प्रिय सौ. लेकीस...

सुबक ठेंगणी's picture
सुबक ठेंगणी in जे न देखे रवी...
8 Jul 2009 - 6:32 pm

"प्राजूची “प्रिय सौ. आईस” वाचून सुचलेलं काहीतरी...एका आईचं मनोगत. ही मी केलेली पहिलीच कविता(?) असल्याने चु.भु.द्या.घ्या. कल्पना फार पूर्वी वाचलेल्या इंग्रजी कवितेवरून सुचली असली तरी भावना आणि शब्द एकदम वोरिजिनल.

मला आजही आठवतंय माझं बाळ
पाळणाघराच्या खिडकीत बसून
माझी वाट बघणारं...
धावत येऊन मला बिलगणारं...
माझ्या हातात असायच्या पिशव्या
भाजी, खाऊ, खेळणी, जबाबदा-यांनी गच्च भरलेल्या
अगदी तळाशी असायचं दबलेलं माझं तुझ्यावरचं प्रेम...
रस्ताभर तुझी माझ्यातल्या आईशी बडबड आणि माझी माझ्यातल्या प्रोफेशनलशी!
“उद्या शाळेत नां”…”बहुतेक ओव्हरटाईम करावा लागणार!”
“आज माझी वही”…”डेडलाईन पुन्हा उलटून जाणार!”
“आई उद्या शाळेत सोडायला येशील?”…”९.२७ नंतर एकदम ९.५६!”

मग रात्री तुला गोष्ट सांगताना सैलावत जाणारी
टेडीबेअरभोवतीची तुझी मिठी,
झोपेतला तुझा निष्पाप चेहरा...
हजार स्वप्न बघणारे तुझे मिटलेले डोळे...
तुझं बोट धरून यायचं होतं गं
तुझ्या स्वप्नांच्या गावाला
पण मिळत नाही त्याच्यासाठी कॅज्युअल!
मग मी नुसतंच तुझ्या डोक्यावर थोपटत राहिले...
तू लवकर मोठी होण्याची वाट बघत!

आणि एक दिवस खरंच...
झालीस की गं मोठी!
आता मी रोज संध्याकाळी...
दारात उभी असायची तुझी वाट पहात...
तुझ्याशी राहिलेलं सगळं बोलायचं होतं…ऐकायचं होतं!
पण आजही तू निघून गेली होतीस...
तुझ्या स्वप्नांच्या गावाला...
आणि मी राहिले मागेच
तुला निरोपाचे हात हलवत...

आजकाल ऐकते तुला फोनवर...
कधी ई पत्रातून भेटतेस...
अश्शीच बोलत रहातेस भडाभडा...
तुझ्या बाळाबद्दल, त्याच्या शाळेबद्दल,
डबे, लोकल, डेडलाईन्सबद्दल...
खरं खरं सांगू...
लांब असलीस नां तरी
फार फार जवळ वाटतेस तेव्हा!

कविताप्रकटनप्रतिसाद

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

8 Jul 2009 - 6:40 pm | श्रावण मोडक

वाचायचं नाही असं ठरवलं होतं. पण राहवलं नाही वाचून काढलं आणि लक्षात आलं की आधीचा निर्णय चुकीचा होता.
मला आधी वाटलं होतं की, ही नुसतीच आवृत्ती असेल. पण तसं नाहीये. स्वतंत्रपणे वाचता येणारं प्रकटन आहे हेदेखील. छान.

विकास's picture

8 Jul 2009 - 6:47 pm | विकास

>>वाचायचं नाही असं ठरवलं होतं. पण राहवलं नाही वाचून काढलं आणि लक्षात आलं की आधीचा निर्णय चुकीचा होता.
मला आधी वाटलं होतं की, ही नुसतीच आवृत्ती असेल. पण तसं नाहीये. स्वतंत्रपणे वाचता येणारं प्रकटन आहे हेदेखील. छान.<<

अगदी हेच म्हणायचे आहे. कविता आवडली.

यशोधरा's picture

8 Jul 2009 - 6:45 pm | यशोधरा

सगळ्यात शेवटच कडवं झकास!
आणि मधल्या काही ओळीही आवडल्या...

