नरफमस्कार ,
मीरफी बरफंड्या,
अरफसे आरफामी शारफाळेत अरफसाताना बोरफोलत आरफासु ?
काही कळत नाहीये का ?
मदनबाण यांची स्वाक्षरी वाचली ती अशी "चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो"
ही "च" ची भाषा.
आम्ही शाळेत असताना "रफ"/ "टरफ" ची भाषा वापरायचो , तिची आठवण झाली
उदा :
तुझे नाव काय ? = तुरफुझे नारफाव कारफाय ? ( रफ ची भाषा ) = तुटरफुझे नाटरफाव काटरफाय ? ( टरफ ची भाषा )
: आरफापले "मिरफिसळ-पारफाव" वरफर स्वारफागत आरफाहे
कशी वाटली ही भाषा ( भाषाच ना की काही वेगळे नाव आहे ?)
तुम्ही सुद्धा अशाच काही भाषा वापरत असाल तर आम्हाला पण सांगा.
----
आरफापला फ्रॅरफ्रॅक्चर बरफंड्या (आटरफापला फ्रॅटरफ्रॅक्चर बटरफंड्या ) (आपला फ्रॅक्चर बंड्या )
बोलायला सोपे आहे हो लिहायला जाम आवघड
प्रतिक्रिया
18 Aug 2009 - 2:57 pm | बाकरवडी
मरफला आरफावडले
:B :B :B बाकरवडी :B :B :B
खाव खाव खाव !
फक्त मिसळपाव !!
18 Aug 2009 - 3:01 pm | भाग्यश्री कुलकर्णी
अमुन्डा मी रुपया अणीमुन्डा आरुपया अझीमुन्डा मारुपया अहिण मुन्डा ब रुपया अम्ही मुन्डा आरुपया अमुन्डाया रुपया अषेत मुन्डा भारुपया अलतो मुन्डा बोरुपया.(मी आणी माझी बहीण आम्ही या भाषेत बोलतो.)
18 Aug 2009 - 4:22 pm | घाशीराम कोतवाल १.२
भाग्यश्री ताई हि रफ ची भाषा आहे कि रुपायाची अहो एकुण ८ वेळा ह्यात रुपया आला आहे म्हणजे आठ रुपये ;)
हलकेच घ्या
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
18 Aug 2009 - 3:03 pm | भाग्यश्री कुलकर्णी
बोलायला सोपे आहे हो लिहायला जाम आवघड....
अगदी मनातल बोललात.
18 Aug 2009 - 3:04 pm | फ्रॅक्चर बंड्या
हे जाम अवघड आहे नाही जमत :T :T
18 Aug 2009 - 3:11 pm | भाग्यश्री कुलकर्णी
शब्दाचे पहिले अक्ष् र काढुन त्या जागी "अ"बोलायचे.उदा.भाग्यश्री मध्ये "अग्यश्री मुन्डा "मग काढलेले "भा"(अक्षर) बोलायचे "अग्यश्री मुन्डा भा रुपया. सरावानी ये ईल.
18 Aug 2009 - 3:23 pm | बाकरवडी
अकरवडी मुन्डा बारुपया अमुन्डा मीरुपया
अमुन्डा तु रुपया ओणमुन्डा कोरुपया?
:B :B :B बाकरवडी :B :B :B
खाव खाव खाव !
फक्त मिसळपाव !!
18 Aug 2009 - 3:20 pm | फ्रॅक्चर बंड्या
अमेल मुन्डा ज रुपया
18 Aug 2009 - 3:22 pm | भाग्यश्री कुलकर्णी
अगे मुन्डा ल रुपया अहो मुन्डा ररुपया
18 Aug 2009 - 3:31 pm | फ्रॅक्चर बंड्या
काय भाषा आहे .
ठार मरेन दिवसभर बोललो तर
"लगे रहो" समजायला वेळ लागला हो
~X( ~X( ~X( ~X(
18 Aug 2009 - 3:23 pm | टारझन
सर्व केस गळून उपटावेसे वाटत आहेत ... कसलं बेक्कार पॅनिक आहे हे !!
भाग्यश्री ... ___/\___ तुझ्या भाषेपेचा तमिळ बोललेलं परवडेल असं वाट्टय !!
18 Aug 2009 - 3:32 pm | बाकरवडी
अकलामुन्डा टरुपया अरझन्मुन्डा टारुपया अतीमुन्डा किरुपया अनमुन्डा छारुपया असेल्मुन्डा दिरुपया.
=))
:B :B :B बाकरवडी :B :B :B
खाव खाव खाव !
फक्त मिसळपाव !!
18 Aug 2009 - 3:31 pm | प्रमोद देव
यका रे यका तोरक?
जआ तळेशा हीना लागे?
चसेअ म्हीआ तोलबो.
ह्या तषेभा म्हीआ णंगा णप तोणम्ह .
