काही विधायक काम करण्याऐवजी मि. पा. कट्ट्यावर चकाट्या पिटणार्या आपल्याला पाहून म्हणाले असते,
"कोण आहे ते तिकडे? या सगळ्या रिकामटेकड्या हरामखोरांना उलटे टांगून राखेचे तोबरे द्या!!"
:))
अगदी बरोबर !! 29 Feb 2008 - 12:29 pm | सर्किट (not verified)
म्हणूनच हल्ली आम्ही महाराजांचं लक्ष नाही, असं पाहून हळूच मिपावर येतो :-) बाकी डांबिसराव, क्यालिफोर्नियात एक पिवळा ड्यांबिस आहे हे बघून लय झ्याक वाटलय बघा.- सर्किट
तुम्हाला व्यक्तीगत संदेश द्यायचा प्रयत्न केला पण हे तिच्यायला जेंव्हापासून साईट अपडेट केलंय ना तेंव्हापासून हजार अडचणी येतायत!!
जर कधी आलांत लॉस एंजेलिस परिसरात तर मला कळवा आणि जरूर माझ्याकडे रहायलाच या. जर मी बे एरियात आलो तर जरूर कळवीन...
स्नेह व्हावा व तो वाढावा ही कामना.
आपला,
पिवळा डांबिस
माझ्या मते ह्या कादंबरीपेक्षा, त्यात शिवरायांवार नरहर कुरुंदकरांनी लिहिलेली १८-२० पानांची प्रस्तावनाच अतिशय अभ्यासपूर्ण आहे, सुरेख आहे.
विशेषतः शिवरायांना अवतार मानण्यापेक्षा, एक अलौकिक कर्तबगारीचा, पण आदर्श मानवच माना हे सूत्र त्यात अतिशय परिणामकारकरित्या मांडले आहे.
आदर्श मानला तर त्याचे गुण आपल्यात यावे यासाठी माणूस प्रयत्न करतो. एकदा अवतार मानला की गंध, फुलं, अक्षता वाहून मोकळे व्हायची आपली परंपरा आहे...
शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करताना जसे श्रीमंत योगी हे अचूक विशेषण आठवते तसेच त्यांच्यातील जे आवश्यक असलेले गूण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काव्यबद्ध केलेत त्यांची पण आठवण होते:
जी शुद्धी हृदाची रामदास शीर डुलवी
जी युक्ती पातशाह्यास शत्रूच्या झुलवी
जी युक्ती कूटनितीस खलासी बुडवी
जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी
ती शुद्धी हेतूची कर्मी लाहूदे
ती बुद्धी भाबड्या जीवा लाभूदे
ती शक्ती शोणितामाजी वाहू दे
दे मंत्र पुन्हा, जो दिले समर्थे तुझ ज्या
ज्या युगपुरूषाच्या दैदिप्यमान कर्तृत्वाने पुढे तीन शतकांनंतर जन्मलेल्या परंतु त्याचाच स्वातंत्र्य प्राप्तिचा वारसा चालविलेल्या क्रांतिकारकांना प्रभावित केले त्या महान शिवप्रभुंना सादर प्रणाम (महाराष्ट्रा पासुन शेकडो मैलांवर जन्मलेल्या हुतात्मा भगतसिंहांनी एक पत्रकार या नात्याने जेव्हा महाराष्ट्रात यायची त्यांना संधी मिळाली तेव्हा रायगडाला आवर्जुन भेट दिली होती तर ब्रिटिशांच्या नजरकैदेतुन सुटण्यापूर्वी नेताजी सुभाषचंद्रांनी जदुनाथ सरकार लिखित शिवचरित्राचे पारायण केले होते - विशेषत: आग्र्याहून सुटकेचे)
हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
गीतकार :स्वातंत्र्यवीर सावरकर
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर
=========================
शिवरायांना माझा मानाचा मुजरा
=========================
साजि चतुर॑ग बिर
र॑ग मे॑ तुर॑ग चढि
सरजा शिवाजी ज॑ग
जीतन चलत है॑ ।
भूषन भनत नाद
बिहद नगारन के
नदी नद मद गैब
रनके रलत है॑ ॥
'सिवाजी न होतो तो
सुनति होत सबकी'
कु॑भकन्न असुर
औतारी अवर॑गजेब
कीन्ही कत्ल मथुरा
दोहाई फेरी रब की ॥
खोदी डारे देवी देव
सहर महल्ला बा॑के
लाखन तुरूक कीन्हे
छूटि गयी तब की ॥
भूषण भनत भाग्यो
कासीपति विश्वनाथ
और कौन गिनतीमे॑
भूली गति भबकी ॥
चारो॑ वर्ण धर्म छोडि
कलमा निवाज पढि
सिवाजी न होतो तो
सुनति होत सबकी ॥
देवल गिरावते
फिरावते निसान अली
ऐसे डुबे राव राजे
सभी गये लबकी ॥
गौरी गनपति आप
औरनको देत ताप
आपनीही बार सब
मारि गये दबकी ॥
पीरा पयग॑बरा
दिग॑बरा दिखाई देत
सिद्धकी सिद्धाई गई
रही बात रबकी ॥
कासीहूकी कला जाती
मथुरा मसीत होती
सिवाजी न होतो तो
सुनति होत सबकी ॥
उरलेले कडवे... (कदाचीत आजच्या परिस्थितीसपण ज्याचा भावार्थ लागू होत असेल असे)
....
हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा भग्न आज जयदुर्ग आसंवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे | भंगले
जाहली राजधान्यांची | जंगले
परदास्य-पराभविं सारी | मंगले
या जगतिं जगू ही आज गमतसे लज्जा
गो-ब्राम्हण क्षत्रियकुलावत॑स सि॑हासनाधिश्वर राजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराजा॑चे चरणि लक्ष लक्ष प्रणाम !
थोरल्या महाराजा॑ची जय॑ती आम्ही "कळसुत्री सरकार" तारिख ठरवत॑ म्हणून कधीही साजरी करत नाही.
ती साजरी होणार मार्चमध्येच, अगदी वाजत-गाजत. सरकारी मिळ्मिळीत पद्धतीन॑ नव्हे..अस्सल म्हराठमोळ्या!!!
तस॑ तर रोज आमचा दिवस सुरु होतो तोच विष्णुसहस्त्रनाम आणि शिवव॑दनेने...त्यामुळे महाराजा॑ना मुजरा करायला आम्हाला कारण काढायची मुळीच गरज नाही.
आपला
- पिढ्या॑न् पिढ्या स्वराज्याच्या लग्नात आहुतीत उड्या मारायला गुढग्याला बाशि॑ग बा॑धून तयार राहणार्या देशमुखा॑चा अभिमानी वारस
ध मा ल.
अवा॑तर : मत आपल॑ आपल॑...जे आज शिवजय॑ती साजरी करतात त्या॑ना आमचा विरोध नाही...जे प्रत्येक महापुरूषाबाबत आपल्याकडे घडत॑ तेच दुर्दैवान॑ राजा॑च्या नशिबीही याव॑...इथ॑ही वाद ? असो.
सरप॑च, आपला हेतु खचितच स्तुत्य आहे, त्याबद्दल धन्यवाद. कृपया गैरसमज नसावा. माझी वरील वाक्य॑ वाद घडवण्यासाठी / वाढवण्यासाठी नाहीत, तर ती केवळ माझ्या मनातली मळमळ आहे.
वादात आम्हालाही पडायचं नव्हते/नाही! महाराज केव्हा जन्मले यापेक्षा त्यांनी आयुष्यात काय कार्य केले, हे अधिक महत्वाचे! हा महापुरुष वर्षातनं फक्त एकच दिवस नव्हे तर अगदी रोजच प्रात:स्मरणीय आहे हेही नक्की. परंतु वर्षात एखाद् दिवस सर्वांनी मिळून त्यांचं पुण्यस्मरण करणे हेही आम्हाला अगत्याचे वाटले/वाटते आणि त्याच भावनेतून, केवळ आणि केवळ श्रद्धेपोटी आज येथे त्यांचे हे पुण्यस्मरण मिसळपाव करत आहे.
आम्ही मोठे इतिहासकारही नाही, किंवा इतिहासाचे गाढे अभ्यासकही नाही. प्रांजळपणे सांगायचे तर चक्क कालनिर्णय बघून जगणारी माणसे आम्ही! आजचा १९ फेब्रुवारी हा दिवस त्यात शिवजयंती म्हणून नोंद झालेला आहे आणि तोच संदर्भ घेऊन मिसळपावने त्यांचे पुण्यस्मरण केलेले आहे आणि त्यामागे केवळ महाराजांच्या ठायीची असीम श्रद्धा असून अन्य कुठलेच कारण नाही.

अगदी अवश्य होऊ द्या! मिसळपावने मात्र ती आजच साजरी केली आहे. प्रेमाने आणि श्रद्धेने!

शिवाय हेही तुम्हीच म्हणताय! चांगला विरोधाभास आहे..!
मत आपल॑ आपल॑...जे आज शिवजय॑ती साजरी करतात त्या॑ना आमचा विरोध नाही...
आणि असूही नये!
जे प्रत्येक महापुरूषाबाबत आपल्याकडे घडत॑ तेच दुर्दैवान॑ राजा॑च्या नशिबीही याव॑...इथ॑ही वाद ? असो.
वादग्रस्त प्रतिसाद देऊन आपणच वाद सुरू केलात! आज इतक्या जणांनी इथे आपापल्या प्रतिसादातून राजांबद्दल आपापल्या मनीची भावना, श्रद्धा आणि प्रेम व्यक्त केलं ती सगळी मंडळी देखील मराठीच आहेत! त्यापैकी कुणालाच इथे वाद सुरू करावासा वाटला नाही. तरीही शेवटी वाद झालाच! असो, मिसळपावचं दुर्दैव! दुसरं काय?
माझी वरील वाक्य॑ वाद घडवण्यासाठी / वाढवण्यासाठी नाहीत, तर ती केवळ माझ्या मनातली मळमळ आहे.
मनातली मळमळ, दु:ख, आनंद, खंत, तळमळ इत्यादी मोकळेपणाने व्यक्त करायला मिसळपाववर कधीच मनाई नसते, तरीही या ठिकाणी आपण ही जी मळमळ व्यक्त केली आहे ती औचित्यपूर्ण नसून अस्थानी आहे असे वाटते! असो...
माझ॑ म्हणण॑ तस॑ मुळीच॑ नाहीये. कदाचित माझी दरिद्री शब्दस॑पत्ती माझ्या योग्य भावना पोहोचवण्याच्या आड येते आहे...कस॑ सा॑गाव॑ हेच कळत नाहीये.

वाईट वाटल॑ तात्या. माझ्या गाढवपणामुळ॑ अस॑ काही होईल ह्याची तीळमात्रही कल्पना नव्हती.

