गणपतीची सजावट !! (छायाचित्रासह)

पाऊसवेडी's picture
पाऊसवेडी in कलादालन
25 Aug 2009 - 2:03 pm

गणपती दोन दिवसांवर आले होते आणि माझ्या घरी मात्र कसलीच तयारी झालेली नव्हती.आईनेही दहा वेळा सांगून झाले कि विकतच तरी मखर घेऊन ये म्हणून पण कोणाच आईएकेल तर काय :) (त्यातून आईचे ;) ) तसेही शनिवार असल्यामुळे मला सुट्टीच होती वेळ पण खूप होता मग मी ठरवले कि आपणच घरी तय्यार करूयात :? त्यात बहिणच कलाकार(commercial artist) असल्यामुळे ती दिवसभर हेच काम करायची ;) हे गेले दोन तीन वर्ष पाहिलेही होते त्यामुळे काही खास पुर्वाताय्यारी वगेरे करयची नव्हतीच कारण अनेक प्रकारचे रुंग आणि ब्रश घरीच होते म्हणून मग पक्का ठरवले .

आधी म्हटले कि फक्त पर्यावरणाच्या दृष्टीने चांगल्या अश्या गोष्टीच वापरून करूयात परत मग त्यला बराच वेळ लागेल असे लक्ष्यात आले :? कारण हलीव किवा कुठेलीही छोटी गवते उगवायला कमीतकमी दोन दिवस तर लागेतातच त्यामुळे हा विचार बाद केला आणि मग थर्माकोल चाच आधार घायचे ठरवेले आणि संध्याकाळी थर्माकोल आणायला गेले आणि दुकानदाराने किती जाडीचा हवा असे विचारल्यावर खूप विचार करून शेवटी ५-७ मिलीमीटर चा द्या असे सांगितेले तोही खरेतर तेव्हा मला जाडच वाटत होता पण शेवटी सांगितेले पण तो दुकानदार म्हणाला कि अग इतका पातळ आम्ही ठेवत नाही #:S सगळे १० च्य पुढेचे असतात मग शेवटी एक १५ आणि एक २० मिलीमितरचा असे दोन थर्माकोल घेतेले आणि घरी आले तर आत येताच आईचे बहिणीवर ओरडणे सुरु झाले तू करणार का मखर?वेळ नाही आत्ता तू फार वेळ लावतेस आपण विकतच आणूयात वगेरे वगेरे (हे सगळे आई एका भारी commercial artist ला ओरडत होती )पण जेव्हा तिला कळले कि ते मी आनले आहे तेव्हा तर ती आणखीनच घाबरली ~X( कारण मी करणार म्हणजे मी शनिवारी बाकी काहीही नाही करणार तेव्हढे एकाच काम करणार आणि ते पण कसे काय होणार त्याची शंका म्हणजे सगळा घटयाचाच सौदा होता पण ठीक आहे कर तुझे तू काहीही असे म्हणून शेवटी तिने परवानगी दिली शनिवारी बाकी सगळे बाजूला ठेऊन मी सुरुवात केली आणि सुरुवातीला कच्ची रेखाटने करयला सुरुवात केली तर त्यातली एकही नक्षी आईला पसंत पडत नव्हती (|: शेवटी मग माझ्या सगळ्या दोन तीन दिवसांच्या मखराच्या सजावटीच्या युक्त्या संपल्यावर आई म्हणाली तुला हवे तसे आणि जमेल तसे कर हे सगळे होईएपर्यंत दुपारचे १२-१२.३० वाजले.

