एका आय सी यू तली आठवण

शरदिनी's picture
शरदिनी in जे न देखे रवी...
18 May 2009 - 1:29 am

कळिकाळाच्या हिंदोळ्यावर
मीपण जळले रुसले तुटले

अद्वैताच्या पुण्याईशी
ललाटरेषा जुंपून घेते

पुन्हा विखारी तल्लख अडसर
अर्थव्यथेचे फ़ासे फ़सले

प्राणपाखरू उडता उडता
काय राहिले, कोणी न उरले

१७ मे २००९, पुणे
________________________________________

एका गरीब रुग्णाच्या कुटुंबाला मोठ्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक ताकद नसल्याने कठीण परिस्थितीतून जावे लागले, तो प्रसंग पाहिल्यानंतर त्या आठवणीत लिहिलेली ही कविता आहे..... यापेक्षा अधिक स्पष्टीकरण देणे मला अशक्य आहे....
... माझ्या या आधी लिहिलेल्या इतर कवितांप्रमाणेच या कवितेतूनही इथला सूज्ञ वाचक करमणूक किंवा डोकेदुखी शोधेल याची खात्री आहे. ... असो... जो जे वांछील तो ते लाभो, इतकेच म्हणते...

मुक्तकसाहित्यिकप्रकटन

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

18 May 2009 - 1:36 am | बिपिन कार्यकर्ते

शीर्षकात आयसीयू असल्यामुळे असेल पण ही कविता समजली आणि म्हणूनच छान वाटली.

बा.आ.क.का.का.क.ना.हे.कि.वे.सां.

बिपिन कार्यकर्ते

चांगली आहे.

ब्रिटिश टिंग्या's picture

18 May 2009 - 2:47 am | ब्रिटिश टिंग्या

असेच म्हणतो!

चांगली आहे!

कवितेचे स्पष्टीकरण दिल्याने समजण्यास अडचण आली नाही!

अवलिया's picture

18 May 2009 - 7:09 am | अवलिया

हेच बोल्तो

चांगली आहे

--अवलिया

प्राजु's picture

18 May 2009 - 2:47 am | प्राजु

शब्दवैचित्र्य असलं तरी.. खालच्या संदर्भामुळे कविता समजली.

एका गरीब रुग्णाच्या कुटुंबाला मोठ्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक ताकद नसल्याने कठीण परिस्थितीतून जावे लागले

या संदर्भासाठी खालची ओळ अतिशय समर्पक वाटली.

पुन्हा विखारी तल्लख अडसर
अर्थव्यथेचे फ़ासे फ़सले

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

18 May 2009 - 6:49 am | सहज

तुमच्या कवितांचे एक वेगळेच ग्लॅमर आहे. :-)

मुख्य म्हणजे तुम्ही वाचकांशी संवाद साधता हे फार्फार आवडले.

अजुन येउ दे.

तुमच्या आतल्या प्रेरणेचा प्रामाणिकपणा हरवायला नको.

विषय विषण्ण करणारा आहे, पण हे प्रकटीकरण तुमचे म्हणून पटले नाही. शैली सुबोध करण्याच्या भीतीपोटी जी तडजोड केलेली आहे, त्यातून "कवयित्रीचे आपले म्हणणे" असा प्रामाणिकपणा हरवला आहे.

(हे म्हणजे "सोडले तर धावते, धरले तर चावते", असे कवयित्रीला वाटेल. पण असे वाटू नये. मी शरदिनी यांच्या कवितेचा "दुर्बोध" असा अवगुण आधीही म्हटलेला नाही. कविता सुबोध-दुर्गम कशीही असू शकते. पण मन पूर्णपणे न पटता कवयित्रीने स्वतःच्या भावनेशी आणि शैलीशी तडजोड केली असेल, तर ती या कवितेत खोट आहे, असे मी म्हणेन.)

तुमच्या कविता कुशल आणि मनस्वी मानून मी वाचतो. पुढील कवितांसाठी माझ्या शुभेच्छा आणि प्रोत्साहन.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 May 2009 - 12:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत.

