(हे पुस्तक मी मैथिलीसाठी, म्हणजे माझ्या अडीच वर्षांच्या पुतणीसाठी बनवले होते. आता तिने बघितले आहे, मग आणखी लोकांनी गंमत लुटायला हरकत नाही. चित्रे माझी मैत्रीण आंद्रेया ग्रानादोस हिने काढली आहेत. त्यामुळे चेहरे दक्षिण-अमेरिकन आहेत, मराठमोळे नाहीत! तिला मराठी मुळीच येत नाही. माझ्या अशा-तशा अनुवादाला अनुसरून आणि वेड्यावाकड्या स्केचेसचा अर्थ लावून तिने ही चित्रे काढली आहेत! तिचे आभार मी मानावे तितके कमीच...)
-------------------------------------
-------------------------------------
-------------------------------------
-------------------------------------
विंचवाचे लगीनघाईचे चर्हाट
म्हणतो सासर करायचे कर्हाड
चला रे चला, जमतंय वर्हाड!
-------------------------------------
-------------------------------------
वरवंड गावचे सुरवंट राव
"कोण तुम्ही?" - आणतात आव
मोठाच त्यांचा बडेजाव!
-------------------------------------
-------------------------------------
धामनगावचा धामण साप
"येत नाही," म्हणतो - "लागतेय धाप"
आळशी कुठला - मारतोय थाप!
-------------------------------------
-------------------------------------
गांगल गावची गोगलगाय
वेळेवरती पोचलीच नाय
म्हणून रडातेय मोकलून धाय
-------------------------------------
-------------------------------------
वाशीवरून आणता राशी
दागिन्यांची मोठी खाशी
वेशीपाशी शिंकली माशी
-------------------------------------
-------------------------------------
इंगळी म्हणाली, "विंचवा येवू?
कर्हाडचे वर्हाड बाजूला ठेवू
तुझे-माझेच लगीन लावू
पाठीवरच्याच घरात राहू!"
-------------------------------------
-------------------------------------
-------------------------------------
-------------------------------------
प्रतिक्रिया
2 May 2009 - 5:04 am | घाटावरचे भट
बेष्ट...पण चित्रे का बरे दिसत नाहीत?
2 May 2009 - 5:08 am | धनंजय
मला दिसत आहेत. यावेळी पहिल्यांदाच पिकासावर चिकटवली आहेत.
सामान्यपणे फ्लिकर वापरतो.
2 May 2009 - 5:24 am | बिपिन कार्यकर्ते
चित्रं दिसत नाहीत. :( बाकी कविता फक्कड एकदम...
जमल्यास http://www.sendspace.com/file/7ih0yb इथून पिकासावरून फोटो डकवायचे सचित्र मार्गदर्शन उतरवून घ्या.
**** आता दिसत आहेत चित्रं!!! मस्तच आहेत. ग्रेट. :)
बिपिन कार्यकर्ते
2 May 2009 - 5:33 am | समिधा
सगळीच चित्रे छान काढली आहेत.कविता तर एकदम झकास :)
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
2 May 2009 - 5:35 am | घाटावरचे भट
आता दिसत आहेत चित्रे. झकासच आहेत. ही गंमत आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल तुमचे आणि आंद्रेया यांचे आभार.
2 May 2009 - 5:39 am | बेसनलाडू
फार छान! कविता नि रंगीत चित्रे दोन्ही!
(बालक)बेसनलाडू
2 May 2009 - 9:37 pm | प्राजु
+१
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 May 2009 - 5:58 am | जृंभणश्वान
प्रचंड आवडली
2 May 2009 - 6:12 am | क्रान्ति
कविता आणि चित्रे दोन्ही मस्त!
