माझी मद्रास ची सफर- भाग २

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
15 May 2009 - 12:11 am

मंडळी, पहिल्या भागाच्या भरभरून प्रतिसादाबद्द्ल शतशः धन्यवाद... लिहिंण्यापूर्वी साशंक होते पण आता मात्र हुरूप आलाय... मला दोन-तीन वर्षांपूर्वीचे ऑर्कुट्वरच्या नव्या नवलाईचे दिवस आठवले.. तेव्हा नवीन खरड आलीय का जितक्या उत्सुक्तेने दर तासाला तपासायचे..तसंच आता ईथे नवा प्रतिसादाच्या बाबतीत होतेय.. :D

असो.. एक-दोन दिवसांत आमची एकमेकांशी चांगलीच ओळख झाली... नि आधी सांगितल्याप्रमाणे, मी आणि एक गुज्जुभाई सोडला तर सारेच दक्षिणी होते.
आता आधी या प्रशिक्षणाबद्दल थोडंसं... ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये ते आयोजित केले जाते, त्यांनी जर एक वर्षभर आधी त्यबद्दलचा अर्ज केला.. तर AICTE आणि ISTE या दोन संस्थांकडून अर्थसहाय्य मिळतं.. म्हणजे उमेदवारांना येण्या-जाण्याचा रेल्वेचा द्वितीय वर्गाचा खर्च आणि त्यांचा राहण्या-जेवण्याचा खर्चाचा भार ते उचलतात.. अशा काही प्रशिक्षण शिबिरांना उपस्थिती लावल्याशिवाय महाविद्यालयीन शिक्षकांना पदोन्नतीही मिळत नाही.. त्यामुळे अशी प्रशिक्षणे म्हणजे दुसर्याच्या खर्चाने १५ दिवसांची सहल आणि वर बढती अशीच सर्वसाधारण मनोवृत्ती असते.. अर्थात त्यालाही अपवाद आहेत...पण ते अपवादात्मकच!!!... नि जर समजा, जर एक वर्ष आधी अर्ज नाही केला, तर त्या संस्थेस कार्यक्रमाची फक्त मंजूरी मिळते.. पण खर्च त्यांचा त्यांनाच करावा लागतो.. विशेषतः स्त्रिया, ज्यांना १५ दिवसांसाठी घर सोडून जाणे शक्य नसते.. त्या अशा प्रशिक्षण शिबिरांत स्वखर्चाने (जास्त नाही.. रूपये २५००/- मात्र) जातात.. पहिल्या प्रकारच्या कार्यक्रमांकडे गंभीरतेने पाहिले जात नाही... नुसता टाईमपास... मी एकदा जाऊन पस्तावले होते.. विद्यार्थ्यांना त्यांच्या गैरवर्तनाबद्दल रागावणारे शिक्षकच तसे वागत होते.. तो अनुभव पुन्हा कधीतरी नक्कीच.. मला मात्र मुंबईपासून दूर कुठेतरी जायचे होते आणि असं नावापुरतं प्रशिक्षण पण नको होतं... हैद्राबादचे अध्यापक विद्यालय आणि आय आय टी मद्रास इथेच अशी शिबिरं होतात ही पक्की माहिती मिळाली.. ईतर आय आय टी मध्ये अशी शिबिरं होत नाहीत.. फक्त दूरस्थ शिक्षण मिळते...

आय आय टी चे शिबिर AICTE व ISTE पुरस्कृत होतं. मी यापूर्वी लांबचा प्रवास केलाय; दुसरा वर्ग, दोन टियर, तीन टियर अशा सगळ्या वर्गांतून. पण एकटं जाण्याचा प्रसंग कधीच नाही आला... त्यातच मेरी त्वचा से मेरी उमर का पता ही नहीं चलता :) , त्यामुळे स्त्रिदाक्षिण्य म्हणून येणारे पुढचे प्रिय-अप्रिय प्रसंग टाळण्यासाठी म्हणून आणि पूर्वानुभवावरून यावर्गात भोचकपणा आणि काळजी यामध्ये जरा तारतम्य असते म्हणून पण, दोन टियर वातानुकुलीत डबा हा माझा पर्याय होता.. नि माझ्या तमाम हितचिंतक वर्गाचा विमान.. मी तरीही आगगाडीचे आरक्षण केले.. जे मी जाईपर्यंत कन्फर्म झाले नाही... पण जर मी द्वितीय वर्गाचे केले असते, तर जाईपावेतो नक्की झाले असते... आता हे नमनाला घडाभर तेल कशाला खर्च केले ते सांगते...
तिथे गेल्याच्या दिवशीच प्रवासखर्च मिळवण्यासाठीचे अर्ज भरावयाचे होते... मी विमानाने आले म्हट्ल्यावर लोकांनी डोक्याला हात लावणे फक्त बाकी होते.. त्यांच्या मते.. हा दोष माझ्या मुंबईकर असण्याचा होता.. मुंबईचे लोक कशावरही वायफळ खर्च करतात..(आणखी एक मुंबईकरांबद्दल गैरसमज!) नि बाँबे गर्ल त्याला कशी काय अपवाद असणार? जर का मी त्यांच्यासारखे भारताच्या इतर कोणत्याही कानाकोपर्‍यातून आले असते, तर मला रेल्वेचे ति़कीट मिळले असते.. नि नसते मिळाले, तर विमानाने न येता दुसर्‍या प्रकारातल्या शिबिरास जाऊ शकले असते.. त्या लोकांचा येण्या-जाण्याचा जास्तीत जास्त खर्च ६००/- हून अधिक नव्हता.. नि माझे येण्याजाण्याचे मिळून ६०००/- अधिक गेले होते.