ठिक आहे. चूक झाली. समस्त मिपाकर हो, माझ्या ह्या गाढवपणाची मी जाहिर माफी मागतो आहे. क्षमस्व.
नाही त्या गोष्टी॑मुळे वातावरणात विष कालवल॑ जात असेल तर योग्य त्या वेळी उपाय केला पाहिजे.
तात्या / सरप॑च / स॑पादक / पोलिस पाटील ह्या धाग्यातील माझा प्रतिसाद उडवून टाकावा अशी मी आपल्याला विन॑ती करतो.

कुठे कधी काय बरळावे याची अक्कल नसलेला
अरे छोड दो यार! चलता है.. मला तुझा प्रतिसाद अस्थानी वाटला आणि म्हणून मी तसं लिहिलं! तुला ते पटलं आणि तू मोठ्या मनाने, खुल्या दिलाने दिलगिरी व्यक्त केलीस यातच सगळं आलं!
तेव्हा आता हा विषय मिटला/संपला/गर्दीस मिळाला! :)
बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय!
तात्या.
--
घाटातून जाताना वाटायचं की एकदा तरी मराठी सैन्य चढता उतरताना दिसावं! :)
हरितात्यांनी आम्हाला कधी पैशाचा खाऊ दिला नाही, पण प्रचंड अभिमान दिला! चिमुकल्या मनगटात कसल्यातरी जोमाच्या मनगट्या घातल्या. त्यावेळी दिसल्या नाहीत तिच्या अदृष्य वळ्या. पंण आज एखाद्या आघाताच्या क्षणी दिसायला लागतात!
-- इति भाईकाका. (हरितात्या)
मेहेंदळे नावाच्या संशोधकांनी संशोधन करून ठरविली आहे. सरकारने नवे. वयाच्या २३व्या वर्षापासून ३९व्या वर्षापर्यंत त्यांनी या संशोधनासाठी वेचली. सर्व विद्वानांनी १९ फेब्रु. ही तारीख मान्य केली आहेत. फक्त शिवसेनादि राजकीय पक्षांनी त्यांच्या राजकीय सोयीसाठी ती अमान्य केली.
गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहिला म्हणजे बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे, आयुष्यभर झटून त्यांनी शिवचरित्र तयार केलं आज अनेक इतिहास कारांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभे केले जाते...पण मेहेंदळे यांच्या बाबत असे काही ऐकिवात नाही , सरदार आप्पा बळवंत मेहेंदळे यांचे ते वंशज आहेत असा ऐकून आहे !
राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो |
अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं ||
राखी रजपुती , रजधानी राखी राजन की |
धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं ||
भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की |
देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं ||
साही के सपूत , सिवराज समशेर तेरी |
दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं ||
वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत |
रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं ||
हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की |
कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं ||
मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह |
बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं ||
राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज |
देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं ||
देवल गिराविते , फिराविते निसान अली |
ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी ||
गौर गणपती आप , औरनको देत ताप |
आपनी ही बार सब , मारी गये दबकी ||
पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत |
सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की ||
कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती |
सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी ||
- कविराज भूषण.
{{ हे! शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज! तुम्ही आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केले.हिन्दुंचा तिलक राखला आहे. श्रुति, स्मृति व पुराणातील आचारधर्माचे संरक्षण केले. राजपुतांचा क्षात्र धर्म व राजांच्या राजधान्यांना आपनाच स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. पृथ्वीवर धर्म आपणच राखला आहे. गुणिजनांमधील श्रेष्ठ गुणांचे अस्तित्व आपल्यामुळेच राहिले आहे. आपण महाराष्ट्राची महानता वाढवली आहे व महाराष्ट्राला श्रेष्ठता प्राप्त करून दिली आहे. आपली किर्ती दिगंतात पसरलेली आहे. आपल्या दिव्या तलवारीने दिल्लीपतीच्या सेनेचा पराभव करून, जगात हिंदुंच्या मान मर्यादांचे संरक्षण केले आहे. वेदांचे आणि पुराणांचे सामर्थ्य आपल्यामुळेच टिकून राहिले आहे. आपल्यामुळेच भाविकांच्या जिभेवर रामनाम अस्तित्व शिल्लक आहे. हिंदुंच्या पवित्र शिखेला व सैनिकांच्या भाकरीला आपल्यामुळेच संरक्षण मिळाले आहे. यज्ञोपवितांना व पवित्र जपमाळांना आपण वाचाविले आहे. मोगलांच्या सामंतांचाच नव्हे, तर बादशाहचाही आपण धुव्वा उडविलात. निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपण प्रकट केले आहे. देवळातील देव व घरामधील धर्म केवळ आपल्यामुळेच शिल्लक राहिला आहे. सभोवाताली सर्व यवनांचे कार्य अक्षुण्णपणे चालू असता व यवन सैनिकांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला असता, राजे महाराजे भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. थोडेसे पुजविधन चुकले तर भक्तांनाच ताप देणाय्रा देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून ते लपून बसले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर काशी कलाहीन झाली असती,मथुरेला मशीद उभा राहीली असती अणि हिन्दुंची सुन्ता झाली असती}
अश्या एका महान युगप्रवर्तकाच्या भुमित जन्म घेतल्याने खरच अयुष्याचे सार्थक झाले!