ब्रिटिश टिंग्या's picture

8 Jul 2009 - 6:53 pm | ब्रिटिश टिंग्या

फारच सुरेख!

आनंदयात्री's picture

9 Jul 2009 - 9:06 am | आनंदयात्री

हेच म्हणतो. ठेंगणीताईंची कविता प्रकटन आवड्ले.
जियो !!

कपिल काळे's picture

8 Jul 2009 - 7:03 pm | कपिल काळे

सुंदर !!
सुरेख !!
सरस!!

आवडली .

अनिल हटेला's picture

8 Jul 2009 - 7:05 pm | अनिल हटेला

उत्तम अत्युत्तम अप्रतीम !!! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

अनिल हटेला's picture

8 Jul 2009 - 7:07 pm | अनिल हटेला

__"__
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Jul 2009 - 7:08 pm | llपुण्याचे पेशवेll

प्राजुच्या कवितेइतकीच सुंदर कविता ही पण आहे.. आवडली..
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

सहज's picture

8 Jul 2009 - 7:16 pm | सहज

छान आहे.

प्रमोद देव's picture

8 Jul 2009 - 7:44 pm | प्रमोद देव

अतिशय सहजसुंदर !

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

दशानन's picture

8 Jul 2009 - 7:49 pm | दशानन

वाह !
सुंदर प्रकटन ... आवडले !

काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ?

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jul 2009 - 8:07 pm | परिकथेतील राजकुमार

मस्तच कविता अहे ग.

पहिलाच प्रयत्न आहे असे बिलकुल वाटत नाही.

अवांतर :- प्राजक्तातै चे नाव बदलुन 'प्रेरणा' ठेवावे का ?

लोकांना नावे ठेवण्याची आवड असलेला
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

दिपक's picture

9 Jul 2009 - 9:03 am | दिपक

सुंदर आणि भावनिक आवडली.. :)

अवांतर : परा तुमच्या राजमातेचे तुमच्याबद्दलचे विचार "प्रिय चिरंजीवास.." मधुन वाचायला आवडतील. :)

परिकथेतील राजकुमार's picture

9 Jul 2009 - 11:29 am | परिकथेतील राजकुमार

=)) =))
आमच्या राजमाता जर कविता लिहितिल, तर नक्कीच तिचे नाव 'चिरंजीव दिवट्यास' असेल.

दिवटा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

प्राजु's picture

8 Jul 2009 - 8:23 pm | प्राजु

अशक्य आहे..
खूप आवडली कविता. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

8 Jul 2009 - 8:54 pm | रेवती

फारच छान कविता.

रेवती

अनामिक's picture

8 Jul 2009 - 10:00 pm | अनामिक

सुंदर कविता!

-अनामिक

मदनबाण's picture

9 Jul 2009 - 4:30 am | मदनबाण

सहमत...

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

चतुरंग's picture

8 Jul 2009 - 10:09 pm | चतुरंग

पिढी दरपिढी होणारी इतिहासाची पुनरावृत्ती, सुरेख शब्दबद्ध केली आहे! :)

(झोळीतला)चतुरंग

ऋषिकेश's picture

8 Jul 2009 - 11:46 pm | ऋषिकेश

लेकीच्या कवितेइतकेच आईचे भाव आवडले..
फारच सुंदर!

आता कविता लिहू लागला आहात तर येऊ दे अजून असंच मस्त मस्त :)

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

नंदन's picture

9 Jul 2009 - 2:52 am | नंदन

सहमत आहे, दोन्ही कविता आवडल्या.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

राघव's picture

9 Jul 2009 - 12:16 am | राघव

निव्वळ अप्रतीम!

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Jul 2009 - 12:29 am | बिपिन कार्यकर्ते

सुबक ठेंगणीने टाकलेला धागा म्हणून उत्सुकतेने उघडला... खालील ओळी वाचल्या...

मग रात्री तुला गोष्ट सांगताना सैलावत जाणारी
टेडीबेअरभोवतीची तुझी मिठी,
झोपेतला तुझा निष्पाप चेहरा...
हजार स्वप्न बघणारे तुझे मिटलेले डोळे...

... धाग्यातून बाहेर पडलो. अक्षरशः डोळ्यासमोर आलं. असह्य झालं. आत्ता पुढची सगळी कविता वाचली. अगदी सुंदर...