त्यावेळचा त्यांचा प्रश्नः " हाउ डु यू पीपल स्टे इन्न बाँबे?? देअर कॉस्ट ऑफ लिव्हिंग इज सो हाय!!! दॅट्स व्हाय यू आर यूज्ड टू स्पेंड टू मच ऑन अननेसेसरी थिंग्ज. एव्हरीडे यू हॅव बाँब ब्लास्ट्स!!!" मला आठवले.. मी जेव्हा जम्मू-काश्मीर मध्ये रहणार्‍या एका मुलीला पहिल्या भेटीत असाच काहीसा प्रश्न विचारला होता!!!! :)

आमचा साधारण दिनक्रम असा होता.. सकाळी ८:०० ते ८:३० गप्पाटप्पा करत न्याहारी, ९:०० वाजता वर्ग चालू होत असे.. मेसपासून ते ठिकाण चंगलेच दूर होते...प्रशिक्षकांनी उशीर खपवून घेतला जाणार नाही अशी तंबी दिली नि नंतर अशा लोकांना समजही दिली.. हे मात्र सहल समजून आलेल्या लोकांना जड गेले... १:३० ते २:१० दुपारचे जेवण.. नंतर ५;०० वाजेपर्यंत पुन्हा शिबिर... आम्ही बर्‍याचदा तेथूनच थेट बाहेर फिरायला जात असू... ८:३० ला मेस बंद होई नि मुख्य प्रवेशद्वारापासूनची विजेरीवरची बस बहुधा ९:१५ ला असे... ९:३० ते रात्री १२:३०-१:०० पर्यंत प्रयोगशाळेत दिलेला अभ्यास किंवा वेगवेगळ्या तांत्रिक विषयावरती चर्चा चालत... आम्ही त्यासाठी अतिथीगॄहात त्यासाठी एक खोली मागितली होती.. पण ती काही मिळाली नाही.. आणि जंटलमन/लेडीज एकमेकांच्या खोलीत जाण्याचा प्रश्नच नव्हता :D त्यामुळे एतक्या दूरवर जावे लागे... आय आय टीत हॉटेल होते.."बसेरा". बंद कधी व्हायचे ठाऊक नाही.. कारण आमचा प्रयोगशाळेनंतरचा पुढचा अड्डा तो असे... सगळे पदार्थ १०-१५-२० च्या रेंजमधले.. त्यामुळे चवही तशीच.. पण दंगामस्तीत वेळ कसा निघून जायचा कळत नसे.. रोज कोणीतरी एक्जण सर्वांचे बिल देई.. असे २:०० वाजेपर्यंत आपापल्या खोल्यांत परतत असू... यात साहजिकच सहलवाले नसायचेच...

अतांत्रिक चर्चा चालु झाल्या... की सगळेजण यंडुगुंडु करायला लागत.. मी त्यांना कॉमन भाषा असे कानीकपाळी ओरडून थकले..करण मी मुलुखाची बडबडी.. अन त्यात जर हे लोक असे बोलायला लागले की नुसतं त्यांच्या तोंडाकडे टुकुटुकु पाहत बसावे लागे... असेच एकदा रात्री बसेरामध्ये बसलो असता.. पुन्हा एकदा तेच चालू झाले.. यावेळी काही प्रतिक्रिया न देता मी गप्प बसले.. आणि अचानक "व्हाय य्यू नार्थ इंडियन्स आर आल्वेज अग्गेन्स्ट साऊथ इंडियन्स"??? असा तोफगोळा आला... मी अगदी तीन तास!!! मी??? नॉर्थ इंडियन??? कधीपासून??? कुणी केलं????? का म्हणून??? गुज्जुभाई काही बोलला नाही.. पण मी परोपरीने प्रयत्न केला.. मी नाही हो उत्तरभारतीय म्हणून.. पण कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.. मला हिंदी बोलता येते... या फक्त एकाच गोष्टीमुळे माझं झोपडं उत्तरभारतात गेलं होतं... यावेळेपर्यंत मला हिंदी तमिळ वादाबद्दल काही माहीत नव्हते..तसेही आम्ही सारे अभियांत्रिकी महाविद्यायातील व्याख्याते/प्राध्यापक असल्याने आंग्ल भाषेतूनच संवाद चालायचा... एकाने याला तोंड फोडायला प्रयत्न केला.. पण इतरजण गप्प करत होते.. म्हटलं.. बोलू द्या त्यांना... नि इतका वेळ खद्खदणारा प्रश्न विचारला, "हिंदी बद्द्ल इतकी अढी का??" तेव्हा त्यांनी सांगितले.. ही हिंदी राष्ट्र्भाषा होण्याआधी तमिळ राष्ट्र्भाषा व्हावी म्हणून प्रयत्न चालू होते.. त्यासाठी त्यांनी आंदोलनही केले.. तेव्हा हिंदी विरूध्द तमिळ आंदोलनावरच्या गोळीबारात ४१ तमिळ आंदोलक ठार झाले... तेव्हापासून तमाम तमिळजनता हिंदीला शत्रू समजते...
मी म्हटलं, की झालं ते वाईटच झालं.. पण म्हणून तमिळ राष्ट्र्भाषा असावी हा दुराग्रह नाही का?? देशात जास्तीत जास्त ठिकाणी हिंदी बोलली जाते... जर का तुम्हांला हिंदी कळत असेल.. तर गुजराथी, थोडीफार बंगाली, जराशी पंजाबी पण कळतात.. याउलट, तमिळ तर शेजारच्या राज्यातल्या मल्लूला पण कळत नाही... त्यामुळे हिंदीच यासाठी योग्य आहे..

