मनासारखे

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
26 May 2009 - 9:13 am

हसू खुलू दे मनासारखे
जरा घडू दे मनासारखे

तुझी दिठी केसांत माळुनी
मला सजू दे मनासारखे

मुठीत बांधू नको कळीला
तिला फुलू दे मनासारखे

खुळे तुझ्या स्वप्नात जागते,
मना करू दे मनासारखे

दंवात न्हाते पहाट ओली,
धुके झरू दे मनासारखे

सुरांसवे माझ्या काव्याचे
दुवे जुळू दे मनासारखे

पसायदानी मागे ज्ञाना,
जनां मिळू दे मनासारखे

गझलप्रकटनविचार

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

26 May 2009 - 9:29 am | विसोबा खेचर

सु रे ख क वि ता..!

अन्य शब्द नाहीत!

आपला,
(मनासारखा) तात्या.

सायली पानसे's picture

26 May 2009 - 11:43 am | सायली पानसे

+१

विशाल कुलकर्णी's picture

26 May 2009 - 11:47 am | विशाल कुलकर्णी

असेच म्हणतो. छानच आहे कविता. :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
"प्रतिसाद पाहुनी मी झालो पसार नाही, मी कोडगा कवी जो विझण्या तयार नाही?
गेले अनेक वाचक सांगून रोज मजला, पण बंद लेखणी मी करण्या तयार नाही!"

(सौजन्य : माननीय मिपाकर श्री श्री श्री केशवसुमारजी )

ऋषिकेश's picture

26 May 2009 - 10:19 am | ऋषिकेश

छान! कविता आवडली

(मानsick)ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

चन्द्रशेखर गोखले's picture

26 May 2009 - 11:27 am | चन्द्रशेखर गोखले

मुठीत बांधू नको कळीला
तिला फुलू दे मनासारखे -अप्रतिम !!

मनाला निखळ आनंद देणारी कविता !

पर्नल नेने मराठे's picture

26 May 2009 - 11:31 am | पर्नल नेने मराठे

कविता छान!
मना करू दे मनासारखे असे आम्हाला कधी मिळ्णार मनासारखे वागायला कोण जाणे :S

चुचु

मनीषा's picture

26 May 2009 - 11:39 am | मनीषा

सुरेख कविता आहे ...

तुझी दिठी केसांत माळुनी
मला सजू दे मनासारखे ........... खूपच छान

मुठीत बांधू नको कळीला
तिला फुलू दे मनासारखे
... सुंदर

मराठमोळा's picture

26 May 2009 - 12:00 pm | मराठमोळा

गझल आवडली... :)
सुंदर..सुरेख आहे.
तुमचा कवितासंग्रह असाच वाढत राहो व आम्हा रसिकांचा त्याचा आनंद मिळत राहो ही सदिच्छा!!!!

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

परिकथेतील राजकुमार's picture

26 May 2009 - 12:19 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त कविता. एकदम खास मुड बनवुन गेली.

आपल्या मनाचा राजा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

हर्षद आनंदी's picture

26 May 2009 - 12:33 pm | हर्षद आनंदी

दंवात न्हाते पहाट ओली,
धुके झरू दे मनासारखे

सुरांसवे माझ्या काव्याचे
दुवे जुळू दे मनासारखे

पसायदानी मागे ज्ञाना,
जनां मिळू दे मनासारखे

सुरेख शब्द्प्रयोग.... मनासारखे

जयवी's picture

26 May 2009 - 1:09 pm | जयवी

सही गझल जानेमन :)

कळी आणि पसायदानाचा शेर खूपच आवडला.

जागु's picture

26 May 2009 - 2:10 pm | जागु

वा. खुप छान.

प्राजु's picture

26 May 2009 - 9:20 pm | प्राजु

अप्रतिम!!!!
खूप आवडली. इतकी की पुन्हा पुन्हा वाचावी वाटली. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनामिक's picture

26 May 2009 - 10:20 pm | अनामिक

सुंदर कविता.

-अनामिक

लवंगी's picture

27 May 2009 - 6:23 am | लवंगी

कविता आवडली.

अवलिया's picture

27 May 2009 - 6:32 am | अवलिया

वा! मस्त !!

--अवलिया

दत्ता काळे's picture

27 May 2009 - 10:52 am | दत्ता काळे

कविता आवडली.