तुझी आठवण येता, निळा डोह फ़ेसाळतो
पापण्याच्या तीरावर, भरतीचा पूर येतो..
क्षण निसटले जणू, मूठीतून जावी रेती
शिंपलीत नयनांच्या, भिजूनिया गेला मोती
गाज हृदयाची खोल, स्पंदनात तुझी सय
विरहाच्या लाटा उंच, वादळाचे मला भय
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
अस्ताचलास रे गेला, माझ्या आकांक्षेचा रवी
धूसरला चंद्र माझा, काळोखास बोल लावी
दूर दूर क्षितिजाला, भेटण्याची आस व्यर्थ
आठवांस अर्पिते मी, आसवांचे शंख तीर्थ
- प्राजु
प्रतिक्रिया
3 Jun 2009 - 10:31 pm | अवलिया
वा! मस्त !!
हे खास आवडले :)
--अवलिया
3 Jun 2009 - 10:35 pm | अनामिक
सुंदर कविता. सगळ्याच ओळी आवडल्या.
हेच का ते शंखतीर्थ?
-अनामिक
10 Jun 2009 - 8:19 am | विसोबा खेचर
अनामिकराव,
अत्यंत समर्पक आणि सुरेख चित्र आहे!
जियो बॉस..!
आपला,
(कलाप्रेमी) तात्या.
3 Jun 2009 - 10:39 pm | लिखाळ
वा ! शंखतीर्थ चांगले आहे. मस्त !
फार छान.
फक्त पहिल्याच वाक्यातले 'फेसाळला निळा डोह' खटकले. डोह फेसाळला हे काही पटले नाही.
डोह शांत आणि खोल असतो. तो डहुळतो.
डोहाकाठी भरपूर साबण वापरुन कुणी रिक्षा किंवा कपडे धुतल्याशिवाय तो फेसाळणे मुष्कील वाटते. ह्.घ्या. :)
फेसाळला हा शब्द तेथे काय हेतूने आहे?
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
3 Jun 2009 - 10:58 pm | शाल्मली
सुंदर कविता !
खूपच आवडली.
हे विशेष आवडले. :)
--शाल्मली.
3 Jun 2009 - 11:22 pm | क्रान्ति
दूर दूर क्षितिजाला, भेटण्याची आस व्यर्थ
आठवांस अर्पिते मी, आसवांचे शंख तीर्थ
खास!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
3 Jun 2009 - 11:35 pm | चंद्रशेखर महामुनी
प्राजु......
किति सुंदर कविता केलिस ग.......!
खुप आवड्ली कविता..
शेवट.. लाजवाब..!
3 Jun 2009 - 11:48 pm | राघव
आवडले :)
राघव
3 Jun 2009 - 11:50 pm | बिपिन कार्यकर्ते
खासच आहे कविता. एकापेक्षा एक कडवी...
बिपिन कार्यकर्ते
3 Jun 2009 - 11:53 pm | ऋषिकेश
सुंदर कविता.. सागरा संबंधी विविध उपमा खूप आवडल्या
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
4 Jun 2009 - 12:35 am | पोलिसकाका_जयहिन्द
लाजवाब..!!!!!
"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."
My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
10 Jun 2009 - 7:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर कविता....!
10 Jun 2009 - 8:18 am | विसोबा खेचर
ओळन् ओळ सुंदर.
सुरेख कविता!
तात्या.