यावर एका संगणक शास्त्रात एम. टेक. केलेल्या, एका महाविद्यालयात संगणक विभागात विभागप्रमुख असलेल्या मनुष्याचा युक्तिवाद: "भारतात सर्वाधिक ठिकाणी व सर्वाधिक वेळा आढळणारा पक्षी कावळा आहे... पण म्हणून काही तुम्ही कावळ्याला राष्ट्रपक्षी करणार का?" =))
हे ऐकून मी तिथे बाँबे गर्लची नि परिणामी मुंबईची बदनामी नको म्हणूनच फक्त गडबडा लोळले नाही.. अहो.. जर शिकल्यासवरल्या लोकांची ही कथा.. तर इतर लोकांबद्दल बोलायलाच नको... याला सरकारही अपवाद नाहीच... सरकारी पाट्या स्थानिक, हिंदी नि आंग्ल भाषेत असाव्या म्हणून दिल्ली दरबारी नियम आहे... पण म्हणून तो पाळला जातोच असे काही नाही.. बर्‍याचशा पाट्या हिंदी म्हणून वाचायचा प्रयत्न केला.. आपल्याकडे बोलीभाषा दर दह कोसांवर बदलते म्हणतात.. इथे एका दहा कोसांत हिंदीची लिपी बदलते... हिंदी सदृश काहीही हिंदीच्या नावावर खपवले जाते.. हिंदी हवी ना... घ्या मारली तुमच्या डोंबलावर!!!!
वानगीदाखल हे पहा... नि तमिळ हिंदी वाचण्याचा प्रयत्न करा...

संस्कृतीविचारप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

Nile's picture

15 May 2009 - 12:50 am | Nile

"भारतात सर्वाधिक ठिकाणी व सर्वाधिक वेळा आढळणारा पक्षी कावळा आहे... पण म्हणून काही तुम्ही कावळ्याला राष्ट्रपक्षी करणार का?" Rolling On The Floor

ROFL!!! लई भारी! =)) =)) =))

समिधा's picture

15 May 2009 - 12:54 am | समिधा

"भारतात सर्वाधिक ठिकाणी व सर्वाधिक वेळा आढळणारा पक्षी कावळा आहे... पण म्हणून काही तुम्ही कावळ्याला राष्ट्रपक्षी करणार का?"
हे खरचं खुपच मजेशिर आहे. =))

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

प्राजु's picture

15 May 2009 - 12:59 am | प्राजु

हाहाहा
वाचताना मजा येते आहे.
मस्तच!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

15 May 2009 - 1:39 am | बिपिन कार्यकर्ते

खरंच, वाचताना मजा येत आहे. तमिळनाडूमधे हिंदीसाठी एक वेगळाच फाँट शोधून काढला आहे. जितका म्हणून कुरूप करता येईल तितका केला आहे. पण आपण बरंच काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून.

बिपिन कार्यकर्ते

सँडी's picture

15 May 2009 - 6:49 am | सँडी

...की सगळेजण यंडुगुंडु करायला लागत.. मी त्यांना कॉमन भाषा असे कानीकपाळी ओरडून थकले.
असेच अनुभव येथील 'तेलगु' भाषिकांचे! सरळ मराठीत बोलायला सुरुवात करायची अशा वेळी. मजा येते...आजकाल सगळे तेंग्लिश कींवा इंदी बोलतात. ;)

-संदीप.
काय'द्याच बोला.

सहज's picture

15 May 2009 - 7:29 am | सहज

पाटी अफलातून आहे.

प्रमोद देव's picture

15 May 2009 - 8:54 am | प्रमोद देव

पाटी अफलातून आहे.

मी मद्रासला गेलो होतो तेव्हा अशा तर्‍हेचेही हिंदी नव्हते. फक्त तमिळ आणि इंग्लीश.
त्यामानाने ही नक्कीच सुधारणा आहे म्हणायचं. ;)

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

यशोधरा's picture

15 May 2009 - 9:05 am | यशोधरा

भारी बोर्ड! त्या तमिळ हिंदीमधलं फक्त 'कंम्प्युटरी कृत आरक्षण ' (बहुधा हेच शब्द असावेत! :O ) एवढेच शब्द कळाले. तमिळ लोक भाषेच्या बाबतीत कडवे असतात अगदी.