प्रतिक्रिया
19 Feb 2008 - 6:21 am | सृष्टीलावण्या
मिसळपाव अटकेपार जावो आणि मिसळपाव.com असेच त्रिखंडात गाजत राहो.
21 Feb 2008 - 11:38 pm | पिवळा डांबिस
महाराज असते तर....
काही विधायक काम करण्याऐवजी मि. पा. कट्ट्यावर चकाट्या पिटणार्या आपल्याला पाहून म्हणाले असते,
"कोण आहे ते तिकडे? या सगळ्या रिकामटेकड्या हरामखोरांना उलटे टांगून राखेचे तोबरे द्या!!"
:))
29 Feb 2008 - 12:29 pm | सर्किट (not verified)
म्हणूनच हल्ली आम्ही महाराजांचं लक्ष नाही, असं पाहून हळूच मिपावर येतो :-) बाकी डांबिसराव, क्यालिफोर्नियात एक पिवळा ड्यांबिस आहे हे बघून लय झ्याक वाटलय बघा.- सर्किट
1 Mar 2008 - 10:48 am | पिवळा डांबिस
तुम्हाला व्यक्तीगत संदेश द्यायचा प्रयत्न केला पण हे तिच्यायला जेंव्हापासून साईट अपडेट केलंय ना तेंव्हापासून हजार अडचणी येतायत!!
जर कधी आलांत लॉस एंजेलिस परिसरात तर मला कळवा आणि जरूर माझ्याकडे रहायलाच या. जर मी बे एरियात आलो तर जरूर कळवीन...
स्नेह व्हावा व तो वाढावा ही कामना.
आपला,
पिवळा डांबिस
19 Feb 2008 - 7:04 am | रविराज
श्रीमंतयोगी नाही श्रीमानयोगी!!!
19 Feb 2008 - 9:00 am | विसोबा खेचर
समर्थांनी,
'निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसि आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंतयोगी!
असं म्हटलं आहे. 'श्रीमानयोगी' हे रणजीत देसायांच्या कादंबरीचे नांव आहे.
अवांतर - माझ्या मते ह्या कादंबरीपेक्षा, त्यात शिवरायांवार नरहर कुरुंदकरांनी लिहिलेली १८-२० पानांची प्रस्तावनाच अतिशय अभ्यासपूर्ण आहे, सुरेख आहे.
आपला,
(कुरुंदकरप्रेमी) तात्या.
19 Feb 2008 - 9:49 am | रविराज
तुम्ही बरोबर आहात.
माझे जे काही तुटपुंजे ज्ञान आहे, ते मी न पाजळलेलेच बरे. :)
रवी.
19 Feb 2008 - 11:48 pm | पिवळा डांबिस
माझ्या मते ह्या कादंबरीपेक्षा, त्यात शिवरायांवार नरहर कुरुंदकरांनी लिहिलेली १८-२० पानांची प्रस्तावनाच अतिशय अभ्यासपूर्ण आहे, सुरेख आहे.
विशेषतः शिवरायांना अवतार मानण्यापेक्षा, एक अलौकिक कर्तबगारीचा, पण आदर्श मानवच माना हे सूत्र त्यात अतिशय परिणामकारकरित्या मांडले आहे.
आदर्श मानला तर त्याचे गुण आपल्यात यावे यासाठी माणूस प्रयत्न करतो. एकदा अवतार मानला की गंध, फुलं, अक्षता वाहून मोकळे व्हायची आपली परंपरा आहे...
शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप||
शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||
शिवरायांचा डोळस भक्त,
पिवळा डांबिस
20 Feb 2008 - 1:30 pm | तळेकर
मला सुद्धा नरहर कुरुंदकरांची प्रस्तावना आवडली, इतकी की पुन्हा पुन्हा वाचली. त्यांचे इतर साहित्य येथे देता आले तर काय बहार येईल. तात्या मग काय ?
19 Feb 2008 - 7:34 am | अनिता
श्रीमंतयोगी / श्रीमानयोगी...मला वाटते दोन्ही बरोबर आहेत.
थो. आबासाहेबासाठीच दोन्ही बिरुद जन्मास आलीत बहुतेक!
19 Feb 2008 - 9:25 am | विकास
शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करताना जसे श्रीमंत योगी हे अचूक विशेषण आठवते तसेच त्यांच्यातील जे आवश्यक असलेले गूण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काव्यबद्ध केलेत त्यांची पण आठवण होते:
जी शुद्धी हृदाची रामदास शीर डुलवी
जी युक्ती पातशाह्यास शत्रूच्या झुलवी
जी युक्ती कूटनितीस खलासी बुडवी
जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी
ती शुद्धी हेतूची कर्मी लाहूदे
ती बुद्धी भाबड्या जीवा लाभूदे
ती शक्ती शोणितामाजी वाहू दे
दे मंत्र पुन्हा, जो दिले समर्थे तुझ ज्या
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा ||
19 Feb 2008 - 9:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रयतेचा राजा, निश्चयाचा महामेरु, सकल जनांचा आधारु, छत्रपती शिवाजी महाराजांना आमचाही मानाचा मुजरा.......!!!!
अवांतर :) विकासराव, गडावर जुने मावळे दिसले की जरा बरं वाटतं !!!!
19 Feb 2008 - 9:27 am | प्राजु
थोरल्या आबासाहेबांना मानाचा मुजरा....
मिसळपाव. कॉम चा वटवृक्ष असाच बहरत राहो. उत्तमोत्तम साहित्य इथे वाचायला मिळो... हीच श्रींची इच्छा...!
