सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
11 May 2009 - 1:47 am

मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या थोडे आधी सरसगडावर जाण्याचे झाले. मी आणि माझा पालीतला भाचा -शुभम- असे दोघे जण सकाळी ११ वाजता बल्लाळेश्वराचे नाव घेवून घरातून निघालो.

छाया. १. निघतांना आम्ही एका बॅगेत खाण्याचे पदार्थ, पाणी आदी. घेतले.


छाया. २. गडाखालच्या विस्तीर्ण पठारावर आस्मादिक व शुभम


छाया. ३. सरसगडाचे खालून घेतलेले छायाचित्र १


छाया. ४. सरसगडाचे खालून घेतलेले छायाचित्र २


छाया. ५. या ठि़काणी आम्ही थांबलो असतांना आमच्या मागून ग. बा. वडेर हायस्कूलची शुभमच्या वर्गातली ४ मुले भेटली. ती शाळा बुडवून आली होती. (असे ते नेहमीच येत असे समजले.) ती मुले आम्हास वाटाड्या म्हणून नंतर उपयोगात आली.


छाया. ६. थोडे पुढे गेल्यानंतर दिसणारा गड. या दोन दिसणार्‍या भागात पायर्‍या खोदलेल्या आहेत. (नंतर छायाचित्र येत आहेच.)


छाया. ७. मागे वळून बघतांना दिसणारे पठार


छाया. ८. गडाच्या पहिल्या टप्प्यावर एक गुहा खोदलेली आहे.


छाया. ९. खालून वर जाणार्‍या पायर्‍या


छाया. १०. वरून खाली दिसणार्‍या पायर्‍या


छाया. १२. घळीतून दिसणारा समोरचा देखावा


छाया. १३. पायर्‍या संपल्यानंतर लागणारा पहीला दरवाजा
या नंतर आमच्याकडचे पाणी संपले आणि गडावर असलेल्या १ ल्या पाण्याच्या टाक्यातुन पाणी भरून घेतले.


छाया. १४. या ठिकाणी असलेली नैसर्गीक खोबण. येथे गडकरी राहत असावेत. (आपली नावे गडावर टाकणार्‍यांना चाबकाने फोडले पाहीजे. )


छाया. १५. या ठिकाणावरुन दिसणारे गडाच्या पाठीमागील द्रुष्य


छाया. १६. दुसर्‍या टप्प्यात आम्ही येथे डबा खाल्ला आणि थोडी विश्रांती घेतली.


छाया. १७. तिसरा टप्पा थोडा अवघड आहे. सरळ चढाईवर पाय सरकू शकतो. गडमाथ्यावर केदारेश्वराचे मंदिर आहे.


छाया. १८. गडावरून दिसणारे सुधागड एज्यू. सोसा. चे ग. बा. वडेर हायस्कूल. शाळेत होणार्‍या वार्षीक क्रॉसकंट्री स्पर्धेत काही मुले शाळेतून येणार्‍या वाटेने ३० मिनीटात गडावर येतात.


छाया. १९. गडावरून दिसणारी अंबा नदी


छाया. २०. गडाच्या उत्तरे कडील द्रुष्य. गडावर येण्यासाठी उत्तरेकडुन पण बिकट वाट आहे.


छाया. २१. आणखी एक द्रुष्य

गडावर थोडे थांबुन ईतिहासातील अनाम विरांचे स्मरण करून आम्ही खाली उतरलो. शाळेतली मुले केव्हाच पसार झाली होती. खाली येण्यास ४:३० झाले होते.

हे ठिकाणइतिहासछायाचित्रण

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

11 May 2009 - 8:50 am | क्रान्ति

गडदर्शन अप्रतिम. छाया १२, १५, १९, २१ खूपच खास! छाया १४ वरील प्रतिक्रियेशी १००% सहमत! [इतकी हाव असेल प्रसिद्धीची तर काहीतरी चांगलं करा नावं कोरण्यापेक्षा!]

क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
www.mauntujhe.blogspot.com

अवलिया's picture

11 May 2009 - 9:32 am | अवलिया

वा ! सुंदर सफर घडवलीत फोटोच्या माध्यमातुन !!
जियो !!

--अवलिया

दिपक's picture

11 May 2009 - 10:38 am | दिपक

वा ! सुंदर सफर घडवलीत फोटोच्या माध्यमातुन !!
मस्तच ! सर्व फोटो सुंदर आहेत.

पहिल्या फोटोत असणाऱ्या दोन बाटल्यांपैकी मागच्या बाटलीत पाणी आणि पुढच्या बाटलीत काय आहे हो? :)

पाषाणभेद's picture

11 May 2009 - 11:10 am | पाषाणभेद

वाटलेच मला कोणीतरी असे विचारेल ते. बाकी आपले निरीक्षण फार बारीक आहे हो. (डिक्टेटीव्ह म्हणून नाव काढाल. राग नको.)
पहिल्या बाटलीत लिंबु पाणी घेतले होते.
ईतर वस्तू:-
मोठी सॅक, पाणी आणि लिंबु पाण्याच्या बाटल्या आणि ( छोटी काळी बॅग/ पाउच घेतली नव्हती. ती टेबलावर होती.), पांढर्‍या प्लॅश्टीकच्या पिशवीत द्राक्ष, डब्यात भाजी/ पोळी, हातरुमालं, गाजर, मोबाईल, वेदनाशामक गोळ्या, बिस्कीटे, गॉगल्स, मोबाईल्स, कांदे, टोप्या आणि मफलर.