चतुरंग's picture

15 May 2009 - 9:31 am | चतुरंग

एकदम खतरा अनुभव आहेत! सांगताय सुद्धा छानच एकदम ओघवत्या भाषेत, उगाच डामडौल नाही! आवडलं मनापासून.

ती पाटी जबरा आहे 'कंप्यूटरीकृत यात्री आरक्षण केंद्र' एवढेच शब्द लागले, बाकीचे काय ते एमजी आरच जाणे! ;)

चतुरंग

मस्त कलंदर's picture

15 May 2009 - 9:36 am | मस्त कलंदर

तरी म्हटलं अजून कुणी अक्षरे लावण्याचा प्रयत्न का नाही करत आहे?

शेवटचा शब्द आहे... तिरूमलायै.. (स्थानकाचे नाव)

मस्त कलंदर..

हे जीवन सुंदर आहे..

अभिरत भिरभि-या's picture

15 May 2009 - 11:53 am | अभिरत भिरभि-या

"भारतात सर्वाधिक ठिकाणी व सर्वाधिक वेळा आढळणारा पक्षी कावळा आहे... पण म्हणून काही तुम्ही कावळ्याला राष्ट्रपक्षी करणार का?"

घ्या हसून मद्राश्यांच्या आडमुठेपणावर !
पण लक्षात घ्या याच गुणामुळे त्यांची भाषा मद्रास आणि तामिळणाडू मध्ये घट्ट टिकून आहे. ब्रह्मदेवाचा बापही तिला हलवू शकत नाही.
आणि परधार्जिण्या मराठ्यांच्या शहरांतून/राज्यातून त्यांची भाषा हळूहळू पण निश्चितपणे हद्दपार होते आहे.
बाकी चालू द्या हिंदीचा उदोउदो ..
(मद्राश्यांचा भाषाप्रेमाचा चाहता) अभिरत

मस्त कलंदर's picture

15 May 2009 - 12:32 pm | मस्त कलंदर

आजकाल मुंबईत आणि पुण्यातही मराठी लोकही मराठी बोलत नाहीत.. माझा भाऊ पुण्यात असतो... त्याचं सगळीकडे हिंदी नि माझं अगदी मुंबईच्या मॉलमध्येही मुद्दाम मराठी..(आणि बर्‍याचदा समोरचा माणूसही मराठीच असतो...) ...हा आम्हां दोघांमधल्या वादाचा मुख्य मुद्दा आहे..
आणि हो.. मराठीत बोलतेय म्हणून जर कुणी घाटी म्हणून कुचेष्टेने पाहिले जरी मात्र.... मग त्या माणसाची/बाईमाणसाची फर्ड्या इंग्रजीत अशी वाट लावते ना... यंव रे यंव!!!!! नाद नाही करायचा!!!!

मस्त कलंदर..
हे जीवन सुंदर आहे..

Nile's picture

15 May 2009 - 1:53 pm | Nile

मग त्यांच्यात अन तुमच्यात काय फरक?

हे दोन मुद्दे वेगळे आहेत. काही झालं तरी तमिळ मध्येच बोलायचे या अट्टाहासामुळे सर्वसामान्य तमिळ समाज हा अनेक गोष्टींना मुकतो आहे.( मी स्वतः मद्रास मध्ये २ वर्ष हिंदी शिकवले आहे). फक्त मराठीच शिकणार/अभ्यासणार असा पवित्रा कोणीही सुज्ञ वैचारीक मनुष्य घेणार नाही.

साधारणपणे चार जणात बोलताना जी भाषा सर्वांना कळेल ती वापरणे हाच शिष्टाचार. आम्ही अमेरिकेत सुद्धा फक्त मराठी लोक असु तर मराठीतच बोलतो. पुण्यातही तसेच होते आणि ते हे सहाजिकपणे.

मस्त कलंदर's picture

15 May 2009 - 1:59 pm | मस्त कलंदर

पण जिथे शक्य आहे, नि ज्यांना कळते, त्यांच्याशी मराठीत बोलायला काय हरकत आहे? मला ९५% लोकांशी बोलताना ते मराठी असल्याचा अनुभव आला.. दुसर्‍यांची गैरसोय करणारे भाषाप्रेम नककीच वाईट...

मस्त कलंदर..
हे जीवन सुंदर आहे..

Nile's picture

15 May 2009 - 2:04 pm | Nile

मग जिथे शक्य आहे आणि जी सर्वांना कळेल अश्या भाषेत बोलणे काय वाईट मग ती कोणती का भाषा असेना?

धमाल मुलगा's picture

15 May 2009 - 2:18 pm | धमाल मुलगा

जिथे पोट जाळायला येतो आपण त्या जागची भाषा शिकली की हा प्रश्नच येत नाही.
दाक्षिणात्य राज्यांत गेलं की झक्क मारुन त्यांची भाषा शिकावी लागते ना?