धनंजय यांनी योग्य शब्दांत माझ्याच भावना मांडल्या आहेत का काय असं वाटलं. भडकमकर मास्तरांनी सोदाहरण ते स्पष्टही केलं आहेच.

शरदिनी ताई, तुमच्या कविता कळायला वेळ लागत असला तरी तेच त्यांचं बलस्थान आहे; प्रामाणिक प्रगटीकरण सोडून तुम्ही लोकाग्रहास्तव सुगम कविता लिहिता हे काही पटलं नाही.

अदिती

भडकमकर मास्तर's picture

18 May 2009 - 8:25 am | भडकमकर मास्तर

सॉरी पण शैली बदलायचा प्रयत्नम( तेही लोकानुनय करण्यासाठी ) अजिबात आवडला नाही...
नवनवीन अर्थ सापडायच्या सार्‍या शक्यता मावळल्या...
....तुम्हाला पटेल तेच लिहा...

आणि खाली अजिबात स्पष्टीकरण लिहू नका.

हा काय शाळेचा वर्ग आहे ?

उद्या कठीण शब्दांचे अर्थ लिहाल...

अवांतर : इतकं सोपं लिहायला लागलात तर तुम्ही ( "एक ढेमसं झेलू बाई दोन ढेमसं झेलू" टायपातल्या )निसर्गकविता लिहायला लागणार अशी एक भीती वाटते....

अतिअवांतर : ढेमसं या फळभाजीचे ढेमसं हे अनेकवचन मानलं तर एकवचन काय ? ढेम्बूस?

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

परिकथेतील राजकुमार's picture

18 May 2009 - 12:07 pm | परिकथेतील राजकुमार

मास्तरांशी सहमत !
हि कविता वाचली आणी गवत खाणारा सिंह डोळ्यासमोर आला.
काहि फुटकळ आणी दिडदमडीच्या टिकाकारांपायी आपण आपली डुर्रदार शैली सोडुन ही असली 'बालगीते' लिहु लागलेला पाहुन माझ्या सारख्या अभ्यासु चाहत्याची प्रचंड निराशा झाली.
कवी सतिश ह्यांच्या बरोबरीने नवकवित्व निर्माणाची ध्यास असलेल्या कवयत्री म्हणुन तुमच्याकडे आम्ही आदराने बघतो ह्याची तरी जाण ठेवावी.

पर्र परा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

नितिन थत्ते's picture

18 May 2009 - 12:20 pm | नितिन थत्ते

ढेमसं हे एकवचन असावं. अनेकवचन ढेमशी असावं.
१ ढेमसं आणलं. खूप ढेमशी आणली.

(शुद्धलेखनाच्या बैलाला **) खराटा
खराटा
(रंग माझा वेगळा)

भडकमकर मास्तर's picture

18 May 2009 - 2:45 pm | भडकमकर मास्तर

हे छान आहे... एक ढेमसं अनेक ढेमशी..
धन्यवाद...
_______________

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

यशोधरा's picture

18 May 2009 - 12:11 pm | यशोधरा

आवडली ही कविता.

लिखाळ's picture

18 May 2009 - 2:27 pm | लिखाळ

कविता फरशी आवडली नाही. यात शब्दवैचित्र्य कमी पडले.
तुम्ही लिहिलेली तळटीप हे स्पष्टीकरण नसून 'अधीक माहिती' किंवा भूमिका आहे असे मला वाटले.
पण कवितेमागची भूमीका सांगीतलीत त्यामुळे कविता पुन्हा वाचून समजून घ्यावीशी वाटली.

माझ्या या आधी लिहिलेल्या इतर कवितांप्रमाणेच या कवितेतूनही इथला सूज्ञ वाचक करमणूक किंवा डोकेदुखी शोधेल याची खात्री आहे. ...

हे वाक्य खुल्यादिलाने लिहिले आहे असे वाटले नाही. असो !
पुलेशु.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)