मग शेवटी आधी तू काहीतर छान जेवण बनव बुवा आपण जेवूयात आणि मग पुन्हा सुरुवात करूयात मी तुला मदत करतो वगेरे अशावासाने देऊन बाबांनी मला मस्त भुलवले आणि मी पण मस्तपैकी खायला तय्यार केले आणि मग जेवण झाल्यावर मुळपदावर आलेली आणि अडून बसेलेली गाडी ढकलण्यासाठी मी बाबांना म्हणाले चला आता आपण सुरुवात करूयात पण कसचे काय बाबा मस्त एक झोप काढ्याच्या विचारात होते आणि त्यांनी तू तय्यारी कर मी लगेच उठून तुला मदत करतो वगेरे बोलून झोपले पण. :''( शेवटी एक एकदम साधीशी नक्षी शोधून मी थर्मोकोल वर ती नक्षी कोरली पण दोनीही बाजूचे गोल काही एकसारखे येते नव्हते ~X( (आणि कर्कटक वगेरे बहिणीच्या पसाऱ्यात शोधण्याचा जाम कंटाळा आला होता )आणि आपण अगदीच नवशिके आहोत हे मान्य करायला मन तय्यार नव्हत मग थर्माकोल च्या दोनीही बाजूंवर खुपसे गोल काढून झाल्यावर त्यातला खरा शेवटी केलेला गोल समजून घेऊन ठेर्माकॉल कापले आणि ते बर्यापैकी नीट आले नंतर त्यावरचे रंगकाम हा विषय माझ्या (आजून सुरु न झालेल्या )phd पेक्षाही खूपच अवघड होते हे लक्ष्यात आले कारण सुरुवातीला फक्त चमक टाकून करूयात न असे म्हणून बहिण सर्रास वापरते ते रबर सोलूषण घेतल आणि मस्त पैकी थर्माकोल वर पसरवले पण त्यामुळे माझे १० मम जाडीचे थर्मोकोल वितळून ते २-४ मम चेच शिल्लक राहिले आता हे मला कुठे माहिती कि त्या rabar solution मुळे थर्माकोल वितळते कापायची सगळी मेहेनत वाया गेली होती आणि दिवसाबरोबर माझा उत्साह पण आता मावळायला लागेल होता मग परत पहिल्यापासून तयारी करून लेस लावायची योजना आखली पण कापून झाल्यावर पांढर्या थर्माकोल वर लेस काही चांगली दिसेना म्हणून मग त्याला रंग करायचे ठरवले.

सगळीकडे रंग शोधून झाल्यावर लक्ष्यात आले कि acralyic मध्ये हवा तो रंग नाही आहे :? poster मध्ये आहे मग शेवटी तोच वापरून रंग दिला तर तो सुकायचे काही नावाचे घेईना कारण त्यात थोडेसे पाणी मिसळेले होते मग शेवटी त्या थर्माकोल मधून सगळे पाणी निथळून बाहेर पडले आणि तो रंग सुकायला सुरुवात झाली आणि मग साधारण ४० -४५ मिनिटांनी तो सुकला नंतर मग जे काही अनेक सजावटीचे प्रकार झाले त्यमुळे त्या बिचार्या थर्माकोलचा आणि माझाही जीव निम्मा झाला होता #:S शेवटी मग निळ्या आणि केशरी रंगाची रंगसंगती आणि त्यावर चंदेरी रंगाची चकमक आणि मस्त अशा जांभळ्या रंगाची फुले लाऊन शेवटी संध्याकाळपर्यंत फक्त मागचाच भाग झाला

एव्हाना सगळेच दुपारची झोप काढून जागे झाले होते आणि चहा पितापिता सहानभूतीने म्हणत होते कि छान आहे,घरी केल्येस ( त्यातून मी अशा अर्थाने ) त्यामानाने छानच आहे ग चालते तेव्हढे वगेरे वगेरे

आत्ता सगळाच झाले होते फक्त कडेचे दोन भाग राहिले होते मग परत पहिल्यापासून नक्षी वगेरे शोधून कापून झाले पण आत्ता काही ते परत रंगवण्याची ताकद नव्हती मग रंगीत कागद आणायला गेले तर चंदेरी कागदच मिळेना खूप शोधाशोध करून तो मिळवला तर तो काही शोभत नाही असेच वाटले.

शेवटी सगळ्यांनाच दया वेगेरे आल्यामुळे कि काय सगळ्यांनीच मदत केली शेवटची सजावट करयला आणि रात्रीचा सगळा स्वयंपाकाचा प्रश्न दादाने आणि बाबांनी मोगलाई आलू वगेरे करून सोडवला आणि रात्री १०-११ पर्यंत माझही घोड गंगेत न्हालेच होते मग मस्त पैकी जेवणावर तव मारता मारता हे कलाकार लोक किती थातूर मातुर कामे करतात >:) यावर परिसंवाद झाला पण आज दिवसभराच्या कामामुळे यात आम्हीच जिंकलो :) आणि मस्त पैकी उद्याच्या गणपतीची वाट पाहत झोपून गेलो

वरच्या सगळ्या गोंधळातून शेवटी जे काही झाले ते खालीच दिले आहे पहा आणि सांगा कसे आहे ते ?????

