सुट्टी
लेखनप्रकार
" जरा लवकर घरी या "बायको. बेळगावला जाताना इतर टेन कमांडमेंट मधली एक.
मैत्रीणीने वयाच्या ४४ वर्षी पी.एच्.डी मिळवली होती. त्याचा सत्कार समारंभ होता निपाणीला.
नेमका मी त्यादिवशी जरा जास्तच व्यस्त होतो. त्यामुळे सर्व कमांड्मेंट्स फोन वरुनच झाल्या.
१. वॉशींग मशिन चालु करु नका.
२.कपडे वापरले की बकेट मधे टाका.
३. मी नाही म्हणुन उगाच उंडारत बसु नका.
४. ओपनर फ्रिझवर ठेवलेला आहे.
५. एक दिवसाचे करुन ठेवले आहे जेवण. एक दिवस जावेकडे जेवा. पैसे हॉटेलात खर्च करु नका.
६. शक्यतो किचन मधे जाउ नका. गेलात तर गॅस बंद करायला विसरु नका.
७. झाडाला पाणी घाला.
८. कचरा तुम्ही काढू नका.
९.तीन दिवसात येते. गावभर मी बाहेर गेले आहे हे सागत बसु नका.
१०.पाठ खाजवायला ब्रश आणला आहे.
अशा रितीने आम्हा दोघांची ३ दिवसाची सुट्टी सुरु झाली.
१ ल्या दिवशी चिरंजीव सेमिस्टर संपल्याची पार्टी करुन जरा उशीराच घरी आले. ओल्या पार्टीला तो थांबत नाही.
जेवता जेवता म्हणाला, " बाबा, आज 'गॉड फादर' बघितला. मस्त पिक्चर".
मी १+ सहमत म्हणालो.
" तु पिक्चर बघत नाहीस हल्ली" चिरंजीव
"नाही रे आवडत" मी
" तुझे ऑलटाइम फेवरीट कुठले" चिरंजीव
" नाही आवडायचे तुला" मी
" सांग तर" चिरंजीव
" तसे खुप आहेत. पण डोक्यात कोरलेले म्हणशील तर ३ च. १. चलती का नाम गाडी २. गाईड ३. कागज के फुल
सि.डी आण चांगल्या प्रतीच्या आणि बघ.
" कागज के फुल अगदी तुझ्या वेळी पण जुनाच होता ना?" चिरंजीव
"हो. आउट डेटेड. पण तु बघ आणि मला सांग" मी
"आणि मराठी मधे"? चिरंजीव
"पिंजरा आणि सामना" ते पण बघ.
३ दिवसात हे ३ सिनेमा बघुन झाले.
खुप आवडले त्याला.
भरभरुन बोलला ह्या सिनेमाबद्दल.
चलती का नाम गाडी मधील मधुबाला आणि किशोर कुमार चा सीन. गाणे चालु असताना गाडीच्या आड पदर झटकते ओला आणि परत घेते अंगावर .
"किती मस्त, अजिबात वल्गर वाटला नाही" चिरंजीव
" गाईड मधे देवानंद कडुन अभिनय करुन घेणारा विजय आनंद तर ग्रेटच. बॅक टू बॅक गाण्याला आता कुणीही हात लावणार नाही. (मोसे छल -क्या से क्या)
"कागज के फुल मधील शॅडो प्ले कॅमेरा अँगल तर एकदम अमेझिंग, हे टेक्निक परत कुठेही बघितले नाही."
आता पिंजरा आणि सामना बद्दल काय म्हणतो ते बघायचे आहे. पण नक्की आवडणार ह्यात शंका नाही.
जाता जाता: 'गॉड फादर' मधले दोन गंमतदार सीन सांग असे विचारले मी त्याला. तो म्हणाला,
१. सुरुवातीच्या लग्न समारंभातील सीन- सॉनीची बायको दोन हाताच्या पंजामधील आकार वाढवत नेते आणि नंतर प्रार्थना (क्रॉस) करते सॉनीच्या मैत्रीणीच्या नावाने.
२. सॉनीची ऑर्डर- ही डझनॉट कम आउट विथ ओनली डी* इन हिज हँड
चिप ऑफ द ओल्ड ब्लॉक सर्टनली
वाचन
6005
प्रतिक्रिया
0