मी आणि माझा फोन

अनामिक's picture
अनामिक in जनातलं, मनातलं
13 Aug 2009 - 7:25 am

अबे अभितक तु यही फोन युज कर रहा है, अब तो बदल ले... - एक मित्र

जरूरत क्या है? - मी

आज कल तो कितने सही सही मॉडेल्स मिलते है... कबतक वही डिब्बा युज करेगा... - एक मैत्रिण

वो सब ठिक है, पर मेरे लिये यही ठिक है. और ऑफिसका सेलभी है मेरे पास. - परत मी

पर वो भी तो डिब्बाही है.. तु आय फोन, या एल जी व्ह्यु क्यों नही लेता... या फिर ब्लॅकबेरी तो ले ही ले... - दुसरा मित्र

कितनी कंजुसी करेगा... नही तो हम सब काँट्री करके तुझे सेलफोन गिफ्ट करते है... - मित्रांपैकीच कुणीतरी

अरे लेकीन फोन किसलिये होता है? बात करनेके लिये ना? मेरा डिब्बा वो काम कर लेता है... मुझे नये फोन की जरूरत नही लगती.... और मेरा इसके साथ एक अटॅचमेंटसा हो गया है... - मी परत समजवायचा प्रयत्न करतो.

प्रत्येक दोन-तीन भेटीनंतर माझा सेलफोन हा आमच्या ग्रुपमधे (ज्यात मी सोडून अजून एकच मराठी आहे) हसण्याचा किंवा चर्चेचा विषय ठरलेला असतो. खरंतर सध्या बाजारात येणार्‍या नवीन सेलफोन्स आणि त्यात असलेल्या सुविधा बघता कदाचित माझे मित्र योग्यच सांगत असतील. पण खरोखर मला नव्या फोनची गरज वाटतच नाही. शिवाय माझी माझ्या फोनशी खरंच एक अटॅचमेंट झालीये, ज्यामुळे हा फोन टाकून नव्या फोनला खिशात (पक्षी आयुष्यात) जागा द्यायची इच्छाच होत नाही. आणि फोनचं मुख्य काय काम असतं हो? हव्या त्या वेळी हव्या त्या व्यक्तीशी बोलण्याचं माध्यम बनणे... बरोबर? माझा फोन हे काम अगदी चोखपणे बजावतो, मग त्याला बदलण्याची गरजच काय?

तसं पाहायला गेलं तर माझा सध्याचा फोन हा माझ्या आयुष्यातला दुसरा फोन. इथे अमेरिकेत आल्यावर जवळ जवळ ६-८ महिन्यांनी माझ्या पहिल्या फोनने, मोटोरोला व्ही-३००ने, माझ्या आयुष्यात प्रवेश केला. तळहातावर मावणार्‍या, अगदी पिटुकल्या, निळ्या रंगाच्या, फ्लॅप असलेल्या ह्या फोनने माझ्यावर तेव्हा चांगलीच भुरळ पाडली होती. पण नव्याचे नऊ दिवस प्रमाणे फोनच्या काँट्रॅक्टचे वर्ष संपता संपता ह्या फोनने त्रास द्यायला सुरवात केली. काँट्रॅक्टमधे असल्याने हा फोन मोबाईलसेवा देणार्‍या कंपनीकडून बदलूनही घेतला, पण त्यानेही ४ महिन्यातच आपली मान टाकली... आणि मला ह्या फोनचा तिथेच निरोप घ्यावा लागला. आता मला नवीन काँट्रॅ़क्ट करून नवीन फोन घेणे भाग होते, पण तो घेईस्तोवर काय? असा प्रश्न पडला. तेव्हा एका सीनियर मित्राने त्याचा स्पेयर फोन, सोनी-एरिकसन, मला वापरायला दिला. ते साल असेल २००५. मित्रांनो, हाच सोनी-एरिकसन, माझ्या आयुष्यातला दुसरा फोन, चार वर्षानंतर अजूनही माझ्या बरोबर आहे.

