As far as I am concerned, the child is absolutely normal. There are no strong triggers to confirm DYSFUNCTION>DISORDER>REBELLION>CHAOS THERORY. There is no random instance leading to another random instance and therfore traceble pattern to confirm chaos theory. May be the pattern is yet to emerge. And nothing is wrong in desire to leave a life with own Terms. In the mean time what do I tell the parents.
केस हाताळ्णारे डॉक्टर म्हणाले.
_____________________________________________________
मी कुमारीका नाही. मी पुरुष द्वेष्टी पण नाही. 'निंफोमॅनीयॅक' तर नाहीच नाही. सातवीत असताना मला माझ्या 'फीमेल पॉवरची" जाणीव झाली.. नक्की कारण सांगता येत नाही. वरच्या मजल्यावरील आजोबा जरा जास्तच रोखुन बघायचे.
Males are gullible fools. Most of the time women are merely a concquest for them. They carry that 18 year Boy in them. The ego of being a man, and the proof of it is their existance. And they are so proud of the tools of the conquest nature has provided.
मी काही 'रातराणी' नव्हे.इथे चॉइस माझा असतो. ती माझी मानसिक आणि शारिरिक गरज असते. भेटलेल्या सर्व पुरुषाबरोबर माझे संबंध असतात असे नाही. बर्याच वेळेला मी एका चांगल्या मित्राची किंवा थेरपीस्ट ची भुमिका बजावते.
माझे एक क्लायंट मला महीन्यातुन एकदा भेटतात. ५ स्टार मधे रुम बुक असते. नुसते हात हातात धरुन बोलतात. त्यांच्या समस्याना माझी उत्तरे बरोबर निघतात. जास्तीत जास्त मांडीवर डोके ठेउन झोपतात. आता ह्या बदल्यात त्यांनी मला गेल्या दोन वर्षात सुमारे दोन लाख रुपये मला दीलेत. नाकारावेत काय? आजारी कोण तो का मी?
तुम्ही बॉन जोवी चे इट्स माय लाईफ बघितले आहे का?
मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचे आहे. ते सर्वमान्य चौकटीत बसत नाही ह्याची मला संपुर्ण कल्पना आहे. चौकट निर्माण करणारे स्व:त ह्या चौकटीत बसतात काय?
बाबा कधी कधी अगदी टीपिकल मेल चुवानिस्ट पिग सारखे वागतात. आईला राग येतो. मारावेसे सुद्धा वाटत असेल. मी मारते.
जरा बोलले की अंगचटीला येणार्यांच्या थोबाडीत वाजवायला मी अजिबात कचरत नाही. आय ऍम द पॉवर. आय ऍम द कंट्रोल.
तसे मी २५ चे मित्र सहसा टाळते. ४०+ चे पुरुष बरे वाटतात. 'गिल्ट कॉम्प्लेक्स' ने पछाडलेले. 'जस्टीफिकेशन"' मधे गुंतलेले.
जरा अवातार काढला की पुरे. एकदम थंड.
आईला मी एकदा विचारले होते, काय ग तुला १६ वर्ष ते लग्न होईपर्यंत एखादा पुरुष खुपच हवाहवासा वाटला होता का?
उत्तर नाही मिळाले ह्यातच सर्व काही आले.
माझी आय़.क्यु १६५ आहे. इंजीनियरीग ची ऍड्मिशन मी नाकारली. हो उद्या रागाउन घराबाहेर काढले तर मला परवडायला पाहीजे ना तो खर्च.
आज बी.एस्.सी. कॉम्प. करत आहे. आत्तापासुन जी.आर्.इ ची तयारी सुरु केली आहे. स्वबळावर मी परदेशी जाणार हे ऩक्की.
माझ्या कॉलेज मधे चार मुलगे आपल्या चैनीसाठी 'गिगोलो' चे काम करतात. त्यांना पण कौंसेलिंग ची गरज आहे का?
मी हाडामांसाची आहे. माझ्याकडे असे 'सोन्याचे' असे काहीही नाही. ज्याच्या वापराने त्याची प्रत कमी होणार कि वजन कमी होणार.
उद्या वाटले तर मी माझा भुतकाळ विसरुन माझ्याशी प्रामाणिक राहील अशा पुरुषाबरोबर लग्न सुद्धा करीन. जोपर्यंत पालकत्वाची जबाबदारी संपुर्णपणे संभाळायची ताकद येत नाही तो पर्यंत मुलांचा विचार नाही.
कौमार्य म्हणजे काय? ते हरवते म्हणजे काय?
पैसे असलेली हातातली पर्स? मोबाईल?
आणि मी ती एकट्यानेच हरवले काय? जोडीदाराचे काय?
आणि मी ते ९ वीत पहिल्यांदा हरवले आणि त्यांत मला आनंद मिळाला हे मी कबुल करते ह्यात धक्का बसण्यासारखे काय?
नेट वर स्क्रेपबुक मधे दोनदा हॅलो केल्यावर लगेच "आती क्या खंडाला" म्हणणार्याना नितीमत्ता लागु नसते का?
आणि अशांच्या घरातील बायकांचे काय? त्यांनी उद्या असे केले तर हेच नियम लागु होतील का?
मला सिस्टीम चा राग नाही.मी स्विकारलेलीआहे ती नाईलाजाने. कारण ते बदलायची शक्ती माझ्या कडे नाही. आणि मला त्याची गरज पण वाटत नाही.
मी पर्वट नाही हे माझ्या पालकांना सांगाल का? त्यांच्या शक्ती पलीकडचे आहे माझे वागणे. निव्वळ त्यांना बरे वाटावे म्हणुन आले मी तुमच्या कडे. आय होप यु हॅव राइट वर्डस फॉर देम सो दॅट देअर लाईफ विल नॉट बी मिझरेबल.
जाता जाता: मिपाकरहो, मारुती च्या तोंडात बोट आहे. तो काही बोलु शकत नाही. बघा पालकांना काही सल्ला देतो येतो का तुम्हाला.
प्रतिक्रिया
23 Apr 2009 - 7:09 am | नितिन थत्ते
नि:शब्द झालो वाचून.
एकच. ती जेव्हा स्थिर होण्याचा विचार करेल, भूतकाळ विसरायचा म्हणेल, तेव्हा कोणी ऐकून घ्यायला तयार असेल का?
खराटा
(रंग माझा वेगळा)
23 Apr 2009 - 7:22 am | विनायक प्रभू
नक्की मिळेल.
23 Apr 2009 - 7:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
जगात एकाच मुलीने एवढे समंजस, हुशार असावे आणि विचार करावा असं होत नाही. शोधलं तर बरेच सापडतात, नाही शोधलं तरीही सापडतातच.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
23 Apr 2009 - 7:47 am | वेदनयन
प्रभुंचा मारुती झाल्यावर आपण कुठपर्यंत पोहोचणार?
23 Apr 2009 - 7:56 am | काळा डॉन
मारुती होणे म्हणजे नक्की काय?
27 Apr 2009 - 8:54 pm | इनोबा म्हणे
>>मारुती होणे म्हणजे नक्की काय?
मारुती बालब्रह्मचारी होता म्हणे! इथे 'सेक्स' या एकाच विषयावर लिहीणार्या व्यक्तीचाही 'मारुती' होतो हे ऐकुन प्रत्यक्ष मारुतीचाही मारुती झाला असेल.
27 Apr 2009 - 9:23 pm | अभिज्ञ
मोरु होणे ऐकले होते परंतु हे मारुति होणे प्रथमच ऐकतोय.
बर असो.
सर्वांनी लवकर आटपा नाहितर नवीन धागा काढा.
हे मारुतीच्या शेपटावानी धागा व पाने वाढतच चालली आहेत.वाचायला त्रास पडतो.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
23 Apr 2009 - 7:48 am | मुक्तसुनीत
- मुलीने जो रस्ता निवडला आहे तो डोळसपणे निवडला आहे असे म्हणता येईल. कुणाची जोर-जबरदस्ती दिसत नाही. आणि कुणी भुलवून , गंडवून केल्याचे भासत नाही.
- याचा अर्थ , तिच्या आयुष्यातले पैशाचे अमर्यादित महत्त्व तिने स्वतःपुरते पक्के केले आहे. तिला आर्थिक स्वावलंबन - थोडक्यात हवे तसे जगायला पैसा - आता हवा आहे.
- सामान्यतः या कोवळ्या वयात मुलामुलींच्या मनात जीवनाचा साथीदार-संसार-मुले-सुखी आयुष्य इ. इ. ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना मौजूद आहेत; मात्र त्या संकल्पनांमधला निरागसपणा अस्तित्त्वात दिसत नाही. बाजारातून गाडी-फ्रिझ सारख्या गोष्टी आणण्याचे तुम्ही आम्ही प्लान्स आखतो तसे ती बोलून दाखवते.
वर उल्लेखिलेले मुद्दे म्हणजे मी त्या मुलीबद्दल दिलेले जज्जमेंट् नव्हे. ही निरीक्षणे आहेत. मोजमाप नाही. मात्र काही प्रश्न मनात आहेत.
या मुलीला नक्की काय हवे आहे ? ती काही गरीब दिसत नाही. सुखवस्तू घरातली आहे. (हे अर्थात फार सब्जेक्टीव्ह बोलणे झाले. आपल्यापेक्षा कुणीतरी जास्त श्रीमंत, जास्त फॅशनेबल, जास्त आकर्षक या जगात असतेच. जसे आमीर खानला शारुख आहे नि शारुखला आमीर. धिक् ताम् च तम् च मदनं च वगैरे वगैरे ) थोडक्यात , हे "पिअर प्रेशर" मधून येते का ? की महत्त्वाकांक्षेतून ? ही कुठल्या प्रकारची महत्त्वाकांक्षा आहे ? मराठी नट्यांपैकी काही नट्यांनी निव्वळ अंगप्रदर्शन करून मिळवलेले नाव आणि या प्रकारच्या महत्त्वाकांक्षेचा काही संबंध असू शकतो का ? ( तसा संबंध पूर्णपणे जोडता येणे अशक्य आहे. कारण काहीही झाले तरी या नट्यांना नाव-प्रसिद्धी मिळालेली आहे. आणि बहुदा यापैकी अति-यशस्वी नट्यांना ज्या स्तराचा धनलाभ होतो तितका या वेश्या-सदृष वृत्तीतून होणार नाही. maybe , she will have to be a really high end hooker to get into that financial stratosphere. )
थोडे अधिक मूलभूत प्रश्न : इतक्या भीषण , झपाट्याने कालबाह्य होणार्या मूल्यांच्या या काळात , एकंदर निरागसता , honor या गोष्टींचे नव्या पीढीला वाटणारे महत्त्वदेखील खूप वेगाने संपुष्टात येत असावे काय ? ही मूल्ये आपल्या आयुष्यात चिरस्थायीच असतात असे माझे म्हणणे नाही. आपला भ्रमनिरास होतोच केव्हातरी. पण कोवळ्या वयात इतकी निर्मम आणि बाजारू वृत्ती ... हे सर्व कोठून येत असेल ?
23 Apr 2009 - 9:40 am | आनंदयात्री
सुरेख प्रतिसाद. इतका व्यवस्थित विचार करु नव्हतो शकलो, किंबहुना तेवढी प्रगल्भताही नाही. पण वर मांडलेल्या तुमच्या विचांरांशी सहमत असे जरुर म्हणावे वाटते.
>>पण कोवळ्या वयात इतकी निर्मम आणि बाजारू वृत्ती ... हे सर्व कोठून येत असेल ?
कथा वाचुन होणारे क्लेश याच प्रश्नामुळे आहेत हे जाणवले. मुलीचे कौतुक करणारे प्रतिसाद जरुर येतिल पण असे कौतुक करुन आपण जाणते अजाणते पणे कशाला खतपाणी घालतोय याची जाणीव सुज्ञ (निवासी/अनिवासी) भारतीयाला जरुर असली पाहिजे.
