकेत ६५-७० वर्षच्या वयस्कर लोकाना धडाडीने काम करताना बघुन भारावून जायचो, पण आपल्यातही असे तरूण आहेत हे वाचुन लई भारी वाटल !! तुमच्या पुढच्या वाटचाली करता शुभेच्छा !!
ह्या ४५ वर्षाच्या प्रवासा बद्दल वाचण्यास देखिल उत्सुक आहे.

सुजय

बाळ्कोबा's picture

10 Sep 2009 - 1:24 pm | बाळ्कोबा

वाटचाल वाटचाल वाटचाल......!!!!!!!

रेवती's picture

8 Sep 2009 - 11:13 pm | रेवती

माहीतीबद्दल धन्यवाद!
फोटोंमुळे एकंदर प्लांटच्या अवाढव्यपणाचा अंदाज येतो.
मला सगळे समजले असे म्हणता येणार नाही पण काहीच कल्पना नव्हती त्या मानाने आता हा प्रकार काय असतो त्याची झलक मिळाली.

रेवती

कांहीं इंटरेस्ट असल्यास जरूर विचार! सर्व प्रश्नांचे शक्यतो सोप्या शब्दात (layman's language मध्ये) उत्तर देण्याचे प्रयोजन आहे.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

चतुरंग's picture

8 Sep 2009 - 11:20 pm | चतुरंग

कित्येक वर्षांपूर्वी दूर्गापूर स्टील प्लँटला दिलेली भेट आठवली. सगळ्यात सुरुवातीला थेट मालगाडीच प्लँटमधे नेली जाऊन कित्येक टन कोळसा फर्नेससाठी जाळायला पाठवलेला आठवतोय. कित्येक फूट उभे असे फर्नेस असलेले आठवताहेत. सगळ्यात शेवटच्या स्टेजला चपट्या पट्ट्यांच्या स्वरुपात स्टिलचा पत्रा यंत्रातून बाहेर येत होता आणी त्याची गोल गुंडाळी बनत होती ते आठवते आहे.आता तंत्रज्ञानात अमूलाग्र बदल झालेला असणार आहे.
सुधीरराव अजूनही असेच सचित्र लेखन येऊदे.

'भंगाररथ' हा शब्द फारच आवडला! ;)

(रथारूढ)चतुरंग

नितिन थत्ते's picture

9 Sep 2009 - 8:43 pm | नितिन थत्ते

काळेसाहेबांची प्लॅण्ट बहुतेक स्क्रॅपपासून स्टील बनवते. त्यामुळे तेथे कोळसा लागत नाही. दुर्गापूर, टिस्को-जमशेदपूर वगैरे मध्ये तसेच आर्सेलर्-मित्तलच्या काही प्लॅण्टमध्ये लोहखनिजापासून स्टील बनवले जाते तेथे लोहखनिजाच्या क्षपणासाठी (Reduction) कोक वापरतात त्यासाठी कोळसा लागतो. (अशा प्लॅण्टना इण्टिग्रेटेड स्टील प्लॅण्ट म्हणतात)

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

सुधीर काळे's picture

11 Sep 2009 - 7:33 am | सुधीर काळे

थत्तेसाहेब, एकदम बरोबर!
पण कोळसा म्हणजे कोल (coal) नव्हे तर 'मेटॅलर्गिकल कोक' (Metallurgical cocke) लागतो. साधारणपणे एक टन लोखंडाला (पोलाद नव्हे) ५००-६०० किलो. पण आज अनेक नव्या सुधारणा झालेल्या आहेत उदा: ब्लास्ट ऑक्सिजन एनरिचमेंट, पल्व्हराइज्ड कोल इंजेक्शन (Blast Oxygen Enrichment, pulvarised coal injection)वगैर.
लोखंडापासून पोलाद बनविण्यासाठी आज BOF (बेसिक ऑक्सिजन फर्नेस) वापरतात. (यालाच LD Converter असेही नाव आहे)
सुधीर
-----------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

पाषाणभेद's picture

9 Sep 2009 - 3:03 am | पाषाणभेद

सही फोटो आलेले आहेत. माहितीही आम्हासारख्या अडाणींसाठी उपयूक्त.

