मौन तुझे

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
23 May 2009 - 7:03 am

बोल एकदा काहितरी रे
मौन तुझे घायाळ करी रे

कातर हळवी सांज गातसे
तरल विराणी दर्दभरी रे

श्रावणातही तळमळते मी
झेलुनिया अलवार सरी रे

जाणवते ती तुझी असोशी
इथे दाटतो श्वास उरी रे

देहच उरतो माझ्यापाशी
मन घुटमळते तुझ्या घरी रे

अंतरण्याने अंतर वाढे
मिटव दुरावा हा जहरी रे

पंचप्राण ज्यांच्यात गुंतले
छेड पुन्हा त्या स्वरलहरी रे

गझलप्रकटनविचार

प्रतिक्रिया

चन्द्रशेखर गोखले's picture

23 May 2009 - 8:19 am | चन्द्रशेखर गोखले

हळुवार हुरहुर जगवणारे गीत !!

अरुण वडुलेकर's picture

23 May 2009 - 2:04 pm | अरुण वडुलेकर

जणू काही ही एक विराणीच.

श्रावणातही तळमळते मी
झेलुनिया अलवार सरी रे

फार आवडले.

सँडी's picture

23 May 2009 - 3:02 pm | सँडी

पंचप्राण ज्यांच्यात गुंतले
छेड पुन्हा त्या स्वरलहरी रे

मस्तच! :)

राघव's picture

23 May 2009 - 6:50 pm | राघव

अतिशय सुंदर!
क्रांतीताई,
तुमच्या कविता/गझल तशाही छान लयीत असतात!
ही कविता तर स्वत:च नाद लेवून आलेली आहे.. खूप छान!!
शुभेच्छा! :)

राघव

मदनबाण's picture

23 May 2009 - 8:51 pm | मदनबाण

पंचप्राण ज्यांच्यात गुंतले
छेड पुन्हा त्या स्वरलहरी रे

सुंदर... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

पाषाणभेद's picture

23 May 2009 - 11:00 pm | पाषाणभेद

छानच कविता आहे.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)