माझी ही 'सोनी' (म्हणजे माझा फोन) खूप खूप गुणी आहे. एवढ्या दिवसांपासून माझ्याजवळ असूनही कध्धी हिने मला त्रास दिला नाही. आजही हिच्याशी दररोज २-३ तास बोलूनही २-२ दिवस चार्ज करायला लागत नाही. कधीही कॉल ड्रॉप झाले नाहीत की कधी हिच्या (अंतर्गत) एंटीनाने रेंज धरसोड केली नाही. नाही म्हणायला हिच्या मागून आलेल्या आणि तिखट झालेल्या फोनने अनेकदा भुरळ पाडली... कधी कधी हिला सोडून दुसरीला जवळ करावेसेही वाटले. पण प्रत्य़क्ष्यात असं काही करू नाही शकलो. त्यामागे कारणही तसेच आहेत. दोन वर्षांपुर्वी रोलरकोस्टर राईडवरून खाली पडून ही हरवली... ज्याच्याकडे गेली त्याने हिला लॉस्ट अँड फाऊंड मधे जमा केली. तेथील लोकांनी ही माझीच आहे याची खात्री करून एका आठवड्याने सुखरूप माझ्याकडे पाठवली. त्यावेळी तिला सुखरूप बघून खूप आनंद झालेला. ह्या प्रसंगानंतर मी खूप काळजी घ्यायचा प्रयत्न केला. पण ही परत दोन वेळा हरवली आणि दोन्हीवेळा सुखरूप माझ्याकडे आली. हिच्यावर असलेली फ्रेंन्डस् ची रिंगटोन, म्हणजे "आय विल बी देअर फॉर यू" हे ती नुसती म्हणतच नाही तर त्या शब्दांना पाळते सुद्धा!

आज कितीतरी वेगवेगळ्या सुविधा असलेले फोनस् उपलब्ध आहेत. इंटरनेट, ऑनलाईन टिवी, जी.पी.एस सगळं सगळं ह्या फोनस् मधे उपलब्ध आहे. पण एवढं सगळं असून खरंच या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे का हे तपासून बघणे गरजेचे आहे. मी आधीच म्हंटल्याप्रमाणे मला तरी ह्या गोष्टी अनावश्यक वाटतात. शिवाय माझी माझ्या सोनीशी एक अटॅचमेंट आहे. छोटंस यंत्र असलं म्हणून काय झालं, हिला सोडायला जीव होत नाही. हिच्याकडे बघता कदाचित हिच मला लवकरच सोडून जाईल असे वाटते, पण तोपर्यंत माझ्या सोनीला मी सुद्धा "आय विल बी देअर फॉर यू" असेच म्हणेन...

ये रही मेरी 'सोनी'.....

अवांतरः फोनला हासू नये!

-अनामिक

मुक्तकप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

नंदन's picture

13 Aug 2009 - 7:46 am | नंदन

लेख आवडला, विचारांशी बव्हंशी सहमत आहे. (अलीकडे आय-फोन घ्यायचा झालेला क्षणिक मोह याच विचारांनी बाजूला सारला होता :))

आज कितीतरी वेगवेगळ्या सुविधा असलेले फोनस् उपलब्ध आहेत. इंटरनेट, ऑनलाईन टिवी, जी.पी.एस सगळं सगळं ह्या फोनस् मधे उपलब्ध आहे. पण एवढं सगळं असून खरंच या सगळ्या गोष्टींची आपल्याला गरज आहे का हे तपासून बघणे गरजेचे आहे. मी आधीच म्हंटल्याप्रमाणे मला तरी ह्या गोष्टी अनावश्यक वाटतात.

- हे अर्थातच व्यक्ति/कालसापेक्ष आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी दस्तुरखुद्द मोबाईलचीच गरज कुठे होती? पण एकदा जीवनमान उंचावलं/प्रगती (भौतिक क्षेत्रातली) होत गेली की अनेक वस्तू चैनीतून गरजेच्या नसल्या तरी ज्यांच्यावाचून आपलं अडू शकत ह्या सदरात येतात. टीव्ही, कॅमेरा, फ्रीज, रेडिओ, मोबाईल ही त्यातलीच उदाहरणं. मागणीशिवाय प्रगती होणं, नवीन शोध लागणं कठीण झालं असतं. अर्थात, तू म्हणतोस तसा ह्या गोष्टी तुला (किंवा 'क्ष'ला) अनावश्यक वाटत आहेत हे तुझ्या/'क्ष'पुरतं पुरेसं आहे. उगाच ब्रँडच्या/नवीन फॅडच्या मागे धावण्यात तसा विशेष अर्थ काही नाही. (अर्थात ज्याला रस आहे, त्यालाही नावं ठेवण्यात फार काही अर्थ नाही).

शेवटी धोंडो भिकाजी जोशी म्हणतात तसं अधूनमधून घड्याळाला किल्ली देत रहाणं महत्त्वाचं :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

श्रावण मोडक's picture

13 Aug 2009 - 9:56 am | श्रावण मोडक

सहमत. माझ्याच जुन्या सोनी मोबाईलची आठवण आली.
धोंडो भिकाजींचे उदाहरण पाहून बरं वाटलं. नंदन इज बॅक.

