तात्यांनी पुरवलेल्या मुखपृष्ठावरच्या सलील चौधरींच्या आणि लतादीदींच्या गाण्यावरून आठवलं की बंगाली आणि हिंदी या भाषाभगिनींमध्ये अशी देवाणघेवाण बरेचदा झालीय, इथे मी फक्त बंगाली ते हिंदी असा प्रवास केलेली (आणि प्रामुख्याने सलीलदांची) काही गाणी देतोय, त्यांत लताखेरीज इतरही गायक आहेत (इथे रफीचं आणि मुकेशचं एक-एक उदाहरण दिलंय, किशोरकुमारनेही अर्थात् बरीच गाणी गायलीत). ही गाणी गोळा करतांना हे जाणवलं की बरेचदा मूळ बंगाली गाण्यांतील शब्दांशी त्यांच्या हिंदी-करणातही ईमान राखलं गेलंय, तर काही वेळा (चित्रपटातील प्रसंगाशी अनुरूप म्हणून असतील, पण) वेगळीच भावना घेऊन हिंदी गाणी समोर येतात. दोन्ही प्रकारच्या रुपांतरात गीतकारांचं खरंच कौतूक केलं पाहिजे इतके चपखल शब्द्प्रयोग आढळतात. म्हणून मी त्यांचीही नांवं द्यायचा प्रयत्न केलाय.
अर्थात्, ही केवळ झलक आहे. तुम्हालाही अशी बरीच गाणी माहीत असतील, त्यांची जरूर माहिती द्या. (Off the top of my head, अमर प्रेम, अमानुष, आनंदाश्रम, असे काही चित्रपट आठवतात.)
१. आमी चोलते चोलते थेमे गेचे (लता, सलील चौधरींच्या संगीत निर्देशनात) आणि कईं बार युंही देखा है (मुकेश, रजनीगंधा चित्रपटात, सलील चौधरींच्याच संगीत निर्देशनात, कलाकारः विद्या सिन्हा, दिनेश ठाकुर)
२. जा रे जा रे उड जा रे पाखी (लता, सलील चौधरींच्या संगीत निर्देशनात) आणि जा रे जा रे उड जा रे पंछी (लता, माया चित्रपटात, सलील चौधरींच्या संगीत निर्देशनात,कलाकारः माला सिन्हा, देव आनंद)
३. ना, मोनो लागे ना (लता, सलील चौधरींच्या संगीत निर्देशनात) आणि ना, जिया लागे ना (आनंद चित्रपटात, गीतकार गुलझार, संगीतकार सलील चौधरी, कलाकारः सुमीता संन्याल, अमिताभ बच्चन)
४. निशीदिन, निशीदिन, बाजे शोरोणर बीन (लता, सलील चौधरींच्या संगीत निर्देशनात) आणि निसदिन निसदिन मेरा जुलमी सजन ऐसी बतिया बनाये हां (अन्नदाता चित्रपटात, गीतकार योगेश, संगीतकार सलील चौधरी, कलाकारः जया भादुरी, अनिल धवन) [हे अफलातून उडत्या चालीचं गाणं मी इतकी वर्षं विसरूनच गेलो होतो! आज पुन्हा ते सापडल्यावर मनापासून आनंद झाला.]
५. आकाश केनो डाके (किशोर कुमार, संगीतकार एस. डी बर्मन?) आणि ये शाम मस्तानी, मदहोश किये जाए (किशोर कुमार, कटी पतंग चित्रपटात, गीतः आनंद बक्षी, संगीतः आर डी बर्मन, कलाकारः राजेश खन्ना, आशा पारेख)
६. जोडी किछु अमारे सुधाओ (आधी श्यामल मित्रा यांनी आणि नंतर महंमद रफी यांनी सलील चौधरी यांच्या संगीत निर्देशनात गायलेलं) आणि दिल तडपे तडपाये (महंमद रफी, पूनम की रात चित्रपटासाठी, गीतकारः शैलेन्द्र, संगीतकारः सलील चौधरी, कलाकारः कुमुद छुगानी, मनोज कुमार)
७. ए बाशी केनो गाये (लता, चित्रपट?, संगीतकारः सलील चौधरी) आणि ये बन्सी क्युं गाये (लता, परख चित्रपटासाठी, संगीतकारः सलील चौधरी, कलाकारः साधना?)
प्रतिक्रिया
2 Aug 2009 - 12:36 pm | विजुभाऊ
हेमन्त कुमार ची बहुतेक गाणी कोणत्या ना कोणत्या बाऊल गीतावर आधारीत आहेत.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
2 Aug 2009 - 12:42 pm | नंदन
धागा. हिंदी आणि त्याच चालीवरची बंगाली गाणी ऐकायला मजा आली. 'प्यार दिवाना होता है'चं तनुजाने काम केलेलं बंगाली रुपडं 'अजि गुन गुन गुंजे आमार' इथे.
