बाप्पा मोरया!
काही दिवसापूर्वी देवकाकांनी 'एखादी ५-६ ओळींची छोटीशी बंदिशीसारखी रचना केलीस का? असं विचारलं, आणि नुकतीच मशकूर अली खान यांची मालकौंसातली "मुरख मन मेरे" ही बंदिश ऐकून तिच्यात मराठी शब्द बसवता येतील का, असा विचार करता करता ही गणेशवंदना मनातून कागदावर उतरली. उद्या गणेशचतुर्थी, आणि मिपाचा वर्धापनदिन. त्यानिमित्त माझ्याकडून ही छोटीशी भेट.
सकल कलांचा उद्गाता
गुणेश गजानन भाग्यविधाता
प्रथम पूज्य हा शिवगौरीसुत
गणनायक शुभदायक दैवत
या विश्वाचा त्राता विनायक
या विश्वाचा त्राता
आदिदेव ओंकार शुभंकर
मी नतमस्तक या चरणांवर
तू विद्येचा दाता गजमुखा
तू विद्येचा दाता
प्रतिक्रिया
22 Aug 2009 - 9:28 pm | प्रकाश घाटपांडे
आम्हाला काही भेटल्या नाहीत ब्वॉ ऐकायला . तिथ पघायला भेटल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
22 Aug 2009 - 9:35 pm | क्रान्ति
बाप्पांनी रंगी नाचता नाचता गडबड केली होती! आता ऐका.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
22 Aug 2009 - 10:46 pm | लवंगी
:)
22 Aug 2009 - 11:12 pm | बिपिन कार्यकर्ते
छान ओघवती रचना आहे. ऐकता मात्र येत नाहीये.
बिपिन कार्यकर्ते
23 Aug 2009 - 7:26 am | प्राजु
मागे तू ही दाखवली होतीस मला..
खूप छान आहे.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Aug 2009 - 7:51 am | विसोबा खेचर
सुंदर काव्य...
23 Aug 2009 - 10:38 am | दशानन
सुंदर काव्य !
असेच म्हणतो....