आणि माझा मारूती झाला-२

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
23 Apr 2009 - 6:59 am

As far as I am concerned, the child is absolutely normal. There are no strong triggers to confirm DYSFUNCTION>DISORDER>REBELLION>CHAOS THERORY. There is no random instance leading to another random instance and therfore traceble pattern to confirm chaos theory. May be the pattern is yet to emerge. And nothing is wrong in desire to leave a life with own Terms. In the mean time what do I tell the parents.
केस हाताळ्णारे डॉक्टर म्हणाले.
_____________________________________________________
मी कुमारीका नाही. मी पुरुष द्वेष्टी पण नाही. 'निंफोमॅनीयॅक' तर नाहीच नाही. सातवीत असताना मला माझ्या 'फीमेल पॉवरची" जाणीव झाली.. नक्की कारण सांगता येत नाही. वरच्या मजल्यावरील आजोबा जरा जास्तच रोखुन बघायचे.
Males are gullible fools. Most of the time women are merely a concquest for them. They carry that 18 year Boy in them. The ego of being a man, and the proof of it is their existance. And they are so proud of the tools of the conquest nature has provided.
मी काही 'रातराणी' नव्हे.इथे चॉइस माझा असतो. ती माझी मानसिक आणि शारिरिक गरज असते. भेटलेल्या सर्व पुरुषाबरोबर माझे संबंध असतात असे नाही. बर्‍याच वेळेला मी एका चांगल्या मित्राची किंवा थेरपीस्ट ची भुमिका बजावते.
माझे एक क्लायंट मला महीन्यातुन एकदा भेटतात. ५ स्टार मधे रुम बुक असते. नुसते हात हातात धरुन बोलतात. त्यांच्या समस्याना माझी उत्तरे बरोबर निघतात. जास्तीत जास्त मांडीवर डोके ठेउन झोपतात. आता ह्या बदल्यात त्यांनी मला गेल्या दोन वर्षात सुमारे दोन लाख रुपये मला दीलेत. नाकारावेत काय? आजारी कोण तो का मी?
तुम्ही बॉन जोवी चे इट्स माय लाईफ बघितले आहे का?
मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचे आहे. ते सर्वमान्य चौकटीत बसत नाही ह्याची मला संपुर्ण कल्पना आहे. चौकट निर्माण करणारे स्व:त ह्या चौकटीत बसतात काय?
बाबा कधी कधी अगदी टीपिकल मेल चुवानिस्ट पिग सारखे वागतात. आईला राग येतो. मारावेसे सुद्धा वाटत असेल. मी मारते.
जरा बोलले की अंगचटीला येणार्‍यांच्या थोबाडीत वाजवायला मी अजिबात कचरत नाही. आय ऍम द पॉवर. आय ऍम द कंट्रोल.
तसे मी २५ चे मित्र सहसा टाळते. ४०+ चे पुरुष बरे वाटतात. 'गिल्ट कॉम्प्लेक्स' ने पछाडलेले. 'जस्टीफिकेशन"' मधे गुंतलेले.
जरा अवातार काढला की पुरे. एकदम थंड.
आईला मी एकदा विचारले होते, काय ग तुला १६ वर्ष ते लग्न होईपर्यंत एखादा पुरुष खुपच हवाहवासा वाटला होता का?
उत्तर नाही मिळाले ह्यातच सर्व काही आले.
माझी आय़.क्यु १६५ आहे. इंजीनियरीग ची ऍड्मिशन मी नाकारली. हो उद्या रागाउन घराबाहेर काढले तर मला परवडायला पाहीजे ना तो खर्च.
आज बी.एस्.सी. कॉम्प. करत आहे. आत्तापासुन जी.आर्.इ ची तयारी सुरु केली आहे. स्वबळावर मी परदेशी जाणार हे ऩक्की.
माझ्या कॉलेज मधे चार मुलगे आपल्या चैनीसाठी 'गिगोलो' चे काम करतात. त्यांना पण कौंसेलिंग ची गरज आहे का?
मी हाडामांसाची आहे. माझ्याकडे असे 'सोन्याचे' असे काहीही नाही. ज्याच्या वापराने त्याची प्रत कमी होणार कि वजन कमी होणार.
उद्या वाटले तर मी माझा भुतकाळ विसरुन माझ्याशी प्रामाणिक राहील अशा पुरुषाबरोबर लग्न सुद्धा करीन. जोपर्यंत पालकत्वाची जबाबदारी संपुर्णपणे संभाळायची ताकद येत नाही तो पर्यंत मुलांचा विचार नाही.
कौमार्य म्हणजे काय? ते हरवते म्हणजे काय?
पैसे असलेली हातातली पर्स? मोबाईल?
आणि मी ती एकट्यानेच हरवले काय? जोडीदाराचे काय?
आणि मी ते ९ वीत पहिल्यांदा हरवले आणि त्यांत मला आनंद मिळाला हे मी कबुल करते ह्यात धक्का बसण्यासारखे काय?
नेट वर स्क्रेपबुक मधे दोनदा हॅलो केल्यावर लगेच "आती क्या खंडाला" म्हणणार्‍याना नितीमत्ता लागु नसते का?
आणि अशांच्या घरातील बायकांचे काय? त्यांनी उद्या असे केले तर हेच नियम लागु होतील का?
मला सिस्टीम चा राग नाही.मी स्विकारलेलीआहे ती नाईलाजाने. कारण ते बदलायची शक्ती माझ्या कडे नाही. आणि मला त्याची गरज पण वाटत नाही.
मी पर्वट नाही हे माझ्या पालकांना सांगाल का? त्यांच्या शक्ती पलीकडचे आहे माझे वागणे. निव्वळ त्यांना बरे वाटावे म्हणुन आले मी तुमच्या कडे. आय होप यु हॅव राइट वर्डस फॉर देम सो दॅट देअर लाईफ विल नॉट बी मिझरेबल.
जाता जाता: मिपाकरहो, मारुती च्या तोंडात बोट आहे. तो काही बोलु शकत नाही. बघा पालकांना काही सल्ला देतो येतो का तुम्हाला.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

