मराठी माणसाचा तारणहार कोण?

घोडीवाले वैद्य's picture
घोडीवाले वैद्य in जनातलं, मनातलं
31 May 2009 - 7:23 pm

राजकारणात सद्‌हेतूने येणारांची संख्या आता घटलीये. किंबहुना या लोकांना आता राजकारणात स्थानच राहिलेले नाही. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हा राजकारणाचा नियम झालाय. एक विचार घेऊन आम्ही राजकारणात येतो, जनतेच्या उद्धार हेच आमचे कर्तव्य आहे, असे आश्‍वासक शब्द वापरून राजकारणात स्थिर स्थावर व्हायचे आणि नंतर वाट्टेल तशी भूमिका बदलून लोकांनी टाकलेल्या विश्‍वासाला हरताळ फासायचा. हे थोड्या बहुत फरकाने प्रत्येक राजकीय पक्षालाच लागू आहे. त्यात कॉंग्रेस हा तर व्यवहारवादीच पक्ष आहे. तरीही सामान्य जनांमध्ये हाच पक्ष लोकप्रिय आहे. त्याची कारणे आर्थिक व्यवहारांशीच निगडीत आहे. परंतु भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे पक्ष काही वेगळ्या विचारांचे प्रतिनिधित्व करीत आहेत, असे वाटत होते. परंतु हे पक्षही संधीसाधू झाले आहे. शिवसेना हा तर मराठी माणसाच्या एकजुटीवर उभा राहिलेला पक्ष आहे. या पक्षाच्या प्रमुखांनी मात्र या शक्तीचा गैरवापर केला. सत्तेच्या राजकारणासाठी अनेक तडजोडी केल्या. सत्ता मिळविली; पण मराठी माणसाचे काय झाले, असा प्रश्‍न विचारल्यास किंवा सद्य स्थितीचे अवलोकन केल्यास "मराठी' उपऱ्याचेच जिणे जगतो आहे. आता तर खरा कोण? मी का तू? यावरच भांडणे सुरू आहेत.
या भांडणावरही वर्तमानपत्रातून चर्चा होते आहे. त्यातून काय निष्पन्न होणार देव जाणे... वाचा
http://beta.esakal.com/2009/05/27103828/features-current-affairs-about.html

http://beta.esakal.com/2009/05/29100539/features-current-affairs-about.html

राजकारणविचार

प्रतिक्रिया

विकि's picture

31 May 2009 - 7:34 pm | विकि

तारणहार एकच भारताचा कम्युनिस्ट पक्ष(मार्क्सिस्ट) . ज्याने मराठी माणसाच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रतिनिधीत्व केले .

पाषाणभेद's picture

31 May 2009 - 8:36 pm | पाषाणभेद

मराठी माणसाचे मरण झाले. अहो सरकारात आपली लॉबीच नाही. जे आहेत ते सगळे मुगगीळे, तडजोड करणारे. तत्वांशी भांडणारे राहीलेच नाहीत. परत सांगतो, यांना सत्तेची उब पाहीजे फक्त. बाकी काही नको. सत्ता आपल्या नंतर घरात कोणाकडे तरी राहीली पाहिजे, बास.
राज ठाकरेंमुळे काहीतरी हातात आले आहे म्हणावे तर ते काय हे काळच ठरवेल. नाहीतर महाराष्ट्राची मुंबई होईल. (आता मुंबईचे काय झाले ते विचारू नका.)

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

यन्ना _रास्कला's picture

31 May 2009 - 8:51 pm | यन्ना _रास्कला

माहीत नाय पन इन्टरनेटावर मराठी भाश्येच तारनहाय फकस्त आपल तात्याजी उरफ इसोबा खेचर. मिसलपावाच्या रुपान त्यानी मराठी भाश्येला नवी सजीवनी दिली =D>

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

चिरोटा's picture

1 Jun 2009 - 9:47 am | चिरोटा

मराठी माणूस म्हणजे केवळ शिवसेना/मनसे/भाकप का? राजकिय पक्षांशिवाय मराठी माणसाला अस्तिवच नाही का?लोकसंख्येने उत्तर प्रदेशच्या खालोखाल आणि क्षेत्रफळात देशात तिसर्‍या असणार्‍या राज्यातले लोक खरोखरच एवढे असहाय्य झाले आहेत का?
लोकसंख्येने जवळपास अर्ध्या असलेल्या शेजारच्याच कर्नाटकात इकडे 'कन्नड माणुस मागे/कन्नड माणसावर अन्याय' असली वाक्ये कधीच ऐकु येत नाहीत.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

Nile's picture

1 Jun 2009 - 9:55 am | Nile

असली वाक्य सगळीकडे ऐकू येतात. 'पिंक चड्डी' इतकही जुनं नाही झालं अजुन.

पण तारणहार लागतोयच कशाला लोकांना कुणास ठावुक?

प्रशु's picture

1 Jun 2009 - 11:11 am | प्रशु

|| तुझ्या ऱक्षणा तुच रे सिद्ध होई.||
|| सदा संकटि देव धाऊन येई. ||