- प्राजु
19 Feb 2008 - 9:32 am | चतुरंग
मी समर्थांच्या शब्दात म्हणेन -
निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसि आधारु |
अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी ||
चतुरंग
19 Feb 2008 - 9:56 am | सर्वसाक्षी
ज्या युगपुरूषाच्या दैदिप्यमान कर्तृत्वाने पुढे तीन शतकांनंतर जन्मलेल्या परंतु त्याचाच स्वातंत्र्य प्राप्तिचा वारसा चालविलेल्या क्रांतिकारकांना प्रभावित केले त्या महान शिवप्रभुंना सादर प्रणाम (महाराष्ट्रा पासुन शेकडो मैलांवर जन्मलेल्या हुतात्मा भगतसिंहांनी एक पत्रकार या नात्याने जेव्हा महाराष्ट्रात यायची त्यांना संधी मिळाली तेव्हा रायगडाला आवर्जुन भेट दिली होती तर ब्रिटिशांच्या नजरकैदेतुन सुटण्यापूर्वी नेताजी सुभाषचंद्रांनी जदुनाथ सरकार लिखित शिवचरित्राचे पारायण केले होते - विशेषत: आग्र्याहून सुटकेचे)
19 Feb 2008 - 10:18 am | सुमीत
आमचा देखील त्रिवार मुजरा,
बाकी तात्या सांगतात तसे "श्रीमान योगी" मध्ये मला पण नरहर कुरंदकरांची प्रस्तावना जास्त आवडली .
19 Feb 2008 - 10:21 am | मनस्वी
हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
गीतकार :स्वातंत्र्यवीर सावरकर
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर
=========================
शिवरायांना माझा मानाचा मुजरा
=========================
19 Feb 2008 - 10:22 am | डॉ.प्रसाद दाढे
साजि चतुर॑ग बिर
र॑ग मे॑ तुर॑ग चढि
सरजा शिवाजी ज॑ग
जीतन चलत है॑ ।
भूषन भनत नाद
बिहद नगारन के
नदी नद मद गैब
रनके रलत है॑ ॥
'सिवाजी न होतो तो
सुनति होत सबकी'
कु॑भकन्न असुर
औतारी अवर॑गजेब
कीन्ही कत्ल मथुरा
दोहाई फेरी रब की ॥
खोदी डारे देवी देव
सहर महल्ला बा॑के
लाखन तुरूक कीन्हे
छूटि गयी तब की ॥
भूषण भनत भाग्यो
कासीपति विश्वनाथ
और कौन गिनतीमे॑
भूली गति भबकी ॥
चारो॑ वर्ण धर्म छोडि
कलमा निवाज पढि
सिवाजी न होतो तो
सुनति होत सबकी ॥
देवल गिरावते
फिरावते निसान अली
ऐसे डुबे राव राजे
सभी गये लबकी ॥
गौरी गनपति आप
औरनको देत ताप
आपनीही बार सब
मारि गये दबकी ॥
पीरा पयग॑बरा
दिग॑बरा दिखाई देत
सिद्धकी सिद्धाई गई
रही बात रबकी ॥
कासीहूकी कला जाती
मथुरा मसीत होती
सिवाजी न होतो तो
सुनति होत सबकी ॥
19 Feb 2008 - 10:39 am | सुमीत
रायगड आणि सिंहगड यांची चित्रे पहा,
http://community.webshots.com/user/sushinde
Forts
19 Feb 2008 - 10:41 am | विकास
उरलेले कडवे... (कदाचीत आजच्या परिस्थितीसपण ज्याचा भावार्थ लागू होत असेल असे)
....
हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा भग्न आज जयदुर्ग आसंवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे | भंगले
जाहली राजधान्यांची | जंगले
परदास्य-पराभविं सारी | मंगले
या जगतिं जगू ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
19 Feb 2008 - 10:43 am | नीलकांत
महाराष्ट्राच्या अखंड स्फुर्तीस्त्रोताला, जाणत्या राजाला...
मानाचा मुजरा.
नीलकांत
19 Feb 2008 - 11:03 am | मुक्तसुनीत
.... बाबासाहेबांच्या शिवचरित्राचे शेवटचे शब्द आठवतात : "काय लिहू ? शब्दच संपले."
19 Feb 2008 - 11:11 am | अवलिया
शिवराया
परत या
आज तुमची खुप गरज आहे
नाना
19 Feb 2008 - 1:27 pm | धमाल मुलगा
गो-ब्राम्हण क्षत्रियकुलावत॑स सि॑हासनाधिश्वर राजाधिराज, छत्रपति शिवाजी महाराजा॑चे चरणि लक्ष लक्ष प्रणाम !
थोरल्या महाराजा॑ची जय॑ती आम्ही "कळसुत्री सरकार" तारिख ठरवत॑ म्हणून कधीही साजरी करत नाही.
ती साजरी होणार मार्चमध्येच, अगदी वाजत-गाजत. सरकारी मिळ्मिळीत पद्धतीन॑ नव्हे..अस्सल म्हराठमोळ्या!!!
तस॑ तर रोज आमचा दिवस सुरु होतो तोच विष्णुसहस्त्रनाम आणि शिवव॑दनेने...त्यामुळे महाराजा॑ना मुजरा करायला आम्हाला कारण काढायची मुळीच गरज नाही.