=D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
2 May 2009 - 6:15 am | नंदन
मूळ संकल्पना, कविता आणि जोडीला काढलेली सुरेख चित्रे - सारेच उत्तम. वाचताना, पाहताना त्यामागची मेहनत आणि जिव्हाळा जाणवत राहतो.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
2 May 2009 - 7:35 pm | स्वाती दिनेश
मूळ संकल्पना, कविता आणि जोडीला काढलेली सुरेख चित्रे - सारेच उत्तम. वाचताना, पाहताना त्यामागची मेहनत आणि जिव्हाळा जाणवत राहतो.
अगदी नंदन सारखेच म्हणते. सुंदरच!!
स्वाती
2 May 2009 - 6:20 am | चित्रा
कविता आणि चित्रेही खूपच छान. इंगळीणबाई हुषार दिसतात.
माशीच्या पायातले बूट आणि पर्समधली माळ खासच आहे.
तुमच्या पिल्लाला नक्की आवडली असेल ही भेट.
(आणि मोठेपणी तर त्यामागचे कष्ट आणि प्रेम कळेलच कळेल).
2 May 2009 - 6:38 am | नाटक्या
पण चित्रे कुठे आहेत???
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
2 May 2009 - 6:43 am | अनामिक
धनंजय, खूप खूप आवडली चित्रे आणि कविता. माझ्या ३ वर्षाच्या भाचीलाही नक्कीच आवडेल.
तुम्ही आणि आंद्रेया, दोघांचेही आभार आणि अभिनंदन!
-अनामिक
2 May 2009 - 7:13 am | मुक्तसुनीत
हेच म्हणतो ! खूपच सुंदर !
2 May 2009 - 6:57 am | अवलिया
धनंजय शेट
मस्त !!
--अवलिया
2 May 2009 - 7:13 am | सहज
आंद्रेया ग्रानादोस यांना आवर्जून सांगा अप्रतिम चित्रे आहेत.
2 May 2009 - 7:53 am | चन्द्रशेखर गोखले
छान ! अप्रतिम !! बालसुलभ काव्यरचना आणि चित्रेही काव्याला साजेशी त्यामुळे कविता अजुनच रंगीबेरंगी झाली !!!
2 May 2009 - 7:53 am | चन्द्रशेखर गोखले
छान ! अप्रतिम !! बालसुलभ काव्यरचना आणि चित्रेही काव्याला साजेशी त्यामुळे कविता अजुनच रंगीबेरंगी झाली !!!
2 May 2009 - 8:28 am | प्राची
अप्रतिम कविता आणि आंद्रेयाबाईंची चित्रे =D> =D> =D>
चित्रातील बारकावे सुंदर आहेत.विंचवाच्या मुंडावळ्यापण आवडल्या. :)
2 May 2009 - 8:36 am | आनंदयात्री
चित्रे ओळी दोन्हीही छान. आवडले.
2 May 2009 - 9:16 am | यन्ना _रास्कला
कवीता आनि चित्र दोनीबी. गानच आढवल, सखुबाई सालुबाई लग्नाला चला तुमी लग्नाला चला, ढेकनांची उसल आनि पालिची भजी, तुमी लग्नाला चला,
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
2 May 2009 - 9:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा ! सुरेख चित्रं आहेत. आणि कवितेच्या ओळीही तितक्याच क्लास !
धनंजयसेठ, लगे रहो !
2 May 2009 - 9:54 am | अमोल केळकर
वा ! मस्त कविता आणि चित्रे ही
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
2 May 2009 - 9:55 am | प्रकाश घाटपांडे
वाचता वाचता लहान होउन गेलो. शेतात दगडाखाली सापडणार्या विंचवाच्या पिल्लावळीची आठवण आली. काळ्या व तांबड्या पाठीचा पृष्ठभाग , त्यांना दगडाने ठेचुन मारणं, दोर्याने नांगी बांधणं, उन्हात तापत ठेवण वगैरे ...
आज मात्र वेगळ्या दृष्टीने पहाता आलं.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
2 May 2009 - 10:15 am | मेघना भुस्कुटे
खूप आधी कुणा जिवलगांच्या वाढदिवसाला आपल्या हाताने ग्रीटिंग्स बनवून देण्याची टूम होती आमच्याकडे. अलीकडे ते सगळे मागेच पडले.