याच धाग्याचा थोडा विस्तार करून लिहायचं तर लताबाई, हृदयनाथांनी मराठीतली मी 'डोलकर, डोलकर' सारखी कोळीगीतं आणि इतर गाणी बंगालीतही नेली. या दुव्याच्या पानावर शेवटी स्क्रोल केल्यावर त्यातली काही ऐकता येतील. वादळ वारं सुटलं गं, तिन्हीसांजा सखे मिळाल्या (दूरे आकाश शामियाना), मेंदीच्या पानावर इ. गाण्यांच्या चालीवरची बंगाली गाणी इथे आहेत.
बाकी निव्वळ गाण्यांखेरीज मराठी मातीतली गाणी इतर प्रांतांत नेणं, शांताबाईंना कोकणीत आणि कोळीगीतं लिहायला उद्युक्त करणं ही मंगेशकर कुटुंबियांची कामगिरी आपल्या सांस्कृतिक समृद्धीत भर घालणारी यात वाद नाही.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
2 Aug 2009 - 12:58 pm | सुनील
मनोरंजक संकलन. नंदन यांनी दिलेल्या दुव्यावरील मराठी ते बंगाली गाणीही सुरेख!
आपल्या वंगबंधूंप्रमाणे, हिंदी चित्रसृष्टीत वावरणार्या मराठी संगीतकारांना (उदा. सी रामचंद्र, वसंत देसाई) हे का करावेसे वाटले नाही? की केले आहे पण मला ठाऊक नाही?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
2 Aug 2009 - 1:02 pm | विजुभाऊ
हेमन्त कुमारानी बंगाली बाऊलगीते हिन्दीत आणली तशी ती तुम्ही का नाही आणलीत असा प्रश्न जेंव्हा वसन्त देसाईना विचारला होता त्यानी उत्तर दिले की तसे केले तर लोक मला चाल चोरली असे म्हणतील.
थोड्या फार फरकाने सी रामचन्द्रानीही हेच उत्तर दिले होते
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
2 Aug 2009 - 1:07 pm | JAGOMOHANPYARE
छू कर मेरे मन को... हे देखील मूळ बन्गाली आहे... www.itwofs.com
2 Aug 2009 - 8:44 pm | बहुगुणी
मेजवानीच दिलीत की! जीवलगा राहिले रे, मोगरा फुलला, तुम आशा विश्वास हमारे यांची रुपांतरं विशेष आवडली. मी वर म्हंटल्याप्रमाणे उत्कृष्ट गीतांतराचा नमूना म्हणजे 'वादळ वारं सुटलं गं', बंगाली रुपड्यात 'बादल कालो घिरलो गो' हे वेगळ्याच अर्थाचे शब्द 'वादळ वारं सुटलं गं' च्या तालात perfectly बसतात. पुन्हा गीतकारांना सलाम! (डोलकर डोलकर मधला पुरुष गायक हेमंत कुमारच आहे ना?)
2 Aug 2009 - 1:13 pm | प्रदीप
असेच एक गीत : मूळ बंगाली गीत 'एक दिन पाखी उडे' (किशोर- आर. डी). हिंदी गीत 'तुमबिन जाऊं कहॉ' (रफी- आर. डी).
एस. डी. बर्मनांचे 'हो रे माझी' हेही त्यांच्याच आवाजात बंगालीत ऐकल्याचे आठवते.
'ये बन्सी क्यूं गाये' ह्या सुंदर गीताची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.
जाता जाता: 'ना जेऊ ना' तील तबला अगदी 'पचकट' वाटतो. 'ओ सजना' त त्याने गाण्याच्या बरोबर जाता जाता स्वतःचा खास रंग भरला आहे, तो लाजवाब आहे. हा तबला कुणी वाजवाला आहे? (मारुति कीर? दत्ताराम? अन्य कुणी?)
3 Aug 2009 - 8:18 am | बहुगुणी
इथे किशोर च्या आवाजात आणि इथे रफीच्या आवाजात ऐका
2 Aug 2009 - 1:48 pm | पक्या
ना जाने कोई कैसी है ये जिंदगानी - हे पण मूळ बंगालीतलेच आहे.
2 Aug 2009 - 7:37 pm | क्रान्ति
हिंदी, मराठी, बंगाली भाषांमधल्या सुरेल गीतांची सुमधुर थाळीच सजवून दिलीय या धाग्यानं आणि प्रतिसादांनी. परख चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत. हे ऐकलंय? याचीही बंगाली आवृत्ती असेल, तर जाणकारांनी दुवा द्यावा.
क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी
3 Aug 2009 - 8:46 am | बहुगुणी
सबिता चौधुरींनी सलिलदांच्या निर्देशनात 'एने डे एने डे झूमका' हे मूळ गाणं म्हंटलं होतं, तेच गाणं सुमिता या कुणी हौशी गायिकेने म्हंटलेलं इथे ऐकायला मिळेल.
सबिता चौधुरींच्या आवाजातलं गाणं मला सापडलं नाही. पण ते शोधतांना त्यांच्या आवाजातलं 'होलुड गांधार फूल' हे 'घडी घडी मेरा दिल धडके'चं बंगाली रुपांतर (की मूळ रूप?) मिळालं!.