>>हे सर्व कोठून येत असेल ?
कदाचित जाणते अजाणते पणे झालेल्या संस्कारातुन.
23 Apr 2009 - 1:16 pm | छोटा डॉन
असेच म्हणतो ...
मुलीच्या "आय क्यु" आणि निर्णयक्षमतेचे आणि तिच्या स्वतःबद्दल काय चांगले-वाईट ठरवण्याच्या गॄहीतकांचे जरुर कौतुक होऊ शकते.
पण हे बरोबर आहे का हा प्रश्न आहे.
आम्ही अगदीच प्रत्येक गोष्टीत "उदात्त संस्कॄती आणि संस्कार" ह्यांच्या आणाभाका देत नाही पण हे बरोबर नाही असेच वाटते.
व्यक्तिस्वातंत्र्य आणि विचारस्वातंत्र्य जरुर आहे, कोणीही मनाला पतेल आणि वाटेल तसे निर्णय जरुर घेऊ शकतो पण काही बाबींचा विचार होणार आहे का नाही ?
"स्वातंत्र्य" आणि "स्वैराचार"ह्यातल्या फरक कधी कळणार ? तसेही "इसी मनी"च्या मागे लागगेल्या सो कॉल्ड स्कॉलर ( आयक्यु १६५ आहे भौ, उगाच आहे का ?) मुलीला पैशाच्या धुंदीत हा फरक कळेल अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे मुर्खाच्या नंदनवनात राहण्यासारखे आहे.
असो.
अजुन लेखाच्या अनुषंगाने "ठळठळीत" जाणवलेले प्रश्न :
१. पहिल्या भागात मुलगी आपल्या आईला "तोवर माझी पर्स पहा म्हणजे बर्याच गोष्टी आपोआप समजतील" असे बोलताना दिसते.
अर्थातच पर्समध्ये तिच्या "व्यवसायाला ( सरळ धंदा म्हणु का ? )" लागणार्या गोष्टी/साधने ( नावे लिहाय्ची गरज नसावी ) असणार की जे पाहुन काय आहे ते लगेच कळेल. आपल्या पालकांना अक्से आपल्या पँटच्या खिषात लायटर्/माचीस सापडले की मुलगा आजकाल "स्मोकर" आहे हे कळते त्याच चालीवर मी हे उमजुन घेतले ...
ह्याचा अर्थ सरळसरळ मुलगी "शरिरविक्रीय ( काही प्रमाणात का होईना )" करते हे स्पष्ट आहे ...
मग दुसर्या भागात अचानक "भेटलेल्या सर्व पुरुषाबरोबर माझे संबंध असतात असे नाही. बर्याच वेळेला मी एका चांगल्या मित्राची किंवा थेरपीस्ट ची भुमिका बजावते." ह्या स्पष्टीकरणाला काय अर्थ आहे ? सम्जात असे "नुसते गप्पा मारणारे" क्लायंट्स आहेत, मी हे नाकारत नाही तरीपण ह्याचे समर्थन कसे होऊ शकते ?
उद्य फोरास रोडवरची / बुधवार पेठेतली एखादी वेश्या जर दर गुरुवारी आपल्या कोठ्यावर "गुरुचरित्र पारायण" ठेवत असेल तर काय तिचाही "ह्याच मुद्द्याच्या" अनुषंगाने उदोउदो व्हावा काय ?
मला वाटते की आपण २ "वेगळ्या वेगळ्या गोष्टी" एकाच परिमाणात तोलत असल्याने आपला तोल जात आहे ...
२. बाकी १६५ आयक्यु, इंजिनीयरिंगची सीट नाकारणे, जी आर ई ची तयारी आणि बीएस्ससी कॉम्प चे शिक्षण आणि तिच्या "व्यवसाय" ह्या सर्वस्वी वेगळ्या गोष्टींची सांगड घालुन तिला "निर्दोष" कसे ठरवता येईल ?
म्हणजे समजा मी २ वेळा बोर्डात आलो आहे, इंजिनीयरिंग फस्क्लास पुर्ण केले आहे, अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत, चांगली उच्च नोकरी करतो वगैरे ह्य गोष्टी गॄहीत धरुन समजा "वाटमारी / घरफोडी" सुरु केली तर मला अशीच "सहानभुती" मिळेल का ?
आपण का वेगवेगळ्या पातळीवरच्या गोष्टींची तुलना करत आहोत ?
इनफॅक्ट बिल क्लिंटन तरी काय कमी होते ? पण त्यांनी जे मोनिका ल्युवेन्स्कीबरोबर रंग उघळले त्याचे समर्थन होईल का ?
३.
म्हणजे काय ?
एखादी गोष्ट जरी पटली/सहन झाली नाही तरी लगेच त्याला "असे प्रत्युत्तर" देणे कितपत योग्य आहे ?
मल इथे पुरुषप्रधान संस्कॄती, भारतीय संस्कार ह्या मुद्द्यांवर उहापोह करायचा नाही पण जे काही हालले आहे ते पटण्यासारखे आहे काय ?
माझ्या मते अतिशय "क्षुल्लक व व्हॅलीड" कारणावरुन बाप बोलतो आहे म्हणुन आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेतुन बापावर हात उचलणे हे मुलीच्या "विकॄत, अंध मॉडर्नायझेशन,स्वैराचार आणि मानसीक असंतुलानाचे" स्पष्ट उदाहरण आहे.
कितीही विचार केला तरी मला हे पटेल असे वाटत नाही ...
हे म्हणजे शाळेत मास्तरने शिक्षा केली म्हणुन उद्या मी गन घेऊन जाऊन त्याला गोळ्या घालण्यासारखे आहे ...
( इथे मुलीचे बापाला मारणे काय अथवा गोळ्या घालणे काय हे बापाला समान पातळीवरचे नुकसान पोहचवतात म्हणुन लिहले.)
(केवळ) आपल्याला च पटत नाही म्हणुन "असा विरोध" करणे हे सर्वथा अमान्य आहे ....
मोठ्ठ्या स्केलवर पहाल तर ह्याच अनुषंगाने तालिबान्यांचे, दहशतवाद्यांचे, गुंडाम्चे काय चुकते ? त्यांना पटत नाही "सिस्टीम" म्हणुन ते विरोधात आहेत ? बंदुका वापरतात हे त्यांच्या "आय क्यु" ला सुचलेल हत्यार आहे ?
त्यांच्या आयक्यु हा १६५ असला असता तर त्यांनीही इथे येऊन कुणालातरी "मारले" असतेच ना ?
हे एकाच पातळीवर येत नाही का ?
असो.
अशा सणकी, स्वैराचारी, अनावश्यक, झगमगाटाचे अंध झालेल्या बालीश "बेताल वागण्याचे" समर्थन होऊ शकत नाही हाच मुद्दा आहे व त्यावर आम्ही ठाम आहोत ...
बाकी काय कौतुक कुणाचेही करता येत हो, त्याला काय लागते ?
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
23 Apr 2009 - 2:24 pm | शक्तिमान
१००% सहमत
समर्पक आणि प्रगल्भ प्रतिसाद !
व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्याच्या नावाखाली कशाचेही समर्थन करायची फ़ॅशनच झाली आहे आजकाल.
23 Apr 2009 - 3:48 pm | धमाल मुलगा
उत्तम प्रतिसाद.
डानरावांनी उल्लेखलेल्या बाबी आणि केवळ अमुक आहे म्हणुन तमुक ह्यासंदर्भात दिलेली उदाहरणे उत्तमच.
मुळात स्वातंत्र्य कुठपर्यंत असते आणि स्वैराचार कुठुन चालु होतो हे कळते तर हा प्रश्नच उद्भवू शकत नाही.
नाहीतरी अश्या "स्वातंत्र्य(!)" आणि इतर तथाकथित बाबींचे अवास्तव स्तोम माजवून समाजाच्या मुलभूत नीतीनियमांना कस्पटासमान लेखणार्या आणि आपल्याच धुंदीत जगणार्यांसाठी "हिप्पी" ही एक कम्युनिटी (मराठी?) होतीच की.
आता भारतातही अशीच देशी-हिप्पी कम्युनिटी बनवावी आणि झुंडीनं बेटांवर रहायला जावं. समाजाचा त्रास नाही अन काही नाही. जिथे सगळेच नागडे तिथे कोण कोणाला हसेल बरे?
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
23 Apr 2009 - 11:12 pm | पक्या
>>बाबा कधी कधी अगदी टीपिकल मेल चुवानिस्ट पिग सारखे वागतात. आईला राग येतो. मारावेसे सुद्धा वाटत असेल. मी मारते.
>>जरा बोलले की अंगचटीला येणार्यांच्या थोबाडीत वाजवायला मी अजिबात कचरत नाही. आय ऍम द पॉवर. आय ऍम द कंट्रोल.
>>म्हणजे काय ?
>>एखादी गोष्ट जरी पटली/सहन झाली नाही तरी लगेच त्याला "असे प्रत्युत्तर" देणे कितपत योग्य आहे ?
>>मल इथे पुरुषप्रधान संस्कॄती, भारतीय संस्कार ह्या मुद्द्यांवर उहापोह करायचा नाही पण जे काही हालले आहे ते पटण्यासारखे >>आहे काय ?
डॉन राव तुमचा प्रतिसाद वाचला. या ठिकाणी मला वाटते की तुमचा काहीतरी गोंधळ होत आहे. मुलगी बापाला मारत नाहिये तर तिच्या अंगचटीला येणार्यांना मारते असे ती म्हणत आहे. तिचे वडील आणि तिची आई ह्यांच्या संबंधात वडीलांचे पारडे जड दिसतेय. पण वडीलांपुढे आई नेहमी नमते घेत असेल. त्यावेळी आईला मनातून वडीलांना मारावेसे वाटत असेल पण ती तसे करत नाही (त्याची कारणे काय असावीत हा वेगळा विषय असू शकेल.) पण मुलगी मात्र आईसारखे वागत नाही. ती खमकी आहे , असा शारिरिक फायदा घेणार्यांविरूध्द आवाज उठवण्याची तिच्यात हिम्मत आहे असे तिला म्हणायचे आहे.
इथे तिने असे कुठेही म्हटले नाहिये की ती वडिलांना मारत आहे. खाली इतर ही काही प्रतिसादात वाचकांचे असेच कन्फ्युझन झालेले दिसतेय.
एकांगी विचार केला की आपली आकलनशक्ती पण किती तोकडी पडते हे दिसून येते.
24 Apr 2009 - 7:41 am | सँडी
मुलगी बापाला मारत नाहिये
बरोबर! असेच समजले.
ती खमकी आहे, शारिरिक फायदा घेणार्यांविरूध्द आवाज उठवण्याची तिच्यात हिम्मत आहे असे तिला म्हणायचे आहे.
थोडिशी दुरुस्ती करावीशी वाटली. आवाज उठवणे हा प्रकार अन्यायाशी संबंधीत असल्याने हा वाकप्रचार बदलावासा वाटतो. इथे सगळा राजीखुशीचा मामला आहे असे वाटते. एकांताचं फलित 'कुठपर्यंत' द्यायचं/घ्यायचं हा निर्णय सर्वस्वी तिचाच असतो, त्यामुळे आपण म्हटल्याप्रमाणे ती त्या बाबतीत खमकी आहे. तिचा विरोध '(सर्व)शारिरिक फायदा घेणार्यांविरूध्द' नव्हे तर तिच्या 'कुठपर्यंत' ची हद्द ओलांडणार्यांविरूध्द असतो असे वाटते. याचप्रमाणे मर्जीनुसार वागण्याचा तिचा स्वभाव तिच्या या सो कॉल्ड ऐशाआरामी 'जगण्या'तही दिसुन येतो.