अमेरिकेत जाऊन कुणी मी मराठी/हिंदी/गुज्जु/तामिळ्/तेलुगु असले हट्ट करत नाही ना?
मग तो आमच्या मातीतच का? कारण आम्हीच बोटचेपी धोरणं घेऊन ज्याच्यात्याच्या पाया पडायला जातो. :(

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

Nile's picture

15 May 2009 - 2:36 pm | Nile

अनेक गुजरात्यांनी मारवाड्यांनी मराठी मातीत येउन मराठी आत्मसात केली व व्यापार केला आणि संपन्न झाले.

कुणी सांगितले अमेरिकेत regionalism चालत नाही म्हणुन?

स्थानिक भाषा शिकणे अपरिहार्य असते कारण, रिक्षावाला, भाजिवाले, बस कंडक्टर वगैरे रोज भेटणारा इसम राष्टीय भाषा जाणतोच असे नाही, जसे तुम्ही तसेच दक्षिणी लोक इकडे आल्यावर शिकतातच कि मराठी वा हिंदी. (महाराष्ट्रात हिंदी सामान्याला कळते ति दक्षिणेत कळत नाही म्हणुन बर्‍याच लोकांचा त्रागा असतो, पण मराठी आणि हिंदी यामध्ये बरेच साम्य आहे, दक्षिणि भाषा या पुर्णपणे वेगळ्या आहेत त्यामुळे सहाजीकच त्यांना ते अवघड जात)

धमाल मुलगा's picture

15 May 2009 - 2:54 pm | धमाल मुलगा

>>अनेक गुजरात्यांनी मारवाड्यांनी मराठी मातीत येउन मराठी आत्मसात केली व व्यापार केला आणि संपन्न झाले.
अगदी! नुसतंच नव्हे तर इथं कमावलेल्या पैशाची जाण ठेऊन इथे समाजोपयोगी कामंही केली. वादच नाही त्याबद्दल!

>>कुणी सांगितले अमेरिकेत regionalism चालत नाही म्हणुन?
:) बहुतेक माझ्या वाक्याचा विपर्यास झालाय किंवा मला ते योग्य मांडता आलं नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा होता, की अमेरिकेत जाऊन तुम्ही (म्हणजे कोणीही, मी असो, अमरसिंह असो, अबु आझमी असो किंवा करुणानिधी :) ) तिथल्या लोकांशी बोलताना आपापली भाषा वापरता? की त्यांची भाषा?

स्थानिक भाषा शिकणे अपरिहार्य असते कारण, रिक्षावाला, भाजिवाले, बस कंडक्टर वगैरे रोज भेटणारा इसम राष्टीय भाषा जाणतोच असे नाही, जसे तुम्ही तसेच दक्षिणी लोक इकडे आल्यावर शिकतातच कि मराठी वा हिंदी.

अहो साहेब, मग मी कुठे आणखी काही वेगळं म्हणतोय? तेच तर म्हणतोय ना? त्याचपध्दतीनं आपण तिकडे गेलो तर आपल्याला तामिळ शिकावं लागेल्च. पण भर मुंबईत ऑफिसातल्या टीम मिटींग तामिळमध्ये व्हायला लागल्य तर काय म्हणाल?

>>जसे तुम्ही तसेच दक्षिणी लोक इकडे आल्यावर शिकतातच कि मराठी वा हिंदी.
आणि महाराष्ट्रात आल्यावर मराठी का नाही? तिकडे चालते का दुसरी भाषा?
माझा मुद्दा भाषिक हटवादीपणाचा आहे. आम्ही इथे आलो तरी आम्ही असंच बोलणार किंवा काय करायचंय इथली भाषा शिकून? होताहेत ना कामं? हेच तर मुळावर येतंय ना शेठ :)

असो, कलंदरताईंच्या धाग्यावर अंमळ विषयांतर घडतंय. उर्वरित चर्चा आपली हरकत नसेल तर खरडवहीतून करुया काय?

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

Nile's picture

15 May 2009 - 10:58 pm | Nile

आणि महाराष्ट्रात आल्यावर मराठी का नाही? तिकडे चालते का दुसरी भाषा?
माझा मुद्दा भाषिक हटवादीपणाचा आहे. आम्ही इथे आलो तरी आम्ही असंच बोलणार किंवा काय करायचंय इथली भाषा शिकून? होताहेत ना कामं? हेच तर मुळावर येतंय ना शेठ

अहो, तुम्हाला काय म्हणायचे आहे? माझा मुद्दा होता ते कट्टरपणा करित असतील तर तुम्ही ही करणार का? जर तुमचे उत्तर हो असेल तर वादाचा मुद्दाच नाही.

मी दक्षिणेत ३-४ वर्ष काढ्ली कोणतीही दक्षिणी भाषा विशेष न येता, न वापरता. मग आता दुसरी भाषा चालली कि नाही ते तुम्हीच ठरवा.
आडमुठे लोक भेटले पण मला अजुन आडमुठा नाही बनवु शकले.