2 Aug 2009 - 7:54 pm | नितिन थत्ते
'खाई है रे हमने कसम संग रहनेकी' हे गाणे सचिन देव बर्मन यांच्या आवाजात २००७ च्या कोलकाता बुक फेअर मध्ये बंगालीतून (शब्द त्याच अर्थाचे होते की नाही हे कळले नाही) ऐकले होते.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
3 Aug 2009 - 2:36 am | ललिता
आमार शोप्नो जे = अपने प्यार के सपने बंगालीत व हिंदीत कलाकार देखिल तेच आहेत!
जागो मोहोन प्रीतोम = जागो मोहन प्यारे
ओगो आर किछू.... = तस्वीर तेरी दिल में चित्रपट माया
ऐ की होलो = ये क्या हुआ
3 Aug 2009 - 3:43 am | प्राजु
खूपच छान आहे.
नंदन, तुझीही लिंक पाहिली. सुपर्ब!!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Aug 2009 - 3:59 am | बहुगुणी
मला अपेक्षा होती तसं आपण collectively एक महत्वाचा संगीतकोषच तयार करतो आहोत, फारच छान!
तात्या: मिपावर कायमस्वरूपी गाण्यांच्या files ठेवता येतील अशी सोय करता येईल का? मला कल्पना आहे हे खर्चिक काम असेल, पण आपली हरकत नसेल तर मदत करायला खूप जण तयार होतील. असा भारतीय बहुभाषिक गाण्यांचा unique database माझ्या माहितीत तरी कुठेही नाही, मिपाचं ते वैशिष्ट्य ठरू शकेल. पहा विचार करून.
3 Aug 2009 - 8:03 am | विसोबा खेचर
हो, विचार सुरू आहे..
सुंदर धागा. सर्वांनी दिलेले दुवे क्लासच!
आपला,
(संगीतप्रेमी) तात्या.
3 Aug 2009 - 4:02 am | विकास
एकदम मस्त संकलन या धाग्यामधे होत आहे!
एकदा हृदयनाथांच्या एका कार्यक्रमात त्यांनी (वर नंदनने सांगितलेल्या चालींव्यतिरीक्त) "रंगा येऊ वो" ची चाल पण बंगाली भजनावरून घेतल्याचे सांगितले होते.
3 Aug 2009 - 9:00 am | फारएन्ड
मी हेमंतकुमार च्या बंगाली कॅसेट मधे ऐकलेली
(बंगाली शब्द आमचे अफाट बंगाली ज्ञान दाखवतील तेव्हा चुकलेले दुर्लक्षित करावे :) )
आमार प्रोश्नो करे नील धृबोतारा
और कोतोकॉल आमी रबो दिशाहारा
(कही दूर जब दिन ढल जाये)
येइ रात तोमार आमार
(ये नयन डरे डरे)
3 Aug 2009 - 9:16 am | विसोबा खेचर
अहो मी या गाण्याच्या कित्येक दिसांपासून शोधात आहे. हे गाण आंतरजालावर कुठे उपलब्ध आहे का? दुवा देऊ शकाल का?
तात्या.
3 Aug 2009 - 10:15 am | बहुगुणी
हेमंतकुमार यांच्या आवाजात इथे.
आणखी दोन चांगले ट्रॅक्सही सापडले.
श्रीकांतो आचार्या यांच्या आवाजात इथे, सुबीर नंदा आणि रेझीया यांच्या आवाजात इथे ऐका. आनंदमधलं मुकेशचं गाणं इथे.
3 Aug 2009 - 10:56 am | विसोबा खेचर
धन्यवाद...:)
तात्या.
3 Aug 2009 - 10:33 am | बहुगुणी
या दोघांचं 'चोले जो जाय दिन दिन दिन दिन, नुपूर बाजे झिन झिन झिन' हे मूळ गाणं मला काही सापडलं नाही , पण ते अरुंधती होम-चौधुरी यांनी सलीलदांच्याच संगीत निर्देशनात म्हंटलेलं या ठिकाणी ऐकायला मिळेल. किशोर च्या 'गुजर जाये दिन दिन दिन' चं हिंदी व्हर्जन इथे, अन्नदाता चित्रपटासाठी.
3 Aug 2009 - 10:43 am | बहुगुणी
हेमंतकुमारच्याच आवाजात बंगाली आणि हिंदी गाणी. हिंदी गाणं कोहरा चित्रपटातलं.
3 Aug 2009 - 3:47 pm | भोचक
सलील कुलकर्णीच्या संधीप्रकाशात या अल्बममधलं 'मन माझे चपळ न राहे निश्चळ' या भजनाची चाल बंगाली लोकसंगीतावरूनच घेतल्याचे त्याने एका मुलाखतीत सांगितल्याचे आठवते. मराठी भजनाची पारंपरिक चाल न घेता त्याने दिलेल्या चालीतही भजन ऐकायला मस्त वाटते.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/