अर्थात या बिनधास्त मुलीचा 'कुठपर्यंत' च्या बाबतीतला चाणक्षपणा लक्षात येतो तो तिच्या मी २५ चे मित्र सहसा टाळते. ४०+ चे पुरुष बरे वाटतात.'गिल्ट कॉम्प्लेक्स' ने पछाडलेले. 'जस्टीफिकेशन"' मधे गुंतलेले. जरा अवतार काढला की पुरे. एकदम थंड. या विचारा(नियमा)(गैरसमजा?)तुन.
उद्या वाटले तर मी माझा भुतकाळ विसरुन माझ्याशी प्रामाणिक राहील अशा पुरुषाबरोबर लग्न सुद्धा करीन.
इथे कथेतलं कॅरॅक्टर?, ही सौ चुहे खाणारी बिल्ली आहे हे लेखकांनी केलेले पात्राचं चित्रण खुपच छान.
अवांतरः
मी २५ चे मित्र सहसा टाळते.
जाहीर निषेध निषेध निषेध! ;)
-सँडी
काय'द्याच बोला?
24 Apr 2009 - 7:47 am | विजुभाऊ
एकांगी विचार केला की आपली आकलनशक्ती पण किती तोकडी पडते हे दिसून येते.
१०० % सहमत. "तालिबान" काय किंवा "श्रीरामसेने" काय सगळेच एकांगी
अवांतर : "हेमांगी "हे नाव होउ शकत असेल तर "एकांगी" हेही नाव होउ शकते
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
24 Apr 2009 - 10:59 am | छोटा डॉन
>>बाबा कधी कधी अगदी टीपिकल मेल चुवानिस्ट पिग सारखे वागतात. आईला राग येतो. मारावेसे सुद्धा वाटत असेल. मी मारते.
>>जरा बोलले की अंगचटीला येणार्यांच्या थोबाडीत वाजवायला मी अजिबात कचरत नाही. आय ऍम द पॉवर. आय ऍम द कंट्रोल.
पक्याभाई, तुमचा प्रतिसाद अगदी नाकारत नाही. विवेचन पटण्यासारखे आहे.
कदाचित माझ्याकडुन गल्लत झाली असेल.
प्रभुमास्तरच योग्य ते स्पष्टीकरण देऊ शकतील, बॉल इज इन मास्तर्स कोर्ट ...
खरे सांगायचे तर मास्तरांनी थोडे "स्पष्ट" लिहणे अपेक्षीत होते. हे म्हणजे "नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यासारखे" होते, काय हवा तो अर्थ काढा.
माझ्या आयक्यु ला जो अर्थ सुट होत होता तो मी काढला, चुकीचा असेल तर मी चुक मान्य करतोच आहे ...
पण ...
एखादी गोष्ट जरी पटली/सहन झाली नाही तरी लगेच त्याला "असे प्रत्युत्तर" देणे कितपत योग्य आहे ?
मला इथे पुरुषप्रधान संस्कॄती, भारतीय संस्कार ह्या मुद्द्यांवर उहापोह करायचा नाही पण जे काही घडले आहे ते पटण्यासारखे आहे का ?
मुलीने आईला "तु बाबांना मारत नाहीस / तुझ्यात मारण्याची ताकद नाही" हे सांगणे व वरुन "आय हॅव पावर" ही वरताण करणे हे ही पटत नाही. ह्याचा अर्थ काय ?
मार खाणारा समजा "क्लायंट" असेल तर आपल्याला तो मार खाईल ही शक्यता कितपत योग्य वाटते ...
माझ्या मते "पैसे देऊन मार खाणारा क्लायंट" ही अगदीच रेअर केस आहे, किमान ह्या "धंद्यात" तरी ...
साहेब, अहो फार कठिण परिस्थीती असते इथे "व्यवसाय करणार्याची", ते शब्दात सांगुन नाय कळणार, अगदी खरोखर ..
मुद्दा कोण मार खातो हा आता गोंधळामुळे गौण ठरु शकतो पण त्या मागची प्रेरणा आणि शक्यता पडताळता "क्लायंटने मार खाणे" व ते ही ५-स्टार हॉटेलात ही संकल्पना मला हास्यास्पद वाटते ...
असो.
प्रभुमास्तर योग्य ते स्पष्टीकरण देतील, त्यांच्या प्रतिसादाची वाट पहातो आहे ... :)
पक्याभाईचा विवेचक प्रतिसाद आवडला ...
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
24 Apr 2009 - 11:22 am | आनंदयात्री
>>प्रभुमास्तर योग्य ते स्पष्टीकरण देतील, त्यांच्या प्रतिसादाची वाट पहातो आहे ...
असेच म्हणतो.
24 Apr 2009 - 11:41 am | विनायक प्रभू
झाली आहे हे खरे.
मुलीने स्त्रीवर झालेले शारीरीक किंवा मानसिक अत्याचार मुकाट्याने सहन करावा ह्या रुढीला मान्य न करण्याचे ठरवले आहे.
आई हे एक उदाहरण आहे.
आणि स्वःत बद्द्ल बोलते.
आता राहीले तिच्या मित्रांचे.
मुलीकडे तीची इच्छा नसताना जवळिक साधणारे मार खातातच की?
इथे गल्लत होते आहे ती नुसते मित्र , क्लायंट्(थेरपीस्ट ह्या नात्याने) आणि तीला ह्या मधुनच कधी कधी लागणारा पुरुष ह्या मधे. ह्या वेगवेगळया नात्याच्या पुरुषामधे तेवढ्याच सफाईने वागण्यार्या ह्या मुलीची केस गुंतागुंतीची आहे हे खरे.
लेखाच्या सुरुवातीला अर्ली चाईल्ड हूड अब्युस हे कारण रुल आउट केलेले आहे डॉक्टरांनी.
डॉक्टर चुकलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कारण मुलीचे टोटल डीमेनर हे सांगते की वस्तुस्थिती लपवण्याची ताकद तीच्यात आहे.
आय क्यु १६५ आहे भौ.
आय क्यु जास्त असलेले सर्वच मॅनीप्युलेटर्स असतात हा निश्कर्ष नाही.
24 Apr 2009 - 11:50 am | प्रकाश घाटपांडे
समजा अर्थ जरी स्पष्ट झाला तरी अन्वयार्थ काढणे आपल्याच हातात?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
24 Apr 2009 - 12:10 pm | वेताळ
पोरगीच्या करणी ने बापाची काय हालत झाली असेल ह्याची कल्पना करवत नाही. त्यामुळे पोरीने बापाला मारले कि नाही ह्याने काय फरक पडत नाही.पुढे मागे मारण्याची संभावना अधिक आहे.( कारण तिचा ज्यादा आय क्यु )
तसेच डानराव तुमचा प्रतिसाद एकदम उत्तम...मलातरी पटला आहे.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
23 Apr 2009 - 8:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
कोवळ्या वयात इतकी निर्मम आणि बाजारू वृत्ती
हे खटकलं. कोवळं वय म्हणजे नक्की काय? आणि बाजारू वृत्ती नक्की कशाला म्हणणार??
ज्या मुलीचा आय.क्यू. १६५ आहे तिला सीनियर कॉलेजमधे शिकताना (वय ~ २० वर्ष) कोवळं वय म्हणणार का? उलटा विचार केला तर 'चौकट राजा'तल्या दिलीप प्रभावळकरच्या कॅरॅक्टरला परिपक्व म्हणणार का?
एखाद्या मुलीने (किंवा मुलानेसुद्धा) आनंद मिळतो म्हणून, पूर्ण कल्पना देऊन, न फसवता, जबरदस्ती न करता, "जाळ्यात न अडकवता", कुणाशी विवाहबाह्य शरीरसंबंध ठेवले (या मुलीने तिच्या 'गिर्हाइकां'शी शरीरसंबंध ठेवले नाही आहेत) आणि त्याबद्दल तिला/त्याला आर्थिक किंवा इतर कोणत्या प्रकारचा लाभ झाला तर त्याला बाजारू वृत्ती म्हणणार का?
काहीतरी हवं आहे म्हणून ही मुलगी असं करते हे मान्य. पण ते काहीतरी फक्त पैशांच्या स्वरूपातच आहे का? यातून ती स्वतः काही शिकत असेल का? आणि याचा तिला आनंद होत नसेलच का? आपल्याला स्वतःला या गोष्टींचा त्रास होतोय असं तिच्या लक्षात आलं तरीही ती हे काम सुरूच ठेवेल का? मला नाही वाटत जर तिला असा त्रास व्हायला लागला तर ती हे सुरू ठेवेल, निव्वळ पैसा मिळतो म्हणून.
अजूनही मला कधीकधी वाटतं, एकदातरी टक्कल करून पहावं. तसंच तिला हे काम करावंसं वाटतं. माझ्या विचाराप्रमाणे दोन्ही गोष्टी तात्त्विक पातळीवर सारख्याच, सामान्यतः लोकं करत नाहीत त्यातल्या, आणि म्हणून 'विक्षिप्त'!
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
23 Apr 2009 - 9:47 am | काळा डॉन
अजूनही मला कधीकधी वाटतं, एकदातरी टक्कल करून पहावं. तसंच तिला हे काम करावंसं वाटतं. माझ्या विचाराप्रमाणे दोन्ही गोष्टी तात्त्विक पातळीवर सारख्याच, सामान्यतः लोकं करत नाहीत त्यातल्या, आणि म्हणून 'विक्षिप्त'!
टक्कल करुन घ्यायचे कुणी तुमाला दिड दोन लाख देणार आहे म्हणुन करणार आहात का? वरील मुलगी हे पैशासाठि करत आहे. हा मूळ फरक आहे. ह्याला विक्शिप्तपणा नाही धंदा म्हणतात.
23 Apr 2009 - 9:49 am | आनंदयात्री
>>एखाद्या मुलीने (किंवा मुलानेसुद्धा) आनंद मिळतो म्हणून, पूर्ण कल्पना देऊन, न फसवता, जबरदस्ती न करता, "जाळ्यात न अडकवता", कुणाशी विवाहबाह्य शरीरसंबंध ठेवले (या मुलीने तिच्या 'गिर्हाइकां'शी शरीरसंबंध ठेवले नाही आहेत) आणि त्याबद्दल तिला/त्याला आर्थिक किंवा इतर कोणत्या प्रकारचा लाभ झाला तर त्याला बाजारू वृत्ती म्हणणार का?
होय.
>>या मुलीने तिच्या 'गिर्हाइकां'शी शरीरसंबंध ठेवले नाही आहेत
हे लेखातले एक वाक्यः
मी काही 'रातराणी' नव्हे.इथे चॉइस माझा असतो. ती माझी मानसिक आणि शारिरिक गरज असते. भेटलेल्या सर्व पुरुषाबरोबर माझे संबंध असतात असे नाही. बर्याच वेळेला मी एका चांगल्या मित्राची किंवा थेरपीस्ट ची भुमिका बजावते.
>>गोष्टींचा त्रास होतोय असं तिच्या लक्षात आलं तरीही ती हे काम सुरूच ठेवेल का? मला नाही वाटत जर तिला असा त्रास व्हायला लागला तर ती हे सुरू ठेवेल, निव्वळ पैसा मिळतो म्हणून.
तोपर्यंत वेळ गेलेली असेल. आयुष्यात हजार कॉप्लेक्सिटीज निर्माण झालेल्या असतील.
संस्कारी घरात वाढलेल्या आणी ईक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळालेल्या, तेवढाच आयक्यु असलेल्या मुलगी तिपेक्षा कितीतरी पट सामाजिक, मानसिक आणी आर्थिक स्थिर असेल.
23 Apr 2009 - 9:59 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तोपर्यंत वेळ गेलेली असेल. आयुष्यात हजार कॉप्लेक्सिटीज निर्माण झालेल्या असतील.