विसुनाना's picture

23 Apr 2009 - 2:01 pm | विसुनाना

जालिंदरबाबा सध्या अशाच विद्रोही विचारांच्या, विस्तृतमनाच्या एका शिष्येच्या शोधात आहेत असे खात्रीलायकरित्या समजते. यापुढे तिने तिचा न-नैतिक पवित्रा टाकून आध्यात्मिक पवित्रा घ्यावा. सदर कन्यका त्यांची पट्टशिष्या म्हणून शोभेल आणि तिची (तिच्यासाठी आणि तिच्या पालकांसाठीही) योग्य त्या मार्गाने उन्नती होईल. म्हटलेच आहे ना - जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती.
तरी या सूचनेचा गांभिर्याने विचार व्हावा असा सल्ला आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

23 Apr 2009 - 4:48 pm | प्रकाश घाटपांडे

=)) =))
तो मी नव्हेच मधील राधेश्याम महाराजाची आठवण आली.

प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सँडी's picture

23 Apr 2009 - 4:03 pm | सँडी

कॅरॅक्टर? आवडले!
सुर्‍याने भोकसुन मारणे काय आणि रिव्हॉल्वरने गोळ्या घातल्या काय? शेवटी खुन तो खुनच! फरक एवढाच की रिव्हॉल्वर धुवावी लागत नाही.

अवांतरः प्रतिसादही आवडले! :)

-सँडी
काय'द्याच बोला?

रामदास's picture

23 Apr 2009 - 5:49 pm | रामदास

आयुष्याबद्दलचा विचार फारच एका टोकाचा आणि एकांगी वाटतो. पण समुपदेशकानी ही वेश्यावृत्ती मुलीच्या मनात आली कोठून याची विचारणा केली का ?आपन होऊन स्विकारलेली लाईफस्टाईल कदाचीत फार थोडक्या शेल्फ लाईफची असेल याची जाणिव तिला आहे का ?
वेश्यावृत्ती ही लक्ष्य साध्य करण्यासाठी सोयीचा आणि जवळातजवळ असणारा मार्ग .(शॉर्टकट) हा मार्ग स्विकारला असेल तर हा मला त्या मुलीचा दुबळेपणा वाटतो.

विनायक प्रभू's picture

23 Apr 2009 - 7:34 pm | विनायक प्रभू

लेखावर चांगली चर्चा झाली. काही सुचना आणि सल्ले खरेच चांगले होते.
छोटा डॉनची सुचना आवडली.
कदाचीत जे डॉक्टर करु शकले नाहीत ते ही चर्चा वाचून मुलीला योग्य निर्णय घेण्यास उद्युक्त करेल.

प्रकाश घाटपांडे's picture

23 Apr 2009 - 7:44 pm | प्रकाश घाटपांडे

वेश्यावृत्ती ही लक्ष्य साध्य करण्यासाठी सोयीचा आणि जवळातजवळ असणारा मार्ग .(शॉर्टकट) हा मार्ग स्विकारला असेल तर हा मला त्या मुलीचा दुबळेपणा वाटतो

शॉर्टकट मारणे ही भावना तात्विक नसेल पण व्यवहारी आहे. सोयीचा व जवळचा मार्ग निवडणे हे लांबचा व खडतर मार्ग निवडण्यापेक्षा साहजिक आहे. पत्रकार भवन मधे कार्यक्रमात एकदा अशीच चर्चा चालू होती. माझा प्रश्न होता कि एखाद्याने अर्थाजनासाठी आपली बुद्धीमत्ता भाड्याने देणे वा एखादीने आपले शरीर वापरण्यासाठी भाड्याने देणे यात हेतुत फरक काय? एक जण आपली बौद्धीक संपदा वापरतो तर दुसरी शारिरिक संपदा वापरते / तो . पहिल्याला समाजमान्यता आहे दुसर्‍याला नाही. पण समाजात मान्यता नसली तरी ती गोष्ट समाजात आहे. कारण ती समाजाची गरज आहे. त्या मुलीच्या आयुष्यातील पुढील घटना ठरवतील कि तिचा निर्णय योग्य होता कि नाही. खर तर नैतिक अनैतिक कल्पनाच सापेक्ष आहेत. समाज मनाला ही बाब खटकते हे मात्र नक्की.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

मन्जिरि's picture

23 Apr 2009 - 9:24 pm | मन्जिरि

बापरे,किति महाभयानक आहे कुथे था॑बणार हे सर्व ?पुर्वि वाटायच ज्या घरात आइ वडिला॑चे स॑बध निट नस्तात्/अति श्रिम॑त घरात असे असु शकते पण भ्रमच निघाला

क्रान्ति's picture

23 Apr 2009 - 10:12 pm | क्रान्ति

मंजिरीशी सहमत. भयंकरच आहे सगळं! कुठे आणि कधी थांबणार देव जाणे!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

संदीप चित्रे's picture

23 Apr 2009 - 11:55 pm | संदीप चित्रे

सध्या बोलती बंद आहे !!!

