मुंबईचा पावणा

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
30 May 2009 - 1:49 am

मुंबईचा पावणा फ़सला
बाई मला
प्रणयाचा डोंगळा डसला

डोंगळा फ़िरतोय भुक्केला
फ़िरूफ़िरूनी जीव शिणला
शरम टांगली वेशीला
मला प्रणयाचा डोंगळा डसला

बांकेबिहारी नक्को गं बाई
मुरली शर्मा नक्को गं बाई
मग कोण मनामधि घुसला?
मुंबईचा पावणा फ़सला

३० मे २००९, पुणे

कलासंगीतविचार

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

30 May 2009 - 2:00 am | चतुरंग

ही कविता मात्र सहज समजली! (किंवा निदान तसं वाटतंय मला!)

(पावणा)चतुरंग

प्राजु's picture

30 May 2009 - 2:45 am | प्राजु

इतकी साधी कविता!!!!!
तुमचीच आहे ना?? सहज समजली म्हणून विचारलं. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनंता's picture

30 May 2009 - 4:29 pm | अनंता

मला तरी ही कविता रुपकात्मक वाटली. शब्द जरी वरकरणी साधेसोपे वाटले तरी अर्थान्वय काही वेगळेच सांगतो आहे!!
शरद पवार यांना मराठी माणूस या एकमेव मुद्यावर, शिवसेनाप्रमुखांनी पंतप्रधानपदासाठी दिलेल्या पाठींबा व त्यामुळे कवयित्रीची झालेली तगमग पहिल्या दोन कडव्यात व्यक्त होते. शेवटच्या कडव्यात राज ठाकरे यांना कोपरखळ्या मारल्यात असे मानायला वाव आहे!!

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

रेवती's picture

30 May 2009 - 3:27 am | रेवती

शरदिनीताई,
एक प्रश्न, गैरसमज करून घेउ नका.
अशी कविता लिहिताना आपल्याला अवघडल्यासारखे वाटले नाही का?
सहसा आपण असं काही लिहित नाही.

रेवती

शरदिनी's picture

30 May 2009 - 7:28 am | शरदिनी

कवीची सुद्धा एक इमेज तयार होते आणि त्यात तो अडकून राहतो आणि तेच तेच लिहीत राहतो....
तसे माझे होत होते म्हणून ही संपूर्ण वेगळी लावणी लिहायचा प्रयत्न केला इतकेच...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2009 - 11:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणि कवीची इमेज वगैरे हेही आवडले !

अवांतर : लावणी जर ग्रामीण ढंगात आहे तर, 'प्रणय' शद्बाला पर्यायी त्याच ढंगातला शब्द लै भारी राह्यला असता नै ?

-दिलीप बिरुटे
(लावण्याचा वेडा रसिक)

llपुण्याचे पेशवेll's picture

30 May 2009 - 11:27 am | llपुण्याचे पेशवेll

प्रणय शब्दाला त्याच ढंगातला ग्रामीण शब्द कोणता?

(शहरी)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

बिपिन कार्यकर्ते's picture

30 May 2009 - 11:32 am | बिपिन कार्यकर्ते

ज्वानी.

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

30 May 2009 - 11:43 am | श्रावण मोडक

तारूण्य = ज्वानी. प्रणय = ?

बिपिन कार्यकर्ते's picture

30 May 2009 - 11:44 am | बिपिन कार्यकर्ते

शिणगार?

पण ते वृत्तात नाही बसत बहुतेक.

बिपिन कार्यकर्ते

श्रावण मोडक's picture

30 May 2009 - 11:50 am | श्रावण मोडक

जवळचा शब्द. पण शृंगार म्हणजे प्रणय होईलच असं नाही शहरामध्ये. गावाकडं खपून जाईल. कारण तिथली माणसं सरळ. करण्याला महत्त्व, वर्णनाला नाही. बाकी वृत्तबित्त जाऊदे यार. शिणगार म्हटलं की कसं गार वाटतं ते महत्त्वाचं.

विनायक प्रभू's picture

30 Sep 2009 - 4:02 pm | विनायक प्रभू

शिण आणि नंतर गार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2009 - 11:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रणय ला सरळ 'प्रेम' चांगले होते, पण त्या 'प्रणयाचा डोंगळा' मुळे 'प्रणय चाळे' असे डोकावले.
त्यामुळे जरा गोचीच झाली ! :(

नेमके याच कवयित्रीच्या कवितेबद्दल आपल्याला हे असे प्रश्न का पडतात कोणास ठाऊक ? सरळ 'लै भारी' अशी प्रतिक्रिया टाकून आपल्याला पुढे कधी जाता येईल कोणास ठाऊक !