आपला
- पिढ्या॑न् पिढ्या स्वराज्याच्या लग्नात आहुतीत उड्या मारायला गुढग्याला बाशि॑ग बा॑धून तयार राहणार्या देशमुखा॑चा अभिमानी वारस
ध मा ल.
अवा॑तर : मत आपल॑ आपल॑...जे आज शिवजय॑ती साजरी करतात त्या॑ना आमचा विरोध नाही...जे प्रत्येक महापुरूषाबाबत आपल्याकडे घडत॑ तेच दुर्दैवान॑ राजा॑च्या नशिबीही याव॑...इथ॑ही वाद ? असो.
सरप॑च, आपला हेतु खचितच स्तुत्य आहे, त्याबद्दल धन्यवाद. कृपया गैरसमज नसावा. माझी वरील वाक्य॑ वाद घडवण्यासाठी / वाढवण्यासाठी नाहीत, तर ती केवळ माझ्या मनातली मळमळ आहे.
19 Feb 2008 - 2:08 pm | विसोबा खेचर
धमालराव,
वादात आम्हालाही पडायचं नव्हते/नाही! महाराज केव्हा जन्मले यापेक्षा त्यांनी आयुष्यात काय कार्य केले, हे अधिक महत्वाचे! हा महापुरुष वर्षातनं फक्त एकच दिवस नव्हे तर अगदी रोजच प्रात:स्मरणीय आहे हेही नक्की. परंतु वर्षात एखाद् दिवस सर्वांनी मिळून त्यांचं पुण्यस्मरण करणे हेही आम्हाला अगत्याचे वाटले/वाटते आणि त्याच भावनेतून, केवळ आणि केवळ श्रद्धेपोटी आज येथे त्यांचे हे पुण्यस्मरण मिसळपाव करत आहे.
आम्ही मोठे इतिहासकारही नाही, किंवा इतिहासाचे गाढे अभ्यासकही नाही. प्रांजळपणे सांगायचे तर चक्क कालनिर्णय बघून जगणारी माणसे आम्ही! आजचा १९ फेब्रुवारी हा दिवस त्यात शिवजयंती म्हणून नोंद झालेला आहे आणि तोच संदर्भ घेऊन मिसळपावने त्यांचे पुण्यस्मरण केलेले आहे आणि त्यामागे केवळ महाराजांच्या ठायीची असीम श्रद्धा असून अन्य कुठलेच कारण नाही.
ती साजरी होणार मार्चमध्येच, अगदी वाजत-गाजत. सरकारी मिळ्मिळीत पद्धतीन॑ नव्हे..अस्सल म्हराठमोळ्या!!!
अगदी अवश्य होऊ द्या! मिसळपावने मात्र ती आजच साजरी केली आहे. प्रेमाने आणि श्रद्धेने!
तस॑ तर रोज आमचा दिवस सुरु होतो तोच विष्णुसहस्त्रनाम आणि शिवव॑दनेने...त्यामुळे महाराजा॑ना मुजरा करायला आम्हाला कारण काढायची मुळीच गरज नाही.
शिवाय हेही तुम्हीच म्हणताय! चांगला विरोधाभास आहे..!
मत आपल॑ आपल॑...जे आज शिवजय॑ती साजरी करतात त्या॑ना आमचा विरोध नाही...
आणि असूही नये!
जे प्रत्येक महापुरूषाबाबत आपल्याकडे घडत॑ तेच दुर्दैवान॑ राजा॑च्या नशिबीही याव॑...इथ॑ही वाद ? असो.
वादग्रस्त प्रतिसाद देऊन आपणच वाद सुरू केलात! आज इतक्या जणांनी इथे आपापल्या प्रतिसादातून राजांबद्दल आपापल्या मनीची भावना, श्रद्धा आणि प्रेम व्यक्त केलं ती सगळी मंडळी देखील मराठीच आहेत! त्यापैकी कुणालाच इथे वाद सुरू करावासा वाटला नाही. तरीही शेवटी वाद झालाच! असो, मिसळपावचं दुर्दैव! दुसरं काय?
माझी वरील वाक्य॑ वाद घडवण्यासाठी / वाढवण्यासाठी नाहीत, तर ती केवळ माझ्या मनातली मळमळ आहे.
मनातली मळमळ, दु:ख, आनंद, खंत, तळमळ इत्यादी मोकळेपणाने व्यक्त करायला मिसळपाववर कधीच मनाई नसते, तरीही या ठिकाणी आपण ही जी मळमळ व्यक्त केली आहे ती औचित्यपूर्ण नसून अस्थानी आहे असे वाटते! असो...
आपला,
(दु:खी) तात्या.
19 Feb 2008 - 2:29 pm | धमाल मुलगा
चुकीची समजुत करून घेतलीत की हो....
माझ॑ म्हणण॑ तस॑ मुळीच॑ नाहीये. कदाचित माझी दरिद्री शब्दस॑पत्ती माझ्या योग्य भावना पोहोचवण्याच्या आड येते आहे...कस॑ सा॑गाव॑ हेच कळत नाहीये.
वादग्रस्त प्रतिसाद देऊन आपणच वाद सुरू केलात! आज इतक्या जणांनी इथे आपापल्या प्रतिसादातून राजांबद्दल आपापल्या मनीची भावना, श्रद्धा आणि प्रेम व्यक्त केलं ती सगळी मंडळी देखील मराठीच आहेत! त्यापैकी कुणालाच इथे वाद सुरू करावासा वाटला नाही. तरीही शेवटी वाद झालाच! असो, मिसळपावचं दुर्दैव! दुसरं काय?
