दुर का रे असतो

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
28 Apr 2009 - 1:13 pm

दुर का रे असतो

दुर कारे असतो सखया जवळी ये ना तू || ध्रु ||
घालीत होती वेणी सकाळी
आरशासमोर होते उभी मी
न दिसे माझी मला मी
परी दिसलास तू || १ ||
दुर कारे असतो सखया जवळी ये ना तू || ध्रु ||

सायंकाळी असते मी एकटी
वाट बघते हात असे कटी
नजर जाई दुरवर, धडधडे र्‍ह्रुदय
मनी असे किंतू || २ ||
दुर कारे असतो सखया जवळी ये ना तू || ध्रु ||

मालव दिप सारे ह्या अशा राती
भरून काढ उणीव दिवसभराची
नको असा नको करू करू तू
पण परंतू || ३ ||
दुर कारे असतो सखया जवळी ये ना तु || ध्रु ||

२/०१/१९९८

प्रेमकाव्यकविताआस्वाद

प्रतिक्रिया

अवलिया's picture

28 Apr 2009 - 1:30 pm | अवलिया

हं. पाषाणभेद ... तुमचे हृदय पाषाणाचे नाही ह्याचा पुरावा देत आहात
बाकी, ९८ साली मिपा नव्हते ती उणीव तुम्ही आता चांगली भरुन काढत आहात.

येवु द्या अजुन सुंदर सुंदर कविता... वेगवेगळ्या विषयांवरच्या !!
:)

--अवलिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Apr 2009 - 1:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>येवु द्या अजुन सुंदर सुंदर कविता... वेगवेगळ्या विषयांवरच्या !!

दिपक's picture

28 Apr 2009 - 1:32 pm | दिपक

भारी रोमॅंटीक आहे . :)

निखिल देशपांडे's picture

28 Apr 2009 - 4:04 pm | निखिल देशपांडे

छान कविता करतोस कि रे दगडफोड्या

==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर

दशानन's picture

28 Apr 2009 - 5:05 pm | दशानन

मस्तच :)

छान कविता !

थोडेसं नवीन !

ऋषिकेश's picture

28 Apr 2009 - 5:47 pm | ऋषिकेश

ठिक कविता..
पु.ले.शु.

ऋषिकेश

विजय गणेश खर्डे's picture

6 May 2009 - 12:47 pm | विजय गणेश खर्डे

मस्त आहे 'कविता'.येऊ द्या आणखीन छान छान कविता.

जागु's picture

6 May 2009 - 12:48 pm | जागु

कविता आवडली.

विजय गणेश खर्डे's picture

6 May 2009 - 2:50 pm | विजय गणेश खर्डे

मुंबईतिल रिक्षांचे मिटर. आता हा कोणता विषय आहे.काय करणार तुम्हि मिटरचे.