कलामुक्तकमौजमजा

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

25 Aug 2009 - 2:25 pm | पर्नल नेने मराठे

वरिल ३ फोतो दिसत नहियेत्.
शेव्तचा दिसला
मस्त्च, मोरपिसे छान दिसत आहेत ;;)
चुचु

सुप्रिया's picture

25 Aug 2009 - 2:38 pm | सुप्रिया

सजावट आणि गणपती दोन्ही छान दिसताहेत.
स्वतः मखर बनवायच्या हिंमतीची दाद दिली पाहीजे.

sneharani's picture

25 Aug 2009 - 2:43 pm | sneharani

Photo Disat nahiyet. shevatcha disato to khup Chhan

मसक्कली's picture

25 Aug 2009 - 2:46 pm | मसक्कली

मस्तच दिसतय डकोरेशन........:) =D>

विमुक्त's picture

25 Aug 2009 - 3:15 pm | विमुक्त

सुंदर!!!!... घेतलेली मेहनत जाणवतीयं...

प्रमोद देव's picture

25 Aug 2009 - 3:30 pm | प्रमोद देव

मी तर तुमच्यापेक्षा भारी कलाकार आहे. ;)

माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे

सूहास's picture

25 Aug 2009 - 6:15 pm | सूहास (not verified)

झ का स...

क्रमांक १,२ आणी तीन चे फोटो दिसत नाहीत..कदाचित मी ऑफिसात आहे म्हणुन...

किस्सा एकदम मस्त....बाकी आपण साप वगैरै घरावेत.आणी आम्हालाही शिकवावे....डेकोरेशन च्या भानगडीत पडु नये(ह.घ्या.)

आमच्या घरी मी हे सगळ वहिनींच्या ताब्यात देत असतो...पण शेवटी किती ही काही झाल की थोडीफार मदत करावीच लागते...

सू हा स...

रेवती's picture

25 Aug 2009 - 7:06 pm | रेवती

छान सजावट!
बाप्पांचा फोटू लोभसवाणा दिसतोय!

रेवती

प्राजु's picture

25 Aug 2009 - 7:58 pm | प्राजु

छान आहे फोटो. बाप्पा एकदम गोंडस दिसताहेत.. :)

सूचवणी : लेखात स्मायलीज कमी वापरल्या तर वाचताना बरं वाटेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मदनबाण's picture

25 Aug 2009 - 9:34 pm | मदनबाण

छान सजावट केली आहे...
पण ३ पैकी फक्त शेवटचा फोटो दिसत आहे.

मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

अभिजा's picture

2 Sep 2009 - 2:03 pm | अभिजा

सुंदर सजावट आहे!

फ्रॅक्चर बंड्या's picture

2 Sep 2009 - 4:58 pm | फ्रॅक्चर बंड्या

सजावट छान आहे.

कावळा's picture

5 Sep 2009 - 5:52 am | कावळा

सजावट छान आहे.
वरील तीन फोटो दिसत नाहीत.

प्रभाकर पेठकर's picture

5 Sep 2009 - 10:06 am | प्रभाकर पेठकर

सजावट छान झाली आहे. प्रयत्नांती परमेश्वर.
फोटो काढताना जरा काळजी घ्यायची होती. गणपती जरा off center झाला आहे.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

पाऊसवेडी's picture

5 Sep 2009 - 10:38 am | पाऊसवेडी

मनापासून धन्यवाद

>>>गणपती जरा off center झाला आहे.
मी पुढच्या वेळी काळजी घेऊन फोटो काढेन
धन्यवाद काका

जपत किनारा शीड सोडणे - नामंजूर!
अन वार्‍याची वाट पहाणे - नामंजूर!
मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची
येईल त्या लाटेवर डुलणे - नामंजूर!

महेश काळे's picture

7 Sep 2009 - 11:29 am | महेश काळे

खुपच सुरेख सजावट अहे...
डोळ्यचे परणे फिटले..

मी माझा ..महेश