एक नक्की की आय.क्यू.१६५ वगैरेला काही अर्थ नाही. तिच्या वागण्याचे भविष्यात बरे/वाईट जे काही परिणाम असतील त्यांचा तिला(सर्वाधिक) फरक पडणार आहे. आपल्या प्रत्येक निर्णयावर पुढच्या अनेक घटना आणि त्यांचे परिणाम अवलंबून असतात.

त्या मुलीचे जे होईल ते माहिती नाही पण तिच्या आईवडिलांसाठी मात्र नक्की वाईट वाटतंय.
त्यांची काही चूक नसताना फक्त तिचे आई-वडील आहेत म्हणून त्यांच्या मनाची फरपट. 'त्रास करून घेऊ नका' असं सांगण्याइतकं सोपं नक्कीच नाही.

विसोबा खेचर's picture

24 Apr 2009 - 12:01 am | विसोबा खेचर

'त्रास करून घेऊ नका' असं सांगण्याइतकं सोपं नक्कीच नाही.

सोपं नक्कीच नाही, पण दुसरं तरी त्यांना काय सांगणार? मुलीला जसं जगायचं तसं जगू दे की! तिच्या मर्जीने, तिच्या खुशीने!

तात्या.

सुनील's picture

25 Apr 2009 - 7:11 am | सुनील

कथा वाचली. फार धक्का बसला नाही. मुलगी सज्ञान आहे. जे काही करते आहे ते तिला कळत आहे. अश्या धंद्यात येणार्‍या बहुतेक सगळ्याच मुली "गरजेपोटी" येतात (प्रत्येकाच्या "गरजे"ची व्याख्या वेगळी!) पुढेमागे तिला संसार थाटायचीदेखिल इच्छा आहे, ह्यातही काही नवल नाही.

तिच्या पालकांची निराशा समजून घेता येते पण त्याला इलाज नाही.

अनेक प्रतिसाद अतिशय उत्तम.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दशानन's picture

25 Apr 2009 - 11:40 am | दशानन

>>>आय़.क्यु १६५ आहे

8}

आईनस्टाईनचा आय क्यु १६० होता =))

link !

थोडेसं नवीन !

प्रदीप's picture

26 Apr 2009 - 9:03 pm | प्रदीप

ह्या मुलीला खरे तर समुपदेशनाची जरूरी नाही. ती सज्ञान आहे, कोवळ्या वयातील असली तरी आपण काय करतो आहोत, ह्याचे तिला पुरते भान आहे. तिच्या प्रतिपादनातील 'नॉइज' प्रथम बाहेर काढून टाकावा कारण तो बराच (निदान ह्या लेखात तरी) आहे.

१. अंगचटीला येणार्‍यांबद्दल ती जे बोलत आहे, ते ती एस्कॉर्टिंगचे काम करते हे माहित असल्याने जे स्वतःहून येउन 'आती क्या खंडाला' असे विचारतात, पण ज्या विचारण्यात तिच्यानुसार बिझीनेस प्रपोजल नसते, त्यांच्याबद्दल. जी चांगली बिझीनेस प्रोपोसल्स येतात त्यांना ती ठरल्याप्रमाणे जे काही द्यायचे ते देत आहे. (ती काही रस्त्यावर उभी राहून गिर्‍हाईके घेत नाही. तशी तिला जरूरी नाही. त्यामुळे उगाच कोणाही 'सोम्यागोम्या'बरोबर जायची तिला जरूरी नाही. अशांना ती स्वतःचा रूद्रावातार दाखवते. एकाद्या दुकानदाराला ज्याप्रमाणे गल्ली/टापू/मोहल्य्यातील खराखुरा दादा आणि उगाच खाका फुगवून त्रास देण्यास आलेल्या फुटकळ मवाल्यातील फरक समजतो, ज्यायोगे तो त्यांना अगदी भिन्न वागणूक देतो, तसे हे आहे, इतकेच).

२. आईला तिच्या वयाच्या १६ व्या वर्षी एखादा पुरूष खूप हवाहवासा वाटला का, ह्या प्रश्नाने ती काय नेमके साधते आहे? माझे उत्तर, स्वतःच्या बेबंद वागणूकीचे समर्थन करण्यासाठी एक खांब (peg).

३. असाच एक खांब काही गिगोलोंचा उल्लेख करून 'मग त्यांनाही समुपदेशनाची जरूर नाही का?' हा प्रश्न. ह्या मुलीला समुपदेशकाकडे आणले तिच्या मात्यापित्यांनी. कारण आपल्या पोटच्या मुलीविषयी त्यांना वाटणारी चिंता व ममत्व. गिगोलोंना त्यांच्या आप्तेष्टांनी बघावे हवे तर? त्यांचा इथे काहीही संबंधच नाही.

४. एकंदरीत मेल शॉवॅनिझम वगैरे ती जे काही येथे उल्लेखिते ते सर्व प्रचंड नॉइज म्हणून बाजूस टाकावे. पुरूषांचे तसे असणे व तिचे जे काही चालले आहे, ह्यांचा अजिबात परस्पर संबंध नाही.

श्रावण मोडकांनी सुचवल्याप्रमाणे ही मुलगी हे असले सगळे असंबंधित प्रश्न उगाच येथे घुसडून स्वतःच्या कृतिचे जस्टिफिकेशन करीत आहे. हे ती अगदी मुद्दाम ठरवून करत असेल असेच नव्हे. पण ती सुशिक्षित आहे, आणि म्हणूनच आपल्या बर्‍या वाईट कृत्यांचे, वर उल्लेखिलेल्या खांबांच्या आधारे समर्थन करण्याची मखलाशी तिच्यात अगदी नकळतही येऊ शकते. हीच जर अशिक्षित मुलगी असती, तर ती ही असली अनेक (मूळ प्रश्नापासून दिशाभूल करणारी) कारणे देत बसली नसती.