आपण या पोलाद कारखान्याला "दूरून साजरे" का म्हणतात?

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

(फक्त काळेप्रणाली दिसत नाही कोठे. :-))
-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

सुधीर काळे's picture

9 Sep 2009 - 11:55 am | सुधीर काळे

पोलादाच्या कारखान्यातील धूळ, गरमी व कानठळ्या बसविणार्‍या "विजांच्या (अक्षरश:) कडकडाट"चा सतत आवज (आर्किंग नॉईज ज्यासाठी कानांना प्रोटेक्टिव्ह साधने-कर्णरक्षके-वावरावी लागतात ) यामुळे तसे हे काम जरा "भारी"च असते व फक्त दूरूनच भव्य दिसते म्हणून मी तसे म्हणालो.
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

चित्रा's picture

9 Sep 2009 - 4:19 am | चित्रा

चित्रमय लेख. "तिखट मीठ" आवडले.

एकलव्य's picture

9 Sep 2009 - 8:10 am | एकलव्य

सुरेख दर्शन! धन्यवाद!!

एक प्रश्न : आपला उद्योग डिमांड पुल वर अवलंबून की सप्लाय पुशवर? सहज कुतुहल इतकेच...

साधारणपणे आमचा उद्योग इमारती बांधण्याच्या उद्योगाच्या मागणीवर फार अवलंबून असतो. सप्लाय पुश विषेष उपयुक्त नसते कारण त्याने फक्त भाव खाली "पाडण्या"चे सत्कार्य होते. पण डेस्परेट परिस्थितीत काही कंपन्या ते करतात. मग कट-थ्रोट परिस्थिती निर्माण होते.
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

एकलव्य's picture

10 Sep 2009 - 11:46 am | एकलव्य

उत्तराबद्दल धन्यवाद... :)

क्रान्ति's picture

9 Sep 2009 - 8:49 am | क्रान्ति

फोटो पाहून या व्यवसायाच्या भव्यतेचा थोडासा अंदाज आला.
खास गोष्ट अशी कीं आजच मी माझ्या व्यावसायिक आयुष्याची ४५ वर्षे पूर्ण केली! एक तर्‍हेने हा माझा "प्रोफेशनल वाढदिवस"च!!

हार्दिक अभिनंदन! :)

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

सहज's picture

9 Sep 2009 - 8:53 am | सहज

सुरेख चित्रकथा! व आपल्या प्रोफेशनल वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!

"एस एम एस" डिपार्टमेंटचा विजय असो!

अजुन येउ दे.

ऋषिकेश's picture

9 Sep 2009 - 10:09 am | ऋषिकेश

छान सफर
आता, चित्रे तर बघितली, आता या क्षेत्रातील ४५ वर्षांच्या विविध अनुभवांवर -अर्थकारणावरहि वाचायला आवडेल

लेखातील लोड सेल वगैरे ट्रांसड्युसर्सची नावं वाचून थोडा नॉस्टॅल्जिक झालो :)
एकूणच गोष्टींचे आकारमान बघता तुम्ही पिझोएलेक्ट्रीक लोड सेल्स वापरत असाल असं (उगाच) वाटलं

ऋषिकेश
------------------
कारखान्यातील गोंगाटात-स्फोटांच्या/मशींन्सच्या आवाजात रेडीयोचा आवाज ऐकू येत नाहि

अमोल केळकर's picture

9 Sep 2009 - 11:54 am | अमोल केळकर

अवांतर प्रतिसाद,
वा ! ऋषिकेश साहेब. आपल्या समयोचित रेडिओ प्रतिक्रिया आवडतात. आपल्या प्रतिसादातील सर्व गाण्यांची ( वेळेसकट ) नोंद ठेवली आहे. कारखान्यातील गोंगाटात आम्ही कानात वायरी घालून गाणी ऐकतो. तेव्हा वाजवाच रेडिओ.
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

