एका ठिकाणी यज्ञविधी चालू असतो. पुरोहित पूजा सांगत असतात. त्याचवेळी तिथे
अचानक दुसरा एक ब्राह्मण उपस्थित होतो. पूजा सांगता सांगताच पुरोहित त्या ब्राह्मणाला म्हणतो,
अस्य मूर्खस्य यागस्य दक्षिणा महिषीशतम् ।
त्वया अर्धं च मया अर्धं विघ्नं मा कुरु पण्डित ।।
ह्या मूर्खाच्या यज्ञात १०० म्हशी दक्षिणा म्हणून आहेत, तू अर्ध्या घे, मी अर्ध्या घेतो, (पण म्हशी दान केल्याने पुण्य नसते असे सांगून) हे पण्डिता ह्या यज्ञात विघ्न आणू नकोस.
प्रतिक्रिया
15 Feb 2008 - 7:59 pm | प्राजु
सृष्टी.. आपले हे काव्यशास्त्रविनोद बाकी एकदम मस्तच हां...
अजूनही येऊदेत...
एकदम मस्तच..
- (संस्कृतप्रेमी)प्राजु
15 Feb 2008 - 8:19 pm | स्वाती राजेश
पुर्वी सकाळ मध्ये काव्यशास्त्रविनोद वाचले होते. त्याची आठवण झाली.
रोज एक संसक्रुत सुभाषित येते त्यात काही वेळा अशी सुभाषिप येत होती.
इथे तुम्ही लिहायला चालु केलेत चांगले केले आणखी काव्यांची वाट पाहात आहे...
15 Feb 2008 - 9:03 pm | वडापाव
अजून काय लिहू?? शब्दच उरले नाहीत.
आपला नम्र,
वडापाव