श्रेयस

दशानन's picture
दशानन in जे न देखे रवी...
2 May 2009 - 1:14 pm

मी पण असाच आहे फाटका
एमके माझ्यामध्ये देखील वेगळा
कधी डिएसपी माझा मित्र होता वेगळा
तर कधी मिनू, शिरिन मध्ये मी गुरफटलेला
कधी प्रेमामुळे रक्तबंबाळ
तर कधी दारुमुळे झालेली आबाळ
मी असाच एक श्रेयस
दुस-याला दुनियादारी शिकवता शिकवता
अचानक दुनियादारी शिकलेला
हरवलेल्या मित्रांमध्ये कधी
श्री तर कधी नितीन शोधत असलेला
संतोष बार च्या अंधा-या टेबलवर
दुनियादारीचा हिशोब मांडलेला
मीच तो एम के कधी
श्रेयस असलेला !

मांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

अनंता's picture

2 May 2009 - 1:29 pm | अनंता

हां , दुनियादारी वाचल्यावर लक्षात येतय थोडंफार.
छान प्रयत्न. दुसरा भाग समजेबल येईल अशी आशा ;)

अवांतर : अबाळ ऐवजी आबाळ हवे होते का?

हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

अनंता's picture

2 May 2009 - 1:35 pm | अनंता

कवितेचा आकार मस्त दारुच्या चषकासारखा दिसतो आहे.
च्यामारी मस्त क्रिप्टीक!

ठकू's picture

2 May 2009 - 1:23 pm | ठकू

चांगली आहे. राजे, दुनियादरी वाचून एकदम भारावून गेलात हो!

-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

टारझन's picture

2 May 2009 - 1:37 pm | टारझन

राजेंना आवरा कोणी तरी !! च्यायला आक्खी दुनियादारी मिपावर उतरवून मिपा "तात्पूरते बंद" पाडायचे नाय तर !!
=)) =)) गम्मत रे ..

छाण लिव्हेश .. आणि आवडेश ... आजुन येऊन देवेश !!!

- टारेश

भाग्यश्री's picture

3 May 2009 - 7:29 am | भाग्यश्री

आख्खी दुनियादारी कोणी उतरवली तर फार आवडेल! आहे का कोणी? मिळतच नाही पुस्तक मला.. आणि इतक्यात भारत फेरीही नाही! त्यामुळे हा ऑप्शन बेस्ट आहे! :)

www.bhagyashree.co.cc

प्रकाश घाटपांडे's picture

2 May 2009 - 2:28 pm | प्रकाश घाटपांडे

सध्या कोन मित्र हाये? एम के गांधी यांनी देशीवादाला चालना द्यावी असे सांगितले आहे. तेच श्रेयस्कर आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अवलिया's picture

2 May 2009 - 4:46 pm | अवलिया

राजे !
मन लावुन वाचलेली दिसतेस दुनियादारी !!
छान ! येवु दे अजुन !!

--अवलिया

सागर's picture

2 May 2009 - 6:33 pm | सागर

राजे
काल रात्री तुमच्या खरडवहीत आधी खरडल्याप्रमाणे मस्तच आहे
दुनियादारी इफेक्ट लई झ्याक झाला हाय तुम्च्यावर ;)

येऊ द्या अजुन भाग
- सागर

प्राजु's picture

2 May 2009 - 10:11 pm | प्राजु

सध्या दुनियादारीचा हॅंगओव्हर आहे हे लक्षात आलं. :)
दुनियादारीच्या नशेसोबत कवितेचा चखणा... मस्त!
कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पाषाणभेद's picture

3 May 2009 - 12:17 pm | पाषाणभेद

वरील नावे दारूचे ब्रांड आहेत का? जाणकार खुलासा करतील काय?
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

सँडी's picture

3 May 2009 - 1:56 pm | सँडी

पहिल्या चार ओळित वर्णन केलेल्या दारुंशी असलेली जवळिक कवीने खुपच छान रंगविली आहे.
शेवटच्या ४-५ ओळित कवीने हुबेहुब आपल्या जवळच्या मित्रांचे करावे असे 'बारा'चे (नावासहीत)केलेले वर्णन तर मैत्रीचे अप्रतिम उदाहरण! ;).

-सँडी
काय'द्याच बोला?

संदीप चित्रे's picture

4 May 2009 - 6:59 am | संदीप चित्रे

जोरदार आहे राजे .... चालू दे :)