जोवर मी लहान होतो. म्हणजे शाळेत जात असे. तोवर मला माहे नाव मुळीच आवडत नसे.
मला माझ्या आई बाबांचा खुपच राग येत असे. मला वाटायचे की, हे काय निशिगंध नाव आहे तेही मुलाचे.
नाजुक मुलीचे असल्यासारखे. कधी जर जर आजारी पडलो तरी डॉक्टर साहेब हात लावायच्या अगोदर सुचवायचे की, तुझे नाव फारच नाजुक आहे ते बदल म्हणजे तु आजारी नाही पडणार.
आणी मी नाईलाजाने एक जळजळीत नजरेने आई बाबांना खुन्नस द्यायचो. निदान निशिकांत तरी ठेवायचे.
पण आता मला निशिगंध हेच नाव खुप आवडते. कारण फक्त एकच ते म्हणजे निशिगंधाचे फुल..ते मला खुप आवडते.
पांढरे शुभ्र नाजुक असे ते फुल पाहील्यावर मला असे उगीच वाटते की मीच आहे. मग मी त्याचे गुगल वर फोटो शोधु लागलो.
पण काही केल्या ते सापडेना. खुप शोधाशोध केल्यावर चुचु ताई कडुन मला असे कळले की त्याचे इंग्रजी नाव ट्युबरोज आहे. मग पुष्कळ सापडली.
तुम्हाला तुमचे नाव आवडते का? असल्यास का?? व नसल्यास का नाही??
प्रतिक्रिया
23 Apr 2009 - 3:47 pm | यशोधरा
प्रकाशचित्र सुरेख आहे.
23 Apr 2009 - 3:55 pm | पर्नल नेने मराठे
:D
चुचु
23 Apr 2009 - 8:00 pm | यन्ना _रास्कला
फोटु झ्याक आलाय. नाव बदलु नका बापु.
पन पनलतायचा प्रतीसाद कायच कलळा नाय. चुचु हा मराठी शबद आहे का? त्या चा मीनिंग काय?
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यानी पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
23 Apr 2009 - 8:03 pm | प्राची
पन पनलतायचा प्रतीसाद कायच कलळा नाय. चुचु हा मराठी शबद आहे का? त्या चा मीनिंग काय?
चुचुताई,याचे उत्तल द्या लवकल,मलापन केवापासून प्लश्न पल्लाय. :/ :|
23 Apr 2009 - 9:45 pm | क्रान्ति
या जगात मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हंजे माझं नाव! माझ्या बाबांनी स्वतःच्या आवडीनं आणि विचारानं ठरवलेलं माझं नाव - क्रान्ति!
निशिगंधाचा फोटो सुरेख!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
24 Apr 2009 - 3:48 pm | निशिगंध
धन्यवाद,
कमी जरी आले तरी आले याचेच समाधान.......
बाकी अजुन खुप दिवस आहे इथे...
माझ्यातही अजुन सुधारणा होईल म्हणा.
_______ निशिगंध_________
मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!
24 Apr 2009 - 4:45 pm | वेताळ
आमचा फोटो सापडला तर बघा.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
24 Apr 2009 - 4:52 pm | वेताळ
आमचा फोटो सापडला तर बघा.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
24 Apr 2009 - 5:10 pm | निशिगंध
खुप प्रयत्न करुन मिळाला. पहा तुमचाच आहे का??
_______ निशिगंध_________
मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!
24 Apr 2009 - 5:18 pm | नितिन थत्ते
मला पण माझे नाव आवडते.
खराटा
(रंग माझा वेगळा)
25 Apr 2009 - 8:00 am | शितल
निशिगंध हे नाव उच्चारले तरी निशिगंधाची सुंदर फुले डोळ्यासमोर येतात आणि त्या फुलांचा सुंदर वास आठवतो. :)
25 Apr 2009 - 3:44 pm | निशिगंध
8> 8> 8> 8>
_______ निशिगंध_________
मी शोधत आहे स्वत:हाला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!