आरती बल्लाळाची
(चालीसहीत)
जयदेव जयदेव जय पालीश्वरा हो देवा पालीश्वरा
आरती ओवाळीतो मी तुज देवा बल्लाळा
जयदेव जयदेव || ध्रु ||
देवूळ तुझे मोठे चौसोपी दगडी
आत असे मुर्ती शेंदरी उघडी
समोर मोठी घंटा अन खांब लाकडी
वर्णावया रुप तुझे बुद्धी माझी तोकडी || १ ||
जयदेव जयदेव || ध्रु ||
देवा तुझा वास असे पाली गावी
तव दर्शने माझी द्रुष्टी सुखावी
मोदकांचा नैवेद्य मी तुजला दावी
भक्तांवर क्रुपा नियमीत असो द्यावी || २ ||
जयदेव जयदेव || ध्रु ||
पौराणीक आणि ऐतीहासीक तव ग्राम असे
मंदिर सुंदर मागे सरसगड वसे
वर्णन म्या पामर करू कैसे
सच्चा एक मुढ वंदन करीतसे || ३ ||
जयदेव जयदेव || ध्रु ||
५/०१/१९९८
बल्लाळेश्वराची मुर्ती
http://farm4.static.flickr.com/3416/3478389927_3108132e7d.jpg?v=0
पालीच्या बल्लाळेश्वराचे मंदिर, मागे सरसगड आहे.
सरसगड, समोरुन
बल्लाळेश्वराचे मंदिर, समोरुन
मंदिरासमोरील मोठी घंटा. ही घंटा आपण फ्रेंचाविरुद्ध लढाईत मिळवलेली आहे.
(छायाचित्र सौजन्यः http://ballaleshwar.com/marathi/index.html)
प्रतिक्रिया
25 Apr 2009 - 10:08 pm | क्रान्ति
अप्रतिम प्रासादिक रचना. मंदिर आणि मूर्ती डोळ्यांपुढे आली.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
25 Apr 2009 - 10:46 pm | चैतन्यकुलकर्णी
शोध घेत रहा ... उत्तमतेचा, नाविन्याचा आणि सत्याचा!
26 Apr 2009 - 8:55 am | अवलिया
वा ! मस्त !!
--अवलिया
26 Apr 2009 - 10:19 am | सायली पानसे
छान आहे!
12 May 2009 - 9:31 am | अनंता
गणपती बाप्पा मोरया!!!
26 Apr 2009 - 11:41 am | मनीषा
छान आहे .. !
26 Apr 2009 - 11:47 am | अनंता
देवूळ तुझे मोठे चौसोपी दगडी
आत असे मुर्ती शेंदरी उघडी
उघडी हा शब्द जरा खटकतो.
त्यापेक्षा साजिरी हा शब्द वापरला तर उत्तम.
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
26 Apr 2009 - 1:05 pm | पाषाणभेद
"आत असे मुर्ती शेंदरी उघडी"
अनंता,
कधीकधी बल्लाळाची मुर्ती ला काही सोवळे नेसवत नाही, म्हणुन तसे लिहीले आहे. तरीही आपली सुचना स्वागतार्ह आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
26 Apr 2009 - 12:06 pm | ऋषिकेश
वा! आरती हा वेगळा प्रकार हाताळल्याबद्दल अभिनंदन!
आता कोणीतरी त्याला छानशी चाल लाऊन रेकॉर्ड करा म्हणजे यंदा गणपतीत म्हणता येईल ;)
एक सुचना: आरतीमधे शेवटच्या कडव्यात कवीने मक्ता घ्यायची पद्धत आहे. तसा बदल करता येईल का?
ऋषिकेश
26 Apr 2009 - 1:10 pm | पाषाणभेद
धन्यवाद ऋषिकेश
आपले म्हणणे खरे आहे. पण मी तो मक्ता आधीच घेतला आहे तरी आपण माझे नाव ओळखा. नाही ओळखता आले तर मी सांगेनच.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
27 Apr 2009 - 11:25 am | पाषाणभेद
ऋषि,
देव काका तुमच्या म्हणण्याप्रमाणे चाल लावणार आहे. बघुया कशी येते ते.
अवांतरः
पालीजवळ ३ कि. मी. अंतरावर 'उन्हेरे ' नावाचे गरम कुंड आहेत. तेथे अवश्य जा. सरसगड पण १ दिवसात चढुन जाता येतो.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
26 Apr 2009 - 2:57 pm | दशानन
सुंदर !
गणपती बाप्पा मोर्या !
थोडेसं नवीन !
27 Apr 2009 - 9:26 am | दिपक
खरंच सुंदर रचली आहे आरती.
क्रांतिताईंनी म्हंटल्याप्रमाणे मंदिर आणि मूर्ती डोळ्यांपुढे आली.
27 Apr 2009 - 9:35 am | विकास
आरती छानच आहे!
27 Apr 2009 - 11:45 am | अमोल केळकर
भक्तगणांच्या सोयीसाठी - पालीचा बल्लाळेश्वर
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
27 Apr 2009 - 12:12 pm | अनंता
www.marathifm.com/Ganpati%20Aarti-Lata%20&%20Usha/Baal%20Bhaktalagi.htm
येथे ऐका.
हा हा हा... आता मी फेमस होणार!!
सुबरु वन, सुबरु टू , सुबरू थ्री....
27 Apr 2009 - 3:07 pm | प्रमोद देव
पाषाणभेद आणि हृषिकेशच्या विनंतीप्रमाणे ह्या आरतीला चाल लावलेय ती खाली ऐका.
मूळ आरतीमध्ये माझ्या कुवतीप्रमाणे काही जुजबी बदल केलेत पण अजूनही म्हणावी तितकी सुलभता आलेली नाहीये.
कुण्या समर्थ कवी/कवयित्रीने वृत्तात जर अजून काही सुधारणा केल्यास नेहमीच्या आरतीच्या चालीवर गाणे कुणालाही सोपे जाईल.
जयदेव जयदेव जय पालीश्वरा हो, देवा बल्लाळा
आरती ओवाळीतो देवा, तुजला बल्लाळा
जयदेव जयदेव || ध्रु ||
देऊळ मोठे तुझे चौसोपी दगडी
असे आत मुर्ती शेंदरी उघडी
समोर घंटा भव्य खांब लाकडी
वर्णावया तव रुप, बुद्धी तोकडी || १ ||
जयदेव जयदेव || ध्रु ||
देवा तुझा निवास असे पाली गावी
तुझ्या दर्शनाने माझी दृष्टी सुखावी
मोदकांचा नैवेद्य मी तुजला दावी
कृपा भक्तांवर नियमीत असावी || २ ||
जयदेव जयदेव || ध्रु ||
पौराणीक, ऐतिहासीक तव ग्राम असे
मंदिर सुंदर मागे सरसगड वसे
वर्णन म्या पामर करू तव कैसे
सच्चा एक मुढ वंदन करीतसे || ३ ||
जयदेव जयदेव || ध्रु ||
Get this widget | Track details | eSnips Social DNA
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
27 Apr 2009 - 3:38 pm | पाषाणभेद
देव काका,
आपण घेतलेल्या मेहनतीमूळे चाल फारच छान झाली आहे. मी तर फक्त आरती लिहीली, पण आपण चाल देवून गणपतीची खरी आळवणी केलीत.
पुनश्च्य धन्यवाद.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
12 May 2009 - 4:26 pm | मीनल
आरती,चाल ,फोटो ...सर्व आवडले.
मीनल.