-दिलीप बिरुटे

श्रावण मोडक's picture

30 May 2009 - 12:01 pm | श्रावण मोडक

नेमके याच कवयित्रीच्या कवितेबद्दल आपल्याला हे असे प्रश्न का पडतात कोणास ठाऊक ? सरळ 'लै भारी' म्हणून आपल्याला पुढे कधी जाता येईल कोणास ठाऊक !
असे प्रश्न पडतात हे या कवीचे यश आहे. प्रश्न न पडता पुढे जाऊ तेव्हा आपण त्यांच्या बाजूला (जी आत्ताच आपल्याला गूढतेमुळे गंडवतीये) जाऊन बसलेले असू गुर्जी. पटेल?

दिपाली पाटिल's picture

30 Sep 2009 - 11:51 am | दिपाली पाटिल

प्र का टा आ...

धमाल मुलगा's picture

27 May 2010 - 7:39 pm | धमाल मुलगा

प्रतिसादाची तारीख पहा, ०५/३०/२००९.
मोडक हा माणुस द्रष्टाच खरा. ;)

Nile's picture

28 May 2010 - 1:04 am | Nile

असे प्रश्न पडतात हे या कवीचे यश आहे... (जी आत्ताच आपल्याला गूढतेमुळे गंडवतीये)

मोडकांना फक्त द्र्ष्टे म्हणल्याबद्दल धम्याचा निषेध! (तरीच याला नाठाळ पुतण्या म्हणतात बरं का ते) ;)

-Nile

श्रावण मोडक's picture

28 May 2010 - 1:30 am | श्रावण मोडक

जी म्हणजे बाजू. या कवीची ही गूढ बाजू आपल्याला गंडवतीये, असं मला म्हणायचं होतं.
इतक्या दिवसांनंतर या स्पष्टीकरणाची संधी दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे.

धमाल मुलगा's picture

28 May 2010 - 1:35 pm | धमाल मुलगा

आता आलं का लक्षात मोडकांनी स्वत: सांगितल्यावर? :P

-(नाठाळ पुतण्या) कवट्या महाकाळ.

सुबक ठेंगणी's picture

30 Sep 2009 - 4:19 am | सुबक ठेंगणी

प्रणय्=इश्क?
नाहीतरी इश्काची इंगळी डसली असं आहेच ;)
शरदिनीताई कविता मस्त ;)

गोगोल's picture

30 Sep 2009 - 10:19 am | गोगोल

..

अनंता's picture

30 May 2009 - 4:42 pm | अनंता

इश्क / इष्क

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

विसोबा खेचर's picture

30 May 2009 - 4:31 am | विसोबा खेचर

शरम टांगली वेशीला
मला प्रणयाचा डोंगळा डसला

शाब्बास..! :)

तात्या.

अवलिया's picture

30 May 2009 - 6:07 am | अवलिया

शब्द किंवा अक्षरे उलटेपालटे करायला विसरलेल्या दिसतायेत शरदिनीताई ! :?

--अवलिया

भडकमकर मास्तर's picture

30 May 2009 - 7:01 am | भडकमकर मास्तर

लोकसभेच्या निवडणूक निकालांवर आधारित काहीतरी वाटतंय...
मुम्बईतच मुम्बईचा पावणा फसला ...
वावा..
छान...

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 May 2010 - 7:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुम्हाला कसं एकदम वेगळंच विवेचन सुचतं हो मास्तर?

अदिती

चन्द्रशेखर गोखले's picture

30 May 2009 - 8:42 am | चन्द्रशेखर गोखले

हे काही बरोबर नाही... आमच्या प्रांतात घुसु नका आमचा भाव खाली येइल ..

श्रावण मोडक's picture

30 May 2009 - 8:45 am | श्रावण मोडक

पावणा फसला, प्रतिमेच्या चौकटीत कवीबी फसला आणि समजणारी लावणी लिहू लागला. :)

क्रान्ति's picture

30 May 2009 - 9:13 am | क्रान्ति

लावणी.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

अजुन लिहा.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

दशानन's picture

30 May 2009 - 10:43 am | दशानन

लै भारी !

गुड वन !

थोडेसं नवीन !

