संडे स्पेशल ( कोंबडी वडे)

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in पाककृती
16 Feb 2008 - 11:30 pm

धोंडोपंत भाऊ यांच्या विनंती वरून ही रेसपी देत आहे.
कोल्हापूर मध्ये ही वडा कोंबडा या नावाने ओळखतात. (संजीव कपुर ची रेसिपी आहे)

साहित्यः १/२ किलो चिकन
मेरिनेटः १/२ टी.स्पून लसूण पेस्ट
१/४ टी.स्पून आले पेस्ट
१टे.स्पून कोथिंबीर
२-३ हिरव्या मिरच्या
मसाला: २ टे.स्पून सुके खोबरे
४-५ ला मिरच्या
४ टे,स्पून ओले खोबरे
४-५ कांदे
४टे.स्पून तेल
१/४ टी.स्पून हळद
२ टी.स्पून मालवणी गरम मसाला
चवीनुसार मीठ

१.प्रथम करी साठी चिकन मेरीनेट करणे (दिलेल्या मेरीनेट्च्या साहित्याने)
२.सुके खोबरे, लाल मिरच्या कोरडेच भाजून, गार झाल्यावर त्याची १/२ कप पाणी घालून पेस्ट करणे.
३.एका कढईत थोडे तेल घेऊन त्यात ३ कांदे चिरून टाकावेत गुलाबी रंग झाल्यावर त्यात ओले खोबरे टाकणे कडेला तेल सुटेपर्यंत (किंवा ब्राऊन होईपर्यंत)परतणे.गार झाल्यावर त्याची पेस्ट करणे.
४.परत कढईत उरलेले तेल घालून २ कांदे चिरून टाकणे. ब्राऊन होइपर्यंत परतणे.त्यात मेरेनेट केलेले चिकन टाकणे. २ कप पाणी टाकुन बॉईल करणे.
नंतर सुके खोबरे,मिरच्या यांची पेस्ट मिक्स करणे. मालवणी मसाला टाकणे. ३-४ मिनिटांनी त्यात कांदा, ओले खोबर्याची पेस्ट टाकणे.गॅस मेडियम करून चिकन शिजवणे.चवीनुसार मीठ टाकणे.

वडे:(२ वाट्या तांदुळ,१ वाटी हरभराडाळ,१/४ वाटी उडद डाळ,१वाटी गहू,४-५ दाणेमेथ्या )
हे सर्व रवाळ दळुन आणणे.
२ वाट्या पीठ
१/४ टी.स्पून हळद
१टी.स्पून तिखट
मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी

१.पीठात हळद, मीठ, तिखट आणि २ टी.स्पून तेल घालून कोमट पाण्यात मळणे.
२.प्लॅस्टीकच्या कागदावर पुरीएवढे गोळे थापून तेलात ब्राऊन रंगावर तळून काढा.

वरील करी कोथिंबीर घालून वड्या सोबत खाणे.

पाकक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

17 Feb 2008 - 10:19 am | विसोबा खेचर

ख ल्ला स..!

तूर्तास इतकेच म्हणतो...!

संतमंडळी म्हणतात, 'मनात मोह, माया. लोभ यांना थारा देऊ नका.'

अहो पण या अश्या पा कृ वाचल्यावर कसं जमायचं हो हे?! :)

असो..

स्वातीताई, तुमच्यामुळे आणि प्रभाकरपंतांमुळे मिपाचं स्वयंपाकघर दिससेंदिवस समृद्ध होत आहे एवढं मात्र खरं!...

आपला,
(तृप्त!) तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

17 Feb 2008 - 10:31 am | प्रभाकर पेठकर

एकाच दिवशी कोलंबी भात आणि कोंबडी- वडे अशा दोन दोन फर्मास पाककृत्या दिल्यावर काय करावे बरे....?

काय करावे ह्याचा निर्णय न झाल्याने आजचा रविवार उपासच घडणार असे दिसते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Feb 2008 - 10:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती.कोंबड्याच्या  तळलेल्या, उकडलेल्या , भाजलेल्या  पीसाचे आम्ही चाहते. आपली पाककृती  " आमच्या  किचनचा मुड " पाहून बनवायला सांगीन.बाय द वे, चिकनच्या पीसला जे पेष्ट लावतात तळण्यासाठी,  ते हरभ-याचे पीठ त्याबरोबर आणखी काय असले पाहिजे ?
अवांतर :) आम्ही आमच्याकडे नॉन व्हेज रेसेपीचे दोन चार पुस्तके आणलेली आहेत. पण कोणाची नजर लागते कोणास ठाऊक.आम्ही अनेकदा प्रयत्न केलेत, पण पुस्तकातल्या पाककृतीची   टेस्ट प्रत्यक्षात कधी आलीच नाही :(

स्वाती राजेश's picture

17 Feb 2008 - 4:52 pm | स्वाती राजेश

डॉ. बिरुटे सर,
वरील पाककृती दिली कारण मी जशी करते तशी पाककृती मी अगोदर दिली आहे तरी पण आता देत आहे.
तशी केलीत तर मस्त टेस्ट येईल.
१/२ किलो चिकन, २टे.स्पून तीळ,१ टे.स्पून खसखस,२ टे.स्पून सुके खोबरे,२ टे.स्पून ओले खोबरे,२+१ कांदे, १/२ टी.स्पून लसूण,१/४ टी.स्पून आले, १/४ टी.स्पून हळद, १ टी.स्पून गरम मसाला.२टी.स्पून तेल, मीठ चवीनुसार
प्रथम खोबरे, तीळ्,खसखस, कांदे भाजून घ्यावे. आले,लसुण कोथिंबीर वाटून घ्यावे
एका पातेल्यात तेल घालून १ कांद बारीक चिरून त्यात घालावा,नंतर तिखट घालावे व परतावे. नंतर वरील बारीक केलेल मसाला घालून तेल सुटे पर्यंत परतणे.नंतर चिकन घालून शिजवणे.चवीनुसार मीठ घालणे. रस्सा जास्त पातळ नको.

प्राजु's picture

19 Feb 2008 - 2:04 am | प्राजु

स्वाती..
'मिसळपाव' म्हंटले की, केवळ कोल्हापूरी मिसळच आठवते तसेच मिसळपाव . कॉम म्हंटले की कोल्हापूरी पाककृतीच आठवायला लागल्या आहेत.
इतकी मस्त रेसिपी दिली आहेस ना इथे.. काय सांगू?
आता तात्याना, इथे कोल्हापूर दरबार नावाचा एक पाककृतींचा टॅग बनवायला सांगायला हवा.

- (कोल्हापूरी मिरची) प्राजु