वाईट वाटल॑ तात्या. माझ्या गाढवपणामुळ॑ अस॑ काही होईल ह्याची तीळमात्रही कल्पना नव्हती.
मनातली मळमळ, दु:ख, आनंद, खंत, तळमळ इत्यादी मोकळेपणाने व्यक्त करायला मिसळपाववर कधीच मनाई नसते, तरीही या ठिकाणी आपण ही जी मळमळ व्यक्त केली आहे ती औचित्यपूर्ण नसून अस्थानी आहे असे वाटते! असो...
ठिक आहे. चूक झाली. समस्त मिपाकर हो, माझ्या ह्या गाढवपणाची मी जाहिर माफी मागतो आहे. क्षमस्व.
नाही त्या गोष्टी॑मुळे वातावरणात विष कालवल॑ जात असेल तर योग्य त्या वेळी उपाय केला पाहिजे.
तात्या / सरप॑च / स॑पादक / पोलिस पाटील ह्या धाग्यातील माझा प्रतिसाद उडवून टाकावा अशी मी आपल्याला विन॑ती करतो.
-कुठे कधी काय बरळावे याची अक्कल नसलेला
ध मा ल.
19 Feb 2008 - 2:49 pm | विसोबा खेचर
तात्या / सरप॑च / स॑पादक / पोलिस पाटील ह्या धाग्यातील माझा प्रतिसाद उडवून टाकावा अशी मी आपल्याला विन॑ती करतो.
कुठे कधी काय बरळावे याची अक्कल नसलेला
अरे छोड दो यार! चलता है.. मला तुझा प्रतिसाद अस्थानी वाटला आणि म्हणून मी तसं लिहिलं! तुला ते पटलं आणि तू मोठ्या मनाने, खुल्या दिलाने दिलगिरी व्यक्त केलीस यातच सगळं आलं!
तेव्हा आता हा विषय मिटला/संपला/गर्दीस मिळाला! :)
बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय!
तात्या.
--
घाटातून जाताना वाटायचं की एकदा तरी मराठी सैन्य चढता उतरताना दिसावं! :)
हरितात्यांनी आम्हाला कधी पैशाचा खाऊ दिला नाही, पण प्रचंड अभिमान दिला! चिमुकल्या मनगटात कसल्यातरी जोमाच्या मनगट्या घातल्या. त्यावेळी दिसल्या नाहीत तिच्या अदृष्य वळ्या. पंण आज एखाद्या आघाताच्या क्षणी दिसायला लागतात!
-- इति भाईकाका. (हरितात्या)
20 Feb 2008 - 8:40 pm | सुधीर कांदळकर
मेहेंदळे नावाच्या संशोधकांनी संशोधन करून ठरविली आहे. सरकारने नवे. वयाच्या २३व्या वर्षापासून ३९व्या वर्षापर्यंत त्यांनी या संशोधनासाठी वेचली. सर्व विद्वानांनी १९ फेब्रु. ही तारीख मान्य केली आहेत. फक्त शिवसेनादि राजकीय पक्षांनी त्यांच्या राजकीय सोयीसाठी ती अमान्य केली.
16 Sep 2010 - 7:43 pm | मालोजीराव
गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहिला म्हणजे बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे, आयुष्यभर झटून त्यांनी शिवचरित्र तयार केलं आज अनेक इतिहास कारांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभे केले जाते...पण मेहेंदळे यांच्या बाबत असे काही ऐकिवात नाही , सरदार आप्पा बळवंत मेहेंदळे यांचे ते वंशज आहेत असा ऐकून आहे !
19 Feb 2008 - 11:38 am | सृष्टीलावण्या
इंद्र जिमि जृंभपर !
बाडव सुअंभपर !
रावण सदंभपर !
रघुकुल राज है !!
पौन वारिवाह पर !
संभु रतिनाह पर !
ज्यो सहसवाह पर !
राम द्विज राज है !
दावा दृमदंड पर !
चिता मृगझुंड पर !
भूषण वितुंड पर !
जैसे मृगराज है !!
तेज तमंअंस पर !
कन्न्ह जिमि कंस पर !
त्यों म्लेंच्छ बंस पर !
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
कवीराज भूषण.
19 Feb 2008 - 11:46 am | मनस्वी
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी
नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा
आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी
धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले
देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे
कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर
19 Feb 2008 - 1:25 pm | केशवराव
महाराष्ट्र धर्म वाढविणार्या , गो ब्राह्मण प्रतिपालक शिवरायापुढे सतत नतमस्तक !!!!
शिवभक्त .... केशवराव .
19 Feb 2008 - 1:40 pm | बापु देवकर
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ,आपणास मानाचा मुजरा.....
राज....
19 Feb 2008 - 1:51 pm | बेसनलाडू
महाराजांना हा मानाचा मुजरा!
(नतमस्तक)बेसनलाडू
19 Feb 2008 - 2:50 pm | इनोबा म्हणे
श्री शिवछत्रपतींना हा मानाचा मुजरा....
