टारगेट वयोगटः २ ते ७ वर्षे ( + काहिश्या निरर्थक नादमय कवितेची मजा घेऊ शकणारा इतर कोणत्याहि वयाचा)
इथे झुऽम झुऽम झुऽम ला अर्थ देणारी एखादी हस्तमुद्रा/हावभाव/अंगविक्षेप पालकांनी/शिक्षकांनी करून दाखवणे अपेक्षित आहे.
तसेच शेवटाचे कडवे मुल अगदी लहान असेल व दूध पित नसेल तर या तालात पिऊन टाकते असा अनुभव आल्याने टाकले.. एरवी म्हणताना गाळले तरी चालेल
===========================
विमान झेपावे कसे? झुऽम झुऽम झुऽम
मासा तळी पोहतसे..झुऽम झुऽम झुऽम
घोरण्याने काकांच्या मिशीवरून
माशी बघा पळतसे...झुऽम झुऽम झुऽम
ढेरपोट्या गोट्याच्या पोटावरून
धोतर सुटले कसे...झुऽम झुऽम झुऽम
टाकलेल्या केळ्याच्या सालीवरून
पाय सरकती कसे..झुऽम झुऽम झुऽम
तळ्यामधील कमळांच्या पानावरून
बेडुक पोहति कसे...झुऽम झुऽम झुऽम
बोर्नवीटा घालून ग्लासामधून
बाळ दुध पितो कसे...झुऽम झुऽम झुऽम
-ऋषिकेश
प्रतिक्रिया
12 Jun 2009 - 6:45 pm | अवलिया
हे हे लुशी लुशी काका!
अज्युन लिही नं चान चान !!!
=D> =D> =D>
(गेल्या कित्येक दशकांपासुन वय वर्षे २ ) अवलिया
12 Jun 2009 - 7:06 pm | चतुरंग
मस्तच गजल रे ऋषि! :)
(अवांतर - आधी 'टारगट वयोगट: २ ते ७' असं वाचलं! ;) )
(टारगट)चतुरंग
13 Jun 2009 - 1:39 am | मस्त कलंदर
मलाही ते टारगटच वाटलं होतं आधी.. ;)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
12 Jun 2009 - 7:40 pm | संदीप चित्रे
आधीच लहान मुलांसाठी काही लिहिणं अवघड... त्यात गझल... :)
मजा आली.
12 Jun 2009 - 7:45 pm | धनंजय
मजा आली.
12 Jun 2009 - 7:45 pm | जृंभणश्वान
मस्त आहे :)
12 Jun 2009 - 8:54 pm | लिखाळ
मजा आली :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
13 Jun 2009 - 12:01 am | प्राजु
खूप छान आहे.
लुशी मामाची गझल ऐकल्यावर
सगळे नाचती कसे झुऽऽम झुऽऽम झुऽऽम!!!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Jun 2009 - 6:33 am | चित्रा
छान गीत.
15 Jun 2009 - 9:12 am | विसोबा खेचर
धमाल आली रे ऋष्या! :)
(बोर्नव्हिटा प्रेमी) तात्या.
15 Jun 2009 - 9:19 am | मिसळभोक्ता
बालगीत चांगले आहे. गझलेचे सर्वच नियम धिक्कारल्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी बालगझल म्हणता येणार नाही.
-- मिसळभोक्ता
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)
15 Jun 2009 - 9:22 am | सहज
बालगीत आवडले.