अर्थातच फोटोत दिसणारे स्पिकर, फेव्हीकॉल चा डबा, आणि टेबल बरोबर घेतले नाही.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

दशानन's picture

11 May 2009 - 11:26 am | दशानन

>>अर्थातच फोटोत दिसणारे स्पिकर, फेव्हीकॉल चा डबा, आणि टेबल बरोबर घेतले नाही.

=))

=))

=))

लै भारी !

थोडेसं नवीन !

अनंता's picture

11 May 2009 - 9:37 am | अनंता

सरसगड!!!

दशानन's picture

11 May 2009 - 9:51 am | दशानन

सुंदर !

नावस साजेसी सफर घडवलीस पठ्या ;)

थोडेसं नवीन !

मराठी_माणूस's picture

11 May 2009 - 10:34 am | मराठी_माणूस

छान. मस्त . सुंदर फोटो.

सहज's picture

11 May 2009 - 10:38 am | सहज

फार मस्त फोटो व माहीती.

खूप आवडले. =D>

प्राजु's picture

11 May 2009 - 11:22 pm | प्राजु

+१
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जागु's picture

11 May 2009 - 10:46 am | जागु

मागच्या दोन महिन्यांत ३ वेळा पालीला जाउन आलो. ह्या अंबा नदीत आम्ही पाय टाकुन बसलो होतो. तर लहान मुले, पुरूष मंडळी पोहली होती.

जागु's picture

11 May 2009 - 10:46 am | जागु

मागच्या दोन महिन्यांत ३ वेळा पालीला जाउन आलो. ह्या अंबा नदीत आम्ही पाय टाकुन बसलो होतो. तर लहान मुले, पुरूष मंडळी पोहली होती.

स्वाती दिनेश's picture

11 May 2009 - 11:22 am | स्वाती दिनेश

फोटो आणि माहिती आवडली.
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

11 May 2009 - 11:46 am | परिकथेतील राजकुमार

सरस सहल !
अप्रतिम वर्णन आणी अप्रतिम फोटु !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

ढ's picture

11 May 2009 - 12:02 pm |

आहेत सर्व.
फक्त वर्णन थोडंसं त्रोटक वाटलं.(हे फक्त पुणेरीपणा सिद्ध करण्यासाठी :) )

भडकमकर मास्तर's picture

11 May 2009 - 2:06 pm | भडकमकर मास्तर

मस्त फोटो...
पाली मन्दिराजवळून दिसणारा गड पाहून विचार करत असे की जायला वाट कुठून असेल??...
अगदी पायर्‍यांची छान वाट आहे की...

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

सुमीत's picture

11 May 2009 - 2:59 pm | सुमीत

खूप दिवसांनी ट्रेक बद्दल वाचायला मिळाले ते पण अगदी नवीन स्वरूपात,
मस्तच आहे

विजुभाऊ's picture

11 May 2009 - 3:19 pm | विजुभाऊ

गडाखालच्या बल्लळेश्वराचे दर्शन घेतले की नाही?

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

उमेश__'s picture

11 May 2009 - 6:05 pm | उमेश__

सुंदर फोटो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 May 2009 - 6:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी फोटो !

केशवराव's picture

11 May 2009 - 7:42 pm | केशवराव

मी ग. बा. वडेरचा माजी विद्यार्थी .[१९६४]
ह्या सरसगडावर नेहमी जायचो. सर्व पूर्व स्मृतींना उजाळा मिळाला. फारच छान.

केशवराव's picture

11 May 2009 - 7:42 pm | केशवराव

मी ग. बा. वडेरचा माजी विद्यार्थी .[१९६४]
ह्या सरसगडावर नेहमी जायचो. सर्व पूर्व स्मृतींना उजाळा मिळाला. फारच छान.

वेताळ's picture

11 May 2009 - 7:43 pm | वेताळ

खुपच छान सचित्र सफर....आवडली.

खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

सुनील's picture

11 May 2009 - 7:53 pm | सुनील

चित्रसफर आवडली.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश's picture

11 May 2009 - 10:10 pm | ऋषिकेश

पाली मुक्कामाचे ठिकाण ठेऊन करता येण्यासारखे दोन गड म्हणजे सरसगड(४४४ मी) व सुधागड (६१९ मी).
यातील सरसगड हा ऐन पाली गावातला. पालीचे तापमान इतर कोकणापेक्षा वेगळे राहते ते या गडामुळे. मला हा गड बांधणार्‍याचे विषेश कौतुक वाटते तो वरून दिसणार्‍या (लक्ष ठेवता येणार्‍या) शिखरांमुळे. पश्चिमेला अंबा नदी आणि तिचे खोरे, पुर्वेला घनगड, तेलबैला, सुधागड स्पष्ट दिसतात. वायव्येला माणिकगड, मिर्‍याडोंगर दिसतात.
वातावरण स्वच्छ असेल तर क्षितीजावर कर्नाळा किल्ल्याचे टोक, इरशाळाची वेगळ्या अँगलने शिंगेहि पाहता येतात.

छा. चि. मस्त आली आहेत.

पक्ष्यांचे फोटो काढायची आवड असलेल्यांनी सरसगडावर जरून जावे. मोठ्या घारी, त्यांची घरटी, पिले, पाढर्‍या छातीच्या घारी मुबलक आहेत.

अवांतरः तरीही सह्याद्रीच्या मुख्य रांगेचे प्रचंड जवळून दर्शन देणारा सुधागड माझा अधिक आवडता आहे.

ऋषिकेश

देवदत्त's picture

12 May 2009 - 12:15 am | देवदत्त

छान वाटले सफरीवर जाऊन :)

जमल्यास तिकडचीही भटकंती करता येईल ;)