हेमो लभू येग यारिवसा
18 Aug 2009 - 3:37 pm | झकासराव
मीरफी आरफानी मारफाजा मारफावस भारफाउ ररफफच्या भारफाषेत बोरफोलत होरफोतो. हीरफी भारफाषा त्यारफानेच मरफला शिरकफवली आरफाये. :)
18 Aug 2009 - 3:41 pm | टारझन
ए गप्प्पा सगळ्यांनो ...
चुचु ला एक लेख लिहायला लावेल नाही तर !!
ए बाकर वड्या !! केस उपटले की लगेच माणूस टकला होतो काय ? :)
18 Aug 2009 - 3:45 pm | पर्नल नेने मराठे
मी लिहिणारच आहे ;) एक ,लव्कर्च प्रकशित होइल.
चुचु
18 Aug 2009 - 3:53 pm | बाकरवडी
अणजेमुन्डा म्हरुपया अतामुन्डा आरुपया अकल्याच्यामुन्डा टरुपया अतील्मुन्डा
आरुपया अंदूमुन्डा मेरुपया अमुन्डा हीरुपया असेल्मुन्डा दीरुपया !
=)) =))
:B :B :B बाकरवडी :B :B :B
खाव खाव खाव !
फक्त मिसळपाव !!
18 Aug 2009 - 3:52 pm | विशाल कुलकर्णी
आपमाम्ही पपमण मपमम च्यापम्या भापमाषेत बोपमोलायचोपमो !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
18 Aug 2009 - 4:01 pm | सूहास (not verified)
स्ड्ङ्स्ड्फ्ङ्स्ड्फ्ङ्स्ङ्ड्।स्ड़्च्च्स्ड्च
स्ड्ळ्;फ़्स्डाफ्फ
'ड्;फ्स्स्वॉसाड्व्ङ्डंब़्फ्प्[वॅफ
'स्ड्व्ङ्ळ्स्डा़फ]\
[ड्ड्ङ्प्';स्फ्[व्ङ्फ्]व्ङ्ङ्स्]व्[र्ट्ञॉप्टृटॉप्क्ष्च्वंबं,
'॓ड्ड
ब्द्ब्६५३४व्३अॅ४ङ्६८आङ्ळ्;़स्ड्ण़्स्ड़्ळ्व
सू हा स...
18 Aug 2009 - 5:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ऐला सूहास, तुलाही बरी तिच भाषा येते जी भाषा मी आणि माझ्या आत्याच्या शेजारच्या मावशींची नणंद वापरायचो. तू त्यांच्या शेजारच्या काकांचा भाचा तर नाहीस ना??
अदिती
18 Aug 2009 - 8:06 pm | संदीप चित्रे
ह्या नावाचे एक प्रायोगिक नाटक पाहिलं आहे का?
माझी एक मैत्रीण त्यात काम करायची.
18 Aug 2009 - 8:48 pm | अश्विनीका
आन्पाम्ही ननपप च्यानप्या भानपाषेत बोनपोलायचो.
जनपराशी विनपिशाल भानपांउंसानपारखी फनपक्त पनपम च्यानप्या जानपागी ननपप वानपापरायचो.
शिवाय 'च' ची भाषा तर होतीच.
- अश्विनी
18 Aug 2009 - 11:36 pm | अनिल हटेला
येरमे पोरमोरानो कारमाय चारमाललयए रे ?
बरमैलोबा चारमायनीजकर !! ;-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
19 Aug 2009 - 1:13 am | Nile
वरील सगळ्यांना माझी भाषा येत नाही वाटतं!
19 Aug 2009 - 4:57 am | मदनबाण
लहानपणी अशा वेगवेगळ्या भाषेत संभाषण करणे म्हणजे धमाल असे,,,च ची भाषेचा उपयोग गोट्या या मालिकेतील सर्व बाल कलाकारांनी केला होता...तेव्हाच मला त्याची मजा वाटली !!! आणि मग च च्या भाषेत बोलणे सुरु झाले.
तुम्ही दिलेली रफ ची भाषा माहित होती पण टरफ बद्धल माहित नव्हते !!! :)
बाकी अग्यश्री यांची भाषा अजुन काय आपल्याला झेपलेली नाय,पन हाय लय भारी !!!
चदनबाणम.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
19 Aug 2009 - 5:54 am | स्वाती२
लहानपणच्या आठवणी जागवल्यात. मला फक्त च चीच भाषा यायची पण माझी मैत्रिण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भाषा बोलायची.
19 Aug 2009 - 8:19 am | शाहरुख
सलील कुलकर्णी आणि संदीप खरे या जोडीचे 'च' च्या भाषेत एक लहान मुलांसाठीचे गाणे आहे...मस्त आहे, नक्की ऐका !!
चमालातु चांगतोसा चमी चकए चष्टगो
मजेत बसा पसरून पाय मुळीच नाही कष्ट गो
(पायरेटेड लिंका न देणारा :-D) शाहरुख