अनामिक's picture

13 Aug 2009 - 5:01 pm | अनामिक

नंदन... तुझ्या मताशी नक्कीच सहमत आहे. कुणाला कोणत्या गोष्टीची गरज असेल ते सांगता येत नाही. काही दिवसांनी कदाचित माझे मतही बदललेले असेल. सध्या तरी कोणतीही नवी वस्तु घेताना मी 'नीड' आणि 'वाँट'ची तुलना करतो. काही वेळा माझी 'नीड' जिंकते तर काही वेळा 'वाँट' जिंकतो.

-अनामिक

चटोरी वैशू's picture

13 Aug 2009 - 7:50 am | चटोरी वैशू

वा! चला ... माझ्यासारख पण कुणीतरी आहे हे वाचुन आनंद झाला.... मला पण माझा नोकिया -३३१५ असाच प्रिय होता... तो मी २००३ मधे घेतला होता... पण दुर्दैवाने मी तो नोव्हेंबर २००८ मधे मी हरवला आणि तो मला नंतर नाही भेटला.. मला खूप दु:ख झाले तेव्हा... पण माझ्या नवर्‍याला आणि मित्र परिवाराला आनंद झाला होता : (
त्यानंतर मी अजून पण दुसरा मोबाईल नाही घेतला (नवर्‍याचा वापरते ; ) )

दशानन's picture

13 Aug 2009 - 7:52 am | दशानन

आपल्या मताशी सहमत.
लेख मस्त जमला आहे...

मी नवीन फोन घेत असतोच पण माझ्याकडे माझा पहिला फोन सोनी-इरक्सन टी-६८ आय अजून पण आहे... :) व मला जाम आवडतो...

ह्याच्या नंतर मी नवनवीन अनेक फोन घेतले पण सोनी-इरक्सन टी-६८ सर कोणालाच येणार नाही ... स्मॉल & लव्हली मोबो... !

त्याला मी अजून पण छोटू म्हणतो... इटुकला पिटुकला :D

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

आवडाबाई's picture

14 Aug 2009 - 4:45 pm | आवडाबाई

आय हाय !!

माझाही हाच पहिला फोन !! आणि माझ्याही कडे देखिल अजून आहे ठेवलेला, अर्थात आता काम नाही करत तो, पण वापरणं अगदीच अशक्य झालं तेव्हाच ठेवला त्याला. फारच गोड फोन आहे हो !! माझ्या कडे छान निळा रंग होता, तुमच्याकडे ?

लेखात लिहिल्या प्रमाणे खरंच emotional attachment झाली होती त्याच्याशी ! (मी एकटीच नाही म्हणायची !! ) तशीच घरातल्या जुन्या टीव्हीशी पण झालेली ! शेवटी वर्ल्ड कप च्या वेळी बदलला !!

मस्त लेख !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Aug 2009 - 8:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नव-नवे मोबाईलचे मॉडेल ही आपली गरज नाही, असे म्हणून त्यापासून पळू नका. मस्त अद्यावत सुविधा असलेला हँडसेट घ्या. जुन्या हँडसेटचे दु:खाचे कढ काही दिवस येतील पण, पुन्हा नव्या हँडसेटमधे तशाच भावना गुंतून जातील. बाकी, तुम्ही सोनीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या दिसता त्यामुळे नजीकच्या काळात 'सोनी' सोडून जाईपर्यंत बदलाची शक्यता कमीच दिसते ! :)

पुलेशु !

-दिलीप बिरुटे

Nile's picture

13 Aug 2009 - 8:12 am | Nile

काय हे अरसिक लोक! वरील सगळ्यांना मॅस्ट कॅलंडरांकडे वर्गणी गोळा करुन पाठवावं लागणार!

-(फुकटात) ब्लॅकबेरीधारक. ;)

छोटा डॉन's picture

13 Aug 2009 - 8:18 am | छोटा डॉन

बरोबर आहे तुझे अनामिक, असतेच आपली अ‍ॅटॅचमेंट कशाशी ना कशाशी, मग त्यात वस्तुत कितीही नवे बदल घडुन अनेक नवी मॉडेल्स बाजारात आली तरी आपली ओढ मात्र तिकडेच असते ...

माझी अशीच "सोनी" एक जुनी जीन्स पँट आहे.
आता जुनी किती म्हणावी हे सर्व सापेक्ष आहे अर्थात, आपल्याला मात्र ती लै लै लै आवडते हे खरे, शिवाय त्यावरच मस्त ६ वर्षापुर्वीचे जॅकेट ...
खल्लास, बाकी कायबी उच्च आणि महागडे कपडे नकोत आपल्याला ह्यासमोर ...
त्यानंतर कित्येक जिन्स घेतल्या, वापरल्या, फेकुन दिल्या मात्र "त्या सोनी जीन्स"ची मज्जा काही औरच आहे ..

