देशांच्या राजकारणांतील स्त्रीयांचे योगदान

प्रदीप's picture
प्रदीप in जनातलं, मनातलं
2 Aug 2009 - 6:49 pm

कोरी अ‍ॅक्विनो ह्या फिलिपिन्सच्या एकेकाळच्या राष्ट्राध्यक्ष असलेल्या स्त्रीचे काल निधन झाले. फर्दिनांद मार्कोस ह्या हुकुमशहाची राजवट उलथून टाकून लोकशाही सरकार प्रस्थापित करण्याचे श्रेय (१९८६) ह्या स्त्रीकडे जाते. मार्कोस ह्या जुलुमशहाने १९७२ सालापासून फिलिपीन्समधे अनिर्बंध सत्ता उपभोगली. 'निनो' अ‍ॅक्विनो ह्या तरूणाने त्याचा सामना करण्याचा प्रयत्न केला तो निष्फळ ठरला व अ‍ॅक्विनोस त्याच्या कुटुंबासह परागंदा व्हावे लागले. १९८३ साली निनो लष्कराच्या देखरेखीखाली देशात परतताच मनिला विमानतळावरच त्याची हत्या करण्यात आली. ह्यामुळे तेथे जनक्षोभ उसळला. नंतर 'कोरी' ही देशात परतली व लढ्याचे नेतृत्व करू लागली. १९८६ झालेल्या निवडणूकीत ती जिंकली असतांना मार्कोसने स्वतःच जिंकल्याचे घोषित केले. त्याच्या ह्या कृत्यामुळे जनताच काय, सैन्यही त्याच्या विरूद्ध गेले व मार्कोस व त्याची पत्नि इमेल्डा ह्या दोघांना देश सोडून पळणे भाग पडले. कोरी सत्तेवर आली, पण सरकार चालवण्याचा तिला काहीच अनुभव नसल्याने ती फारसा प्रभाव पाडू शकली नाही. १९९२ साली ती सत्तेवरून पायउतार झाली. तरीही लोक तिला विसरलेले नाहीत. कालच्या तिच्या मृत्यूनंतर त्या देशावर दु:खाची कळा पसरली आहे.

ह्यावरून आठवल्यानुसार देशोदेशींच्या राजकारणात प्रभावी ठरलेल्या स्त्रीयांची नावे खाली देत आहे [नाव(देश)].

* मार्गारेट थॅचर (यू. के.)
* गोल्डा मेयर (इस्राएल)
*इंदिरा गांधी (भारत)
* मायावती (भारत)
* सोनिया गांधी (भारत) --:(
* सिरीमाओ बंदरनायके (श्रीलंका)
* चंद्रिका कुमारतुंगे (श्रीलंका) -- ह्यांना एल. टी. टी. ईंच्या दहशतावादी कारवायांमुळे आपला एक डोळा गमवावा लागला
* कोरी अ‍ॅक्विनो (फिलिपीन्स)
* ग्लोरिया माकापागल (फिलीपीन्स)-- सध्याच्या तेथील राष्ट्रपति
* मेघावती सुकार्नोपुत्री (इंडोनेशिया)-- सुकार्नोंची कन्या. सुहार्तोंच्या राजवटीचा शेवट ह्यांच्या निवडणूकीमुळे झाला. मात्र त्या फारसा प्रभाव टाकू शकल्या नाहीत.
* बेनझिर भुत्तो (पाकिस्तान)
* काँडॉलिसा राईस (यू. एस. ए.)
* मर्कल (जर्मनी)
* शेख हसिना (बांग्लादेश)

माओ चेदाँग ह्यांच्या पत्निही राजकारणात सक्रिय होत्या, व माओंच्या पश्चात तेथील एका उलथापालथीनंतर त्यांचे राजकिय आयुष्य संपुष्टात आले. तैवानचे ह्यापूर्वीचे राष्ट्रपति चेन- शुई-बिन ह्यांच्या पत्निही राजकारणात सक्रिय होत्या. त्या गेली अनेक वर्षे व्हीलचेयरला खिळून आहेत. सध्या दोघे पति पत्नी पैशाच्या अफरातफरीच्या आरोपांवरून स्थानबद्ध आहेत.

इतिहाससमाजराजकारण

प्रतिक्रिया

ह्या धाग्यावर बर्‍यापैकी माहीती मिळू शकेल.

प्रदीप's picture

3 Aug 2009 - 9:52 pm | प्रदीप

आफ्रिका व द. अमेरिकेतील देशातही इतक्या स्त्रीयांनी सर्वोच्च पदे भूषविलेली आहेत, हे मला माहितीच नव्हते. ह्या दुव्याबद्दल धन्यवाद.