स्वाती दिनेश's picture

9 Sep 2009 - 12:34 pm | स्वाती दिनेश

छान सफर
आता, चित्रे तर बघितली, आता या क्षेत्रातील ४५ वर्षांच्या विविध अनुभवांवर -अर्थकारणावरहि वाचायला आवडेल.
ऋषिकेशसारखेच म्हणते,
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

9 Sep 2009 - 11:46 am | प्रभाकर पेठकर

आपल्या व्यवसायाचे पोलादी, सचित्र-वर्णन कुतुहूलजनक आहे. वाचताना विषयातील रस वाढत गेला आणि छायाचित्रांमधून अंगावर येणारी (यंत्रसामुग्रीची) भव्यता मन दडपवून टाकणारी आहे.
ह्या विषयाची बहुअंगी माहिती आपल्या पुढील लेखनातुन मिळेल अशी आशा आहे.

धन्यवाद आणि अभिनंदन.

व्यावसायिक वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

अमोल केळकर's picture

9 Sep 2009 - 12:04 pm | अमोल केळकर

काळे साहेब,
इथे कुठल्या प्रकारचे स्टील बनवले जात ? ( कार्बन, अलॉय, स्टेनलेस स्टील ). फायनल प्रॉडक्ट काय अहे ? वायर रॉड , ब्राईट बार का कॉईल . गॅल्व्हनाइजड प्रॉडक्ट बनतात का ?

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सुधीर काळे's picture

9 Sep 2009 - 1:18 pm | सुधीर काळे

ज्याला "रीइन्फोर्समेंट बार" उर्फ री-बार"('शिमिट'मध्ये घालायच्या सळ्या) म्हणतात ते आम्ही बनवतो.
जकार्तातल्या प्रत्येक गगनचुंबी इमारतीत आमचं पोलादच घेतलं जातं. याचं कारण आमच्या पोलादाची प्रत (quality) व डिलिव्हरीची हमी.
खरंच आमचं उत्तम प्रतीचं पोलाद आमच्या रोलिंग मिलच्या मर्यादित कुवतीमुळे या कमी किमतीच्या उत्पादनात खितपत पडलंय्. नाही तर हेच पोलाद वापरून कितीतरी जास्त किमती उत्पादनं बाजारात आणता येतील.
खरं तर सध्या मी या रोलिंग मिलच्या मर्यादाच घालवायचे काम करीत आहे.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

JAGOMOHANPYARE's picture

9 Sep 2009 - 12:16 pm | JAGOMOHANPYARE

साक्षात पोलादी पुरुषाचा वारसा पहायला मिळाला. धन्यवाद...

.............. सरदार पटेल तुमच्यावर खुष असतील... :)

पारंबीचा भापू's picture

9 Sep 2009 - 1:08 pm | पारंबीचा भापू

दादा,
एकदम जालिम लेख लिहिला तुम्ही! पोलादातले रो-का-ठो न कळणार्‍या मलाही खूप आवडला व या क्षेत्राबद्दल एक नवी जिज्ञासा निर्माण झाली!
आंदे और ऐसेच लेख!
भापू

सहज's picture

9 Sep 2009 - 1:15 pm | सहज

>या क्षेत्राबद्दल एक नवी जिज्ञासा निर्माण झाली!

आयटी पेक्षा भारी पगार मिळतो!