तिथल्या लोकांशी बोलताना आपापली भाषा वापरता? की त्यांची भाषा?

आम्ही जि भाषा सर्वांना कळेल ति वापरण्याचा प्रयत्न करतो.

पण भर मुंबईत ऑफिसातल्या टीम मिटींग तामिळमध्ये व्हायला लागल्य तर काय म्हणाल?

आता भाषा ही संवादाची गरज आहे, तुमच्या मिटिंगमधल्या लोकांना तुम्हाला वगळायचे तर नाही ना? ;) अनेक लोक मुर्खपणा करतात पण म्हणुन तुम्ही करणार का हा प्रश्न आहे. माझे मुळ वाक्यः

मग जिथे शक्य आहे आणि जी सर्वांना कळेल अश्या भाषेत बोलणे काय वाईट मग ती कोणती का भाषा असेना?

हे फक्त मराठी लोकांसाठी नाही.

असो, मला याउपर काही म्हणायचे नाही.

निखिल देशपांडे's picture

15 May 2009 - 2:23 pm | निखिल देशपांडे

मग जिथे शक्य आहे आणि जी सर्वांना कळेल अश्या भाषेत बोलणे काय वाईट मग ती कोणती का भाषा असेना?
आज काल आमची नविन पद्धती अवलंबली आहे. कुठे ही नविन ठीकाणी संवाद सुरु करताना मराठीत सुरु करतो. वर म्हट्ल्या प्रमाणे ९५% वेळा समोरच्याला मराठी येत किंवा समजत असते. जर त्याला मराठी कळत नसेल तर "क्या आपको मराठी नही आती?? कितने साल से मुंबई मे हो??" असे विचारुन पुढचा संवाद करतो. बहुतेक लोकांना हिंदी येतच असते त्यामुळे काम होतेच. नाहीतर वरच्या संवादाने समोरचा माणुस ओशाळतो(विश्वास बसणार नाही पण हे होतय). आता त्याल हिंदी येत नसेल तर इंग्रजी आहेच. आता हयात मराठीचा अट्टहास आहेच. सोय पण आहे. फक्त समोरच्याला येत नसेल असे समजुन सुरुवात हिंदीत करण्याला आमचा विरोध आहे. बाकी ज्यांना इंग्रजी सुद्धा येत नाही त्यांचा साठी आम्ही गुजराथी, बंगाली (बांग्लादेशात न येणार्‍या आपल्या बांधवांसाठी) आणी भोजपुरी शिकायचे ठरवले आहे.

अरे सर्वात मह्त्वाचे तुमचे दोन्ही लेख खुप छान झाले आहेत.
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

Nile's picture

15 May 2009 - 2:44 pm | Nile

बरोबर आहे, तुम्ही केलंत की तुम्ही मराठीचे तारणहार, त्यांनी केलं की ते कट्टर भाषाप्रेमी. वादाचा मुद्दा येतो कुठे?

निखिल देशपांडे's picture

15 May 2009 - 4:13 pm | निखिल देशपांडे

बरोबर आहे, तुम्ही केलंत की तुम्ही मराठीचे तारणहार, त्यांनी केलं की ते कट्टर भाषाप्रेमी. वादाचा मुद्दा येतो कुठे?
बाबारे आम्ही पण कट्टर भाषाप्रेमीच आहोत.... फक्त आमची आणी त्यांची पद्धत वेगळी आहे ती वर दिलीच आहे.
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

स्वाती दिनेश's picture

15 May 2009 - 12:02 pm | स्वाती दिनेश

हा भाग मस्तच उतरला आहे, हिंदी पाटी भन्नाट आणि राष्ट्रीय पक्षी कावळा.. अफलातून.
स्वाती

नंदन's picture

15 May 2009 - 2:31 pm | नंदन

आहे, पाटी तर बेष्टच. हिंदीची चिंधी.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

15 May 2009 - 12:07 pm | विसोबा खेचर

वरील सर्वांसारखेच म्हणतो..

मस्तच! :)

तात्या.

धमाल मुलगा's picture

15 May 2009 - 2:12 pm | धमाल मुलगा

ऐकावं ते एकेक नवलच!
खरंच झंगडच दिसताहेत हे लोक.

यावर एका संगणक शास्त्रात एम. टेक. केलेल्या, एका महाविद्यालयात संगणक विभागात विभागप्रमुख असलेल्या मनुष्याचा युक्तिवाद: "भारतात सर्वाधिक ठिकाणी व सर्वाधिक वेळा आढळणारा पक्षी कावळा आहे... पण म्हणून काही तुम्ही कावळ्याला राष्ट्रपक्षी करणार का?"

=)) =))
असतात, असतात असे आडमुठ्या तिरक्या खोपडीचे लोक :)
त्याला कळेल अशा भाषेत विचारायचं ना, सगळीकडे मायक्रोसॉफ्ट जास्त वापरलं जातं म्हणुन तुम्ही ओपनसोर्स बंदच करु म्हणता का?

