धोंडोपंत भाऊ यांच्या विनंती वरून ही रेसपी देत आहे.
कोल्हापूर मध्ये ही वडा कोंबडा या नावाने ओळखतात. (संजीव कपुर ची रेसिपी आहे)
साहित्यः १/२ किलो चिकन
मेरिनेटः १/२ टी.स्पून लसूण पेस्ट
१/४ टी.स्पून आले पेस्ट
१टे.स्पून कोथिंबीर
२-३ हिरव्या मिरच्या
मसाला: २ टे.स्पून सुके खोबरे
४-५ ला मिरच्या
४ टे,स्पून ओले खोबरे
४-५ कांदे
४टे.स्पून तेल
१/४ टी.स्पून हळद
२ टी.स्पून मालवणी गरम मसाला
चवीनुसार मीठ
१.प्रथम करी साठी चिकन मेरीनेट करणे (दिलेल्या मेरीनेट्च्या साहित्याने)
२.सुके खोबरे, लाल मिरच्या कोरडेच भाजून, गार झाल्यावर त्याची १/२ कप पाणी घालून पेस्ट करणे.
३.एका कढईत थोडे तेल घेऊन त्यात ३ कांदे चिरून टाकावेत गुलाबी रंग झाल्यावर त्यात ओले खोबरे टाकणे कडेला तेल सुटेपर्यंत (किंवा ब्राऊन होईपर्यंत)परतणे.गार झाल्यावर त्याची पेस्ट करणे.
४.परत कढईत उरलेले तेल घालून २ कांदे चिरून टाकणे. ब्राऊन होइपर्यंत परतणे.त्यात मेरेनेट केलेले चिकन टाकणे. २ कप पाणी टाकुन बॉईल करणे.
नंतर सुके खोबरे,मिरच्या यांची पेस्ट मिक्स करणे. मालवणी मसाला टाकणे. ३-४ मिनिटांनी त्यात कांदा, ओले खोबर्याची पेस्ट टाकणे.गॅस मेडियम करून चिकन शिजवणे.चवीनुसार मीठ टाकणे.
वडे:(२ वाट्या तांदुळ,१ वाटी हरभराडाळ,१/४ वाटी उडद डाळ,१वाटी गहू,४-५ दाणेमेथ्या )
हे सर्व रवाळ दळुन आणणे.
२ वाट्या पीठ
१/४ टी.स्पून हळद
१टी.स्पून तिखट
मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी
१.पीठात हळद, मीठ, तिखट आणि २ टी.स्पून तेल घालून कोमट पाण्यात मळणे.
२.प्लॅस्टीकच्या कागदावर पुरीएवढे गोळे थापून तेलात ब्राऊन रंगावर तळून काढा.
वरील करी कोथिंबीर घालून वड्या सोबत खाणे.
प्रतिक्रिया
17 Feb 2008 - 10:19 am | विसोबा खेचर
ख ल्ला स..!
तूर्तास इतकेच म्हणतो...!
संतमंडळी म्हणतात, 'मनात मोह, माया. लोभ यांना थारा देऊ नका.'
अहो पण या अश्या पा कृ वाचल्यावर कसं जमायचं हो हे?! :)
असो..
स्वातीताई, तुमच्यामुळे आणि प्रभाकरपंतांमुळे मिपाचं स्वयंपाकघर दिससेंदिवस समृद्ध होत आहे एवढं मात्र खरं!...
आपला,
(तृप्त!) तात्या.
17 Feb 2008 - 10:31 am | प्रभाकर पेठकर
एकाच दिवशी कोलंबी भात आणि कोंबडी- वडे अशा दोन दोन फर्मास पाककृत्या दिल्यावर काय करावे बरे....?
काय करावे ह्याचा निर्णय न झाल्याने आजचा रविवार उपासच घडणार असे दिसते.
17 Feb 2008 - 10:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेहमीप्रमाणेच सुंदर पाककृती.कोंबड्याच्या तळलेल्या, उकडलेल्या , भाजलेल्या पीसाचे आम्ही चाहते. आपली पाककृती " आमच्या किचनचा मुड " पाहून बनवायला सांगीन.बाय द वे, चिकनच्या पीसला जे पेष्ट लावतात तळण्यासाठी, ते हरभ-याचे पीठ त्याबरोबर आणखी काय असले पाहिजे ?
अवांतर :) आम्ही आमच्याकडे नॉन व्हेज रेसेपीचे दोन चार पुस्तके आणलेली आहेत. पण कोणाची नजर लागते कोणास ठाऊक.आम्ही अनेकदा प्रयत्न केलेत, पण पुस्तकातल्या पाककृतीची टेस्ट प्रत्यक्षात कधी आलीच नाही :(
17 Feb 2008 - 4:52 pm | स्वाती राजेश
डॉ. बिरुटे सर,
वरील पाककृती दिली कारण मी जशी करते तशी पाककृती मी अगोदर दिली आहे तरी पण आता देत आहे.
तशी केलीत तर मस्त टेस्ट येईल.
१/२ किलो चिकन, २टे.स्पून तीळ,१ टे.स्पून खसखस,२ टे.स्पून सुके खोबरे,२ टे.स्पून ओले खोबरे,२+१ कांदे, १/२ टी.स्पून लसूण,१/४ टी.स्पून आले, १/४ टी.स्पून हळद, १ टी.स्पून गरम मसाला.२टी.स्पून तेल, मीठ चवीनुसार
प्रथम खोबरे, तीळ्,खसखस, कांदे भाजून घ्यावे. आले,लसुण कोथिंबीर वाटून घ्यावे
एका पातेल्यात तेल घालून १ कांद बारीक चिरून त्यात घालावा,नंतर तिखट घालावे व परतावे. नंतर वरील बारीक केलेल मसाला घालून तेल सुटे पर्यंत परतणे.नंतर चिकन घालून शिजवणे.चवीनुसार मीठ घालणे. रस्सा जास्त पातळ नको.
19 Feb 2008 - 2:04 am | प्राजु
स्वाती..
'मिसळपाव' म्हंटले की, केवळ कोल्हापूरी मिसळच आठवते तसेच मिसळपाव . कॉम म्हंटले की कोल्हापूरी पाककृतीच आठवायला लागल्या आहेत.
इतकी मस्त रेसिपी दिली आहेस ना इथे.. काय सांगू?
आता तात्याना, इथे कोल्हापूर दरबार नावाचा एक पाककृतींचा टॅग बनवायला सांगायला हवा.
- (कोल्हापूरी मिरची) प्राजु