संस्कारी घरात वाढलेल्या आणी ईक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळालेल्या, तेवढाच आयक्यु असलेल्या मुलगी तिपेक्षा कितीतरी पट सामाजिक, मानसिक आणी आर्थिक स्थिर असेल.
आनंदयात्री, असहमत. 'संस्कारी' घरात वाढलेले कितीतरी मुलं-मुली पाहिले आहेत ज्यांना सुरूवातीला स्वतःचे निर्णय घेता येत नाही म्हणून वाईट वाटतं आणि नंतर निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास एवढे कमी होतात की त्यांना पुन्हा एक प्रभू मास्तर, एक आधार शोधण्याची वेळ येते.
आयुष्यात हजार प्रश्न निर्माण होतील हे नक्कीच! पण नक्की काय आणि कसे?
असे प्रश्न 'संस्कारी' घरातल्या मुलांच्या आयुष्यात कधीच नाही निर्माण होत? आणि तेव्हा असंही कुणालाही, कध्धीच असं वाटत नाही की मी तेव्हा माझ्या विचारांवर चाललो/ले असतो/ते तर एवढा त्रास नसता झाला? आय.क्यू १६५ असणारी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातल्या प्रश्नांना घाबरून जाईल, शस्त्रं टाकून देईल? मला नाही असं वाटत. तिला इतरांची गरज पडणारच नाही असं नाही, गरज पडली तर ती असेल 'फक्त "लढ"' म्हणणार्यांची!
मी स्वत: असं वागेन, असं नाही, पण एखाद्या हुशार, बुद्धीमान व्यक्तीने आपलं आयुष्य कसं जगावं हे सांगणारे नियम सामान्य माणसाच्या बुद्धीतून, दृष्टीकोनातून आले असणं हा त्या व्यक्तीवर अक्षम्य अन्याय आहे. जो पर्यंत ही व्यक्ती इतरांना 'नादी' लावत नाही तोपर्यंत तिच्या आयुष्यावर वाईट ताशेरे झाडण्याचा, चांगलं-वाईट म्हणण्याचा अधिकार इतरांना नाही.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
23 Apr 2009 - 10:11 am | आनंदयात्री
३_१४ विक्षिप्त अदिती असहमत.
>>'संस्कारी' घरात वाढलेले कितीतरी मुलं-मुली पाहिले आहेत ज्यांना सुरूवातीला स्वतःचे निर्णय घेता येत नाही म्हणून वाईट वाटतं आणि नंतर निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास एवढे कमी होतात की त्यांना पुन्हा एक प्रभू मास्तर, एक आधार शोधण्याची वेळ येते.
मी संस्कारी घरात वाढलेले आणी तितका आयक्यु असलेले असे म्हटले होते. तुम्ही जर हुशार मुले फक्त संस्कारी घरात जन्माला आले म्हणुन प्रभु मास्तरांकडे जातात असे म्हणत असताल .. माफ करा .. मी तुमचे जग पाहिलेलेच नाही.
आणी संस्कारी घरात जन्मलेल्या सर्वसाधारण मुलांनाही सर्वसाधारणपणे प्रभु मास्तर लागत नसावा. न लागणार्यांचीच संख्या जास्त असावी. मी जवळुन पाहिलेल्या ३ शहरात तर संस्कारी घरांमधे कौनिलरकडे न्यावा लागावा असा प्रॉब्लेम मला दिसला नाही. कदाचित मी मिडलक्लास किंवा लोअर मिडलक्लास मधे वाढल्यामुळे हे असावे .. असेही असेल.
23 Apr 2009 - 10:21 am | वेताळ
नादी लावत नाही म्हणजे? आता ती काय सामाजिक सद्भावना वाढवण्याचे काम करते कि काय?
तीचे वागणे चुकीचे आहे त्याचे समर्थन होवु शकत नाही.
तसे तिला पैशाने विकत घेणारे देखिल दोषी आहेत.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
23 Apr 2009 - 10:40 am | विनायक प्रभू
शेवटचा पॅरा तेवढासा बरोबर नाही.
23 Apr 2009 - 10:47 am | आनंदयात्री
का हो ? बिझनेस रिस्क ??
25 Apr 2009 - 9:42 am | टारझन
आंद्या ... मास्तर ला कदाचीत ह्या शब्दांमुळे उचकी लागली असेल .. =))
असो .. मुलगी धंदेवाईक आहे बॉ .. हे जरा अतिच आहे .. तिच्या म्हणन्याप्रमाणे तिच्या समोरचा (मे बी जोडिदार) काही एकपत्नि नसावा .. पण किमान तो असा उकिरडे धुंड्या (बहुदा ट्रक ड्रायव्हर असतात तसे) तरी असण्याची शक्यता फार कमी .. फार फार तर अफेयर्स असु शकतील .. पण हे म्हणजे अतिच आं ..
(जांबुवंत )टारझन
24 Apr 2009 - 9:39 am | विजुभाऊ
आनन्दयात्रीशी असहमत
संस्कारी घरात वाढलेले म्हणजे काय?
तालिबान्यांवरही संस्कार झालेले असतात
संघवाल्यांवरही संस्कार झालेले असतात
दु:शासन संस्कारी घरातला होता
जॉर्ज कार्व्हर ल तर घरच नव्हते
फासे पारधी लोकांत तर एकतरी घरफोडी न केलेला मुलगा लग्नाला अपात्र समजला जातो हेही संस्कारच
अहिंसा हा संस्कार असेल तर देवाला बकरे कापणे हाही संस्कारच असतो.
बरेच वेळेस संस्कार या गोंडस नावाखाली मुलांची चौकस बुद्धी मारुन टाकणे हीच इतिकर्तव्यता समजली जाते
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
24 Apr 2009 - 10:07 am | आनंदयात्री
>>आनन्दयात्रीशी असहमत
उत्तम !!
>>संस्कारी घरात वाढलेले म्हणजे काय?
संस्कारी घरात वाढलेले म्हणजे काय हे चक्क आपल्याला माहित नाही हे वाचुन विश्वास बसला नाही. तुम्ही 'माझ्या म्हणन्याच्या कंटेक्स्टमधले माझे मत काय' असे जाणुन घेण्यात इंटरेस्टेड असाल हे मानुन खालील टंकन करित आहे.
नितीमत्तेची चाड असलेल्या, आपल्या संहिष्णु संस्कृतीशी नाते सांगणार्या संस्कारांची लहान वयापासुनच मुलांच्या मनात रुजवणार्या -- जेणेकरुन एक सुजाण, संहिष्णु नागरिक आपल्या सुसंस्कृत समाजाला देणार्या घरात वाढलेला असे माझे मत आहे. वर्षानुवर्षे अशीच मुल्यांची जोपासना होत असल्याने आजही आपला समाज सुसंस्कृत आहे असेच मला वाटते. अर्थात १०००० लोकवस्तीच्या गावात १०००० सुसंस्कृत असतात असे माझे अजिबात म्हणने नाही. त्या गावातही एखादी बलात्कराची बातमी येतेच तिचा उहापोह होतो कारण ती दुर्मिळ असते. इतर संस्कृतींमधल्या नागरिकांच्या आयुष्यातल्या भावनिक आणी शारिरीक समस्यांचा आपण तुलनात्मक विचार करावा आणी मग मतप्रदर्शन करावे अशी आपणास विनंती करतो.
>>तालिबान्यांवरही संस्कार झालेले असतात
होय. कोण नाही म्हणते ? अर्थातच ते माझ्या चष्म्यातुन हिन संस्कार !! (किंबहुना त्यांच्यासाठी स्वर्गप्राप्तीचा मार्ग)
हे वाक्य का आले असावे कळले नाही. अर्थात प्रतिसादाला वजन प्राप्त होत आहे तालिबान हा शब्द घेतल्याने !!
>>संघवाल्यांवरही संस्कार झालेले असतात
>>दु:शासन संस्कारी घरातला होता
>>जॉर्ज कार्व्हर ल तर घरच नव्हते
>>फासे पारधी लोकांत तर एकतरी घरफोडी न केलेला मुलगा लग्नाला अपात्र समजला जातो हेही संस्कारच
>>अहिंसा हा संस्कार असेल तर देवाला बकरे कापणे हाही संस्कारच असतो.
उदाहरणे उत्तम आहेत. प्रतिसादाला वजन प्राप्त होत आहे. वर उल्लेखल्याप्रमाणे असे उदाहरणे असणारच म्हणुन सगळी संस्कारी घरे तुम्ही उठुन जाळुन टाकावीत असे नाही.
>>बरेच वेळेस संस्कार या गोंडस नावाखाली मुलांची चौकस बुद्धी मारुन टाकणे हीच इतिकर्तव्यता समजली जाते
हा हा हा ... चौकस बुद्धी मारुन टाकणे ??? कमाल आहे बुवा. शरिरसंबंध या फक्त एकाच विषयांबद्दल लहानपणीच सो कॉल्ड गरजेचे शिक्षण मिळाले नाही तर चौकस बुद्धी मारुन टाकली !!! १४ वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला शरिरसंबंध तिच्या/त्याच्या वयासाठी टॅबु वाटलेच पाहिजेत .. नाही ???
24 Apr 2009 - 12:46 pm | धमाल मुलगा
>>तालिबान्यांवरही संस्कार झालेले असतात
बहुधा त्यामुळेच तिथे बलात्कार किंवा तत्सम अनैतिक गोष्टींना कडक (पाशवी) शिक्षा असाव्यात.
>>संघवाल्यांवरही संस्कार झालेले असतात
तसेच ते गांधीवाद्यांवरही झालेले असतात, मार्क्सवाद्यांवर झालेले असतात, कम्युनिस्टांवरही असतात, नक्षलवाद्यांवरही असतात...
>>दु:शासन संस्कारी घरातला होता
खरंच असं वाटतं आपल्याला?
जिथे माता-पिता स्वतः द्वेष आणि दुस्वास करतच जगले तिथे योग्य ते संस्कार होऊ शकतात मुलांवर?
>>जॉर्ज कार्व्हर ल तर घरच नव्हते
तरीही काही समाजाचे मुलभुत नियम म्हणुन होते ते पाळण्याची सारासार विचारशक्ती नक्कीच होती.
>>फासे पारधी लोकांत तर एकतरी घरफोडी न केलेला मुलगा लग्नाला अपात्र समजला जातो हेही संस्कारच
मला वाटतं ह्याला प्रथा म्हणतात.
>>अहिंसा हा संस्कार असेल
आहे. मान्य!
>>तर देवाला बकरे कापणे हाही संस्कारच असतो.
ही देखील एक प्रथा आहे...संस्कार नव्हे.
>>बरेच वेळेस संस्कार या गोंडस नावाखाली मुलांची चौकस बुद्धी मारुन टाकणे हीच इतिकर्तव्यता समजली जाते
ह्याचा अर्थ नीटसा कळला नाही. कृपया समजाऊन सांगाल?
>>संस्कारी घरात वाढलेले म्हणजे काय?
ज्या घरात मुलभुत नियम ज्यायोगे समाजात वावरणे आपल्याला आणि समाजाला आपण सोपे जाईल असे नियम अंगीभुत बाणवणे.
मुळात मलातरी उपरोक्त उदाहरणांचे दाखले ह्या चर्चेत देण्याचे प्रयोजन समजलेले नाही. एखादा शब्द पकडून त्यावर कीस काढण्याने मुळ मुद्दा बाजुला राहुन चर्चा भरकटते असा आजवरचा अनुभव आहे.
अवांतरः
:) ह्याला म्हणतात संस्कार! नजरेला नजर देण्यासाठीदेखील परवानगी मागायची बुध्दी होते कारण संस्कार!
:)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
24 Apr 2009 - 1:15 pm | विजुभाऊ
वरील उदाहरणे ही चर्चा भरकटवण्यासाठी नाहीत.