बाकी, अभिरतबाबा तुमच्याशी सहमत! परंतु एक गोष्ट नक्की आहे, की "अभिमान" आणि "वृथा दुराभिमान" ह्यातला फरक कळणे ह्या लोकांना अत्यावश्यक आहे.

अवांतरः यशोधरा, तुझ्या हापिसातला तो तामिळी माणसाचा किस्सा सांग की इथे :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

अभिरत भिरभि-या's picture

15 May 2009 - 4:05 pm | अभिरत भिरभि-या

>> बाकी, अभिरतबाबा तुमच्याशी सहमत! परंतु एक गोष्ट नक्की आहे, की "अभिमान" आणि "वृथा दुराभिमान" ह्यातला फरक कळणे ह्या लोकांना अत्यावश्यक आहे.

तामिळजनांचा अभिमान दुराभिमानाकडे झुकतो हे मान्य. पण मला मराठीजनांचा निराभिमान आणि तामिळींचा दुराभिमान यात एकाची निवड करायला सांगितले तर मी डोळे झाकून दुराभिमान निवडेन.

अर्थात, या दोघांपेक्षाही बंगालीबाबू उत्तम! ते हिंदी शिकतातच पण स्वतःच्या भाषेचा रास्त अभिमानही बाळगतात.

मस्त कलंदर's picture

15 May 2009 - 4:09 pm | मस्त कलंदर

मस्त कलंदर..

हे जीवन सुंदर आहे..

सँडी's picture

15 May 2009 - 7:55 pm | सँडी

आज कळले तामीळ लोकांच्या भाषाप्रेमाचा स्विकार कसा झाला ते?
खुपच छान! आवडले! :)

यशोधरा's picture

15 May 2009 - 10:31 pm | यशोधरा

धम्याने सांगितल्यावरुन, थोडक्यात किस्सा -

असच एकदा, हापिसात मराठी सहकार्‍यांशी मराठीतून गप्पा मारताना माझा एक मद्र देशीय सहकारी तिथे आला, रीतीप्रमाणे त्यालाही हाय हॅलो केल, कस चाललय वगैरे विचारल.. आणि, अर्थात हे विंग्रजीमधून, कारण, त्यांना एक मद्र आणि दुसरी विंग्रजी ह्या दोन भाषा सोडून, अगदी ते राहतात त्या राष्ट्राची दुसरी कोणतीही भाषा बोलायची पण विलक्षण एलर्जी आहे!! आणि कोणी काही लेक्चर द्यायच्या आत सांगतेय, मी मुळीच सगळ्यांना एकच पट्टीने मोजत नाहीये. माझी शेजारीण पण मद्र देशीयच आहे, आणि आमच एकदम गूळपीठ आहे. आणि ती चक्क मस्त हिंदीही बोलते, अन कधी कधी मला पण मद्र भाषेतले शब्द शिकवते, आणि मी ही शिकते. कुठलीच भाषा शिकायचं मला काही वावड नाहीये, विरोध आहे तो प्रवृत्तीला. तर, सुरुवातीला ठीक बोलत होतो आम्ही इथल तिथल, मग तो एकदम, आमच्या मराठी बोलण्यावरच घसरला!! आणि मग ही मुक्ताफळ उडाली!! तेच मूळ संवाद घालायचा मोह आवरत नाहीये, म्हणून त्यातल्या त्यात सेंसॉर करून... :D

मद्रमॅन: व्हाऽऽट इस धिऽऽसऽऽऽ यू आल आऽऽऽऽलवेज स्पीक इन यूवर लॅंग्वेऽऽज... धिऽऽस इज वेऽऽऽऽरी रॉंग! ग वर जोर देऊन!

आम्ही जरा उडालोच!! अरेच्या! याला काय चावल आता!! आधी आम्ही समजलो की तो खेचतोय आमची, मग लक्षात आल की, तस नाही, खरच म्हणतोय तो, तेवढ्यात,

मद्रमॅन: यू मस्ट स्पीक इन अवर लॅंग्वेज, दु यू नो, देअर इज नोऽऽऽ लॅंग्वेज लाईक अवर्स!! इट इज इंटऽऽऽर् नॅशनल लंग्वेज, यू नो??

आमची डोचकी सटकायला लागलेली!!

मी: इंटरनॅशनल?? सिन्स व्हेन?? हाउ कम??

मद्रमॅन: यू डोंट नो?? व्हाऽऽट यू आर सेईंग?? इट इज स्पोकन इन श्रीलंका, यू नो दॅट???

आम्ही प्रचंड वैतागाने, पण प्रचंड हसू यायला लागल्याने, खुर्च्यांमधून पडायच्या बेतात होतो!! आणि आता मराठी मॅन पण वैतागलेले!! आणि सगळ्यांनाच खुमखुमी चढलेली!!

मराठी मॅन १: सो व्हाय डोंट यू गो टू श्रीलंका?? सेटल डाऊन देअर?

मराठी मॅन २: लेका फ़ुकण्या ( ए, तू कान बंद कर आता, मी त्याला शिव्या ऐकवतो मस्त - हे मला) भXXXx तिकडे मुंबईत येता लेको, तिकडे काय मराठी शिकता का रे?? तू भेट रे साल्या बाहेर!! च्यायला, माज उतरवतो तुझा, मराठी बोलू नका म्हणतोय!!