क्रान्ति's picture

2 Aug 2009 - 8:20 pm | क्रान्ति

खूपच चांगली माहिती दिलीय.

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी

विकास's picture

2 Aug 2009 - 9:15 pm | विकास

चांगली माहीती. यात अजून एक भर आहे ती : ३०च्या मंदितील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांची पत्नी इलेनॉर रुझवेल्ट यांची. रुझवेल्ट यांच्या "New Deal with America" या घोषवाक्याप्रमाणे त्यांनी First Lady (मराठी प्रतिशब्द? भाषांतराचा अर्थ भलताच होईल :) ) म्हणून काम समाजात योगदान दिलेच पण रुझवेल्ट यांच्या मृत्यूनंतर संयुक्त राष्ट्राच्या उभारणीसंदर्भात इलेनॉरनी सकृय भुमिका घेतली आणि ट्रूमन राष्ट्राध्यक्ष असताना संयुक्त राष्ट्रांमधे त्यांची प्रतिनिधित्व करायला नेमणूक झाली. येथे त्यांनी केलेले काम म्हणजे "मानवी हक्क" अर्थात "human rights" यांचे संरक्षण. आज त्याचा (मानवी हक्क संज्ञेचा) बर्‍याचदा चुकीचा वापर होतो - शाब्दीक आणि व्यावहारीक, तरी देखील ते एक अधुनिक जगातील नक्किच पुढचे पाऊल ठरले आहे.

विकास's picture

2 Aug 2009 - 9:27 pm | विकास

हिलरी क्लिंटन म्हणजे "people love to hate" या भाषेत चपखल बसणारे व्यक्तिमत्व आहे. पण १९९२ साली त्यांनी ज्या पद्धतीने first lady म्हणून अमेरिकेतील सगळ्यात गंभीर प्रश्न health care तडीस नेण्याचा प्रयत्न केला आणि तोच प्रश्न त्या कायम बोलत आल्यात त्यातून त्यांची अभ्यासू वृत्ती, ज्ञान आणि जिद्द कळते. आज ओबामा त्या प्रश्नाच्या मागे लागायचे प्रमुख कारण म्हणजे हिलरीने युद्ध आणि अर्थव्यवस्थेइतकाच हा प्रश्न देखील निवडणूकांच्या वेळेस माहीतीवर आधारीत महत्वाचा केला होता हे आहे.

स्वत:च्या राष्ट्राचा स्वार्थ हा हुषारीने आणि अभ्यासू तसेच स्वाभिमानी वृत्तीने जपणार्‍यांमधे जशा इंदिरा गांधी आहेत तशाच हिलरी आणि काँडोलीझा राइस आहेत असे वाटते. (बाकीच्यांबद्दल मला फारशी या अर्थाने माहीती नाही).

स्वाती२'s picture

2 Aug 2009 - 9:58 pm | स्वाती२

अमेरिकेच्या Secretary of State, हे पद भुषवलेली पहीली स्त्री.

ऋषिकेश's picture

2 Aug 2009 - 10:21 pm | ऋषिकेश

बाकी देशांबद्द्ल विषेश अशी मुखोद्गत माहिती नाहि मात्र भारतात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकारणात एकापेक्षा एक उत्तम स्त्रीया कार्यरत आहेत/होत्या. काहि पटकन आठवणार्‍या स्त्रिया:
राष्ट्रिय स्तर
सुषमा स्वराज
प्रतिभा पाटिल, मीरा कुमार (प्रभाव फारसा नसला(चुभुद्याघ्या) तरी महत्त्व अनन्यसाधारण आहे)
सरोजिनी नायडु
राबडीदेवी --- राजकारणावर प्रभाव नक्कीच आहे (चांगला वाईट हा वेगळा मुद्दा)
सुचेता कृपलानी
विजयालक्ष्मी पंडीत

काहि स्थानिक/राज्य स्तरावरीलः
मृणाल गोरे
अहिल्याबाई रांगणेकर
मेघा पाटकर

ऐतिहासिकः
मॅडम कामा
राणी लक्ष्मीबाई
कॅप्टन लक्ष्मीबाई

----
अन्य देशांतील महत्त्वाच्या बायकांमधे (जरी त्या अराजकीय असल्या तरी राजकीय उलथापालथ घडवू शकल्या अश्या) अमेरिकेच्या रोझा पार्क यांचे नाव घेतलेच पाहिजे

ऋषिकेश
------------------
रात्रीचे १० वाजून २० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."

विशाल कुलकर्णी's picture

3 Aug 2009 - 9:36 am | विशाल कुलकर्णी

यात ममता बॅनर्जींचे नाव कसे काय विसरलात?