मला एवढेच म्हणायचे आहे की की संस्कार हे सापेक्ष असतात. ते बहुतेक वेळा समाजात सुरक्षीततेने जगता यावे यासाठी केले गेलेले नियम असतात.
कुंतीला वायुवासून इंद्रपासून मुले झाली होती त्याकाळच्या समाजात हे नियम बाह्य नव्हते
माद्रीला अश्विनिकुमारांपासुन मुले झाली होती तेंव्हा कोणालाच यात काही वेगळे वातले नव्हते.
कुरुंचा वंष चालावा म्हणून अंबा अंबालिका अंबीका याना भिष्माकडे पाठवण्यात आलेले होते यातही लोकाना अनैतीक वाटले नव्हते
तालिबान संघ ही उदाहरणे प्रातिनिधीक....
समाज मान्यता धुडकावुन लावलेल्या बर्याच लोकानी क्रान्ती केलेली आहे उदा: गॅलिलीओ , शिवाजी
म्लेछ्चांची चाकरी न करता स्वतःचे राज्य स्थापन करणे हे लोकाना मान्य नव्हते. शिवाजीने ते केले.
कृष्णाने समाज मान्यता असलेली इंद्राची पूजा बन्द करुन पर्वताची पूजा सुरु केली हे तेंव्हा लोकाना पटले नव्हते.
बरेच वेळेस संस्कार या गोंडस नावाखाली मुलांची चौकस बुद्धी मारुन टाकणे हीच इतिकर्तव्यता समजली जाते
ह्याचा अर्थ नीटसा कळला नाही. कृपया समजाऊन सांगाल?
मुलानी मोठ्याना प्रश्न विचारु नयेत. मोठ्याना त्यांच्या चुकीबद्दल विचारु नये ते उलटुन बोलणे ठरते.
मोठ्यांचा आदर करावा या संस्कारापाई बरेचदा मुलांची मने मारली जातात . त्याना योग्य ज्ञानाची दारे बंद केली जातात.
खजुराहो सारखी मुक्त शिल्पे असणार्या संस्कृतीत लैंगीक शन्का विचारणे हे वाइट का मानले जावे ?
कर्कवृत्ती पेक्षा विशुववृत्ती धारण करुन असणे नेहमीच बरे......असो
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
23 Apr 2009 - 10:11 am | काळा डॉन
.
धंदेवाली ती धंदेवालीच. कुणाला चांगली वाटेल कुणाला वाईट ज्याचा त्याचा प्रश्न. त्याने तसाही कुणाला काय फरक पडतोय?
27 Apr 2009 - 9:08 pm | इनोबा म्हणे
मला तरी ती मुलगी धंदेवालीच वाटते.
23 Apr 2009 - 12:52 pm | विजुभाऊ
१००% सहमत.
गोष्टीतली मुलगी प्रगल्भ वाटते तिला काय हवे आहे याची उत्तम जाण आहे. ते कसे मिळवायचे तेही तिला समजते. तिच्याकडे उत्तम ऍसरटिव्हनेस आहे. थांबावे कोठे ही उमज असणारी मुलगी हुशार तल्लख आहे.
ही मुलगी भविष्यात उत्तम मॅनेजर/ऍडमिनिस्टर होउ शकेल.तिच्यात लोकांचे वीक पॉइन्ट्स समजून घेउन त्यांच्याकडुन काम करवून घेण्याची कला आहे.
दुनिया झुकती है झुकानावाला चाहिये हे तिला बर्रोब्बर कळाले आहे त्याच वेळेस तिला स्वतःच्या मर्यादांचीही जाण आहे. हा उत्त्तम गुण फारच कमी लोकांकडे असतो. ( इंदिरा गांधींकडे हा गुण होता)
ती एक उत्तम लीडर होउ शकेल
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
23 Apr 2009 - 10:56 am | मुक्तसुनीत
कोवळ्या वयात इतकी निर्मम आणि बाजारू वृत्ती
हे खटकलं. कोवळं वय म्हणजे नक्की काय? आणि बाजारू वृत्ती नक्की कशाला म्हणणार??
ज्या मुलीचा आय.क्यू. १६५ आहे तिला सीनियर कॉलेजमधे शिकताना (वय ~ २० वर्ष) कोवळं वय म्हणणार का? उलटा विचार केला तर 'चौकट राजा'तल्या दिलीप प्रभावळकरच्या कॅरॅक्टरला परिपक्व म्हणणार का?
कोवळे वय ही सब्जेक्टीव्ह टर्म आहे. अर्थात यात तुम्ही जोडलेला आय क्यु चा संबंध कळला नाही. मुलगा/मुलगी खूप हुशार असले तरी वय कोवळे असू शकतेच. हां , "किती वर्षे म्हणजे कोवळे ?" हा मुद्दा चर्चेचा असू शकतो. माझ्या मते विशी येईपर्यंतची वर्षे कोवळी होत. "चौकट राजा" मधले उदाहरण अप्रस्तुत आहे. डिव्हेलपमेंटल इशूज , डाउन सिंड्रोम, ऑटीजम आणि अन्य मेंदूशी संबंधित समस्या हा विषय निराळा होईल. माझ्या मते त्यांना या चर्चेत आणणे अप्रस्तुत आहे.
एखाद्या मुलीने (किंवा मुलानेसुद्धा) आनंद मिळतो म्हणून, पूर्ण कल्पना देऊन, न फसवता, जबरदस्ती न करता, "जाळ्यात न अडकवता", कुणाशी विवाहबाह्य शरीरसंबंध ठेवले (या मुलीने तिच्या 'गिर्हाइकां'शी शरीरसंबंध ठेवले नाही आहेत) आणि त्याबद्दल तिला/त्याला आर्थिक किंवा इतर कोणत्या प्रकारचा लाभ झाला तर त्याला बाजारू वृत्ती म्हणणार का?
मला वाटते इथे एकाच व्यक्तीशी ठेवलेली रिलेशनशिप , अनेकांबरोबर ठेवलेली "मुक्त" रिलेशनशिप आणि "धंदा" - म्हणजे एका रात्रीपुरते/काही तासांपुरते शरीराला दुसर्याला वापरू देणे (मग त्यात यौन संबंध असोत की नसोत) या मधे तुमची गल्लत होते आहे. माझ्यामते आता मी "बाजारू" वृत्ती कशाला म्हणतो आहे ते पुरेसे स्पष्ट व्हावे.
काहीतरी हवं आहे म्हणून ही मुलगी असं करते हे मान्य. पण ते काहीतरी फक्त पैशांच्या स्वरूपातच आहे का? यातून ती स्वतः काही शिकत असेल का? आणि याचा तिला आनंद होत नसेलच का? आपल्याला स्वतःला या गोष्टींचा त्रास होतोय असं तिच्या लक्षात आलं तरीही ती हे काम सुरूच ठेवेल का? मला नाही वाटत जर तिला असा त्रास व्हायला लागला तर ती हे सुरू ठेवेल, निव्वळ पैसा मिळतो म्हणून.
श्री. प्रभु यांचे मूळ लिखाण वाचताना मी असा निष्कर्ष काढला की ही मुलगी हे पैशाकरता करते. (मी प्रभुंना विनंती करतो की या बाबतीत त्यांनी - फॉर अ चेंज- थोडे सरळ , सोप्या शब्दात स्पष्टीकरण द्यावे :-) ) काही "शिकण्यासाठी" , "नवा अनुभव घेण्यासाठी" ती हे करते असे श्री. प्रभु म्हणत नाहीत. आता , यात तिला त्रास होतो आहे तरीही ती हे करते आहे असे मी कुठे म्हण्टले ते अदिती यांनी सांगितले तर बरे होईल ! अर्थातच तिला यात लाभ आहे , त्या लाभातून आनंद आहे वगैरे वगैरे काही अमान्य नाहीच. मुद्दा असा की : कोवळ्या वयात हा डोळसपणे केलेला बाजारू धंदा आहे.
अजूनही मला कधीकधी वाटतं, एकदातरी टक्कल करून पहावं. तसंच तिला हे काम करावंसं वाटतं. माझ्या विचाराप्रमाणे दोन्ही गोष्टी तात्त्विक पातळीवर सारख्याच, सामान्यतः लोकं करत नाहीत त्यातल्या, आणि म्हणून 'विक्षिप्त'!
वर कुणीतरी म्ह्ण्टल्याप्रमाणे , टक्कल करायला पैसे मिळत नाहीत. आणि समजा मिळाले , (पर्सिस खंबाटाला मिळाले तसे ) , तरी त्याला आपण शरीरविक्रय म्हणत नाही - जसे रॅंपवरच्या मॉडेल्स ना , नट-नट्यांना आपण शरीरविक्रेते म्हणत नाही. मात्र ठराविक पैसे घेऊन हॉटेलमधे एका व्यक्तीला घेऊन जाऊन त्या व्यक्तीला आपले शरीर वापरू देणे याचे सर्वसंमत नाव शरीरविक्रय आहे.
"शरीरविक्रय करणे ही प्रक्रिया ही व्यावसायिक संदर्भात नट-नट्या-मॉडेल्स यांच्या पातळीवर , टक्कल करून करणे आदि प्रकाराच्या संदर्भात व्यक्तिगत निवड , प्रयोगशीलता यांच्या पातळीवर आहे " असे अदिती यांना असे म्हणायचे आहे काय ? कारण अर्थातच तोही एक , शक्य असा विचार आहे. वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता द्यावी असा आणखी एक मतप्रवाह अस्तित्त्वात आहेच. अदिती यांनी माझ्या उत्तरांच्या संदर्भात आपली मते अजून स्पष्टपणे मांडायला हरकत नाही. त्यांनी या मुलीला दिलेले ना-हरकत प्रमाणपत्र कुठल्या संदर्भात आहे ? कायद्याच्या की व्यक्तीस्वातंत्र्याच्या ?
माझा या संदर्भात एक मूलभूत प्रश्न आहे : ही मुलगी जे करते ते विद्यमान कायद्याच्या कक्षेत बसणारे आहे काय ? तिला अटक होऊ शकते काय ?
23 Apr 2009 - 2:39 pm | धमाल मुलगा
मुक्तसुनीत आणि आनंदयात्रींशी सहमत!
इतर बर्याच मुद्द्याचा उलगडा झाला, परंतु अमुक एक आय.क्यू. असलेली व्यक्ती अशीच वागेल किंवा वागणार नाही असं कसं काय ठरवता येऊ शकत?
मुळात माझा अमुक इतका आय.क्यू. आहे म्हणुन मी जे केवळ मलाच योग्य वाटतं तेच्च करणार हा दृष्टीकोन वैयक्तिकरित्या मला तरी नाही पटत.
कारण, कितीही हुशार असला तरी माणुस हा समाजात रहात असतो, आणि चार गोष्टी ह्या पाळाव्याच लागतात. अन्यथा अशा व्यक्तींना समाजाचा त्रास आणि काहीप्रमाणात समाजाला अश्या व्यक्तींचा त्रास सोसणं क्रमप्राप्त ठरते.
असो,
व्यक्तीशः मलातरी त्या मुलीच्या ह्या वागण्याचं उदात्तीकरण करणं वाटतं.
अशांना समुपदेशानं की सायकॉलॉजिस्टच्या/ सायकिऍट्रीस्टच्या मदतीनं की आणखी कसं ते सुवर्णमध्यापर्यंत आणावं हे सांगण्याइतपत माझा तरी अभ्यास नाही.
आपल्याला डेटावेअरहाऊसींगबद्दल बोलायला सांगा, आख्खा दिवस तुमचं टक्कुरं कुरतडेन..पण जिथं आपलं क्षेत्रच नाही तिथं आपण मत ते कसलं देणार? मला तरी "चड्डीत रहाणे - एक कला" ह्यावर पुर्ण विश्वास आहे. ;)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
23 Apr 2009 - 4:31 pm | छोटा डॉन
लै लै लै वेळा सहमत ...