थोडक्यात ह्या मुलीला समुपदेशन काय करणार? खरे तर ती त्यासाठी लेखकाकडे आलेली नाही. ती आली निव्वळ आईवडिलांच्या समजुतीखातर. समुपदेशनाची जरूरच जर असेल तर ती तिच्या आईवडिलांना. त्यांना त्यांचे मन कठोर करून मुलीशी संबंध तोडण्याचा सल्ला देणे मी तरी यथोचित समजेन. मुलीने अत्यंत समजूतीने चोखाळलेला मार्ग त्यांच्या आचारविचारांच्या चौकटीत बसणारा नाही. आणि मुलगी तिच्या मार्गावर ठाम असल्याने काही तडजोड होणेशी शक्य नाही. किंबहुना ती वेळ केव्हाच निघून गेलेली आहे. हे असे असतांना तिच्याशी संबंध तोडणे हाच एक मार्ग त्यांच्यापुढे आहे. तसे करतांना काही आक्रस्ताळेपणाने करण्याची काहीही जरूरी नाही, हे अगदी गुण्यागोविंदानेही होऊ शकते. खरे तर ते तसेच व्हावे. त्यांनी अगदी शांतपणे मुलीला 'आता ह्यापुढे तुझे व आमचे काहीही संबंध उरलेले नाहीत. तू तुझ्या वाटेवरून पुढे जावे. आणि मागे बघूही नयेस, कारण आता तुझे परतीचे दोर कापले गेलेले आहेत' असे सांगावे. हे क्लेशकारक आहे हे खरे, पण तोच माझ्या मते रास्त मार्ग आहे.

जाता जाता, माझ्या माहितीची एक अगदी सुशिक्षित, चांगल्या घरातील तरूण मुलगी (चांगली लॉ शिकलेली व वकिली करत असलेली) हाच एस्कॉर्टींगचा 'व्यवसाय' ८० च्या दशकात करत होती. तेव्हा आता इतक्या दशकांनंतर ह्या केसमधे अगदी सेन्सेशनल काय आहे, हे मला उमगले नाही. तसेच आपल्याकडे आलेल्या केसचा , विशेषतः ती अगदी ताजी असतांना, इतका जाहीर पंचनामा करणे कितपत एथिकल आहे, ह्याबद्दलही मला प्रश्न आहे.

मुक्तसुनीत's picture

27 Apr 2009 - 7:29 am | मुक्तसुनीत

प्रदीप यांनी प्रस्तुत मुलीच्या संदर्भात जे विश्लेषण केलेले आहे ते मला पटते. मात्र कुठल्याही भावनिक उलथापालथीशिवाय आईवडिलांनी संबंध तोडणे अशक्य कोटीतले आहे. "विवेकाने वागावे" हे म्हणणे अर्थातच तर्काधिष्ठित आहे. पण भावनाविरहित होऊन निर्णय घेण्याकरता माणसांनी संत किंवा यंत्र बनायला हवे.

जाता जाता, माझ्या माहितीची एक अगदी सुशिक्षित, चांगल्या घरातील तरूण मुलगी (चांगली लॉ शिकलेली व वकिली करत असलेली) हाच एस्कॉर्टींगचा 'व्यवसाय' ८० च्या दशकात करत होती. तेव्हा आता इतक्या दशकांनंतर ह्या केसमधे अगदी सेन्सेशनल काय आहे, हे मला उमगले नाही.

कॉलगर्ल्स ही संज्ञासुद्धा जुनीच म्हणायला हवी. मूळ लेखकाने ही अशा प्रकारची पहिली , एकमेव घटना आहे असे म्हण्टल्याचे माझ्या वाचनात आलेले नाही. लेखाचे लेखक याप्रकारचे काही काम करतात. त्यांना आलेला अनुभव ते आपल्यासमोर मांडत आहेत. यामधे त्यांचे काही चुकत आहे , काही अनुचित घडते आहे किंवा काही अनावश्यक आहे असे मला वाटत नाही. लेखकाची शैली प्रत्येकाला आवडणारी नाही ( मला स्वतःला ती खटकते.) पण असे विषय लोकांसमोर येत आहेत आणि या इंटरॅक्टिव्ह माध्यमात त्याबद्दल चर्चा घडते आहे हे मला व्यक्तीशः महत्त्वाचे वाटते.

तसेच आपल्याकडे आलेल्या केसचा , विशेषतः ती अगदी ताजी असतांना, इतका जाहीर पंचनामा करणे कितपत एथिकल आहे, ह्याबद्दलही मला प्रश्न आहे.
या केसमधे लेखकाने त्या मुलीचे नाव-गाव, आईवडलांची ओळख कुठे देतात असे दिसले नाही. मुद्दा सामाजिक समस्येचा , "सोशल फॅब्रिक"चा आहे (असे मला वाटते.) मला यात लेखकाच्या नैतिकतेचा प्रश्न येतोसे वाटले नाही.