सुंदर आहेत चित्रे आणि कविताही.
2 May 2009 - 10:22 am | प्रमोद देव
कविता आणि चित्रे मस्तच आहेत.
फक्त ते सुरवंटाचे चित्र मात्र म्हणावे तसे जमले नाही असे वाटते. सुरवंट केसाळ असते तसे हे दिसत नाहीये.
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
2 May 2009 - 12:20 pm | लिखाळ
वा ! उत्तमच..
गोगलगायीच्या समोरचे मिमि मधले अंतर आणि 'वेशीवर माशी शिंकली'..दागिने सांडले हे फार सुंदर आहे.
कविता आणि चित्रे दोन्ही फार सुंदर. तुमचे आणि आंद्रेया यांचे कौतूक आणि अभिनंदन.
हल्लीच्या शहरी लहान मुलांच्या भावविश्वात कारण नसताना डोकावणार्या इंग्रजी तपशीलांपासून दूर..अस्सल मराठी काव्य आवडले.
सुरवंटाबाबत देवकाकांशी सहमत.
-- लिखाळ.
2 May 2009 - 12:41 pm | विसुनाना
वा! धनूकाका... इटुकलं, पिटुकलं पुस्तक तुपलं आपल्याला तर आवडलं.
सुरवंटरावांच्या कोल्हापुरी मिशा आणि गांधी टोपी 'आंद्रेया ग्रानादोस'ताई(वय?)ला कशी काय दिसली बुवा?
छोट्यांचा 'फीडबॅक' लवकरच देईन.
2 May 2009 - 5:58 pm | प्रियाली
व्वा! सक्काळी सक्काळी काहीतरी मस्तच नजरेस पडलं.
धनुकाका, लग्नाचा बेत फक्कड आहे. :)
तुम्हा दोघांचे (धनंजय आणि आंद्रेया) या प्रयत्नाबद्दल अभिनंदन!
2 May 2009 - 6:19 pm | शितल
कविता आणि चित्रे खुपच सुंदर आहेत.
माझ्या लेकाही दाखवेन, जाम खुश होईल तो. :)
2 May 2009 - 6:26 pm | चतुरंग
कविता आणि चित्रे दोन्ही मस्तच. खूपच आवडली. माझ्या मुलाला आज वाचून दाखवेन आणि सांगेन त्याला काय वाटले.
तुझे आणि आंद्रियाचे अभिनंदन! :)
(रंग कुठल्याप्रकारचे वापरले आहेत आणि कागद कुठला?)
(अनुवाद म्हणतो आहेस तर मूळ कविता कोणती आहे?)
चतुरंग
2 May 2009 - 7:24 pm | धनंजय
आंद्रेयाला सर्वांची प्रशंसा, शाबासकी जरूर सांगेन.
चतुरंग यांचा अनुवादाबद्दल प्रश्न आणि प्रमोद देव, लिखाळ यांचे सुरवंटाबद्दल निरीक्षण दोघांचे मूळ एकच आहे.
मुळातली कविता मराठीच आहे - म्हणजे वर दिलेली. "असातसा अनुवाद" म्हणजे आंद्रेयाला स्पॅनिशमध्ये माझा समजावून सांगायचा प्रयत्न! (अर्थात समोर उत्तम दर्जाची बियर होती, म्हणून 'फ्रस्ट्रेशन'चा त्रास झाला नाही.)
सुरवंटाचा अर्थ आंद्रेयाला सिएन्पिए (=शंभर पायांचा किडा) म्हणून सांगितला - योग्य स्पॅनिश शब्द सुचला नाही. म्हणून आंद्रेयाने तिच्या देशातील कुठल्याशा खूप-पाय-असलेल्या जिवाणूचे चित्र काढले.