नंदन's picture

9 Sep 2009 - 1:17 pm | नंदन

शिवाय पोलादाच्या सान्निध्यात असल्याने हळवेपणा इ. जाणवणार नाही हा फायदाही आहेच.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुधीर काळे's picture

13 Sep 2009 - 2:04 pm | सुधीर काळे

नंदनसाहेब,
<<शिवाय पोलादाच्या सान्निध्यात असल्याने हळवेपणा इ. जाणवणार नाही हा फायदाही आहेच. नंदन>>
पण पोलादाच्या सांनिद्ध्याने मेंदू गंजतो असा सोयिस्कर आणि गोड गैरसमज "स्वगौरवित विद्वान" लोकात प्रसृत आहे! खरं तर पोलाद जवळ असेल तर त्याची affinity for oxygen organic अवयवांपेक्षा जास्त असल्याने मेंदू गंजण्यापासून सुरक्षित रहातो.
तरी हळवेपणापासून आणि मेंदू गंजण्यापासून सुरक्षितता असे दोन फायदे या धंद्यात काम करणार्‍याना होतात.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

अमोल केळकर's picture

9 Sep 2009 - 1:39 pm | अमोल केळकर

छा ! काही तरीच तुमचे

( स्टील कंपनीत खितपत पडलेला ) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सुधीर काळे's picture

11 Sep 2009 - 7:45 am | सुधीर काळे

दुर्दैवाने हे खरे नाही. पण हल्ली भारतात पोलादनिर्मितीत वाढ करण्याची लाट आली आहे त्यामुळे जरा बरे दिवस आले आहेत. पण छत्तीसगड, ओरिसा वगैरेसारख्या ठिकाणी जावे लागते.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

नंदन's picture

9 Sep 2009 - 1:23 pm | नंदन

लेख. सचित्र माहितीमुळे संग्राह्य झाला आहे. तुम्ही चित्रित केलेले व्हिडिओजही पहायला आवडतील. दहा मिनिटांहून कमी कालावधीचे असल्यास यूट्यूबवर अपलोड करता यावेत.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

व्हीडियोचे सात छोटे-छोटे तुकडे आहेत. पण आज नेट फार स्लो आहे. चढले की पाठवतो.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Sep 2009 - 5:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जरुर.

लेख आवडला.

अदिती

अर्चिस's picture

9 Sep 2009 - 1:48 pm | अर्चिस

आपल्या ४५ वर्ष्याच्या अनुभवाबद्दल वाचायला आवडेल

अर्चिस

सुधीर काळे's picture

9 Sep 2009 - 8:25 pm | सुधीर काळे

काय आणि किती लिहायचे ते कळत नाहीये. जास्त लिहिले तर जास्त होईल म्हणून व कमी लिहिले तर कमी लिहिले म्हणून भ्या वाटतय.
चतुरंगजी, बिपिनजींना विचारून ठरवतो. बघू या.
त्या आधी रोलिंगचा "धडा" लिहून काढतो.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

तेन्नालीराम's picture

9 Sep 2009 - 8:20 pm | तेन्नालीराम

वा, सुधीरभाऊ! तुमचा लेख लई आवडला.
आमच्यासारख्या उष्ण्प्रवृत्तीच्या लोकांना नाही झेपणार हे काम!
अहो, सारखे आपले अंगावर घामोळे! नायसिलवाल्यांची धन करायची!!
आता व्हिडिओ शॉटची वाट पहात आहे!
ते. रा.

मी माझ्या पोलाद कारखान्याची बरीच छायाचित्रे इथे 'पेश' केली. कांहीं व्हीडियो क्लिप्सही चढविल्या जात आहेत. त्यात आपल्याला क्वचितच माणूस दिसला असेल. सगळी छायाचित्रे यंत्रांची आहेत. त्यात "द्विपादयंत्र" औषधालाच दिसते. हे खरेच आहे. आज जवळ-जवळ संपूर्ण प्रक्रिया आमचे पर्यवेक्षक (supervisors) व कामगार कंट्रोल रूममधून मॅनिप्युलेटर्सच्या सहाय्याने घडवून आणतात.
भट्टीची मरम्मत करणे (fettling), इलेक्ट्रोड जोडणे, सँपल काढणे, तपमान मोजण्याची लान्स (lance) पोलादरसात घुसवणे, कास्टिंगची सुरुवात करणे, डाबू व टंडिश बनविणे (विटा लावणे) अशी मोजकीच कामे जवळ जाऊन करावी लागतात.
(पण जर का काही बिनसलं तर 'मातोश्रीं'ची आठवण येते व घामेघूम व्हायला होते)
आजची ही परिस्थिती पोलाद बनविणारे धातुशास्त्रज्ञ व ऑटोमेशन इंजिनियर्स यांच्यामधील निकटच्या सहकार्याचे प्रतीक आहे.
म्हणूनच दरवर्षी पाच लाख टन बनविण्याची क्षमता असलेल्या आमच्या कारखान्यात मेल्टिंग, रोलिंग, मेंटेनन्स, क्वलिटी कंट्रोल व "सफेत कॉलरवाले" (खरेदी, विक्री, इन्स्पेक्शन, गुदाम, पर्सोनेल, अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, सिक्यूरिटी) असे सगळे धरून फक्त ६०० लोक कामाला आहेत.)
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

