चांदरात

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
27 Apr 2009 - 12:04 pm

चांदरात

हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||

तू स्पर्श करता जगा मी विसरले
मी हरले अन मीच जिंकले
न कळे मला कुणी कुणावर केली मात || १ ||
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||

मंचकावर मी बसले कळ सोसते मुश्कील
आपल्याच दुनियेमध्ये असती आपण मश्गुल
दिवेही पेंगुळले चढत चालली चांदरात || २ ||
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||

वारा पडला पडदेही पडले
रस रंग गंधही धुंद जहाले
कालची मी वेडी जणू आज टाकली मी कात || ३ ||
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||
२/१/१९९८

प्रेमकाव्यकविताआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

27 Apr 2009 - 12:11 pm | विसोबा खेचर

काय समजत नाय बॉस! फक्त चौकोन-चौकोन दिसताहेत!

तात्या.

पाषाणभेद's picture

27 Apr 2009 - 12:22 pm | पाषाणभेद

तात्या आता बघा.
http://www.misalpav.com/node/7489

आताही चौकोन चौकोन दिसतात का?
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

अनंता's picture

27 Apr 2009 - 12:30 pm | अनंता

छान कविता.

हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....

ऋषिकेश's picture

27 Apr 2009 - 12:31 pm | ऋषिकेश

आता वाचता येतंय..
कविता चांगली आहे. आवडली
बाकी,

२/१/१९९८

कुछ ताजा ताजा आनेदो भाई ;)

ऋषिकेश

पाषाणभेद's picture

27 Apr 2009 - 12:47 pm | पाषाणभेद

लय दिसापासुन म्या टाकायचा इचार करत हुतो. पन आज येळ आली पघा. आन त्या १९९८ च्या येळला आपल मिस्सळ तयार नव्हती ना भौ.
तवाच टाकली आसती तर आपली भ्येट झाली आसती का?

"आमच्या हाटेलीत जो माल तयार हाय त्योच माल भेटल"
"नोकरांना दरोज पगार दिला जातो."
"खारा माल त्येलात आन गोड माल तुपात क्येला जातो. "
"क्यास विंचरू न ये."
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

नितिन थत्ते's picture

27 Apr 2009 - 3:50 pm | नितिन थत्ते

क्यास विंचरू न ये
क्यासातून हलुवार हात फिरवावा. =))

अवांतरः १९९८ मध्ये डोकीवर खूप क्यासं होती. आता हळुवार हात फिरवायला केस थोडेच राहिलेत. त्यामुळे कविता वाचायला उशीर झालासा वाटला.
खराटा
(रंग माझा वेगळा)

अरुण वडुलेकर's picture

27 Apr 2009 - 3:14 pm | अरुण वडुलेकर

कविता चांगली आहे. पण शुद्धलेखनाकडे अधिक लक्ष द्यायला हवे.
पहिल्याच ओळीत तु स्पर्श करता.... च्या ठिकाणी तू असें असायला पाहिजे होते.
पुढेही हा तु अनेक ठिकाणी र्‍हस्वच झालेला दिसतो.
शुद्धलेखनाला फाट्यावर मारायची क्रांति एरवी ठीक आहे.पण काव्यात या अशा बाळबोध
चुका म्हणजे ग्लेन फिडिश अल्युमिनियमच्या गल्लासातून सर्व्ह केल्या सारखे वाटते.

पाषाणभेद's picture

27 Apr 2009 - 3:26 pm | पाषाणभेद

धन्यवाद.
चुक दुरूस्त केली आहे.

बाकी आपल्यासारखी अनुभवी माणसे असतांना आम्ही काळजी घ्यायला हवी.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)

प्राजु's picture

27 Apr 2009 - 6:56 pm | प्राजु

छान आहे कविता.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

27 Apr 2009 - 7:05 pm | संदीप चित्रे

पाषाणभेद एकदम मेणाहून मऊ झालेला दिसतोय :)

चतुरंग's picture

27 Apr 2009 - 7:29 pm | चतुरंग

चतुरंग

आपला अभिजित's picture

27 Apr 2009 - 7:34 pm | आपला अभिजित

रचना, शब्द उत्तम!
पण
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||

हे असे एकाच वाक्याचे ध्रुवपद खटकते. ते नियमांत बसते की नाही, हे काव्यतज्ज्ञ सांगतील. पण खटकतेय, एवढे नक्की!

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

27 Apr 2009 - 8:18 pm | क्रान्ति

सुरेख आहे.
:) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

शितल's picture

27 Apr 2009 - 9:57 pm | शितल

सहमत. :)

टिउ's picture

27 Apr 2009 - 8:27 pm | टिउ

छान कविता!

२/१/१९९८

तुम्ही तर मिसळपाववर येण्याआधीपासुन सिद्धहस्त होता राव! ;-)

प्रमोद देव's picture

27 Apr 2009 - 9:59 pm | प्रमोद देव

मंचकावर मी बसले कळ सोसते मुश्कील
आपल्याच दुनियेमध्ये असती आपण मश्गुल

जरा पुन्हा लिहून पाहा. मुश्कील आणि मश्गुल हे शब्द इथे जरा उपरे वाटताहेत.
बाकी कविता आवडली.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

बेसनलाडू's picture

27 Apr 2009 - 11:12 pm | बेसनलाडू

आवडली.
पेंगुळलेले दिवे, चांदरात आणि एकंदर माहौल पाहून/वाचून माझ्या
दिवे,चंद्र-तारे अता मालवू दे
नव्या जीवनाची निशा जागवू दे

या ओळींची आठवण झाली.
(स्मरणशील)बेसनलाडू

लिखाळ's picture

27 Apr 2009 - 11:38 pm | लिखाळ

सुंदर चांदरात :)
-- लिखाळ.

यन्ना _रास्कला's picture

28 Apr 2009 - 6:52 am | यन्ना _रास्कला

इस्मे जादा कुझ समझता नाय पन कविता अच्चा जम्या हय.

पुढ लिहिलेल वाचु नए.

विंग्लिश पिक्चरामधी एकटा हिरो झोपलाय आनि त्याच कुत्र येउन तेला चाटटय अस दाखवत आनि नवीन कविता निर्मान होत हलुवार केसाना चाट तु एकदा तरी कुतरड्या.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यानी पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !

मनीषा's picture

28 Apr 2009 - 7:21 am | मनीषा

तू स्पर्श करता जगा मी विसरले
मी हरले अन मीच जिंकले
न कळे मला कुणी कुणावर केली मात || १ ||
सुंदर !!!