(तुकोबाचा वारकरी,शिवबाचा धारकरी) -इनोबा
19 Feb 2008 - 9:21 pm | llपुण्याचे पेशवेll
समर्थांनी शिवरायांच्या पश्चात संभाजीराजांना लिहीलेल्या पत्रातून
"शिवरायांचे कैसे चालणे| शिवरायाचे कैसे बोलणे ||
शिवरायाचे सलगी देणे| कैसे असे||
याहून करावे विशेष| तरीच म्हणावे पुरुष||
याऊपरी विशेष | काय सांगावे||"
(थोरल्या राजांचे राज्य त्यांचा सेवक म्हणून चलवणारे)
-पुण्याचे पेशवे
19 Feb 2008 - 10:41 pm | आनंद घारे
शिवरायांची राजमुद्रा
19 Feb 2008 - 11:33 pm | धनंजय
आणि विश्ववंदित अशा या चंद्रलेखेस मुजरा.
19 Feb 2008 - 10:44 pm | ऋषिकेश
जाणता राजा शिवबाला मानाचा मुजरा
-ऋषिकेश
19 Feb 2008 - 11:39 pm | अव्यक्त
कासीहूकी कला जाती
मथुरा मसीत होती
सिवाजी न होतो तो
सुनति होत सबकी ॥
छत्रपतिना त्रिवार मुजरा....
आमच्या वन्शजाना लाख लाख अभिवादन....
प्रसाद सावन्त (भोसले) अव्यक्त
19 Feb 2008 - 11:52 pm | अव्यक्त
छत्रपतिना त्रिवार मुजरा....
प्रसाद सावन्त (भोसले)
20 Feb 2008 - 8:42 pm | सुधीर कांदळकर
सरपंचांना धन्यवाद देतो.
1 Apr 2008 - 7:35 pm | अनामिका
राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो |
अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं ||
राखी रजपुती , रजधानी राखी राजन की |
धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं ||
भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की |
देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं ||
साही के सपूत , सिवराज समशेर तेरी |
दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं ||
वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत |
रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं ||
हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की |
कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं ||
मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह |
बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं ||
राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज |
देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं ||
देवल गिराविते , फिराविते निसान अली |
ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी ||
गौर गणपती आप , औरनको देत ताप |
आपनी ही बार सब , मारी गये दबकी ||
पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत |
सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की ||
कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती |
सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी ||
- कविराज भूषण.
{{ हे! शहाजींचे वीर पुत्र शिवाजी महाराज! तुम्ही आपल्या तलावारीने हिंदुत्वाचे संरक्षण केले.हिन्दुंचा तिलक राखला आहे. श्रुति, स्मृति व पुराणातील आचारधर्माचे संरक्षण केले. राजपुतांचा क्षात्र धर्म व राजांच्या राजधान्यांना आपनाच स्थैर्य प्राप्त करून दिले आहे. पृथ्वीवर धर्म आपणच राखला आहे. गुणिजनांमधील श्रेष्ठ गुणांचे अस्तित्व आपल्यामुळेच राहिले आहे. आपण महाराष्ट्राची महानता वाढवली आहे व महाराष्ट्राला श्रेष्ठता प्राप्त करून दिली आहे. आपली किर्ती दिगंतात पसरलेली आहे. आपल्या दिव्या तलवारीने दिल्लीपतीच्या सेनेचा पराभव करून, जगात हिंदुंच्या मान मर्यादांचे संरक्षण केले आहे. वेदांचे आणि पुराणांचे सामर्थ्य आपल्यामुळेच टिकून राहिले आहे. आपल्यामुळेच भाविकांच्या जिभेवर रामनाम अस्तित्व शिल्लक आहे. हिंदुंच्या पवित्र शिखेला व सैनिकांच्या भाकरीला आपल्यामुळेच संरक्षण मिळाले आहे. यज्ञोपवितांना व पवित्र जपमाळांना आपण वाचाविले आहे. मोगलांच्या सामंतांचाच नव्हे, तर बादशाहचाही आपण धुव्वा उडविलात. निग्रहानुग्रहाचे सामर्थ्य आपण प्रकट केले आहे. देवळातील देव व घरामधील धर्म केवळ आपल्यामुळेच शिल्लक राहिला आहे. सभोवाताली सर्व यवनांचे कार्य अक्षुण्णपणे चालू असता व यवन सैनिकांनी मंदिरे पाडून त्या जागी अल्लाचा ध्वज फडकविला असता, राजे महाराजे भयग्रस्त व पतित होऊन तोंडदेखील बाहेर काढत नव्हते. थोडेसे पुजविधन चुकले तर भक्तांनाच ताप देणाय्रा देवी, गणपती आदि देवदेवतांना आपल्यावरील या यावनी संकटांचा प्रतिकार करणे अशक्य वाटून ते लपून बसले होते. सिद्धांची सिद्धि समाप्त होवून जिकडे तिकडे पीर, पैगंबर, फकीर, अवलिया यांचेच साम्राज्य पसरलेले होते. अशा स्थितीत जर शिवाजी महाराज झाले नसते, तर काशी कलाहीन झाली असती,मथुरेला मशीद उभा राहीली असती अणि हिन्दुंची सुन्ता झाली असती}
अश्या एका महान युगप्रवर्तकाच्या भुमित जन्म घेतल्याने खरच अयुष्याचे सार्थक झाले!
20 Feb 2009 - 5:02 pm | अनामिका
जेंव्हा करपून निघाली धरणी यवनांच्या जालाखाली...
विकून टाकली अब्रू स्वधार्माच्या चितेखाली...
एक तेजस्वी सूर्य उगवला महाराष्ट्राच्या क्षितिजावरती..
गातो गान तयाचे..आजच्या शुभ मुहूर्तावरती...!!!
महाराजांच्या पवित्र स्मृतीला त्रिवार मुजरा....
"अनामिका"