सौभाग्य

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
5 Jun 2009 - 9:27 pm

खोड्या करून इतके दुर्दैव हासलेले
पण गप्प राहण्याचे मी वचन पाळलेले

हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या
गजर्‍यास काय ठाउक केसांत माळलेल्या
कोठेतरी कुणावर खंजीर चाललेले...

सनई नि चौघड्यांनी आहेत कान किटले
दिसतेस तू तरी मी डोळे कधीच मिटले
हृदयात आसवांचे मग सूर लागलेले...

जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने
या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?
होते कधी तुला मी सर्वस्व वाहिलेले...

मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले...

चिमटीत मावणारे सौभाग्य घे तुला तू
विसरून जा मला अन् कर मोकळे मला तू
झोळीत घाल माझ्या अस्तित्त्व फाटलेले...

कविताप्रकटनप्रतिभा

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

5 Jun 2009 - 9:43 pm | स्वाती दिनेश

चिमटीत मावणारे सौभाग्य घे तुला तू
आवडले.
स्वाती

हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या
गजर्‍यास काय ठाउक केसांत माळलेल्या
कोठेतरी कुणावर खंजीर चाललेले...

मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले...

हे विशेष!

चतुरंग

क्रान्ति's picture

5 Jun 2009 - 9:56 pm | क्रान्ति

जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने
या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?

केवळ अद्वितिय शब्दरचना!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

एक's picture

5 Jun 2009 - 10:03 pm | एक

सुंदर कविता! अप्रतिम!

श्रावण मोडक's picture

5 Jun 2009 - 10:05 pm | श्रावण मोडक

बऱ्याच जागा आवडलेल्या आहेत. चांगली रचना.
(अवांतर - या रचनेत इतरही काही संदेश आहेत का?)

पिवळा डांबिस's picture

5 Jun 2009 - 11:13 pm | पिवळा डांबिस

मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले...
क्या बात है! जियो!!!
फक्त जरासं एकच सजेशन...
हृदयात आसवांचे मग सूर लागलेले...
या ऐवजी,
हृदयात आसवांचे मग पूर दाटलेले...
हे कसं वाटतंय?
चूभूद्याघ्या..
-पिडांकाका

श्रावण मोडक's picture

5 Jun 2009 - 11:33 pm | श्रावण मोडक

काय सुचवणी आहे. सलाम.
मूळ रचनेतील सूर अगदी योग्य जागी आहे. म्हणजे सनई-चौघड्यांनी कान किटले आहेत. डोळे मिटले असल्याने स्वाभाविकच हृदयातून आसवे गळताहेत. आंसू ओघळतानाही एक सूर असतो मनात. तो सूरच आता मनाचे सांत्वन करतोय. आणि पूर - विटलेले कान, मिटलेले डोळे अशा वेळी निवण्यासाठी हृदयातूनच आसवांचे पूर वाहिले पाहिजेत.
बेला, पिडां - हे माझं आकलन. पण तुम्हा दोघांनाही सलाम. कारण सूर आणि पूर दोन्ही समर्पक बसतात (असं मला वाटतं हे म्हटलंच पाहिजे का?)

बेसनलाडू's picture

6 Jun 2009 - 12:07 am | बेसनलाडू

सनई चौघडे, अश्रू आणि सूर यांचा परस्परसंबंध मोडकसाहेबांनी अचूक ओळखलाय. मलाही तोच अपेक्षित असल्याने आसवांचे पूर न होता सूर झाले/होणारच होते. मोडकसाहेबांना १०/१० ;)
(परीक्षक)बेसनलाडू
पिडाकाकांनी सुचवलेला बदल स्वतंत्रपणे योग्य असला तरी इतर दोन ओळींच्या संदर्भात चपखल बसत नाही, असे वाटते आहे.
(स्वतंत्र)बेसनलाडू

धनंजय's picture

6 Jun 2009 - 12:11 am | धनंजय

बदल मला आवडला.

घाटावरचे भट's picture

6 Jun 2009 - 12:09 am | घाटावरचे भट

त्याचा संबंध वरच्या सनई चौघड्यांच्या सुरांशी असल्याने तसे तर्कसंगत वाटते. 'आसवांचे पूर' मेंदूच्या उजव्या भागाला पटले, डाव्या भागाला नाही.

प्राजु's picture

5 Jun 2009 - 11:21 pm | प्राजु

जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने
या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?
होते कधी तुला मी सर्वस्व वाहिलेले...

सुप्पर्ब!!!
अप्रतिम शब्दरचना! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jun 2009 - 11:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवितेत मोठा आशय असल्याचा भास होतो, पण रचना तशी सो-सोच वाटली.

और भी आने दो !

-दिलीप बिरुटे

धनंजय's picture

5 Jun 2009 - 11:50 pm | धनंजय

कुंकवाची देवाण आणि घेवाण करणार्‍या दोघांबद्दल वाईट वाटले.

लिखाळ's picture

6 Jun 2009 - 1:04 am | लिखाळ

>>या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?<<
वाहवा.. कविता आवडली.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

मदनबाण's picture

6 Jun 2009 - 5:03 am | मदनबाण

कविता आवडली... :)

मदनबाण.....

Love is a game that two can play and both win.
Eva Gabor

केशवसुमार's picture

6 Jun 2009 - 8:30 am | केशवसुमार

बेलाशेठ,
ब-याच दिवसानी अगमन केलेत.
(आनंदी)केशवसुमार..
एकदम खणखणित कविता..अभिनंदन!!
(वाचक)केशवसुमार

चन्द्रशेखर गोखले's picture

6 Jun 2009 - 9:57 am | चन्द्रशेखर गोखले

अप्रतिम काव्य !!

नितिन थत्ते's picture

6 Jun 2009 - 10:55 am | नितिन थत्ते

भारी कविता.

खराटा
(रंग माझा वेगळा)

दत्ता काळे's picture

6 Jun 2009 - 11:03 am | दत्ता काळे

मेलो हजार मरणे, तरिही जगून होतो
समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो
होमात आज माझे आयुष्य पेटलेले...

समिधा म्हणून काही स्मरणे रचून होतो . . . .जबरदस्त.

राघव's picture

8 Jun 2009 - 11:19 am | राघव

भिडणारी कविता.. सगळीच कविता/गीत आवडले! छान लिहिलेत!!

बाकी -
हातांस काय ठावे मेंदीत रंगलेल्या
कोठेतरी कुणावर खंजीर चाललेले...

- या ओळी आधी वाचलेल्या आहेत. प्राजुतैने कविता पूर्ण करा असा धागा टाकला होता, त्यात या दोन ओळी तुम्ही लिहिलेल्या आहेत!! तेव्हाच वाटले होते काय मस्त गझल होईल या ओळी घेऊन!

http://www.misalpav.com/node/7018#comment-106916

(स्मरणशील) राघव :)
( आधीचे नाव - मुमुक्षु )

मराठमोळा's picture

8 Jun 2009 - 11:27 am | मराठमोळा

अप्रतिम काव्य.
खुपच सुंदर.. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

ऋषिकेश's picture

8 Jun 2009 - 1:32 pm | ऋषिकेश

लै भारी बेला!
जोरदार पुनरागमन :)

जपलेत घाव इतके - जणु मूल्यवान रत्ने
या अक्षता म्हणू की फुटकी बिलोर स्वप्ने?

हे अगदी विषेश
अजून येऊ द्या.

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे