सुट्टी

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
20 May 2009 - 8:10 am

" जरा लवकर घरी या "बायको. बेळगावला जाताना इतर टेन कमांडमेंट मधली एक.
मैत्रीणीने वयाच्या ४४ वर्षी पी.एच्.डी मिळवली होती. त्याचा सत्कार समारंभ होता निपाणीला.
नेमका मी त्यादिवशी जरा जास्तच व्यस्त होतो. त्यामुळे सर्व कमांड्मेंट्स फोन वरुनच झाल्या.
१. वॉशींग मशिन चालु करु नका.
२.कपडे वापरले की बकेट मधे टाका.
३. मी नाही म्हणुन उगाच उंडारत बसु नका.
४. ओपनर फ्रिझवर ठेवलेला आहे.
५. एक दिवसाचे करुन ठेवले आहे जेवण. एक दिवस जावेकडे जेवा. पैसे हॉटेलात खर्च करु नका.
६. शक्यतो किचन मधे जाउ नका. गेलात तर गॅस बंद करायला विसरु नका.
७. झाडाला पाणी घाला.
८. कचरा तुम्ही काढू नका.
९.तीन दिवसात येते. गावभर मी बाहेर गेले आहे हे सागत बसु नका.
१०.पाठ खाजवायला ब्रश आणला आहे.
अशा रितीने आम्हा दोघांची ३ दिवसाची सुट्टी सुरु झाली.
१ ल्या दिवशी चिरंजीव सेमिस्टर संपल्याची पार्टी करुन जरा उशीराच घरी आले. ओल्या पार्टीला तो थांबत नाही.
जेवता जेवता म्हणाला, " बाबा, आज 'गॉड फादर' बघितला. मस्त पिक्चर".
मी १+ सहमत म्हणालो.
" तु पिक्चर बघत नाहीस हल्ली" चिरंजीव
"नाही रे आवडत" मी
" तुझे ऑलटाइम फेवरीट कुठले" चिरंजीव
" नाही आवडायचे तुला" मी
" सांग तर" चिरंजीव
" तसे खुप आहेत. पण डोक्यात कोरलेले म्हणशील तर ३ च. १. चलती का नाम गाडी २. गाईड ३. कागज के फुल
सि.डी आण चांगल्या प्रतीच्या आणि बघ.
" कागज के फुल अगदी तुझ्या वेळी पण जुनाच होता ना?" चिरंजीव
"हो. आउट डेटेड. पण तु बघ आणि मला सांग" मी
"आणि मराठी मधे"? चिरंजीव
"पिंजरा आणि सामना" ते पण बघ.
३ दिवसात हे ३ सिनेमा बघुन झाले.
खुप आवडले त्याला.
भरभरुन बोलला ह्या सिनेमाबद्दल.
चलती का नाम गाडी मधील मधुबाला आणि किशोर कुमार चा सीन. गाणे चालु असताना गाडीच्या आड पदर झटकते ओला आणि परत घेते अंगावर .
"किती मस्त, अजिबात वल्गर वाटला नाही" चिरंजीव
" गाईड मधे देवानंद कडुन अभिनय करुन घेणारा विजय आनंद तर ग्रेटच. बॅक टू बॅक गाण्याला आता कुणीही हात लावणार नाही. (मोसे छल -क्या से क्या)
"कागज के फुल मधील शॅडो प्ले कॅमेरा अँगल तर एकदम अमेझिंग, हे टेक्निक परत कुठेही बघितले नाही."
आता पिंजरा आणि सामना बद्दल काय म्हणतो ते बघायचे आहे. पण नक्की आवडणार ह्यात शंका नाही.
जाता जाता: 'गॉड फादर' मधले दोन गंमतदार सीन सांग असे विचारले मी त्याला. तो म्हणाला,
१. सुरुवातीच्या लग्न समारंभातील सीन- सॉनीची बायको दोन हाताच्या पंजामधील आकार वाढवत नेते आणि नंतर प्रार्थना (क्रॉस) करते सॉनीच्या मैत्रीणीच्या नावाने.
२. सॉनीची ऑर्डर- ही डझनॉट कम आउट विथ ओनली डी* इन हिज हँड
चिप ऑफ द ओल्ड ब्लॉक सर्टनली

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

दशानन's picture

20 May 2009 - 9:16 am | दशानन

३. मी नाही म्हणुन उगाच उंडारत बसु नका.
६. शक्यतो किचन मधे जाउ नका. गेलात तर गॅस बंद करायला विसरु नका.
८. कचरा तुम्ही काढू नका.
९.तीन दिवसात येते. गावभर मी बाहेर गेले आहे हे सागत बसु नका.

ह्या सुचना वाचल्यावर तुमच्या तीचा (आमच्या काकूंचा ) तुमच्यावर असलेला (अ)विश्वास प्रकटपणे दिसून आला =))

थोडेसं नवीन !

सँडी's picture

20 May 2009 - 9:33 am | सँडी

=))

ओपनर फ्रिझवर ठेवलेला आहे.
वा!वा! हे मस्तच!

बाकरवडी's picture

20 May 2009 - 9:17 am | बाकरवडी

१०.पाठ खाजवायला ब्रश आणला आहे.

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

:B :B :B बाकरवडी :B :B :B

सहज's picture

20 May 2009 - 9:20 am | सहज

सुटी एन्जॉय केलीत तर!

विसोबा खेचर's picture

20 May 2009 - 9:46 am | विसोबा खेचर

१०.पाठ खाजवायला ब्रश आणला आहे.

हे लै भारी! :)

बाय द वे, मी ब्रशने नाही, कंगव्याने पाठ खाजवतो. अतीव सुख मिळतं! :)

तात्या.

यन्ना _रास्कला's picture

20 May 2009 - 1:46 pm | यन्ना _रास्कला

बाय द वे, मी ब्रशने नाही, कंगव्याने पाठ खाजवतो. अतीव सुख मिळतं!

कोनाची पाट खाजवल्यान अटिव सुख मिलत त्ये पन सांगा कि वाईच. ;)

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*

हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

विनायक प्रभू's picture

20 May 2009 - 10:04 am | विनायक प्रभू

जानव्याची मजा ब्रश मधे नाय बॉ

श्रीयुत संतोष जोशी's picture

20 May 2009 - 3:44 pm | श्रीयुत संतोष जोशी

अगदी बरोब्बर

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

परिकथेतील राजकुमार's picture

20 May 2009 - 12:27 pm | परिकथेतील राजकुमार

खी खी खी
१० कमांडमेंटस भारीच.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

निखिल देशपांडे's picture

20 May 2009 - 5:05 pm | निखिल देशपांडे

१० कमांडमेंटस भारीच.
असेच म्हणतो....

==निखिल

अवलिया's picture

20 May 2009 - 1:39 pm | अवलिया

हम्म :)

--अवलिया

गूढ अर्थ (नेहमीप्रमाणेच ;) ) नाही कळाला!!

फुकटात वजन कमी करायचा सल्ला हवाय तुम्हाला? - चालते व्हा!!

धमाल मुलगा's picture

20 May 2009 - 2:45 pm | धमाल मुलगा

आता मास्तरांना सगळ्या गोष्टी हातात मिळायची सवय झालेली. काकू घरी नाहीत म्हणल्यावर स्वावलंबन क्रमप्राप्त आहे. त्यामुळे कावले असावेत. आणि एकटेपण आहेच :D

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

आनंदयात्री's picture

20 May 2009 - 4:31 pm | आनंदयात्री

>>काकू घरी नाहीत म्हणल्यावर स्वावलंबन क्रमप्राप्त आहे. त्यामुळे कावले असावेत. आणि एकटेपण आहेच

खी खी खी ... ;)

-
(परावलंबी) आंद्या

विनायक प्रभू's picture

21 May 2009 - 7:12 am | विनायक प्रभू

अनंतकोटी ब्रम्हांड नायक राम राम गोविंदा न गोविंदा
गो विं दा.