माझे सुरवंटरावांचे कच्चे रेखाचित्र असे (त्यातून आंद्रेयाने मिशा आणि गांधीटोपी घेतली! पण तो केसाळपणा काही तिला समजला त्या किड्यावरती तिला पटला नाही) :
आंद्रेया (वय? प्रौढांनी "ताई" म्हणण्याचेच. लहान मूल "मावशी" म्हणू शकेल, "काकू" नाही, अशा दरम्यान) ही पेशाने लहान मुलांची खेळणी कल्पते (डिझाइन करते). या दुव्यावरती तिने आराखडा तयार केलेली खेळणी दिसतील. ती चित्रे थेट संगणकावरच काढते. (प्रणाली/प्रोग्रॅम कुठला ते तिला विचारून सांगतो.)
- - -
ताजा कलम : या पुस्तकाची कल्पना आणि आंद्रेयाची चित्रे माझ्या दुसर्या एका मैत्रिणीला खूप आवडली. पुढच्या महिन्यात तिच्या लग्नात ती सर्व पाहुण्यांना याचे स्पॅनिश+जर्मन+इंग्रजी रूपांतर छापून देणार आहे. (या मैत्रिणीची आणि तिच्या भावी नवर्याची गंमत कथा [नावे बदलून] मी या इथे सांगितली होती.) रूपांतरात गावे स्पेन किंवा जर्मनी किंवा अमेरिकेतली आहेत, पण "सिएन्पिए" रावांच्या आकडेबाज मिशा आणि गांधी टोपी मात्र बदलली नाहीत! स्पॅनिश आणि इंग्रजी रूपांतर मी करून दिले होते (बियरविना केले म्हणून बरे!). लग्नसमारंभ पार पडल्यानंतर झाल्यानंतर इंग्रजी रूपांतर येथे देईन.
2 May 2009 - 8:54 pm | अभिज्ञ
फारच सुरेख संकल्पना.
कविता व चित्रे दोन्ही फार आवडले.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
2 May 2009 - 9:53 pm | वेताळ
तुम्हा दोघाचे अभिनंदन...........लहान मुलाना खुप आवडेल हे पुस्तक.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
3 May 2009 - 8:37 am | भडकमकर मास्तर
फार छान वाट॑ली चित्रकथा...
विंचवाचे वर्हाड या नावानेही मजाच आणली...
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
3 May 2009 - 12:21 pm | सुनील
चित्रे आणि कविता दोन्हीही छान!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
3 May 2009 - 11:07 pm | सुवर्णमयी
मुलीला कथा अनुवाद करून सांगितली. (अर्थात तसे करतांना मूळ यमकाची मजा मग आली नाही असे वाटले. )तिला कथा आवडली. तिला चित्रावरून प्राणी तरी नक्कीच ओळखता आले. बाकी बरेच संदर्भ समजवून द्यावे लागले.
तुम्ही दोघांनीही अतिशय उत्तम काम केले आहे. संकल्पना आणि सादरीकरण दोन्ही मस्त.
सुरवंटाला कॅटरपिलर म्हटले की कदाचित चित्र अधिक पटेल वा त्यात थोडा बदलही करता येईल...
सोनाली
19 May 2009 - 3:56 pm | बाकरवडी
मस्तच ! जबराट आवडली कविता आणि चित्रेही.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
19 May 2009 - 4:12 pm | माया
खुप सुंदर आहेत चित्रं आणि ओळीपण.
19 May 2009 - 5:24 pm | ऋषिकेश
अ ति श य भ न्ना ट!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
प्रचंड आवडले... आंद्रेयाच्या आणि तुमच्या मेहनतीला सलाम :)
(सलामी बहाद्दर) ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)
11 Nov 2011 - 11:42 pm | राजेश घासकडवी
चित्रं आणि कविता मस्तच. मराठीमध्ये अगदी लहान मुलांसाठी अशा चित्रकथांची पुस्तकं त्यामानाने कमी असतात.
सुरवंट रावांचं धनंजयने काढलेलं स्केच खूपच जास्त आवडलं. त्याला एक छान लय आहे.