...का?

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
21 Feb 2008 - 3:00 am

प्रदीप कुलकर्णींची कविता "...का?" ही आमची प्रेरणा -
.....................................
...का?
.....................................

आडवा झालोच मी हलकेच अन्
देह माझा चादरीने झाकला...!
पसरला अंधार तो ...माझ्यावरी -
-का तुझा तो 'बा' असा हा वाकला?

व्यर्थ धडपडशील तू माझ्यासवे
भान याचेही तुला नाही जरी...
मी असा तुज...सवेही हिंडतो -
- का हिंडतो तो घेउनी सोटा करी?

शेज ही भासेच काटेरी जरी
स्पर्श तो होताच अन् झाली कडी..!
आग आहे अंतरी, बाहेर ही -
- का बडवुनी हा सोलतो ही कातडी?

वेळ भेटीची चुकीची आपली...
वाट लागे आज माझी हे दिसे
मम जाणिवा ह्या बधिर होती
- का तरी सोटा जरी पाठी बसे?

मीच खोलीतून निसटू पाहतो
बघ कसा तो दार लावी आयते...
झेपावता मग त्या गवाक्षी -
- का धावलो मग 'लावुनी' मी पाय ते?

जाळती आतून-बाहेरुन या...
मारण्याच्या, झोडण्याच्या वेदना
काय शिकलास "रंग्या" सांग तू -
- का मम ललाटी भर्जरी ही वेदना?

-चतुरंग

...............................................
रचनाकाल २० फेब्रुवारी २००८
...............................................

कविताविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

21 Feb 2008 - 3:42 am | प्राजु

चतुरंग, यू टू???

सह्हि..

- प्राजु.