एकदम संतुलीत प्रतिसाद आहे, आवडला ...
आपण नक्की कोण आहोत, काय करणे अपेक्षीत आहे, काय करतो आहोत, त्याचे परिणाम कुणाला भोगावे लागणार आहेत्/लागत आहेत ह्या बाबींशी काडीमोड घेतला की असे "बेताल" वागणे येते असे आमचे मत आहे ...
बाकी अश्या वागण्याचे "इतर ( जसे की आयक्यु, डिग्र्या, सामाजिक स्थान वगैरे )" गोष्टींशी सांगड घालुन त्याला "निर्दोष" ठरवणे अथवा मानणे हा तेवढाच अपराध ...
आता इथे "अपराध" ह्या शब्दामुळे गोंधळ होऊ शकतो कारण प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असु शकतात ...
जसे की ती मुलगी जसे म्हणते आहे तसे हे "५-स्टार हॉटेलाच्या रुममध्ये बसुन केलेले समुपदेशन" आहे पण सर्वसाधारण आयक्यु आणि समज वापरली तर ह्याला शुद्ध भाषेत "शरिरविक्रीयाचा धंदा ( च्यायला डायरेक्ट "रंडीबाजी" म्हणजे तर ह्याची तीव्रता योग्य प्रकारे दिसेल का ?) म्हणतात. सो, हा फरक आहे फ्रेम ऑफ रेफरन्सचा ...
पण आपण जेव्हा एखाद्या समाजाचा विचार करतो तेव्हा त्या समाजाच्या पारंपारिक रुढी , समाजमान्यता, शुचिता ह्यांना अनुसरुन वागणे योग्य नाही का ?
उगाच हुशार हुशार म्हणुन एखाद्याने उंटाच्या ***चा मुका घ्यायचा प्रयत्न केला तर हाती काय लागेल ?
आता थोडक्यात सांगायचे तर आमच्या सामाजिक मर्यादात ही गोष्ट "अपराध" मध्ये मोडते. सो कॉल्ड स्कॉलर लोकांना मान्य नसेल तर ते स्वतःचा वेगळा असा "हिप्पी टाईप" गट बनवुन स्वतःच्या स्वच्छंद जिवनाचा आनंद घेऊ शकतात. म्हणजे कसे कुणालाच त्रास नाही , बरोबर ?
पण इथेच ह्या समाजात राहुन त्याचे उलट समर्थन करुन बाकीच्यांना मागास म्हणणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे ...
अशांना समुपदेशक नव्हे तर "हंटर" अथवा "वेड्याचे इस्पितळ" हवे आहे, भले आम्हाला कोणी तालीबानी म्हटले तरी हरकत नाही पण असल्या प्रथा ह्या समाजात नकोच ...
जर हिंमत असेल तर सरळसरळ जगजाहीरपणे दिवसाढवळ्या तिने "व्यवसाय" करावा पण त्याला स्वतःच्या समाधानासाठी "समुपदेशन/स्ट्रेस रिलीव्हिंग ट्रीटमेंट" असले गोंडस नावे देऊन आपले हिडीस चाळे मेन फ्लो मध्ये आणण्याचा प्रयत्न करु नये...
अवांतर :
प्रभुसरांना एक विनंती. जमल्यास "त्या मुलीला" हा धागा वाचण्यास अवश्य सांगणे अथवा वाचायला"च" लावणे...
१६५ आयक्यु असल्याने बहुसंख्य जनता काय व का म्हणत आहे हे तिला जरुर समजेल व आय होप मारुतीला तोंडात जास्त वेळ बोट घालुन बसायचा त्रास होणार नाही ...
ही चर्चा वाचुन "बरेच समजेल" अशी अपेक्षा आम्ही एका "सुजाण, स्कॉलर" व्यक्तीकडुन जरुर ठेऊ शकतो, बरोबर ?
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
23 Apr 2009 - 4:36 pm | आनंदयात्री
प्रचंड सहमत !!!
एकेक मुद्दा अत्यंत व्यवस्थित मांडलेला आहे धमाल आणी डॉनने !!
23 Apr 2009 - 6:43 pm | प्राजु
डॉन भाऊ चा प्रतिसाद उत्कृष्ट आहे.
बेस्ट!
खरतर हा लेख वाचून... माझी बोलतीच बंद झाली आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Apr 2009 - 8:56 pm | भाग्यश्री
धमाल, डॉनशी सहमत !
कितीही विचार करून तिच्या वागण्याचे उदात्तीकरण करून पाहीले, जमले नाही..
जे चूक ते चूकच.. आणि जर त्या मुलीला ती चूक वाटत नसेल, तर ती सर्वांना(पालकांना वगैरे) पटवण्यात काहीच हरकत नाहीये. त्यासाठी समुपदेशक कशाला? (हे तात्यांचे म्हणणे पटले..) आणि समाजावर परिणाम हा होणारच.. पॅसिव्ह स्मोकींग बद्दल आपण इतके ऐकतो आणि निषेध नोंदवतो, तसंच हे वाटते मला..
आणि अमेरीकेत पोस्ट ग्रॅड करायला १२+४ शैक्षणिक वर्ष लागतात हा माझ्यामते बरेच काळापासून असलेला नियम आहे, आणि तो कोणासाठी बदललेला मी ऐकले नाही.. (ती मुलगी भारतात पुढे अजुन शिकून मग अमेरिकेत येणार इत्यादी गोष्टी लेखात नसल्याने त्या नाहीत, असंच ऍझ्युम केले आहे.. )
www.bhagyashree.co.cc
23 Apr 2009 - 7:54 am | विनायक प्रभू
सर्व कोठून येते?
Or may be I am too old or dumb to understand it.
23 Apr 2009 - 7:55 am | काळा डॉन
जिआरई द्यायला १२वी नंतर ४ वर्षाची डिग्री लागते बिएस्सी करुन एडमिशन मिळत नाही. इतके पण कळत नाही हिला आणि म्हणे हुशार!
हिच्यासाठी धंदेवाली हा एकच शब्द आहे!
23 Apr 2009 - 7:58 am | विनायक प्रभू
तुम्हाला कोणी सांगितले.
पोस्ट ग्रॅड प्रोग्राम कोणत्याही ग्रॅङुएट ला देता येतो.
'धंदेवाली" हम्म
अर्थात तुमचा दोष नाही.
23 Apr 2009 - 9:43 am | काळा डॉन
अमेरिकेत शिकणार्या कोणालाही विचारा. एडमिशन मिळवण्यासाठी ४ वर्षाची डिग्री मिनिमम लागते बहुतेक विद्यापिठात.
धंदेवाली" हम्म
अर्थात तुमचा दोष नाही.
अर्थातच नाही!!! माजा काय सम्म्बध यात? समजले नाही
23 Apr 2009 - 9:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
बी.एस्सी. कॉम्प करून पुढे एम.एस्सी. किंवा इतर काही रेकग्नाईज्ड कोर्स करणारच नाही असं काही म्हटलं आहे का? 'ग्रि'चा स्कोर पाच वर्ष आणि 'टोफल'चा स्कोर तीन वर्ष चालतो. (ही माहिती माझ्यावेळची, ~ २००३-०४) आता चित्रं फार बदललं नसावं. अनेक हुशार विद्यार्थ्यांसाठी केलेले अपवाद मी स्वतः पाहिले आहेत, ही बाब वेगळीच! प्रत्येक वेळेला स्वतःवरून दुसर्याची नीट परीक्षा करता येतेच असं नाही.
उगाच एखाद्याचं उणं काढायचं असेल तर काहीही काढता येतं पण एखाद्याला समजून घेणं फार कठीण असतं, मास्तर!
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
23 Apr 2009 - 9:49 am | पिवळा डांबिस
बाकी तुमच्या विश्वातलं काही माहिती नाही पण फक्त बी एस सी होऊन परदेशातल्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळत नाही हे नक्की!!!
परदेशात चार वर्षांचा कॉलेज कोर्स केल्याशिवाय पोस्ट ग्रॅज्युएटला ऍडमिशन मिळत नाही आणि बी एस सी हा फक्त तीन वर्षांचा कोर्स आहे.....
काळा डॉनचे बरोबर आहे....
विप्र, तुम्ही घसरलात इथे.......
23 Apr 2009 - 9:52 am | विनायक प्रभू
१०+२+३ ची सिस्टीम आहे इथे. नंतर २ वर्षाचा वर्क एक्स्पिरीयन्स पुरतो परदेशासाठी असे मला वाटते.
तरीसुद्धा पडताळुन बघतो तुम्ही म्हणत असाल तर.
चुक असेल तर दुरुस्त करतो.
23 Apr 2009 - 9:55 am | पिवळा डांबिस
प्लीज पडताळून पहा!!
पण माझ्या अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार तरी मी म्हणतो आहे त्यात तथ्य आहे, युरोपाचे माहिती नाही...
बी एस सी, एम एस सी केलेला,
पिडां
23 Apr 2009 - 10:02 am | काळा डॉन
आयला चुक असेल तर दुरुस्त करतो म्हणजे काय? काल्पनिक कथा आहे होय? मला वाटल सत्यकथा आहे. पहिल्या भागात तुम्हि लिहिलेलं
मुळ केसच्या ऑडीओ स्क्रिप्टमधले एफ वर्ड्स मी गाळलेले आहेत, आणि बरेचसे शब्द मवाळुन लिहीले आहेत
23 Apr 2009 - 10:23 am | विनायक प्रभू
चूक असेल. वेळ आली तर गरजेप्रमाणे बदल होत नाही का?
मी फक्त तीने म्हटलेले जसे चा तसे मांडले आहे.
कमाल आहे बॉ.
23 Apr 2009 - 10:28 am | काळा डॉन
तिच्या बोलण्यात चूक असेल तर "तुम्हि" का दुरुस्त करताय मग?
23 Apr 2009 - 11:19 am | शक्तिमान
भले शाब्बास!
23 Apr 2009 - 9:44 am | विनायक प्रभू
असे काय करताय. चार वर्षानंतरचे म्हणते आहे ती. ते सुद्धा स्वबळावर.
23 Apr 2009 - 9:49 am | आनंदयात्री
प्रकाटाआ
23 Apr 2009 - 9:48 am | वेताळ
मुक्तसुनित ह्याना १००+ समर्थन
फक्त पैसा कसाही मिळवणे व त्यातुन सर्व काही विकत घेता येते ही वृती माणसामध्ये झपाट्याने फोफावत आहे. आपण जे काही चुक बरोबर करतो त्याच्या समर्थनासाठी कारणे देखिल लगेच तयार केली जातात.आजोबाची नजर तुम्हाला तशी वाटली म्हणजे तुम्ही देखिल त्याना काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न केला असला पाहिजे नाहीतर ९वीतच सुख प्राप्त केले नसते.मी सोडले तर समाजातील प्रत्येक घटक माझा फायदा उचलायला तयार आहे अशी मानसिकता बनायला मग वेळ कसा लागेल?त्या आईवडिलाची काय चुक ,त्यानी तुम्हाला वाढवताना घेतलेले कष्ट सुखासमोर व पैशासमोर कस्पटास्मान झाले का?मुळातच आपल्या चुकाना पवित्र करुन घेण्याचा प्रकार आजकाल सर्वत्र पहावयास मिळतो आहे.
सामजिक मुल्ये,नितीमता ह्या फक्त दुसर्यानेच पाळल्या पाहिजेत हा विचार समाजस्वास्थ्याला घातक आहे.तिचे वागणे समर्थनिय होवुच शकत नाही.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
23 Apr 2009 - 9:53 am | दशानन
+१
सहमत.
थोडेसं नवीन !
23 Apr 2009 - 10:10 am | शरदिनी
हे सारे वाचून अश्रू आले.
... काय भयंकर लोक आहेत.