नंतरच्या शिव्या न लिहिल्याबद्दल क्षमस्व वाचक हो!

मद्रमॅन : व्हाऽऽट इज धिस?? आय एम नॉट फ़ॉलोइंग यू गाऽऽईज!! स्पीक इन इंग्लिश, सो दॅट आय कॅन फ़ॉलो....

मराठी मॅन १: अबे, मेरी बात को समझ ध्यानसे, एक तो हम मराठीं में बोलना तो छोडने वाले नहीं, तेरी लॅंवेज इंटरनॅशनल हो या और कुछ...

मद्रमॅन: आय डोंट अंडरस्टॅंड हिंदी...

मराठी मॅन१ : वो तुम्हारा प्रॉब्लेम है, नहीं आती तो सीखो!!

आणि अस बरच काय काय वाजल!! त्यानंतर त्याच्या समोर तर मराठीतच बोलयचो आम्हीं अन त्याच्याशी बोलताना हिंदीतच बोलायचो!
सुरुवातीला त्याने कांगावा केला, पण आम्ही तरकटच लोक आहोत. त्याच्याशी हिंदीतच बोलतो आणि तो ही झक्कत आता बोलतो. आम्ही सुखाने मराठी गप्पांचा फड त्याच्या समोर जमवतो.

परिकथेतील राजकुमार's picture

15 May 2009 - 2:22 pm | परिकथेतील राजकुमार

सुंदर अनुभव कथन.
पु.ले.शु.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

लिखाळ's picture

15 May 2009 - 7:17 pm | लिखाळ

वा .. दोन्ही भाग वाचले.. मस्त आहेत..
पाटी आणि कावळ्याचा किस्सा तर फारच मजेदार :)
पुढील लेखनास शुभेच्छा !
-- लिखाळ.

मदनबाण's picture

15 May 2009 - 7:27 pm | मदनबाण

मस्त लेखन...
पाटी अंमळ खत्रुड आहे. :D

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

तिकडे अश बर्‍याचशा पाट्या होत्या.. पण सगळ्यांचे फोटो न काढ्ल्याचे वाईट वाटतेय.. नाहीतर पुणेरी पाट्यांसांरखी इथे पण एक मालिका सुरू केली असती....

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

चिरोटा's picture

15 May 2009 - 7:39 pm | चिरोटा

उतरला आहे.

व्हाय य्यू नार्थ इंडियन्स आर आल्वेज अग्गेन्स्ट साऊथ इंडियन्स"???

ईकडे हाच प्रकार असतो. मला एकदा "तुम्हा उत्तर भारतियांच्या जेवणात रोज भात असतो का?" असे एकाने विचारले असता कंटाळून मी शेवटी "भारताचा नकाशा उघड आणि महाराष्ट्र कुठे आहे ते बघ" असे उत्तर दिले. त्यावर त्याचे प्रत्यत्तुर - आमच्या राज्याच्या वर महाराष्ट्र आहे.म्हणजे ऊत्तरेला आहे म्हणुन तुम्ही उत्तर भारतिय.आता काय बोलणार?
थोड्याफार प्रमाणात आपणही हेच करतो-चेन्नई चा मद्रासी,हैदराबादचा पण मद्रासी, मैसुरचा मद्रासी आणि कोचीनचा पण मद्रासीच.!!
पुर्वी दिल्लीकरांच्या द्रुष्टीने भारतात तीनच भाषा असायच्या- हिंदी,बंगाली आणि मद्रासी.!!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

स्वामि's picture

15 May 2009 - 9:54 pm | स्वामि

नाद नाही करायचा! सही रे मस्त कलंदर,या भय्या लोक्सची तोंड इंग्रजीनेच फोडली पाहीजेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 May 2009 - 10:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

झकास वर्णन! मजा आली दुसर्‍याही भागात. कावळाचा विनोद आणि पाटी दोन्ही सह्हीच!! वर्णसाम्यामुळेसुद्धा कावळ्याला राष्ट्रीय पक्षी घोषित करावं असं वाटलं का मद्रमनुष्याला? ;-)

अवांतरः आमच्या हापिसात बंगाल्यांचे ऑकार कानावर यायला लागले की सरळ त्यांना मराठीतून काहीही प्रश्न विचारते. एक शांतता पसरते आणि पुन्हा संवादाची भाषा हिंदी किंवा इंग्लिश होते! :-)

मस्त कलंदर's picture

15 May 2009 - 10:57 pm | मस्त कलंदर

मला त्या क्षणी काय काय वाटलं ते केवळ वर्णनातीत आहे... जमीन दुभंगून तिच्या पोटात जाऊ???? की असल्या तर्क्शास्त्रापुढे डोकं आपटून घेऊ.. की या मूर्खपणावर आय ड्रीम ऑफ जिनी मधली जिनी कशी गडाबळा लोळून हसते.. तशी हसू??????? वेड्यासारखी पहातच राहिले होते मी सगळ्यांकडे... :D

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर म्हणजे घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!