फोटोंमधे मशीन्सची भव्यता बघूनही दडपायला होतंय सुधीरकाका.
प्रोफेशनल आयुष्याची ४५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

(जन्मापासूनच्या आयुष्याची ४० वर्षेही अजून पूर्ण न केलेला) संदीप

नितिन थत्ते's picture

11 Sep 2009 - 8:43 am | नितिन थत्ते

दुरून साजरे म्हणण्याचा काळे साहेबांचा उद्देश असा की हा फार धोकादायक प्रकार आहे.
(पूर्वी एका छोट्या खाजगी स्टील कंपनीत प्रॉजेक्ट केले होते. तेथे काळेसाहेब म्हणतात तसे ऑटोमेशन वगैरे काही नव्हते. स्टीलच्या रसाने ओतप्रोत भरून हिंदकळणार्‍या इकडून तिकडे क्रेनने नेल्या जाणार्‍या लॅडलच्या- पातेल्याच्या आसपास माणसे वावरत असल्याचे आणि त्या हिंदकळणार्‍या लॅडलमधून थोडाथोडा रस सांडत असल्याचे चित्र डोळ्यासमोर आणून पहावे. मला आठवून अजून काटा येतो.)

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

सुधीर काळे's picture

11 Sep 2009 - 5:29 pm | सुधीर काळे

थत्ते-जी,
माझ्या आजवरच्या व्यवहारिक आयुष्यात एकूण २ जीवघेणे अपघात झाले आहेत पण ते अपघात कुठेही झाले असते! (म्हणजे त्याचा आणि पोलाद कारखान्याचा संबंध नव्हता).
जे लोक पोलाद कारखान्यात काम करतात त्यांना केंव्हा व कुठे पळायचे हे माहीत असते. त्यामुळे बारिक-सारिक भाजल्याचे अपघात (चुकून गरम असलेली सळी पकडणे वगैरे) सोडून मोठे अपघात क्वचितच होतात.
३०-४० टनापेक्षा मोठ्या भट्ट्या बर्‍यापैकी स्वयंचलित असतात. त्याहून लहान भट्ट्या आज अपवादात्मकच चालू असतील.
अर्थात आय. टी. क्षेत्रापेक्षा नक्कीच जास्त धोका असतो.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

स्वाती२'s picture

11 Sep 2009 - 11:03 pm | स्वाती२

फोटो आणि लेख दोन्ही आवडले. माझा नवरा foundry सांभाळतो- sand casting.
व्यावसायीक जीवनाची ४५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन. तुमचे अनुभव वाचायला नक्कीच आवडेल.

