(विडंबन केलं आहे)

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
29 Jul 2009 - 12:08 am

कोसळणारा तो मंद बाजार,
सध्या जडलाय कसलासा असाध्य आजार..
ओले चिंब झाले आकडे
तन ही ओले चिंब झाले
तुझ ते हळुवार चढणं
माझ्याकडे टक लावुन बघणं
आणि दणकन् खाली पडणं
आणि माझी विजार चिंब चिंब होणं
झालय नेहमीचच गार्‍हाणं
नेहमीच असं टक लावुन बघतोस
आणि मला भिजवतोस
तुझ पडणं आणि माझा भिजणं
झालंय आता नेहमीचच मला
कधी कळणार रे माझ्या खिशातील भावना तुला?

प्रेरणा: विडंबन हवं आहे ही विनंती, आर्थिक मंदी, बरेचदा कोसळणारे शेअर् बाजार आणि हवालदील सामान्य गुंतवणूकदार

हास्यकविताविडंबन

प्रतिक्रिया

टारझन's picture

29 Jul 2009 - 12:18 am | टारझन

ओले चिंब झाले आकडे

ह्या ओळीमागची संकल्पना काही झेपली नाही बुवा पामराला ... पण विडंबण बाकी "वा ! छाण !! " झाले आहे

(बेलाचा फॅन) टारझन

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Jul 2009 - 2:22 am | llपुण्याचे पेशवेll

>>ह्या ओळीमागची संकल्पना काही झेपली नाही बुवा पामराला ... पण विडंबण बाकी "वा ! छाण !! " झाले आहे
हेच म्हणतो. बाकी शेअर बाजार आणि इतर कल्पना छान.

(टार्‍याचा मित्र)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

सहज's picture

29 Jul 2009 - 6:09 am | सहज

बेलाशेठ विडंबन आठवले.

ओले चिंब झाले आकडे = बहुतेक "मेल्ट्डाउन" असा अर्थ सुचवायचा असावा.

बेसनलाडू's picture

30 Jul 2009 - 1:24 am | बेसनलाडू

ओले चिंब झाले आकडे = बहुतेक "मेल्ट्डाउन" असा अर्थ सुचवायचा असावा.
बरोबर आहे.
(बिनचूक)बेसनलाडू
आणि अशा मेल्टडाउन् मुळे दरदरून घाम फुटल्याने तनही ओले ;)
(घामाघूम)बेसनलाडू

भडकमकर मास्तर's picture

29 Jul 2009 - 9:28 am | भडकमकर मास्तर

मस्त विडंबन आहे.. कमी शब्दांत चपखल बसलेल्या भावना..
आवडले...
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)