असो, सुंदर लेख.
असेच अजुन येऊद्यात ...

------
( जीन्सप्रेमी )छोटा डॉन

प्राजु's picture

14 Aug 2009 - 12:22 am | प्राजु

आणखीही येऊदेत.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

14 Aug 2009 - 12:58 am | टारझन

लय भारी लेख रे अनामिका ... दिल से लिखेला .. भा गया भिडू..

शिवाय त्यावरच मस्त ६ वर्षापुर्वीचे जॅकेट ...

च्यायला ... डाण्या .. सुक्क्या बोंबला .. सहा वर्षांपासून तुझी साईझ तीच का रे ? जगदंब जगदंब !! लेका ... जिवाला खात जा रे काही तरी !!

-(डॉणच्या काळजीत) टॉण

मदनबाण's picture

13 Aug 2009 - 8:36 am | मदनबाण

फोनचं मुख्य काय काम असतं हो? हव्या त्या वेळी हव्या त्या व्यक्तीशी बोलण्याचं माध्यम बनणे... बरोबर? माझा फोन हे काम अगदी चोखपणे बजावतो, मग त्याला बदलण्याची गरजच काय?
हल्ली मलाही हे पटायला लागले आहे.जेव्हा मला पहिला मोबाईल घ्यायचा होता तेव्हा मी तिर्थरुपांना भरपुर मस्का लावत असे...पेपरात येणार्‍या विविध मोबाईल्स च्या जाहिराती दाखवत असे...त्यांचे गुण वर्णन करुन सांगत असे...मोबाईलने कनेक्टेड राहण आज काल किती आवश्यक आहे याचे यथाशक्ति समर्थन करत असे.शेवटी मोबाईल घेतलाच...मग अनेक मोबाईल कसे बदलले गेले मलाच कळले नाही...त्यातला पहिला घेतलेला मोबाईल हरवला तेव्हा लयं त्रास झाला...
सध्या जो फॉरम्युला वापरतोय तो माझ्ह्या एकदम फायध्याचा आहे..म्हणजे जो जुना मोबाईल होता तो मातोश्रींना दिला,माझा सोनी डब्ल्यु ५५० तिर्थरुपांना दिला आणि मी नविन मोबाईल घेतला !!! :D
शाळेत जात असतानाच लोकांकडे पेजर आले होते, तेव्हा जरा पेजर वाजला की लोक एकदम स्टाईल मधे मेसेज वाचत...पेजरची निळी,हिरवी स्क्रीन पाहताना अगदी मजेशीर दिसायची.नंतर मोबाईल आला १६रु इनकमिंग आणि आउट गोईंग !!!वॉकी-टॉकी सारखे हॅडसेट घेऊन काही लोग हिंडायचे यात सुद्धा शो बाजी पुश्कळ चालायची...आता ब्लॅकबेरी वाली माणसे पाहतो आहे.
आता हातातील घड्याळ्यात सुद्धा मोबाईल आला आहे...तो कसा वाटतो ते पहाच :--
http://www.mobilewhack.com/reviews/f88_wrist_watch_mobile_phone.html
http://www.techgadgets.in/mobile-phones/2007/17/w100-wrist-watch-mobile-...

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

अवलिया's picture

13 Aug 2009 - 9:25 am | अवलिया

मस्त लेख ... आवडला. :)

--अवलिया

ब्रिटिश टिंग्या's picture

13 Aug 2009 - 10:03 am | ब्रिटिश टिंग्या

लेख मस्त जमला आहे!
जवळपास प्रत्येकाचीच अशी कुठल्या न कुठल्या बाबतीत अ‍ॅटॅचमेंट असतेच...... :)

माझा स्वत:चाच पहिला फोन नोकिया ६६१०आय मी २००५ मध्ये घेतला अन् अजुनही वापरत आहे :)

पर्नल नेने मराठे's picture

13 Aug 2009 - 10:10 am | पर्नल नेने मराठे

मला फोन म्हट्ले कि नोकियाला पर्याय नाहि असे वाटे पण नवर्याचा सोनी एक्सपेरिया पाहुन फोन बदलाय्चा मोह होतोय :-d
चुचु

पर्नल नेने मराठे's picture

13 Aug 2009 - 10:15 am | पर्नल नेने मराठे

चुचु

स्वाती दिनेश's picture

13 Aug 2009 - 11:35 am | स्वाती दिनेश

लेख आवडला आणि लेख,प्रतिसाद वाचून आपल्यासारखा विचार करणारे बरेच जण आहेत हे पाहून आनंदही झाला.
स्वाती

यशोधरा's picture

14 Aug 2009 - 11:37 am | यशोधरा

स्वातीताईसारखेच म्हणते! आवडला लेख.