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

चिरोटा's picture

3 Aug 2009 - 10:13 am | चिरोटा

प्रमिला दंडवते
मार्गारेट अल्वा
अँजेला मर्केल (जर्मनीच्या चँसलर)
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

ऋषिकेश's picture

3 Aug 2009 - 2:07 pm | ऋषिकेश

खरंच की, विसरलो खरा. अजूनही अत्यंत साधी रहाणी ठेवणार्‍या, जनतेशी नाळ जोडलेल्या ह्या स्त्रीचा प्रभावही राजकारणावर आहेच

त्याचबरोबर उच्च रहाणी असूनही भारतीय राजकाराणावर ठ्सा उमटवता येऊ शकतो हे दाखवणार्‍या व दुसर्‍या स्त्रीबरोबरच्या एका चहा पार्टीनंतर अख्खे सरकार पाडून कायमचा ठसा उमटवलेल्या जयललिता यांचेही नाव घ्यावेच लागेल

झालं तर वृंदा करात वगैरे स्त्रिया स्थानिक ठसा उमटवून आहेत

(ठसठशीत)ऋषिकेश
------------------
दूपारचे २ वाजून ०६ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "खूब लढी मर्दानी वो तो..."

राजू's picture

3 Aug 2009 - 1:01 pm | राजू

:? :? :?
आयुष्य खरंच सोपं असतं,
आपणच त्याला कठीण करून ठेवतो,
स्वत:साठी आणि इतरांसाठी.

नंदन's picture

3 Aug 2009 - 2:04 pm | नंदन

वेगळ्या विषयावरील समयोचित लेख आवडला. वर अनेक प्रभावी स्त्री राजकारण्यांची नावे आलेली आहेतच, त्यात भर घालण्यासारखे काही नसल्याने सध्या योगायोगाने वाचनात आलेल्या एका पुस्तकातील माहितीबद्दल आणि एका लेखाबद्दल लिहितो.

भारतीय उपखंडातल्या बहुतेक प्रभावी स्त्री राजकारण्यांना घराणेशाहीचा उघड फायदा मिळला आहे. (हे मत केवळ माझे नाही. संदर्भासाठी पहा : इंडिया आफ्टर गांधी. लेखक- रामचंद्र गुहा, राहणार- बेंगळुरू ). मग त्या सॉलोमन बंदरनायकेंच्या हत्येनंतर जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या सिरिमाओ बंदरनायके असोत की मुजिबूर रहमानांच्या कन्या शेख हसीना. अर्थात इंदिरा गांधींसारख्या आपल्या कर्तृत्वाने निवड सार्थ ठरवणार्‍या स्त्री राजकारणीही यात आल्याच.

खोलवर रुजलेल्या घराणेशाहीच्या मानसिकतेबरोबरच सहजासहजी मिळालेला मतदानाचा अधिकार हेही यामागचे कारण असावे, असे काही राजकीय अभ्यासकांचे मत आहे. यासंदर्भात ब्रिटन आणि अमेरिकेतल्या स्त्रियांनी मतदानाचा हक्क मिळावा यासाठी केलेल्या संघर्षाचा मागोवा घेता येईल. वरील लेख समयोचित म्हणण्याचे कारण हे की, शंभर वर्षांपूर्वी साधारण याच सुमारास (८ जुलै १९०९) मार्गरेट वॉलेस-डनलॉप ह्या कार्यकर्तीने स्त्रियांना मतदानाचे हक्क मिळावेत म्हणून लंडनच्या हॉलोवे तुरूंगात उपोषण केले. आठवड्याभराहून अधिक काळ उलटल्यावर ब्रिटिश गृहमंत्रालयाला याची दखल घेणे भाग पडले. पहिल्या महायुद्धामुळे जरी खंड पडला तरी त्यानंतर काही वर्षांनी स्त्रियांना प्रथम इंग्लंड व अमेरिकेत टप्प्याटप्प्याने आणि नंतर संपूर्णपणे मतदानाचे अधिकार मिळाले. ह्या उपोषणामुळे गांधींना निषेधाचे नवीन शस्त्र सापडले/त्याच्या प्रभावाची खात्री पटली, असं मानण्यास जागा आहे. (विस्तृत लेख येथे वाचता येईल.)