प्रदीप's picture

27 Apr 2009 - 9:32 am | प्रदीप

आई वडिलांनी अगदी आतून कोरडे होऊन मुलीशी संबंध तोडावेत असे माझ्या प्रतिसादातून ध्वनित होत असेल तर ती माझी चूक आहे. मुलीला तोडले तर पाहिजेच आणि त्यात क्लेश खूप आहेत असे मी म्हटलेच आहे. फक्त त्या मुलीसमोर त्यांनी हे दर्शवू नयेत. अत्यंत शांतपणे (ज्या शांतपणे तिने तिच्या आईवडिलांना तिची बाजू सांगितली त्याच शांतपणे) त्यांनी तिला त्यांचा निर्णय सांगावा. आक्रस्ताळेपणा करून काही फायदा नाही. ती घर सोडून निघून गेल्यावर त्यांचा बांध फुटेलच, तो जरूर फुटू द्यावा. त्या मुलीसमोर असले काही नको. असे केल्याने तिलाही जाण आलीच की ज्या थंडपणे आपण स्वतःचे निर्णय अत्यंत स्वार्थीपणे घेऊ शकतो, तसेच ते इतरही घेऊ शकतात, तर ते तिच्यासाठी चांगलेच आहे. तेव्हा तेव्हढ्यापुरते जरूर आईवडिलांनी यंत्रवत व्हावे!

लेखकाची शैली प्रत्येकाला आवडणारी नाही ( मला स्वतःला ती खटकते.) पण असे विषय लोकांसमोर येत आहेत आणि या इंटरॅक्टिव्ह माध्यमात त्याबद्दल चर्चा घडते आहे हे मला व्यक्तीशः महत्त्वाचे वाटते.

मला ही लेखनशैली बरीच खटकली. अत्यंत दु:खदायक अशी ही समस्या एका कुटुंबापुढे उभी असतांना त्याबद्द्दल गांभिर्याने लिहीणे वेगळे व त्याचे इथे झाले आहे तसे सेन्सेशनायलेझन करणे वेगळे. असे विषय लोकांसमोर जरूर यावेत व त्याबद्दल गांभिर्याने उहापोह जरूर व्हावा. त्यात मारूति, तोंडात बोट इ. इ. घातले की त्या व्यथेची धार कमी होते. त्यातून त्या मुलीने जे सगळे काहीबाही स्वसमर्थनार्थ म्हटले आहे, ते लेखकाने स्वतःच बाजूस केले असते तर तो लेख खरोखरीच सामाजिक व्यथेची मांडणी करणारा झाला असता.

हा लेख त्या मुलीने वाचला तर तिला काहीही वाटणार नाही, ह्या मुक्तसुनितांच्या मताशी मीही संपूर्ण सहमत आहे. प्रश्न त्या मुलीचा नाही, तिच्या आईवडिलांचा आहे. हे सगळे इथवर आले तरीही त्यांना काहीही सुगावा नव्हता, असे मानणे कठीण वाटते. तेव्हा दोष त्यांचाही आहेच. पण अशा परिस्थितीत आईवडील हतबल होतात, काहीतरी चुकते आहे हे उमजत रहाते, पण ते कसे निस्तरायचे हे कळेनासे होते. ह्याचा उल्लेख श्री. प्रभूंनी खाली एका प्रतिसादात केला आहे. ह्याबाबातीत टीन एजर्सशी सदैव सुसंवाद सुरू ठेवणे हे महत्वाचे.

विनायक प्रभू's picture

27 Apr 2009 - 8:40 am | विनायक प्रभू

हा नुसता एखादा अनुभव नाही हो कर्क साहेब.
रोज प्रमाण वाढते आहे म्हणुनच लेखाचा खटाटोप.
पालकांना ह्या समस्येला तोंड कसे द्यायचे हे समजतच नाही.
अर्थात सर्व काही वरील केस प्रमाणे नाही. पण बरेच साम्य दिसुन येत आहे.