जागु's picture

30 May 2009 - 11:41 am | जागु

राजकारण !

दिपक's picture

30 May 2009 - 11:47 am | दिपक

झ्याक झाली बघा लावणी. :)

जयवी's picture

30 May 2009 - 3:10 pm | जयवी

ए मस्तच गं......:)

धनंजय's picture

30 May 2009 - 5:26 pm | धनंजय

'इष्काची इंगळी डसली' च्या चालीत राजकीय मतप्रदर्शन.
चालू द्या.

परिकथेतील राजकुमार's picture

30 May 2009 - 5:32 pm | परिकथेतील राजकुमार

ह्यात काही नाममात्र फेरबदल करुन 'डोंगळा डोंगळा मी हो लाज सोडली, तुही होना निर्लज्ज, येना माझ्या घरी' अशा प्रकारचे एखादे फर्मास गीत रचता येईल.

परा खरे
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

गोगोल's picture

30 Sep 2009 - 10:31 am | गोगोल

(चाल मुन्गळा मुन्गळा)

हो ओ ओ ओ डोंगळा डोंगळा
मी हो लाज सोडली
(इथे ग्लासावर टक टक टक आवाज)
आता येतोस माझ्या घरी की येऊ मी तुझ्या घरी?

मीनल's picture

30 May 2009 - 7:16 pm | मीनल

तुमच्या आधीच्या सर्वाधिक कविता संपूर्णपणे समजल्या नाहीत किंवा थोड्या समजल्या नाहीत. त्यामुळे आम्हा वाचकांना तुमच्या प्रत्येक कवितेत अर्थ शोधायची सवय झाली आहे.
ती प्रतिमा तुम्ही पुसायचा प्रयत्न केला. तो उत्तम आहे.
ही कविता समजली. त्यात ते राजकारण असेल मला वाटले नाही. पण इथे `प्रणय` हा शब्द मलाही खटकला.
कदाचित आपल्या इमेज मुळे असेल. आपल्या इतर कविता अश्या प्रणयाच्या नाहीत. म्हणून तसे असेल.
पण लेखानात वैविध्य हे असायलाच हवे. नाहीतर ते मोनोटोनस होते.

आपल्या लेखनावर ते न समजल्यामुळे टींगल/ चेष्टा करणारे प्रतिसाद असतिल. त्याची कारण काय? लेखन कठिण किंवा वाचकाचा कमकुवतपणा सर्वाधिक वाचकांना ते लेखन, त्यामागचा अर्थ समजत नाहीत. त्यातील मेसेज पोचत नाही.ते सर्व कमकुवत आहेत असे अजिबात नाही हे आपल्याला माहितच आहेत.
मल वाटते की इथे जे लेखन प्रकाशित केले जाते ते वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी. पण ते पोचत नसतील तर त्याची किंमत कमी होणार नाही. पण कळले तर त्याची किंमत नक्की वाढेल.
आपले पुढले लेखन आम्हाला कळायला/समजायला हवेत म्हणजे ते आम्ही अधिक एंन्जॉय करू शकू.
प्रतिसादात कौतुक करणारे शब्द ही आहेत. त्याची तुम्ही नोंद घेतलली दिसते आहे.
पण ज्या कविता समजत नाहीत त्यांचे थोडेफार तरी अर्थ उलगडून सांगणे जरूरीचे आहे असे मला वाटते. शब्द न शब्द सांगितला तर त्यातील मजा जाईल. पण वाचाकांच्या प्रतिसादावरून त्यांना कितपत समजले आहे, ते चूक की बरोबर याचा खुलासा करावा ही कळकळेची विनंती आहे.
एकदा वाचून सोडून देणारे वाचक असतील.पण त्यातला अर्थ शोधणारे भटकत राहतात.
त्यांना ढोबळ तरी मार्ग दाखवायला हवा अस मला वाटत.

मीनल

मीनल.

दिपाली पाटिल's picture

30 Sep 2009 - 12:36 am | दिपाली पाटिल

अशीच एक मर्‍हाटी लावणी आहे नं?? की हे कुठल्या गाण्याचं विडंबन आहे...

दिपाली :)

विदेश's picture

30 Sep 2009 - 5:48 pm | विदेश

थोडीशी भर तुमच्या परवानगीने-

मुंबईचा पावणा फ़सला
बाई मला
प्रणयाचा डोंगळा डसला

मुंबईचा पावणा फसला ग,
बाई मला
पिरतीचा डोंगळा डसला ग-