(तो लिहितो तेव्हा...)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
15 Jul 2009 - 10:04 pm

मिसळपावावर नवीनच आलेले कवी ज्ञानेश ह्यांच्या 'मी लिहितो तेव्हा...' ह्या सुंदर कवितेने आम्हाला स्फूर्ती दिली नसती तरच नवल! :)
============
तो लिहितो तेव्हा माझी,
बोबडी पहा हो वळते
तो इथे सारखा दिसतो
अन दशा बावरी होते

तो लिहितो तेव्हा सगळ्या
जालाचा लगदा होतो
शब्दांच्या भडिमाराला
मी 'टिपतो', बोळा होतो

तो लिहितो तेव्हा लिहिणे,
दु:स्वप्न जणू का होते
झीनत, हेलन, बिंदूने
स्वप्नातच थरथर होते

तो लिहितो तेव्हा तेव्हा,
तो लिहितो ऐसे काही,
जणू डोक्याखाली त्याच्या
उशी हिमालयाची घेई..

तो लिहितो तेव्हा मजला,
जाणवते जंतर मंतर
कवितेला भिडतो 'रंगा',
कवितेच्या थोडे नंतर....!

============
-चतुरंग

हास्यकविताविडंबन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

15 Jul 2009 - 10:24 pm | श्रावण मोडक

या एका 'तो'मधून किती बाण निघाले आहेत!!! वावा... चौफेर आहात अगदी.
चांगले विडंबन, त्यातही झीनत, हेलन, बिंदूमध्ये 'चतुरंग' दिसले.

बेसनलाडू's picture

16 Jul 2009 - 1:03 pm | बेसनलाडू

रंगाशेठ, मस्त एकदम!
(आस्वादक)बेसनलाडू

केशवसुमार's picture

17 Jul 2009 - 1:32 am | केशवसुमार

रंगाशेठ,
एकदम जबर्‍या विडंबन..
(सहमत)केशवसुमार

प्राजु's picture

15 Jul 2009 - 10:38 pm | प्राजु

झालं!! नारळ फुटला यांच्याही स्वागताचा!! :)
छान विडंबन!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ज्ञानेश...'s picture

16 Jul 2009 - 8:01 am | ज्ञानेश...

:D
विडंबन आवडले!

"Great Power Comes With Great Responssibilities"

अमोल केळकर's picture

16 Jul 2009 - 9:17 am | अमोल केळकर

वा ! मस्त मजा आली वाचून
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विशाल कुलकर्णी's picture

16 Jul 2009 - 9:38 am | विशाल कुलकर्णी

चतुरंगाचा हा कितवा रंग? भलताचा चमकदार आहे ! ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

नितिन थत्ते's picture

16 Jul 2009 - 10:13 am | नितिन थत्ते

रंगाशेठ, चांगल्या कवितेचे तितकेच चांगले विडंबन.
बर्‍याच दिवसांनी मजा आली.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

दत्ता काळे's picture

16 Jul 2009 - 1:18 pm | दत्ता काळे

चतुरंगजी विडंबन लई आवडले.

लिखाळ's picture

16 Jul 2009 - 3:31 pm | लिखाळ

मजेदार :)
-- लिखाळ.

कपिल काळे's picture

16 Jul 2009 - 3:40 pm | कपिल काळे

कोण आहे रे तो?
एका तो मधून बरेच काही सूचित !!

तो लिहितो तेव्हा सगळ्या
जालाचा लगदा होतो
हे तर भारीच !!

टुकुल's picture

17 Jul 2009 - 12:57 am | टुकुल

बाकी विचार करत आहे कि तुमच्या कविते मधे "तो" एवजी "ती" वापरुन एका कवियेत्रीला समर्पित करु, ज्यांच्या कविता कधीच मला आणी बर्‍याच लोकांना उमजल्याच नाही... :D

प्रशांत उदय मनोहर's picture

17 Jul 2009 - 1:10 am | प्रशांत उदय मनोहर

विडंबन मस्तच जमलंय.

मिपावरच्या सूर्याने न पाहिलेलं साहित्य वाचून आनंद झाला.

मदनबाण's picture

17 Jul 2009 - 6:30 am | मदनबाण

तो लिहितो तेव्हा मजला,
जाणवते जंतर मंतर
कवितेला भिडतो 'रंगा',
कवितेच्या थोडे नंतर....!
मस्त विडंबन. :)

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

ऋषिकेश's picture

17 Jul 2009 - 9:41 am | ऋषिकेश

मस्त.. मजा आली :)

अवांतरः "नसतेस घरी तू जेव्हा" च्या चालिवर नीट म्हटता येतंय

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

चतुरंग's picture

17 Jul 2009 - 5:58 pm | चतुरंग

धन्यवाद!:)

चतुरंग

ठकू's picture

17 Jul 2009 - 9:08 pm | ठकू

कर्कशी सहमत.

विडंबन आवडलं.

-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

बट्ट्याबोळ's picture

18 Jul 2009 - 7:52 pm | बट्ट्याबोळ

छान !! :)