> सर तुमचा लेख वाचला आणि त्याच्या वरच्या अनेक प्रतिक्रिया हि वाचल्या.
> एक चित्रपट आहे Mumbai to Bangkok.. श्रेयस तळपदे चा नवा आहे.......
> त्यात त्याचे एका local massage parlour मधे काम करणार्‍या तरुणी वर प्रेम बसते........ति मुलगी दिवसा mdical camp मधे volenteer म्हणून काम करते नि रात्री तिथे......
> ह्याला जेंव्हा जाणवते कि आपण तिच्यात गुंतलो आहोत तेंव्हा तिचा व्यवसाय त्याचा डोळ्यासमोर येतो आणी तो तिला ते सोडण्या संबधी विचारतो.........ति जे उत्तर देते मनाला विचार करायला लावणारे आहे...तुम्ही जरुर पहा हा चित्रपट ............
> she says समाजात प्रत्येक जण केवळ पैसे मिळ्वण्यासाठीच काम करतो.... to earn living...to support the family needs. everone has professional skills we enhance them use them at work place... in other words we utilize our professional skils and knowledge to work and satisfy our customers.. and get or earn our salaries............
> in short we sell our skills and earn money..........there is nothing wrong in it............. a doctor sales his medical skills....a painter sales his painting skills and that satistes their respective clients.........so if u view this from that angle there is nothing worng in what i do.
>
> the girl u have mentioned in the story ..........she has with and firm and stable mind has taken the decision and she is fully aware about the consequences and also seems to be ready to bear them.............whether she has a psychological problem i am not the one who can comment but if she has ......then the boys who work as gigolo also have the same problem...........they r also doing it for the moeny.......त जर समाजात मान वर करुन फिरतात तर टिकेची झोड फक्त ह्या मुलीवर का ? केवळ ति स्त्री आहे म्हणून ? समाज सगळ्यांचा बनतो त्या उच्चभ्रु .. गरिब ..शिकलेली.. न शिकलेले......आस्तिक........ नस्तिक ...सगळे येतात.... प्रत्येकाला समाजात स्थान आहे आणि मान आहे मग वैश्याना ह्या समाजाचा हिस्सा का मानले जात नाही? ह्याच समाजातले लोक त्यांच्याकडे जातात ते चांगले ह्या वाईट?
> ह्या मुलिला सर्व परिणामांची कल्पना आहे तरिहि तिने स्वतः हा निर्णय घेतला आहे.
> तिला वैश्या म्हणणे कितपत योग्य आहे..........आणि तसे असेल तर तिचे क्लायंट्स ते कोण ? ते समाजात ताठ मानेने वावरणारेच आहेत ना?
>
> मर्यादा... नियम बंधन हे सगळ्यांना सारखेच असावेत स्त्रियांना आणि पुरुषांना वेगळे नियम लागु नसावेत.
> जत वैश्या वाईट आहेत तर वैश्या गमन करणारे त्यहुन वाईट असतात असा मला वाटते....
>
> आपल्याला आलेल्या अनेक प्रतिक्रिया मधे त्या मुलिला .blame केला आहे.. .......for the wy her thought process goes.....all called her prostitute and what not......no one has uttered a work about then men who are her clients? what about them? no one has blamed them........conviniently.
>
> also some said about her parents...आई वडील कमि पडले संस्कार करण्यात ह्या सारखा हास्यास्पद मुद्दा मला वाटत दुसरा नाहि.
> कोणतेही आई बाप आपल्या मुलांना असे संस्कार देत नाहित्..........त्यांच काम असते ते योग्य अयोग्य काय ते समजावणे.........त्यातुन काय घ्यायचे हे त्या मुलांवर असते..........आईबाप मुलांना पाण्यापर्यंत घेउन जाउ शकतात ... शेवटी प्यावा त्यांना स्वतःच लागत ना..........
>
> जसे दारु सिगरेट वाईट असते.... किंवा तंग कपडे घालुन जाउ नको बाहेर हे पालक सांगु शकतात पण मुलांना ते करायचे तर ते करतातच ना.... कित्येक मुले चोरुन दरु पितात किंव सिग्रेट ओढतात तसेच मी अश्याही मुलि पहिल्या आहेत कि ज्या घरुन निघाल्यावर बहेर कपडे बद्लुन कॉलेज ला जातात........
>
> पालकांना दोष देणे योग्य नाही.
>
> the concept of right or wrong changes with person to person its a relative term to that extend..........so its better for us to follow what we feel is true..........or right and once we chose the path only we ourselves are responsible for the consequences good or bad whatever it may be......ज का हे परिणाम भोगयची तयारी असेल तर जरूर आपल्याला योग्या वाटेल त्या वाटेवर जावे.........कोणाचीही पर्वा न करता.......आणी कोणाला हि दोष न देता.........
>
> मला वाटते त्या मुलिने हेच केला आहे आणि ति त्याची पुर्ण जवाबदारी ति घेते आहे कोणालाही दोष न देता.........तिला तिचा मार्ग निवडलाय्..........तिचि कोणवरही जबरदस्ती नाहि कि मला स्विकारा ... मी आहे हि अशि आहे........स्विकारा व नाकारा.........माझि दोन्हिला तयारी आहे......ति आई वडीलांना दोष हि देत नाहिये.........
> माग तिने तिचे आयुष्य स्वतःच्या टर्मस वर जगले तर तिला पुर्ण हक्क आहे तसे करण्याचा.
>
> मला लेख आवडला तुमचा.... सामाजिक चौकटीच्या बहेर जाउन विचार करायला लावणारा आहे...............

सर तुमचा लेख वाचला आणि त्याच्या वरच्या अनेक प्रतिक्रिया हि वाचल्या.
एक चित्रपट आहे Mumbai to Bangkok.. श्रेयस तळपदे चा नवा आहे.......
त्यात त्याचे एका local massage parlour मधे काम करणार्‍या तरुणी वर प्रेम बसते........ति मुलगी दिवसा mdical camp मधे volenteer म्हणून काम करते नि रात्री तिथे......
ह्याला जेंव्हा जाणवते कि आपण तिच्यात गुंतलो आहोत तेंव्हा तिचा व्यवसाय त्याचा डोळ्यासमोर येतो आणी तो तिला ते सोडण्या संबधी विचारतो.........ति जे उत्तर देते मनाला विचार करायला लावणारे आहे...तुम्ही जरुर पहा हा चित्रपट ............
she says समाजात प्रत्येक जण केवळ पैसे मिळ्वण्यासाठीच काम करतो.... to earn living...to support the family needs. everone has professional skills we enhance them use them at work place... in other words we utilize our professional skils and knowledge to work and satisfy our customers.. and get or earn our salaries............
in short we sell our skills and earn money..........there is nothing wrong in it............. a doctor sales his medical skills....a painter sales his painting skills and that satistes their respective clients.........so if u view this from that angle there is nothing worng in what i do.

the girl u have mentioned in the story ..........she has with and firm and stable mind has taken the decision and she is fully aware about the consequences and also seems to be ready to bear them.............whether she has a psychological problem i am not the one who can comment but if she has ......then the boys who work as gigolo also have the same problem...........they r also doing it for the moeny.......त जर समाजात मान वर करुन फिरतात तर टिकेची झोड फक्त ह्या मुलीवर का ? केवळ ति स्त्री आहे म्हणून ? समाज सगळ्यांचा बनतो त्या उच्चभ्रु .. गरिब ..शिकलेली.. न शिकलेले......आस्तिक........ नस्तिक ...सगळे येतात.... प्रत्येकाला समाजात स्थान आहे आणि मान आहे मग वैश्याना ह्या समाजाचा हिस्सा का मानले जात नाही? ह्याच समाजातले लोक त्यांच्याकडे जातात ते चांगले ह्या वाईट?
ह्या मुलिला सर्व परिणामांची कल्पना आहे तरिहि तिने स्वतः हा निर्णय घेतला आहे.
तिला वैश्या म्हणणे कितपत योग्य आहे..........आणि तसे असेल तर तिचे क्लायंट्स ते कोण ते समाजात ताठ मानेने वावरणारेच आहेत ना?

