यशोधरांची सुंदर गझल http://misalpav.com/node/9264 वाचून मला ही लिहावसं वाटलं :&
~X( ~X( ~X(
असे चोंदले, राहिला श्वास नाही
घसे शेकले, थांबला त्रास नाही
उरी कोंडला, पूर बेभान सारा
असो भेसुरा! कोरडा खास नाही
मला धाप लागे, उरी दाटल्याने
कुणा हाक देईन, आवाज नाही
किती क्षोभ नाकातुनी शेंबडाचा
मिळाली सर्दी साथ, आराम नाही
जसे होतसे प्राण नाकात गोळा
जरी पाहिजे, मोकळा श्वास नाही
किती झीट झाले, तरी पार नाही
उतारे ठरे फोल ईलाज नाही
चेतन
अवांतर: कधीपासुन ही सर्दी काही पाठ सोडत नाही आहे. या सर्दीच्या बैलाला घो ...
प्रतिक्रिया
7 Sep 2009 - 4:37 pm | अमोल केळकर
मस्त .
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
7 Sep 2009 - 8:12 pm | अजुन कच्चाच आहे
मस्त!
मिळाली सर्दी साथ, आराम नाही
मध्ये
मिळाली सर्द साथ, आराम नाही
चालेल का
.................
अजून कच्चाच आहे.
(पिकणार कधी ते कळायला नाडीपट्टी पहावी काय?)
7 Sep 2009 - 10:19 pm | चेतन
अमोल धन्यवाद
अजून कच्चाच आहे. सर्द ही चालेल मी ही कवितेच्या प्रांतात अजुन कच्चाच आहे
:T
चेतन
8 Sep 2009 - 9:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्तच!
तुमची सर्दी पाहून मला, मी सर्दीला केलेलं आवाहन, थांब ना, आठवलं.
अदिती
8 Sep 2009 - 10:58 am | चेतन
धन्यवाद अदिती
तुमची कविता खरचं मस्त आहे