आणि तिचं काही चुकलं नाही, आणि तिला समर्थन करणारेही लोक आहेत...
... आणि ती वडिलांना मारते की काय , कशासाठी ते कळले नाही...
हे सगळं व्यक्तिस्वातंत्र्याचे वृथा कौतुक केल्याने घडते आहे.....
...
24 Apr 2009 - 9:43 am | विजुभाऊ
यात कोठेही ती मुलगी वडिलाना मारते असे आलेले नाही.
नसलेल्या गोष्टी आणून का उगाच नक्राश्रु ढाळताय?
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
23 Apr 2009 - 10:16 am | मराठमोळा
मुक्तसुनीत यांच्याशी सहमत.
तसेच.. माझ्या मते प्रेत्येक माणसात एक सायको असतो. कुठे ना कुठे हा सायको आपले डोके वर काढत असतो. जास्त आय क्यु असलेल्या व्यक्ती मानसिक दृष्ट्या खुप चंचल/अस्थिर असतात. योग्य दिशा मिळाल्यास खुप काही चांगले करु शकतात, परंतु जर ह्या लोकांमधे जर विकृती वाढली तर मात्र त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तसेच आजकाल माझी लाईफ, मी, मला जे बरोबर वाटते तेच मी करणार, दुनियेने मला काय दिले, आई वडिलांनी फक्त त्यांचे कर्तव्य केले अशी एक भावना वाढत आहे.
प्रत्येकाला आपले आयुष्य जगण्याचे स्वातंत्र्य आहे असे म्हणुन काही लोकं या गोष्टीचे समर्थन सुद्धा करतात. पण मला सांगा जर एखाद्या व्यक्तीला रस्त्यावर नागवे फिरावेसे वाटले, खुन/चोरी करावीशी वाटली तर त्याला विकृती म्हणणार का सुज्ञ जास्त आय क्यु असलेला स्वतःचे डिसिजन स्वतः घेणारा हुशार व्यक्ती? (कारण माणुस हा समाजशील प्राणी आहे हे विसरुन चालणार नाही.)
ह्या कथेतील मुलगी ही मानसिक दृष्ट्या विकृत आहे. (केस हाताळणार्या डॉक्टरांशी असहमत) भविष्यात ती पस्तावेल हे नक्की (जगाच्या कोणत्याही कोपर्यात गेली तरी).
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
23 Apr 2009 - 10:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
रस्त्यावर नागवं फिरणारा आणि खून/चोरी करणारा विकृतच! मला सांगा ही मुलगी असं काही करते हे नक्की कोणाकोणाला माहित असणार? आणि त्याचा समाजावर वाईट परिणाम कसा होणार?
कशी काय, कशावरून??
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
23 Apr 2009 - 10:41 am | वेताळ
मांजर जरी डोळे बंद करुन चोरुन दुध पित असेल तरी जग त्याला बघत असते. ती जर असले काम करीत असेल तर त्याचा बोभाटा व्हायला किती वेळ लागणार आहे? पुढे तिच्या नवर्याला जर हे कळाले तर त्याची हालात काय होईल.जरी तिने त्याला सर्व सांगुन लग्न केले तर तो तिला पैशासाठी ते काम परत करण्यास का भाग पाडणार नाही? समजा तिने त्याला सोडुन दिले तर म्हातारपणी कोण तिच्या कडे जाणार?अहो अशा किती तरी आयुष्य जगणार्या पोरी पुढे अंमली पदार्थ सेवनाने आपले आयुष्य उध्दस्त करुन घेतात.किती तरी असे आयुष्य जगणार्या फॅशनमॉडेल आज रस्त्याकडेला भिक मागतात हे तुम्ही बघितले असेलच. चुक ते चुक.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
23 Apr 2009 - 10:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
१. हा इतिहास लपवून ही मुलगी कोणाशी लग्नं करेल असं मला वाटत नाही.
२. या इतिहासामुळे हे किंवा इतरही काही इच्छेविरुद्ध करायला लावणार्या मुलाशी ही मुलगी लग्नं करेल असंही मला वाटत नाही. आणि केलंच तर त्याला 'अच्छा, टाटा, बाय-बाय' करण्याएवढी धमक तिच्या अंगात नक्कीच आहे.
३. समजा ती म्हातारपणी व्यक्तीगत आयुष्यात एकटीच असेल तर तिच्याकडे कोणी कशाला 'जायला' पाहिजे? बुद्धी वापरून पैसा मिळवता येतो, तसंच आपल्यासारखे चार मित्र-मैत्रिणीही जोडता येतात. ही मैत्री आयुष्यभर पुरते. माझे आजोबा वय वर्ष ३६ ते ९२ एकटेच राहिले. खेड्यात रहायचं म्हणून कधीही आमच्याबरोबर राहिले नाहीत. आनंदात जगले आणि समाधानाने गेले. पण कधीही दुसरं लग्नं करायचा विचार केला नाही.
४. अजूनही ह्या कानाचं त्या कानाला कसं कळणार? आणि कळलं तरीही त्याने समाजावर वाईट परिणाम नक्की कसा होणार? इथेसुद्धा बर्याचशा लोकांचं मत काय, की हा प्रकार साफ अमान्य आहे. म्हणजे मिपाकर समाजावर या गोष्टीचा वाईट परिणाम झाला का? माझ्या मते, नाही. ज्याने त्याने आपापली मतं, मार्ग आधीच ठरवले आहेत.
कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होऊ शकतो तो फक्त लहान मुलांवर! त्या मुलांना या गोष्टी नक्की कुठून कळतात?? यापेक्षा जास्त वाईट परीणाम तर घरातला इडीयट बॉक्स करतो. तो आवरतो का आपण एक समाज म्हणून? घरात लहान मुलांसमोर नाही नाही ते बोलून त्यांना आपणच वाईट सवयी लावतो ते आवरतो का?
फॅशनच्या जगाबद्दल मला पूर्ण अज्ञान आहे, पण तरीही फॅशन मॉडेल आणि (कोणत्याही) बुध्दीमान माणसाची तुलना मला हसवून गेली. त्याबद्दल सॉरी.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
23 Apr 2009 - 10:18 am | विसोबा खेचर
छान चर्चा..! चालू द्या! :)
मास्तर, एकदा माझ्यासोबत मुंबैला चला. तुम्हाला फोरासरोड, फॉकलंड रोड, कामाठीपुरा सगळं फिरवून आणतो. त्यानंतर मस्तपैकी काँग्रेस हाऊसला आमच्या शबनमआपाच्या कोठ्यावर किंवा बनारसी चाळीतल्या आमच्या रौशनीच्या लेकीच्या कोठ्यावर जाऊ, दारू पिऊ आणि मुजरा पाहू! येता काय बोला? वाटलं तर आपल्या रामदासबाबालाही सोबत घ्या! :)
चलाच एकदा! हे समुपदेशन वगैरे सगळं विसरून जाल! च्यामारी उगाच कुणाकुणाचे तकलादू प्रश्न तुम्हाला हाताळत बसायला नकोत! :)
मी पर्वट नाही हे माझ्या पालकांना सांगाल का?
तिला म्हणावं गधडे, नववीत शेण खातांना पालकांना विचारून खाल्लं होतंस का? रांडच्ये, पंचतारांकीत हाटेलात त्या कुठल्याश्या अशीलाला मारे त्याचे डोके मांडीवर घेऊन अंगाई गीत गात झोपवतेस ते तुझ्या पालकांना विचारून करतेस का? मग पालकांशी बोलायला आताच गं बरा तुला हवा आहे समुपदेशक??
मिपाकरहो, मारुती च्या तोंडात बोट आहे. तो काही बोलु शकत नाही. बघा पालकांना काही सल्ला देतो येतो का तुम्हाला.
मास्तर, तिच्या पालकांना माझ्याकडे द्या पाठवून. चांगला सल्ला देईन त्यांना!
बाय द वे, पंचतारांकीत हाटेलात एक टाईम भेटायचे ती पोरगी किती पैशे मागते हे कळलं तर बरं होईल! मी पण थोडा टाईम तिच्या मांड्यांवर डोकं ठेऊन झोपेन म्हणतो..! :)
आपला,
(मध्यरात्रीची मुंबई बघितलेला) तात्या नवलकर.
23 Apr 2009 - 10:26 am | काळा डॉन
तात्या छप्परतोड प्रतिसाद!
मास्तर, आता म्हणा की "हम्म्म! तुमचा दोष नाही "
नको वेताळबाबा म्हणतोय पैशाने विकत घेणारे पण गुन्हेगार :)
23 Apr 2009 - 10:32 am | विनायक प्रभू
इथेच द्या ना सल्ला.
देणारे आहेत. म्हणुन घेते.
23 Apr 2009 - 10:38 am | विसोबा खेचर
सल्ला इतकाच की,
पोरगी आपल्या अपेक्षेप्रमाणे वागेल ही अपेक्षा सोडून द्या म्हणावं! तिला जसं जगायचं तसं जगू द्या...!
जास्त डोक्याला ताप करून घेऊ नका म्हणावं!
आणि पोरीला सांगा, तुझ्या आईबापाची काळजी तू घे. त्याकरता रिकामचोट मला येऊन पिडू नको. तू हायेस ना मोठी शाणी तिच्यायला? मग आईबापसाला सौताच काय ते उत्तर दे..!
भेंचोत, खाणार सगळा गाव आणि निस्तरणार समुपदेशक? हा काय धंदा? :)
बाझवला तिच्यायला! :)
तात्या.
23 Apr 2009 - 10:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
तात्यांच्या प्रतिसादातले काही शब्द वगळता या प्रतिसादाशी अगदी सहमत.
पुणे-सातारा रस्ता किती सुंदर असला तरी रेल्वेगाडी त्यावरून जाणार नाही.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
23 Apr 2009 - 10:42 am | अवलिया
भेंचोत, खाणार सगळा गाव आणि निस्तरणार समुपदेशक? हा काय धंदा?
सर्व चर्चेतले सगळ्यात आवडलेले वाक्य !!! :)
मास्तर, चालु द्या !!
--अवलिया
23 Apr 2009 - 10:43 am | काळा डॉन
समुपदेशन १ नंबर ! =))
आणि लगे हाथ मांडीवर गाईगाई करायचा रेट पण विचारुन घ्या.. ;)
23 Apr 2009 - 10:45 am | विनायक प्रभू
पालकांना आहे. मुलीला अजिबात नाही. त्यांच्या समाधानाकरता गेली समुपदेशकाकडे.
तुमचा सल्ला लय भारी.
23 Apr 2009 - 10:33 am | वेताळ
मांडीवर डोक ठेवुन झोपी जाण्याचे तुम्ही विसरुन जाल.लग्नानंतर दगडावर पण डोके टेकले की आपोआप झोप येते.बघा हा उपाय करुन. खुप पैशे वाचतील. =))
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
23 Apr 2009 - 10:45 am | पिवळा डांबिस
लग्नानंतर दगडावर पण डोके टेकले की आपोआप झोप येते.बघा हा उपाय करुन.
लग्न केल्यानंतर दगडावर डोके टेकून झोपायची पाळी येते हे तात्याला कशाला सांगताय.....
:)
तो शहाणा....
लग्न न करता नुसतीच धमाल करतोय....
आणि लॉन्गटर्म पैशेही वाचवतोय.....
विचारा त्याला की किती मैत्रिणींना दागिने घेऊन द्यायला लागलेत त्याला....
चांगली साडी कधीही दागिन्यांपेक्षा स्वस्तच पडते.....
अहो खुळे की काय तुम्ही!!!!
:)
23 Apr 2009 - 10:52 am | विसोबा खेचर
चांगली साडी कधीही दागिन्यांपेक्षा स्वस्तच पडते.....