किंचित अवांतर माहिती देण्याचे स्वातंत्र्य घेऊन, ह्या चळवळीने एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातच वेग का घेतला हे पाहणेही रंजक ठरावे. औद्योगिकीकरण/आधुनिकीकरणसारखी थोडी ढोबळ कारणे आहेतच, पण लोकसंख्येतील स्त्री-पुरूष गुणोत्तरही थोडे बिघडले होते. एकट्या इंग्लंडमध्येच १८५१ साली दहा वर्षांवरील स्त्रियांची संख्या सुमारे ८२ लाख होती, तर पुरूषांची ७६ लाख. (संदर्भ - ह्यूमन डॉक्युमेंट्स ऑफ द व्हिक्टोरियन गोल्डन एज) यातून निर्माण होणार्‍या सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरच्या समस्यांनी मुळातच किलकिल्या होऊ पाहणार्‍या स्त्री-स्वातंत्र्याच्या दाराला उघडण्यात मोठा हातभार लावला असावा, अशी शक्यता आहे. 'आर्ट इमिटेटिंग लाईफ'चा पडताळा घ्यायचा असल्यास याच विषयावर दोन सार्वकालिक श्रेष्ठ कादंबर्‍या - मादाम बॉवरी (१८५७) आणि ऍना कॅरेनिना (१८७३) साधारण याच काळात लिहिल्या गेल्या.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुनील's picture

3 Aug 2009 - 2:23 pm | सुनील

भारतीय उपखंडातल्या बहुतेक प्रभावी स्त्री राजकारण्यांना घराणेशाहीचा उघड फायदा मिळला आहे
या संदर्भातील एक आठवण.

अमेरिकेतील abc ह्या वाहिनीवरून प्रसारीत होणारा जेपर्डी हा माझा आवडता प्रश्नोत्तराचा कार्यक्रम. एकदा फायनल जेपर्डीत शेवटचा प्रश्न होता - चारपैकी दोन देशांची नावे कोणती ज्याचे पंतप्रधान वडील-मुलगी असे होते?

उत्तर सांगण्यापूर्वी कार्यक्रमाच्या संचालकाने टिपण्णी केली - योगायोगाने हे चारही देश जगाच्या एकाच भागात आहेत. तीनही स्पर्धकांनी भारत-पाकिस्तान असे उत्तर दिले होते (उरलेले श्रीलंका आणि बांग्लादेश कुणास आठवले नसावेत).

घराणेशाहीच्या मानसिकतेचा प्रभाव ह्या उपखंडातील लोकांच्या मनावर अद्यापही आहे, हे खरे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील's picture

3 Aug 2009 - 2:27 pm | सुनील

यादी फार वाढत चाललेली आहे. काहीतरी कठोर निकष / चाळण्या लावून ही यादी आटोक्यात ठेवावी काय? असे असल्यास ते निकष कोणते असावेत?

(आटोपशीर) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चिरोटा's picture

3 Aug 2009 - 2:37 pm | चिरोटा

चाळणी लावली तरी त्यात राजकारण येणारच!!. आशियात(विशेष करुन भारत्/पाक्/बांग्ला) राजकारण म्हणजे लोकाना ** बनवायचा धंदा.त्यातल्या त्यात कुठल्या व्यक्तीनी लोकाना कमीत कमी मुर्खात काढले अशी चाळणी लावता येइल.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

प्रदीप's picture

3 Aug 2009 - 2:48 pm | प्रदीप

लावणे जरूरीचे आहे, हे अगदी बरोबर आहे.

"आंतरराष्ट्रीय राजकारणात ज्यांचा प्रभाव पडला आहे", अशी चाळणी लावली तर, मला वाटते यादी सुटसुटीत राहील. हा निकष लावल्यास माझ्या यादीतील मायावती हे एक नाव बाद होते.

ऋषिकेश's picture

3 Aug 2009 - 3:25 pm | ऋषिकेश

फक्त मायावतीच कसे बाद होईल. माझ्यामते आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार केला तर जवळजवळ ७०% बाद होतील . उदा.दाखल अगदी चंद्रिका कुमारतुंगे किंवा बंदरनायके घ्या इतरांना त्यांची नावे माहित असण्यावाचून त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात असा काय प्रभाव पाडला आहे?

(देशी)ऋषिकेश
------------------
दूपारचे ३ वाजून २५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "चांदण्या शिंपीत जाशी...."

प्रदीप's picture

3 Aug 2009 - 3:38 pm | प्रदीप

त्या त्यांच्या देशांच्या पंतप्रधान अथवा राष्ट्रपति इ. होत्या.
म्हणजे त्यांचे कार्यक्षेत्र अंतर्गत राजकारणापुरते निगडीत नव्हते. वास्तविक मला मुळात हे म्हणायचे होते, की ज्या स्त्रीया आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत होत्या, त्यांची यादी मी देत आहे.

भेंडि बाजार म्हणतात....