बिपिन कार्यकर्ते

बहुगुणी's picture

9 Jul 2009 - 1:01 am | बहुगुणी

मला माझ्या आयुष्यातल्या, आईसकट सर्वच 'डबल डयूटी' सांभाळणार्‍या अनेक स्त्रिया, डोळ्यासमोर उभ्या राहिल्या, तुमच्या साध्या पण भिडणार्‍या शब्दांचीच ही किमया. आता लिहीत रहा, तुमचं पद्य लिखाणही ताकदीचं आहे.

Nile's picture

9 Jul 2009 - 2:57 am | Nile

तुमच्या साध्या पण भिडणार्‍या शब्दांचीच ही किमया. आता लिहीत रहा, तुमचं पद्य लिखाणही ताकदीचं आहे.

असंच म्हणतो!

खरं तर कविता वगैरे उघडुन पहात नाही, पाहीलंच तर त्यावर (अडाणी) प्रतिक्रीया देत नाही, पण बिका म्हणल्याप्रमाणे नाव पाहुन उघडला! मस्त! येउद्या अजुन. :)

अवलिया's picture

9 Jul 2009 - 9:32 am | अवलिया

वा! सुरेख !!
आवडले :)

--अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

अश्विनि३३७९'s picture

9 Jul 2009 - 11:08 am | अश्विनि३३७९

छान आहे कविता
मला वाट्लं विडंबन असेल
पण या ओळी वाचून डोळे पाणवले

मग रात्री तुला गोष्ट सांगताना सैलावत जाणारी
टेडीबेअरभोवतीची तुझी मिठी,
झोपेतला तुझा निष्पाप चेहरा...
हजार स्वप्न बघणारे तुझे मिटलेले डोळे...
तुझं बोट धरून यायचं होतं गं
तुझ्या स्वप्नांच्या गावाला
पण मिळत नाही त्याच्यासाठी कॅज्युअल!
मग मी नुसतंच तुझ्या डोक्यावर थोपटत राहिले...
तू लवकर मोठी होण्याची वाट बघत!

अश्विनि३३७९'s picture

9 Jul 2009 - 11:09 am | अश्विनि३३७९

छान आहे कविता
मला वाट्लं विडंबन असेल
पण या ओळी वाचून डोळे पाणवले

मग रात्री तुला गोष्ट सांगताना सैलावत जाणारी
टेडीबेअरभोवतीची तुझी मिठी,
झोपेतला तुझा निष्पाप चेहरा...
हजार स्वप्न बघणारे तुझे मिटलेले डोळे...
तुझं बोट धरून यायचं होतं गं
तुझ्या स्वप्नांच्या गावाला
पण मिळत नाही त्याच्यासाठी कॅज्युअल!
मग मी नुसतंच तुझ्या डोक्यावर थोपटत राहिले...
तू लवकर मोठी होण्याची वाट बघत!

शाल्मली's picture

9 Jul 2009 - 12:56 pm | शाल्मली

छान सहजसुंदर कविता!!

--शाल्मली.

सुप्रिया's picture

9 Jul 2009 - 1:50 pm | सुप्रिया

नोकरी करणार्र्या आईच्या मनातले भाव सुरेख उतरवले आहेत.

-----
देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.

लवंगी's picture

9 Jul 2009 - 5:36 pm | लवंगी

लेक आणी आई या दुहेरी नात्याने भिडली कविता मनाला..

ठकू's picture

9 Jul 2009 - 6:12 pm | ठकू

फारच सुंदर आहे.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

क्रान्ति's picture

11 Jul 2009 - 8:31 am | क्रान्ति

देणं अशक्य आहे!
सध्या अक्षरशः जगतेय ही कविता! [फक्त या एका ओळीत किंचित बदल करून
तुझ्या बाळाबद्दल, त्याच्या शाळेबद्दल, याच्या जागी "तुझ्या मैत्रिणींबद्दल, तुझ्या कॉलेजबद्दल, "]
रडवलंस सई!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखारूह की शायरी

विसोबा खेचर's picture

6 Aug 2009 - 11:23 am | विसोबा खेचर

सुरेख...

तात्या.