सुधीर काळे's picture

12 Sep 2009 - 12:43 pm | सुधीर काळे

आपले मिस्टर आमच्यासारख्या व्यवसायात असल्यामुळे त्यांना जास्त अपील झाले असेल.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
आपण कुठे असता?
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

आनंद घारे's picture

13 Sep 2009 - 8:48 pm | आनंद घारे

आणि त्याहून चांगले 'विटी' प्रतिसाद वाचायला मजा आली. मी कॉलेजला असतांना भद्रावतीचा कारखाना पाहिला होता. त्यानंतर लहान सहान रोलिंग मिल्ल्स आणि फाउंडरी पाहिल्या होत्या त्यामुळे समजायला अडचण आली नाही.
चाळीस वर्षानंतर मिपावर भेटण्याने खूप आनंद झाला.
आपला गाववाला
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

सुधीर काळे's picture

14 Sep 2009 - 9:26 pm | सुधीर काळे

धन्यवाद. गाववाला (जमखंडीकर) भेटल्याचा खूप आनंद झाला.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

डॉ.प्रसाद दाढे's picture

14 Sep 2009 - 10:11 pm | डॉ.प्रसाद दाढे

अभिनंदन!! मला मुळातच उद्योजकांबद्दल अन त्यातही मराठी उद्योजकांबद्दल प्रचंड आदर आहे. तुमचा हा कारखाना प्रत्यक्ष बघता येईल का?
एक तांत्रिक प्रश्नः तुम्ही ३१६ एल हा मिश्र धातूसुद्धा बनविता का? (त्या ग्रेडचे स्टील सर्जरीत वापरले जाते म्हणून तोच थोडासा ठाऊक आहे)

सुधीर काळे's picture

14 Sep 2009 - 10:27 pm | सुधीर काळे

मी या कारखान्याचा मालक वगैरे नसून तिथला एक डायरेक्टर आहे. तांत्रिक शाखेचा प्रमुख.
३१६-एल हे पोलाद मी मुकुंदमध्ये असताना बनविले आहे. ते मॉलिब्डेनमयुक्त स्टेनलेस स्टील आहे. एल म्हणजे एक्स्ट्रा-लो-कार्बन असलेले. हे पोलाद बनविणे सोपे नाही!
३०४-एल पण असते. त्यातही एलचा तोच अर्थ आहे.
आमचा कारखाना जकार्ताला आहे. आपण जकार्तास्थित असाल तर जरूर या. आपले स्वागत आहे.
धन्यवाद
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

अमोल केळकर's picture

15 Sep 2009 - 9:43 am | अमोल केळकर

मी सध्या इथेच ( मुकंद मध्ये )पडीक असतो. आणि ३१६ एल ला कोणी ग्राहक आहे का हे शोधत आहे.
अधिक माहिती साठी संप्रर्क करु शकता

अमोल
मुकंद - एक्स्पोर्ट डिपार्टमेंड- कळवा
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

अमोल केळकर's picture

15 Sep 2009 - 9:44 am | अमोल केळकर

मी सध्या इथेच ( मुकंद मध्ये )पडीक असतो. आणि ३१६ एल ला कोणी ग्राहक आहे का हे शोधत आहे.
अधिक माहिती साठी संप्रर्क करु शकता

अमोल
मुकंद - एक्स्पोर्ट डिपार्टमेंड- कळवा
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

सुधीर काळे's picture

15 Sep 2009 - 11:27 am | सुधीर काळे

प्रिय अमोल! WOW!!
तू मुकुंदमध्ये 'पडीक' आहेस हे आताच लक्षात आले. किती वर्षे मुकुंदमध्ये पडीक आहेस? आधी कुठे होतास? आज-काल किती टन स्टेनलेस तिथे दरमहा बनते? (अरे-तुरे केल्याबद्दल रागावणार नाहीस अशी आशा आहे! 'मुकुंद'मधला म्हणून जरा जास्तच आपुलकी!!)
खरंच! अगदी 'माहेरचं माणूस' भेटल्यावर स्त्रियांना कसं वाटत असेल त्याची कल्पना आली. मी मुकुंद कंपनीला साक्षात माझी आईच समजतो! इतके त्या कंपनीचे माझ्यावर उपकार आहेत. आम्ही तिला जरूर उर्जितावस्थेस आणले, पण जन्मदात्री ती जन्मदात्री!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

सुधीर काळे's picture

15 Sep 2009 - 11:33 am | सुधीर काळे

------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

अमोल केळकर's picture

15 Sep 2009 - 11:38 am | अमोल केळकर

व्य. नी. पाठवला आहे
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

प्रथम आपल्या प्रोफेशनल वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा! सुन्दर लेख फोटोमुळे सर्वाना समजण्यास सोपे झाले. थोडे स्टिल क्षेत्राबद्द्ल वाचायला आवडेल.