प्रभावाची व्याख्या कशी करायची?!
...........................
"आंतरराष्ट्रीय राजकारणात विकसीत देशाच्या नेत्याना साहजिकच जास्त महत्व मिळते.ओबामांच्या सौ. आता बर्‍याच लोकाना सुंदर दिसु लागल्या आहेतच. त्यात पर्यावरण्/एडस निर्मुलन सारखे विषय त्याना आवडु लागले तर विचारायलाच नको.!!
आंतरराष्ट्रीय राजकारणात विकसनशील देशाच्या नेत्याना दुय्यम स्थान असते. तेव्हा ही चाळणी योग्य वाटत नाही".

तसे मला वाटत नाही. इंदिरा गांधी विकसनशील देशाच्या पंतप्रधान होत्या. कोरी अ‍ॅक्विनो विकसनशील देशाची राष्ट्रप्रमुख होती. चंद्रिका श्रीलंकेच्या राष्ट्रप्रमुख असतांना स्वीडीश इ. युरोपिय लुडबुड्यांशी वाटाघाटी करत होत्या.

चिरोटा's picture

3 Aug 2009 - 4:13 pm | चिरोटा

पण विकसित देशात राहुन प्रभाव पाडणे विकसनशील देशात राहुन प्रभाव पाडण्यापेक्षा सोपे नाही वाटत का?निवडुन येणे हा जरी निकष लावला तर भारतासारख्या लोकसंख्येने जास्त असलेल्या देशात निवडुन येणे विकसित देशांत निवडुन येण्यापेक्षा कितीतरी कठीण आहे(होणारा भ्रष्टाचार्/गुंडगिरी तुर्तास बाजुला ठेवू).
ओबामांचेच उदाहरण घ्या. त्यांचे वय आहे ४७.भारतात कुठला माणुस ४७ व्या वर्षी स्वकर्त्रुत्वावर पंतप्रधान म्हणून निवडुन येइल?मग आंतरराष्ट्रीय प्रभाव तर बाजुलाच राहिला.

वास्तविक मला मुळात हे म्हणायचे होते, की ज्या स्त्रीया आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत होत्या, त्यांची यादी मी देत आहे

ठीक. मग राजकारणापुरते बोलायचे झाले तर भारतातर्फे इंदिरा गांधी.दुसरे कोणीच दिसत नाही.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

चिरोटा's picture

3 Aug 2009 - 3:43 pm | चिरोटा

प्रभावाची व्याख्या कशी करायची?!
भारताबद्दल बोलायचे तर सध्याच्या काळात स्वकर्त्रुत्वावर आंतरराष्ट्रीय प्रभाव पाडणार्‍या म्हणजे
१) मेधा पाटकर
२) मीरा नायर.
३)अरुंधती रॉय
वरील तिन्ही स्त्रिया बर्‍याच लोकाना भारताच्या 'शत्रु' वाटतात पण त्यांचा प्रभाव नाकारता येणार नाही.!
आंतरराष्ट्रीय राजकारणात विकसीत देशाच्या नेत्याना साहजिकच जास्त महत्व मिळते.ओबामांच्या सौ. आता बर्‍याच लोकाना सुंदर दिसु लागल्या आहेतच. त्यात पर्यावरण्/एडस निर्मुलन सारखे विषय त्याना आवडु लागले तर विचारायलाच नको.!!असो.
आंतरराष्ट्रीय राजकारणात विकसनशील देशाच्या नेत्याना दुय्यम स्थान असते. तेव्हा ही चाळणी योग्य वाटत नाही.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Aug 2009 - 3:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बर्मी राजकारणी आंग सान स्यू की यांची कोणालाच आठवण झाली नाही?

अदिती

मस्त कलंदर's picture

3 Aug 2009 - 4:32 pm | मस्त कलंदर

खरंतर लेख वाचतानाच त्यात स्यू की यांचं नांव कसं आलं नाही हा विचार मनात आला होता...

@आदिती... wpta!!! :)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

प्रदीप's picture

3 Aug 2009 - 5:03 pm | प्रदीप

होय, आंग सांग स्यु ची ह्यांचे नाव अनवधानाने राहून गेले आहे.

(ज्या स्त्रीया आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत होत्या,) ह्या चाळणीतही त्या बसतात, असे मला वाटते.

विकास's picture

3 Aug 2009 - 5:34 pm | विकास

स्यूं चे नाव या यादीत अगदी योग्य आहे.

तसेच कधी काळी विनी मंडेलांनी पण आंतर्राष्ट्रीय राजकारणात स्वत:च्या लोकांचा प्रश्न पुढे नेण्यास मदत केली असे वाटते.