दुष्काळ, कर्ज यात बुडालेले शेतकरी असोत का नर्मदातीरी भंगलेली घरटी असोत.. दु:ख शेवटी काळीज पिळवटणारेच असते..
नाहीच आस जेथे जगण्यात काय आहे?
आयुष्य ठेवलेल्या सरणात काय आहे?
दिसतात येथ सारे मिठ्ठास बोलणारे..
स्वार्थात रंगलेल्या शब्दांत काय आहे?
आता नको पुन्हा ती आश्वासने, दिलासे..
बोलावयास सारे.. पोटात काय आहे?
तू सांग देवराया आता कसा जगू मी..
काळीज फाटलेले.. ठिगळात काय आहे?
देऊ कसा भरवसा कोमेजल्या मनाला..
तुटतात जेथ नाती मैत्रात काय आहे?
असतो असाच थोडा पाऊस सांडलेला..
भेगाळल्या धरेला पुरणार काय आहे?
पडत्या घरास माझ्या सोडून मीच जातो..
अवशेष दावणार्या दगडांत काय आहे?
(विषण्ण) राघव
प्रतिक्रिया
31 Aug 2009 - 6:22 pm | मदनबाण
दिसला नाही मार्ग तरी
चालावे लागणारच आहे
सोडवं सोडवं म्हंटले तरी
जगावे लागणारच आहे.
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
31 Aug 2009 - 6:35 pm | श्रावण मोडक
सलाम.
31 Aug 2009 - 7:46 pm | अवलिया
सलाम !
31 Aug 2009 - 10:42 pm | बिपिन कार्यकर्ते
सलाम !
अवांतर: विषण्ण व्हायला काय झालं रे राघवा?
बिपिन कार्यकर्ते
31 Aug 2009 - 8:11 pm | रामदास
सुरेख कविता.
अभिनंदन.
31 Aug 2009 - 9:35 pm | क्रान्ति
पडत्या घरास माझ्या सोडून मीच जातो..
अवशेष दावणार्या दगडांत काय आहे?
__/\__
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
31 Aug 2009 - 10:46 pm | अनामिक
सुंदर कविता...
-अनामिक