कुठवर पाहू तुझी मी वाट
कुठवर पाहू तुझी मी वाट
सा़जणा, आठवण तुझी येते ||
एकटी मी मनामध्ये कुढते
वेड्या शंकेने उर धडधडते ||
भेट तुझी आहे जवळी
तिच्यामध्येच तुला बघते ||
असेल कारे स्थिती तुझीही
माझ्यासारखी आठवण येते ? ||
कुठवर राहू एकटी मी
मिलनासाठी तडफडते ||
- पाषाणभेद
प्रतिक्रिया
11 May 2009 - 10:36 am | चिरोटा
आहे. "मिलनासाठी तडफडते" तडफडते शब्दाऐवजी दुसरा कुठला शब्द जास्त ठीक बसेल काय?
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
11 May 2009 - 10:40 am | जागु
आतुरते ठिक वाटतो का ?
11 May 2009 - 11:17 am | पाषाणभेद
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. ( हि पंच लाईन कशी वाटते ? टाकतोच.) त्याचप्रमाणे ही कविताही सार्वजनीक - तुमचीच आहे. तिचा आपण हवा तसा वापर करावा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
11 May 2009 - 11:31 am | सागर
पाषाणभेद,
छोटीशी पण सुंदर कविता
मनास भावली
व्यक्तीशः मला "मिलनासाठी तडफडते" हे आवडले व पटले पण.
बदलायची गरज मला तरी वाटत नाही...
तडफडण्यात जेवढी व्याकुळता आहे , ती फक्त त्या शब्दानेच चांगली व्यक्त होते असे मला वाटते... :)
अजून येऊ द्यात
(कविताप्रेमी) सागर
अवांतर : एवढी लहान कविता मी कधी लिहायला शिकणार :( शॉर्ट ऍन्ड स्वीट :)
11 May 2009 - 8:49 pm | क्रान्ति
आज मिपावर वाट पहायचा दिवस आहे का? @)
कविता मस्त आहे.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
www.mauntujhe.blogspot.com