सुधीर काळे साहेब, आपल्या ४५ वर्षांच्या दैदिप्यमान व्यावसायिक कारकीर्दीखातर आपले हार्दिक अभिनंदन. मराठी माणसांना दुष्प्राप्य तांत्रिक माहिती सोप्या भाषेत (प्रकाशचित्रांच्या) सांगून कारकीर्दीचे वर्धापन साजरे करण्याची आपली पद्धतही अभिनव आणि स्तुत्य आहे.

अशा तांत्रिक माहित्यांचा खुला प्रसार आपल्या मराठी लोकांच्या सामान्यज्ञानात मोलाची भर घालेल यात तिळमात्रही संशय नाही.

आपल्या व्यावसायिक अनुभवाचे भांडार आता इथे मायबोलीत, खुले करावेत अशी नम्र विनंती!

सुधीर काळे's picture

15 Sep 2009 - 8:24 pm | सुधीर काळे

खरं सांगायचं तर तो दिवस माझा व्यावसायिक वाढदिवस आहे हे तो लेख अपलोड करेपर्यंत माझ्या लक्षात नव्हते व तो अपलोड करतानाच माझ्या लक्षात आले. ७ सप्टेंबरला मी''भंगार रथ' व आणखी एक फोटो अपलोड केले होते. त्यावेळी सर्वांकडून मला याबद्दल जास्त विस्तारपूर्वक लिहायची विनंती येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण सभासदांनी जरा आग्रह केला म्हणून मी दुसर्‍या दिवशी फोटो काढणे, ते योग्य क्रमाने मांडणे, त्याखालची कॉमेंट्री लिहिणे या गोष्टी केल्या व ते सर्व करता-करता माझ्या लक्षात आलं की तो माझा व्यावसायिक वाढदिवस आहे. लक्षात आलं म्हणून आणि केवळ गंमत म्हणून मी त्या गोष्टीचा उल्लेख केला एवढेच. व्हीडियो चित्रण वगैरे नंतर केले ते लवकरच पहायला मिळेल. तेही आपणा सर्वांना आवडेल अशी आशा आहे!
तरी यात प्री-प्लॅनिंग वगैरे कांहीं नव्हते, होता तो केवळ योगायोग!
पण बर्‍याच लोकांना लेख आवडला असावा. त्यामुळे मला खूप आनंद वाटतो.
यानंतर रोलिंग मिलचा एक असाच परिचय मी करून देणार आहे. ती प्रोसेस व्हीडियोत पहाण्याने जास्त समजेल. कारण रोलिंग मिलमध्ये गोष्टी खूप वेगाने घडतात व पहायला जास्त मजा येते. तरी आगामी तारखेकडे लक्ष ठेवा! (अगदी "येणार-येणार लौकरच रुपेरी पडद्यावर"च्या थाटात!)
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

गोळेसाहेब,
माझी कारकीर्द "दैदिप्यमान" वगैरे काही नाही, ४५ वर्षें ‍(वेगवेगळ्या पायर्‍यांवर उभे राहून) अक्षरशः पाट्या टाकल्या इतकेच! पण वाचन, लेखन, गायन, वादन वगैरेसारखी कलाक्षेत्रातली मुसाफिरी करत, वेळात वेळ काढून अनेक छंद जोपासत मी इमाने-इतबारे पाट्या टाकल्या हे मात्र नक्की. देवाच्या कृपेने थोडेफार व्यावसायिक यशही मिळाले. आज मागे वळून पहाताना समाधान वाटते हेही खरे. यात सगळे आले.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.