मर्यादा... नियम बंधन हे सगळ्यांना सारखेच असावेत स्त्रियांना आणि पुरुषांना वेगळे नियम लागु नसावेत.
जत वैश्या वाईट आहेत तर वैश्या गमन करणारे त्यहुन वाईट असतात असा मला वाटते....

आपल्याला आलेल्या अनेक प्रतिक्रिया मधे i saw everyone has blamed the girl ........for the wy her thought process goes.....all called her prostitute and what not......no one has uttered a work about then men who are her clients? what about them? no one has blamed them........conviniently.

also some said about her parents...आई वडील कमि पडले संस्कार करण्यात ह्या सारखा हास्यास्पद मुद्दा मला वाटत दुसरा नाहि.
कोणतेही आई बाप आपल्या मुलांना असे संस्कार देत नाहित्..........त्यांच काम असते ते योग्य अयोग्य काय ते समजावणे.........त्यातुन काय घ्यायचे हे त्या मुलांवर असते..........आईबाप मुलांना पाण्यापर्यंत घेउन जाउ शकतात ... शेवटी प्यावा त्यांना स्वतःच लागत ना..........

जसे दारु सिगरेट वाईट असते.... किंवा तंग कपडे घालुन जाउ नको बाहेर हे पालक सांगु शकतात पण मुलांना ते करायचे तर ते करतातच ना.... कित्येक मुले चोरुन दरु पितात किंव सिग्रेट ओढतात तसेच मी अश्याही मुलि पहिल्या आहेत कि ज्या घरुन निघाल्यावर बहेर कपडे बद्लुन कॉलेज ला जातात........

पालकांना दोष देणे योग्य नाही.

the concept of right or wrong changes with person to person its a relative term to that extend..........so its better for us to follow what we feel is true..........or right and once we chose the path only we ourselves are responsible for the consequences good or bad whatever it may be......ज का हे परिणाम भोगयची तयारी असेल तर जरूर आपल्याला योग्या वाटेल त्या वाटेवर जावे.........कोणाचीही पर्वा न करता.......आणी कोणाला हि दोष न देता.........

मला वाटते त्या मुलिने हेच केला आहे आणि ति त्याची पुर्ण जवाबदारी ति घेते आहे कोणालाही दोष न देता.........तिला तिचा मार्ग निवडलाय्..........तिचि कोणवरही जबरदस्ती नाहि कि मला स्विकारा ... मी आहे हि अशि आहे........स्विकारा व नाकारा.........माझि दोन्हिला तयारी आहे......ति आई वडीलांना दोष हि देत नाहिये.........
माग तिने तिचे आयुष्य स्वतःच्या टर्मस वर जगले तर तिला पुर्ण हक्क आहे तसे करण्याचा.

मला लेख आवडला तुमचा.... सामाजिक चौकटीच्या बहेर जाउन विचार करायला लावणारा आहे...............

प्रदीप's picture

27 Apr 2009 - 8:45 pm | प्रदीप

आपण व दुसर्‍या ह्याच विषयाला धरून सुरू झालेल्या एका धाग्यात कालिंदीबाई ह्यांनी चर्चेचा मूळ रोख समजावून न घेता भलत्याच दिशेने बाण सोडले आहेत. ही चर्चा ती केवळ स्त्री आहे याकारणास्तव प्रभूंनी सुरू केली आहे, असे अजिबात त्यांच्या लेखात अभिप्रेत झालेले नाही. तसेच वरील अनेक (एखादुसरा अपवाद असेल, मी सर्वांसाठी बोलू शकत नाही) प्रतिसादातही त्या व्यक्तिच्या स्त्रीत्वाचा उल्लेख असला (कारण तिथे 'ती' तीच आहे म्हणून) तरी 'स्त्री असे करते कसे?' असा रोख व्यक्त होतो आहे असे कुठे दिसलेले नाही. तिला वेश्या म्हणावे की काय वगैरे बरीच चर्चा झालेली आहे. पण आता असे करा: 'ती' च्या जागी 'तो' वाचा. वेश्या हा शब्द तसाच राहू द्या, त्या गिगोलोंच्या संदर्भात. मग असे आढळेल की मूळ लेखाचा गाभा व (बहुतांश) प्रतिसादांचा गाभा थोडाही बदलत नाही आहे. थोडक्यात ह्या मुलीचा जागी एक मुलगा असता व त्याने हे असे केले असते तरी आम्ही त्या मुलीला जी दूषणे दिली आहेत, ती त्याला दिली असती. ह्याचे कारण ती/तो जे करत आहे, ते सर्वसाधारणपणे मान्य असलेल्या मूल्याना धक्का पोहोचवणारे आहे.