प्रशु's picture

20 May 2009 - 4:09 pm | प्रशु

. एक दिवसाचे करुन ठेवले आहे जेवण. एक दिवस जावेकडे जेवा. पैसे हॉटेलात खर्च करु नका.
.तीन दिवसात येते. गावभर मी बाहेर गेले आहे हे सागत बसु नका.

एकदम हिट.............

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 May 2009 - 4:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

९.तीन दिवसात येते. गावभर मी बाहेर गेले आहे हे सागत बसु नका.

तीन दिवसांनी फोन करते घरी, तुम्ही घरी नसताना! ;-)

(काड्याघालू) अदिती

प्रमोद देव's picture

20 May 2009 - 7:04 pm | प्रमोद देव

तीन दिवसात येते. गावभर मी बाहेर गेले आहे हे सागत बसु नका.

ह्याचा अर्थ काय 'सांगा'असा होतो? ;)
इतके स्पष्टपणे सांगितल्यावरही तुम्ही नेमके उलट वागताय!
काकुंना कळले तर तुमची काय धडगत नाय आता!!! :)

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

रामदास's picture

20 May 2009 - 7:43 pm | रामदास

लिहीलेला लेख आवडला.शब्दन् शब्द कळला.

संदीप चित्रे's picture

20 May 2009 - 9:33 pm | संदीप चित्रे

तीनपेक्षा जास्त वर्षं झाली की कमांडमेंट जवळपास सारख्याच असतात असं दिसतंय :)

क्रान्ति's picture

20 May 2009 - 10:32 pm | क्रान्ति

[काकूंच्या १० कमांडमेंटस सह ]
चिरंजीवासोबत आपले आवडते चित्रपट पहाण्यात सुट्टी घालवली आणि आपले आवडते चित्रपट त्यालाही आवडले, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. ते सगळेच चित्रपट तेवढ्या ताकदीचे आहेतच मुळी!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

बारकाईने सांगितल्याशिवाय त्याला समजणार नाही आणि आपल्या माघारी तो नक्कीच काहीतरी घोळ घालणार; ह्याचा इतका पक्का आत्मविश्वास सार्वत्रिक असावा ह्याची फारच मौज वाटली! :)
(अवांतर : सिनेमे बघून मुलाबरोबर सुट्टी घालवणे हे बाकी झकास केलेत, कोणतेही काम केले नाही म्हणजे घोळ व्हायचा प्रश्नच येत नाही! ;) )

चतुरंग

वेदनयन's picture

21 May 2009 - 6:37 am | वेदनयन

मला वाटली तुमची. पण अपेक्षाभंग झाला. असू देत.

हा लेख त्यातल्या त्यात बराच आशावादी. नाहितर अजुन एक झाड बघायला/वाचायला/छळायला मिळाले असते. वाचलो.

---

मुक्तसुनीत's picture

21 May 2009 - 7:54 am | मुक्तसुनीत

टेकाडे भौजी यांची सुतिका - सॉरी - श्रुतिका अम्मळ मजेशीर ! ;-)

अबोल's picture

21 May 2009 - 8:22 pm | अबोल

सुखी आहात कारण तुम्हाला अश्या कमांडमेंट मिळतात ,कारण मला मिळाल्या असत्या तर बायकोच्या कमांडमेंट (तिच्या गेरहजेरीत )मोडल्याचे सुख व चिरंजीव आपल्याशी कुठ्ल्यातरी विषयावर चर्चा करतात हे सुख.

सुबक ठेंगणी's picture

22 May 2009 - 5:45 am | सुबक ठेंगणी

तरी बरं...

एका दिवसाचे जेवण केले आहे...बाकीचे दिवस हॉटेलात खर्च न करता मिसळपावावर काढा

असं नाही सांगितलं! आणि मग तुम्ही आ़ज्ञाधारकपणे टपरीवरच्या मिसळपावावर दिवस काढल्यावर..."अहो मला मिसळ्पाव.कॉम म्हणायचं होतं " असा दम नाही दिला हे कित्ती बरं! ;)
पण दहा कमांडमेंट्स्ची कल्पनाच खूप सही आहे! आपापल्या 'कुवती'नुसार कल्पकतेलाही किती वाव आहे! ;)