तसं नाय! एकदा एकीला लाडात येऊन एका तोळ्याची चेन देण्यापर्यंत खुळावलो होतो! छ्या! मांडीवर डोकं ठेऊन घटकाभर झोपण्याकरता चेन लईच महाग पडते राव! पण तेव्हा हे समजत नव्हतं. कोवळं वय होतं! ;)
तात्या.
23 Apr 2009 - 10:59 am | काळा डॉन
मांडीवर डोक ठेवुन झोपणारा वेडझव असतय म्हणतो मास्तर! :SS
23 Apr 2009 - 11:03 am | विनायक प्रभू
आणि मुलीच्या भाषेत गलिबल फुल्स
23 Apr 2009 - 10:48 am | विनायक प्रभू
पिडां नी सांगितल्याप्रमाणे तात्या गलिबल ४०+ फुल नक्की नाही.
23 Apr 2009 - 10:52 am | अवलिया
मास्तर,
पण मला एक प्रश्न पडला की आपली पोरगी वाया गेली हे पालकांना पोरीने सांगितल्यावरच कसे कळले ?
घरात, बाहेर वावरतांना झालेला फरक लक्षात येत नाही का?
की दिवस रात्र ते ही मिठ्या मारुन पडलेले असायचे?
बाकी पत्ता द्या बरे... च्यामारी मी पण ४०+ च आहे...
हिमालयातुन मम्मईला जात आहे.. भेटुन घेतो एकदा.
बरेच दिवसांत झोपलो नाही कुणाच्या मांडीवर डोके ठेवुन :)
--अवलिया
23 Apr 2009 - 10:55 am | विनायक प्रभू
माडीवर डोके टेवायचे पैसे मोजणारे वेड्झवे नक्की नाय हो.
23 Apr 2009 - 11:04 am | परिकथेतील राजकुमार
हे वाचुन येव्हडच कळल की नितीमत्ता, स्वतःची अक्कल , व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे साले सगळे उगा वापरलेले भर भक्कम नावाचे मुखवटे ! शरीराची भुक भागवणे हेच खरे उद्दीष्ट !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
23 Apr 2009 - 11:24 am | श्रावण मोडक
या मुलीने न-नैतीक "पवित्रा" घेतला आहे. तो केवळ रिकग्नाईज केला तर बाकी प्रश्न निकालात निघतात. चौकोनाला गोलात (किंवा गोलाला चौकोनात, तुम्ही ठरवा) बसवण्याचा प्रयत्न करण्यात अर्थ नसतो. हाच सल्ला, मला वाटते वेगळ्या शब्दांत, अदिती, विसोबा वगैरेनीही दिला आहे.
आधी वाटले होते, धक्का बसणार नाही. पण धक्का बसला. वेगळाच. या मुलीची स्पष्टता सौम्य धक्कादायक ठरली. न-नैतीकतेचे तत्त्वज्ञान करण्याची तिची हातोटी तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. अर्थात, त्यासाठीही माझेच स्टिरिओटाईप्स कारणीभूत आहेत, असे माझे माझ्याविषयीचे वैयक्तिक मत आहे. ही कमेंट इतरांबाबत नाही. या मुलीची स्पष्टता आणि तिचा आयक्यू यांची सांगड मी तरी घालणार नाही. असल्या मोजपट्ट्या काळाच्या ओघात माणूसच बाद ठरवत असतो.
डिसफंक्शन, डिसऑर्डर, रिबेलियन, केऑस थेअरी या केसमध्ये मांडता येत नाही, एका डॉक्टरला मांडता येऊ नये यातच सारे काही आले. या थेअरीज मानवी वर्तनाचे विश्लेषण करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा ठरू शकत नाहीत. माणसाचे वर्तनही इव्हॉल्व्ह होत असते. थेअरीही इव्हॉल्व्ह व्हावी लागते. भविष्यातील अशा एखाद्या थेअरीसाठी ही मुलगी आणि हिच्यासारखे इतर अनेक जण आजच पायाभरणी करताहेत. एक केस म्हणून. त्याचे स्वागत करावयाचे की नाही ही वैयक्तिक निवड झाली. पण कुणी काहीही निवड केली म्हणून वास्तव बदलणार नाही. ते तसेच विकसीत होत राहील.
बाकी बऱ्याच गोष्टी वाचल्यानंतर मलेशिया-सिंगापूर येथे कोठे तरी पॉर्न उद्योगात असणाऱ्या एका भारतीय हिरॉईनची एका टॅब्लॉईडमध्ये आलेली मुलाखत आठवली. त्यात ती मुलगी म्हणतेच, "त्या चित्रपटांव्यतिरिक्त मी इतर कोणाहीसोबत आजवर झोपलेले नाही. सामान्य मुलीप्रमाणेच मलाही माझे घर, संसार या गोष्टी हव्याच आहेत." त्या मुलीलाही आपल्याला असा जोडीदार मिळेल याची खात्री होती. पाहणीतील काही घटना असे दाखवतात की, हो असे जोडीदार मिळतात. कसलीही उदात्तता न ठेवता, केवळ त्या जगण्यासाठीची साथ या भावनेतूनही अशा जोड्या जमल्या आहेत. टिकल्या आहेत. कारण अखेर, ही जी साथ असते ती शरिरापुरती नाही आणि त्यावरून साथीची निष्ठा ठरवता येत नसते, हे अशा दोन व्यक्तींनी स्वीकारले तर बाकी प्रश्न येतात कुठे त्यांच्यालेखी? ते कधीच निकालात निघालेले असतात. आपण मारे नैतीक-अनैतीक, कोणी साथीदार मिळेल की नाही याच्या चर्चा करत राहतो, ते जगतात, जगण्यातील सुख-दुःखं झेलतात. पुढे जातात.
वेल, ऑल टूगेदर, दीज थिंग्ज मे नॉट मेक अ सेन्स टू मी, ऑर अस; बट दे आर देअर फॉर शुअर. अॅटलीस्ट ऑन फेसव्हॅल्यू.
23 Apr 2009 - 11:31 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
श्रावण, मला काय म्हणायचं होतं हे मलाच नीट कळत नव्हतं (आणि म्हणून मांडता येत नव्हतं). तुमचा प्रतिसाद वाचून ते लगेच समजलं.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
23 Apr 2009 - 11:50 am | विनायक प्रभू
मी पण सहमत. वेल सेड भौ
23 Apr 2009 - 12:46 pm | दिगम्भा
फार धक्का बसण्यासारखे वाटले नाही.
हल्ली बहुतेक मुलां/मुलींचे विचार असेच असतात असे वाटते, वर्तनात फरक असू शकेल तो सुद्धा "जनाची" कमीजास्त वाटेल तेवढ्यापुरता.
असेच सगळे एखाद्या पुरुषाने म्हटले व केले असते तर कदाचित एवढी टीका झाली नसती.
खरे तर बरेचसे (अधिकाधिक वरच्या पदावर नोकरी करणारे) पुरुष/स्त्रिया बौद्धिक वेश्याव्यवसाय करत असतात असे माझे मत आहे. आणि कधीकधी तो शरीर विक्रयापेक्षा कितितरी वाईट व अप्रामाणिक असतो.
श्रावण, अदिती, तात्या यांच्याशी सहमत.
- ३५५/११३ दिगम्भा
23 Apr 2009 - 12:51 pm | प्रकाश घाटपांडे
आम्ही बी हेच म्हंतो. आंतरजालावरील आयड्यांच्या वर्तनाचे विश्लेषणाबाबत देखील हे खरेच आहे. कारण ती माणसेच आहेत.
परस्परांच्या उपयुक्ततेच्या मुल्यांची चाचपणी सतत होत असते. जोड्या टिकणे हे त्यावर अवलंबुन आहे. हे उपयुक्ततामुल्य जेव्हा एकांगी होईल त्यावेळी देखील या जोड्या एक दुर गेल्या मुळे तुटतील. तसेच दोन्ही अंगाने जरी विचार केला व परस्परांचे उपयुक्तता मुल्यांचा निरोपयोग होउ लागेल अथवा ते मुल्य उपद्रवमुल्याकडे झुकु लागेल त्यावेळी देखील हेच घडेल. नंतर दुसर्या जोडीदाराच्या शोधात. पुढे पुन्हा हेच. हेच वास्तव जगण आहे. व्यवहार हाच आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
23 Apr 2009 - 5:44 pm | मुक्तसुनीत
या मुलीने न-नैतीक "पवित्रा" घेतला आहे. तो केवळ रिकग्नाईज केला तर बाकी प्रश्न निकालात निघतात.
मी माझ्या पहिल्याच पोस्ट मधे या एमोरॅलिटीचा निर्देश केलेला आहे.
इतक्या भीषण , झपाट्याने कालबाह्य होणार्या मूल्यांच्या या काळात , एकंदर निरागसता , honor या गोष्टींचे नव्या पीढीला वाटणारे महत्त्वदेखील खूप वेगाने संपुष्टात येत असावे काय ? ही मूल्ये आपल्या आयुष्यात चिरस्थायीच असतात असे माझे म्हणणे नाही.
23 Apr 2009 - 7:51 pm | श्रावण मोडक
मुक्तसुनीतराव,
अमॉरल - न नैतीक, इम्मॉरल - अनैतीक (हे माझे अर्थ). अ-नैतीक म्हणजेच न-नैतीक असे येथे तुमच्या म्हणण्याच्या आशयासंदर्भात लक्षात येते आहेच. तुम्ही जो निर्देश केला, तोच मी येथे थोडा अधिक स्पष्ट मांडला इतकेच.
पण तिची 'न-नैतीक भूमिका/वैचारिक बैठक' आहे, असे माझे मत नाही. तिचा तो पवित्रा आहे असे माझे मत आहे. पवित्रा या शब्दाला मी अवतरणंही टाकली आहेत. हा पवित्रा तिच्या त्या उच्च आयक्यूचा परिणाम असू शकतो. हा आयक्यू असण्यासाठी वैचारिक बैठक हवीच असते, असे मला वाटत नाही. त्यामुळे अशा आयक्यूतून टोकाची तर्ककठोर भूमिका मांडण्याची क्षमता असू शकते. पण ती वैचारिक असेलच असे नाही. त्यामुळे ही भूमिका तर्काच्या चौकटीत न फेटाळण्याजोगी असते. चौकट तर्काऐवजी साधक-बाधक विचारांची असेल तर वेगळी मते संभवतात. श्रेयस काय आणि प्रेयस काय असा हा वाद आहे. प्रेयसच श्रेयस कसे. हे दाखवण्याची हातोटी त्या मुलीकडे आहे. ती तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. अर्थात, मी त्या हातोटीला फसणार नाही. पण केवळ ती मुलगी आहे म्हणून नैतीक-अनैतीकतेचे डोस पाजत बसणारही नाही.
अतिअवांतर : आयक्यूच्या मोजणीच्या मापदंडांमध्ये सामाजिक भान हा मापदंड असतो का? कारण ते सापेक्ष असते.
(मी रेल्वेत बसलो आहे) मला झाडं मागे पळताना दिसताहेत. मी बसलेली रेल्वे पुढे जाते आहे (झाडं आहेत तिथंच आहेत).
23 Apr 2009 - 12:41 pm | विजुभाऊ
मास्तर; वपुंचे "ऐक सखे " वाचल्यावर यातली बरीच उत्तरे मिळाली होती.
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
23 Apr 2009 - 1:15 pm | खालिद
प.पू.ह. भ. प. अयप्पास्वामी वेंकटसुब्रम्हण्यम यांचा एका वाक्यातील उपदेश याच काय तर सर्व प्रश्नांचे उत्तर देउन जातो
"जगा आणि जगू द्या"
याच तत्वज्ञानाचे निरूपण करताना पुढे ते म्हणतात,
"प्रत्येकाने स्वतःचेच बघावे. दुसर्याचे बघायला गेल्यास आत्मप्रौढी अथवा न्यूनगंड निर्माण होउ शकतो."