आई वडिल एका ठराविक लिमीटपर्यंत मुलांना/ मुलींना बर्‍या-वाईटाची माहिती देऊ शकतात, ह्यापुढे सर्व त्या व्यक्तिंवरच अवलंबून असते, हे बरोबर. पण मुलांना बरे वाईट काय आहे, हेच जर फार वरवरच दर्शवले गेले असेल, तर ती मुले भरकटू शकतात. तसे न होऊ देण्यासाठी टीन- एजर्सशी सुसंवाद करत रहाणे जरूरीचे आहे. आता येथे जी कहाणी आहे, तिच्यात तसा फारसा घडत नसावा असे दिसते. ही मुलगी ज्या थराला जाऊन तिचा 'व्यवसाय' करत आहे, तो तिथपर्यंत पोहोचण्यास काही अवधी लागलाच असणार. मधल्या अनेक पायर्‍या तिने पार केल्या असणार, आणि ह्या सर्व वेळात ती घरातच रहात होती. तेव्हा आई वडीलांना तिचे 'काहीतरी वेगळे'च चालले आहे, ह्याबद्दल अजिबात कल्पना नसावी हे पटत नाही. घोड्याला तुम्ही पाणवठा दाखवू शकता, त्याची तहान भागवण्यासाठी तुम्ही स्वतः पाणी पिवू शकत नाही, हे अगदी खरे. पंण इथे घोड्याला पाणवठ्याचा रस्ताच मुळी नीट दाखवला न गेल्याने तो (ती) भरकटला (ली) आहे, व वाटेत आलेल्या घाण पाण्याच्या डबक्यावर तहान भागवून घेत आहे. (आता इथे ती जे करते आहे, त्याबद्दल आपण कशी जजमेंट देणार, हा मूलभूत प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्याचे उत्तर मी तरी असे देईन की शेवटी आपली एक नैतिक बॉटम लाईन असते, ती नुसती जुन्या बुरसटलेल्या वगैरे कल्पनांवरच आधारित आहे असे नाही. आपल्या समाजात कालानुरूप बर्‍याच सुधारणा झाल्या आहेत, होत आहेत. तरीही नैतिक दृष्ट्या बर्‍या वाईटाची एक बॉटम लाईन आहेच आणि तशी ती असावीच. तसे नसले तर समाजाची वीणच उलगडू लागेल. आणि प्रत्येकाने वैयक्तिक स्वार्थासाठी केलेले कसलेही कृत्य समर्थनीय म्हणावे लागेल).

आता राहिला तुमच्या प्रतिसादातील काही वैचारिक गोंधळः

(१) ज्या दुर्दैवी स्त्रिया (अथवा पुरूष) परिस्थितीमुळे वेश्या बनतात, त्यांच्याबद्दल सहानभुतिच आहे (empathy). इथे तसे झालेले नाही. ही व्यक्ति स्वतःहून केवळ चैन अथवा/ आणि शरिरसुख भागवण्याचा मार्ग म्हणून वेश्याव्यवसाय करीत आहे.

(२) तुम्ही वर्णन केकेल्या चित्रपटाबद्दल मला काहीही माहिती नाही, पण तुमच्याच वर्णनावरून एक जाणवते ते हे की मस्सज पार्लरमध्ये काम करणारी स्त्री वरील (१) ह्या कॅटेगरीतील असावी. तिच्या विषयी येथे चर्चा चाललेली नाही.

चित्रा's picture

28 Apr 2009 - 4:52 am | चित्रा

हे सर्व वाचून या मुलीला केवळ प्रेम आणि समाजमान्यता हवी आहे असे वाटले. (ते मिळवण्याचा हा धरलेला मार्ग कितीही बरोबर नसला तरी). आईवडिलांकडून प्रेम आणि भविष्यातील (स्वप्नातील) जोडीदाराकडून एवढे प्रेम की तो हे सर्व विसरून लग्न करेल.. असे होणे अशक्य नाही, पण कठीण आहे, हे तिलाही माहिती असावे.

तिने पुरूषांना गलिबल फूल्स म्हणणे योग्य वाटले नाही. हेच एखाद्या पुरूषाने स्त्रियांना म्हटले असते तर तिच्याकडे सहानुभूतीने पाहणार्‍या व्यक्तींनी अशा पुरूषाकडे सहानुभूतीने पाहिले असते असे नाही. ज्या पुरूषांना ती गलिबल फूल्स समजते त्याचपैकी एका पुरूषाशी लग्न करावे असे तिला वाटते आहे, ही अजून एक आश्चर्यकारक गोष्ट. तिने याचाही विचार करावा.

स्त्री असण्याच्या "शक्तीची" जाणीव तरूण वयात होणे अस्वाभाविक नाही, पण ती एकुलती एक महत्त्वाची गोष्ट तिच्या आजवरच्या आयुष्यात घडली आहे अशा प्रकारचे तिचे वागणे आहे. सल्ला देण्यासारखा नाही, तिने तिला तिच्या ज्या अचीव्हमेंटस वाटतात त्याचा आढावा घ्यावा एवढेच सुचवावेसे वाटते. कदाचित अशा गोष्टी तिला स्वतःशीच कबूल कराव्या लागतील ज्याकडे कदाचित नकळत कदाचित जाणीवपूर्वक ती दुर्लक्ष करते आहे.

Some boys kiss me, some boys hug me
I think theyre o.k.
If they dont give me proper credit
I just walk away

They can beg and they can plead
But they cant see the light, thats right
cause the boy with the cold hard cash
Is always mister right, cause we are

Chorus:

Living in a material world
And I am a material girl
You know that we are living in a material world
And I am a material girl

Some boys romance, some boys slow dance
Thats all right with me
If they cant raise my interest then i
Have to let them be

Some boys try and some boys lie but
I dont let them play
Only boys who save their pennies
Make my rainy day, cause they are

(chorus)

Living in a material world [material]
Living in a material world
(repeat)

Boys may come and boys may go
And thats all right you see
Experience has made me rich
And now theyre after me, cause everybodys

(chorus)

A material, a material, a material, a material world

Living in a material world [material]
Living in a material world
(repeat and fade)