मिसळभोक्ता's picture

13 Aug 2009 - 11:37 am | मिसळभोक्ता

फोन आणि अंडरवियर नियमीतपणे बदलावी.

-- मिसळभोक्ता

मीनल's picture

13 Aug 2009 - 5:53 pm | मीनल

मजा आली वाचून लेख.
`मोबाईल` ही एक स्टाईल आहे आज काल.गरज कोणाला किती हा मुद्दा वेगळा.

माझ्या मावशी च्या मुलाने मस्त मोबाईल घेऊन दिला आहे तिला. पण एकतर पिशवीमधे असतो .आणि दुसर म्हणजे वापरताच येत नाही.

माझ्या मैत्रीणीच्या मुलाने केडिट वर अनेक फोन घेतले आहेत. जुने किती तरी तसेच पडून आहेत घरात.पण नवी नवी स्टाईल लागते सतत.

मीनल.

क्रान्ति's picture

13 Aug 2009 - 9:38 pm | क्रान्ति

मस्त लिहिला आहे लेख. बर्‍याच गोष्टींची अशी वेगळीच जवळीक असते ना आपली! माझी पण अशीच जवळीक आहे माझ्या नोकिया ५३१० म्युझिक एक्स्प्रेसशी. त्याआधी मी एक मॉडेल बदललं होतं, म्हणजे हरवलाच होता सेल म्हणून. पण हा घेतल्यापासून मात्र नो चेंज!

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Aug 2009 - 11:31 pm | llपुण्याचे पेशवेll

छान.. लेख आवडला.. जुन २००५(माझा पहीला मोबाईल) पासून आजपर्यंत माझे ४ मोबाईल झाले. सुदैवाने कोणतेच हरवले नाहीत. सुरुवात केली ती नोकीया Nokia 6610i पासून. Nokia 6610i

मग त्यानंतर म्युझिकफोनची हुक्की आल्यामुळे Nokia 6681 घेतला.Nokia 6681
पण त्यात एफएम रेडीओ ऐकण्याची सुविधा नव्हती म्हणून मग या सर्व सुविधा आणि चांगला कॅमेरा असलेला Sony K790i घेतला.Sony K790i

गेल्यावर्षी AT&T च्या कॉन्ट्रॅक्टमधे स्वस्त मिळतो म्हणून iPhone3G घेतला. त्यामुळे अगदी अंडरवियरसारखे नसले तरी वर्षाला १ प्रमाने फोन बदलणे झाले. असा हा माझा खर्चिक फोन प्रवास. आता मात्र पुढची ३ वर्षे फोन बदलायचा नाही असे ठरवले आहे.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

स्वप्निल..'s picture

14 Aug 2009 - 12:06 am | स्वप्निल..

चांगला जमलाय लेख आणि फोन पण मस्तच :) !

स्वप्निल

धनंजय's picture

14 Aug 2009 - 3:51 am | धनंजय

छान जमला आहे.

सहज's picture

14 Aug 2009 - 12:04 pm | सहज

हेच म्हणतो.

बाकरवडी's picture

14 Aug 2009 - 9:20 am | बाकरवडी

हा माझा सध्याचा फोन !!! ;)

:B :B :B बाकरवडी :B :B :B

खाव खाव खाव !
फक्त मिसळपाव !!

शितल's picture

14 Aug 2009 - 11:33 am | शितल

अनामिक,
मस्त लिहिले आहेस.
मला तर सेल फोन रफ अ‍ॅण्ड टफ आवडतो पाण्यात पडो, नाही तर वरून खाली परत वाजला पाहिजे नोकियाचे हॅन्डसेट जास्त टिकतात असा आता पर्यन्तचा अनुभव आहे. :)

भाग्यश्री कुलकर्णी's picture

14 Aug 2009 - 11:50 am | भाग्यश्री कुलकर्णी

शितलच्या मताशी एकदम सहमत.लेख फारच छान.

विनायक प्रभू's picture

14 Aug 2009 - 4:48 pm | विनायक प्रभू

माझ्याकडे पण चलेजाव मोहीमेच्या आसपासच्या वेळचा फोन आहे.

लिखाळ's picture

14 Aug 2009 - 5:12 pm | लिखाळ

लेख छान. तुमच्याशी सहमत.

-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.